Friday 1 March 2013

बुद्धिप्रामाण्यवाद म्हणजे काय?

अंधश्रद्धेच्या क्षेत्रात काम करत असताना, 'अंधश्रद्धा निर्मूलन करून आपल्याला समाजात काय करायचं आहे?' असा प्रश्न आम्हांला वारंवार विचारला जातो. या प्रश्नाचं उत्तर असं, की आम्हाला समाजामध्ये वैज्ञानिक प्रक्रिया र्रूील्ल३्रा्रू टी३ँ िनिर्माण करायची आहे, वैज्ञानिक दृष्टिकोन वृद्धिंगत करायचा आहे. आम्हाला बुद्धिप्रामाण्यवादी समाज बनवायचा आहे, समाजामध्ये फं३्रल्लं'्र२े रुजवायचा आहे.

हे सगळे शब्द वापरत असताना, यांचा नेमका अर्थ काय होतो? समाजामध्ये बुद्धिप्रामाण्यवाद रुजवायचा म्हणजे नेमकं काय? समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणं म्हणजे नेमकं काय? या दोन्ही गोष्टी एकच आहेत का? या प्रश्नांचा मुळातून अभ्यास करणं ही आजच्या काळाची गरज आहे. त्याच पद्धतीनं अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचीही ही अपरिहार्य अशी गरज आहे. ज्याला आपण इंग्रजीमध्ये फं३्रल्लं'्र२े असं म्हणतो, त्याचंच मराठीत केलेलं भाषांतर म्हणजे 'बुद्धिप्रामाण्यवाद'! साधरणत: विसाव्या शतकात हा शब्द मोठय़ा प्रमाणावर रूढ झाला, फं३्रल्लं'्र२े या नावाखाली मान्यता पावला. बुद्धिप्रामाण्यवाद फं३्रल्लं'्र२े हा एखादा इझम आहे का? जसा टं१७्र२े, र्रूं'्र२े व ¬ंल्लँ्रि२े मराठीत यांना म्हणतात मार्क्‍सवाद, समाजवाद, गांधीवाद. या व्यतिरिक्त आणखीही 'वाद' आहेत. या पद्धतीचा हा काही वाद आहे का? हा सुरवातीला तुमच्या-माझ्या मनामध्ये प्रश्न निर्माण होईल.पण ज्या अर्थाने आपण इझम किंवा वाद हा शब्द वापरतो, त्या अर्थाने 'बुद्धिप्रामाण्यवाद' हा कोणता वाद नाही. बुद्धिप्रामाण्यवाद यामध्ये 'वाद' हा शब्द जरी असला तरी खर्‍या अर्थानं ही एक प्रक्रिया आहे. त्याला आपण बुद्धिप्रामाण्य प्रक्रिया असं म्हणू शकतो. जीवनातल्या विविध अंगांच्या प्रश्नांची उत्तरं जरी आपल्याला या प्रक्रियेतून मिळत असली, तरी ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या वादांमध्ये जगाचं वा देशाचं अर्थशास्त्रं, समाजशास्त्र या अमूक पद्धतीचं असावं, राज्यव्यवस्था अमूक पद्धतीनं चालावी या विशिष्ट वादानुसार ती चालावी, असा आग्रह असतो. त्या पद्धतीनं बुद्धिप्रामाण्यवाद काही स्वतंत्र इझम किंवा वाद नाही.

बुद्धिप्रामाण्यवाद भारताला नवा नाही!

भारतीय परंपरेमध्ये बुद्धिप्रामाण्यवाद हा शब्द जरी नवा असला, तरी या पद्धतीची प्रक्रिया मात्र नवी नाही. 'चार्वाक ऋषींची परंपरा' ही एक वेदकालीन परंपरा आहे. चार्वाक त्या काळामध्ये विवेकवाद मांडत असत. ह्या विवेकवादाचं आजच्या काळातलं आधुनिक स्वरूप म्हणजेच बुद्धिप्रामाण्यवाद, असं आपल्याला म्हणता येईल.चार्वाकांचा विवेकवाद 'प्रत्यक्ष प्रमाण अधिक अनुमान' या स्वरूपाचा होता. म्हणजे प्रत्यक्ष प्रमाण अधिक अनुमान याच्या आधारावर जीवनातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण शोधलं पाहिजे. जीवनात जे सत्य आपल्याला शोधायचं आहे, त्याचं उत्तर प्रत्यक्ष प्रमाण आणि त्याच्या आधारावर केलेले अनुमान यातूनच आपल्याला मिळणार आहे किंवा तसं सत्य आपल्याला शोधता येणार आहे, या पद्धतीची चार्वाकांची मांडणी होती.

तुम्हाला माहित आहे, की सत्य शोधण्याच्या प्रक्रियेतूनच धर्मांचा उदय झाला आहे किंवा किमान सगळ्या धर्मांनी, 'आम्ही अंतिम सत्य शोधण्याचा प्रय▪करत आहोत' असा दावा तरी केला आहे. प्रश्न एवढाच होता, की हे जे काही 'अंतिम सत्य' आहे ते म्हणजे नेमकं काय आहे?

मानव जातीला दीर्घ काळापासून, अगदी पाषाणयुगापासून या विश्‍वासंबंधी विविध प्रश्न सतावत होते. जसे ही सृष्टी कशी निर्माण झाली? ही पृथ्वी कशी निर्माण झाली? सूर्य, चंद्र, तारे कसे निर्माण झाले? त्याच पद्धतीनं, हे का निर्माण झाले? हा प्रश्न प्रामुख्याने पडत होता.आता, हे का निर्माण झाले असावेत? आपोआप आणि विनाकारण तर हे नक्कीच निर्माण झाले नसावेत! मग कुणाची तरी यामागे एक सुनियंत्रित अशी योजना असली पाहिजे, एक कारण परंपरा असली पाहिजे आणि एका विशिष्ट उद्देशाने यांची निर्मिती झाली असली पाहिजे, या पद्धतीची मांडणी होणं स्वाभाविक होतं. ज्या कारणांकरिता सृष्टीची, माणसांची आणि इतर प्राण्यांची निर्मिती झाली, त्या कारणांचा शोध घेणं म्हणजेच 'अंतिम सत्याचा' शोध घेणं हा धर्माचा खरा उद्देश आहे, अशी मान्यता पुढे रूढ झाली.बरं, हे अंतिम सत्य म्हणजे काय? ईश्‍वर असेल, ब्रह्म असेल, ब्रह्मंड असेल, त्याही पलीकडे जाऊन प्रेमस्वरूप असेल किंवा आणखी काहीतरी असेल, या पद्धतीची मांडणी वेगवेगळ्या धर्मांनी आपापल्या पद्धतीनं केली आहे.चार्वाकांचं म्हणणं असं होतं, की 'हे अंतिम सत्य वगैरे जे काही आहे, त्याला मुळात अस्तित्वच नाही. या जागामध्ये अंतिम सत्य वगैरे काही नसतं. पण सत्य शोधण्याचा एकमात्र मार्ग आहे आणि तो म्हणजे 'प्रत्यक्ष प्रमाण' म्हणजे 'पुरावा' 'ढ१ा' ते 'ढ१ा' आणि त्याच्या आधारावर केलं जाणारं अनुमान, या दोन गोष्टींपेक्षा आणखी तिसर्‍या कोणत्याही मार्गानं आपल्याला खर्‍या अर्थानं सत्य गवसू शकत नाही किंवा सत्य शोधलं जाऊ शकत नाही'. या पद्धतीची मांडणी त्या काळामध्ये चार्वाकांनी केली.

प्रत्यक्ष प्रमाण अधिक अनुमान

आता हे आपण नेमकं समजून घेऊ, की प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे काय? त्याच्या आधारावर केलं जाणारं अनुमान म्हणजे काय? आपल्याला कल्पना असेल, की आजच्या काळामध्ये वैज्ञानिक प्रक्रिया रूढ झाली आहे म्हणून वादाचे मुद्दे फारसे उरत नाहीत, पण ज्या काळामध्ये माणसाला या पद्धतीची वैज्ञानिक प्रक्रिया आणि प्रगतीच माहीत नव्हती, त्या काळामध्ये तर्काच्या आधारावर ज्ञान मिळवणं हाही ज्ञानाच्या मार्गांमध्ये एक मार्ग मानला जात होता. कवेळ तर्क करून एका गोष्टीच्या आधारावर दुसर्‍या गोष्टीचं 'लॉजिक' आपण मांडत जायचं. तर्क करत जायचं आणि याच्या आधारावर सुद्धा आपल्याला ज्ञान मिळू शकतं, सत्य शोधून काढता येऊ शकतं, अशी मांडणी त्या काळामध्ये अनेक विद्वान, ऋषीमुनी आणि वैज्ञानिक करत असत. चार्वाकांचं म्हणणं असं होतं, की केवळ तर्काच्या आधारावर कोणतंही सत्य शोधलं जाऊ शकत नाही. हा तर्क किंवा अनुमान प्रत्यक्ष प्रमाणावरच आधारलेला असला पाहिजे. तरच आपल्याला खर्‍या अर्थानं सत्य शोधता येईल.प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे पुरावा. एखादी घडणारी घटना आपण पाचही इंद्रियांनी प्रत्यक्ष अनुभवली, ती घटना घडते आहे याचा पुरावा आपल्याला मिळाला, की त्याच्या आधारावर जे अनुमान आपण करू तेवढंच काय ते सत्य, बाकी सगळच्या सगळं असत्य. या पद्धतीनं ही मांडणी केली जाऊ शकते. याकरिता एक उदाहरण पाहू. समजा, जंगलामध्ये भटकत असताना आपण रस्ता विसरलो. कुठे जायचं याची कल्पना येत नसल्यामुळे रात्रीच्या अंधारात कुठेतरी आडोसा शोधून आपण बसलो आहोत. अशा अवस्थेत सकाळच्या झुंजूमुंजू वातावरणामध्ये सूर्याची किरणं नुकतीच पसरायला लागली आहेत. अशा वेळेस त्या अंधुकशा प्रकाशात आपल्याला कुठेतरी दूरवर धूर दिसतो. त्याबरोबर आपल्याला अत्यानंद होईल. आपण विचार करू, 'त्या ठिकाणी धूर दिसतो म्हणजे नक्कीच त्या ठिकाणी मनुष्यवस्ती असणार!' कडकडून भूक लागलेली आहे, प्रचंड तहान लागलेली आहे. त्या ठिकाणी मनुष्यवस्ती असल्यामुळे या दोन्ही गोष्टी मिळण्याची शक्यता आहे. तसेच मला आता एकटेपणाची भीती जाणवू लागली आहे. मी अडकून पडलो आहे. कदाचित मी हिंस्त्र श्‍वापदांना बळी पडेन. रात्रभर मी स्वत:ला कसंबसं वाचवलं आहे आणि आता मला त्या ठिकाणी तो निवारा, आसरा मिळण्याची शक्यता आहे. म्हणून आपल्या मनामध्ये अतिशय आनंद निर्माण होईल.

(लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक आहेत.)

भ्रमणध्वनी -९३७१0१४८३२

२ँ८ेंल्लं५.ु'ॅ२स्र३.्रल्ल

Tuesday 26 February 2013

ज्योतिष्यांनो, या १४ प्रश्नांची उत्तरे द्या!

     A A << Back to Headlines     
ज्योतिष किती खरे? किती खोटे? फलज्योतिष विज्ञान आहे काय? या विषयावर अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक प्रा. श्याम मानव आणि ज्योतिष महामंडळाचे अध्यक्ष नंदकिशोर जकातदार आज खामगावात आमनेसामने भिडणार आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील विविध पत्रकार संघटनांनी खामगावातील नॅशनल हायस्कूलच्या मैदानावर सायंकाळी ५.३0 वाजता हे आयोजन केले आहे. गेल्या २५ वर्षांत ज्योतिष हे शास्त्र असेल तर ते सिद्ध करा आणि १५ लाख रुपयांचे पारितोषिक मिळवा, हे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आव्हान स्वीकारण्यासाठी कुठलाही ज्योतिषी वा ज्योतिषी महामंडळाचा पदाधिकारी पुढे आला नाही. त्या पार्श्‍वभूमीवर नंदकिशोर जकातदारांनी ज्योतिष हे विज्ञान आहे? या विषयावर बोलण्याची तयारी दाखविली, हे महत्त्वाचे आहे. अंनिसच्या वतीने जगभरातील ज्योतिष्यांना सोबतच्या लेखातील १४ प्रश्न नेहमी विचारले जातात. आजपर्यंत त्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं कोणीही देऊ शकले नाहीत. बघूया आज काय होते ते.- संपादक१) फलज्योतिष हे शास्त्र आहे का? २) पूर्वी फलज्योतिष आणि खगोलशास्त्र एकत्र होते. ग्रीकांपासून, आर्यभट्टापासून ते गॅलिलिओ-कोपर्निकसपर्यंत अनेक सुप्रसिद्ध खगोलशास्त्री ज्योतिषीही होते, पण एकोणिसाव्या शतकात खगोलशास्त्र व फलज्योतिष वेगळे झाले, ते का? ३) खगोलशास्त्र ही विज्ञानाची व वैज्ञानिक अभ्यासाची महत्त्वाची शाखा झाली. त्याचा अभ्यास जगभराच्या सगळय़ा विद्यापीठांमधून होता; परंतु फलज्योतिष मात्र चोथा समजून विज्ञानाने फेकून दिले. असे का? ४) जगभराच्या 186 वैज्ञानिकांनी, ज्यात १९ नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ आहेत, 'फलज्योतिष हे शास्त्र नाही. तो केवळ काही लोकांचा पोट भरण्याचा धंदा आहे. त्यावर जनतेने विश्‍वास ठेवू नये,' असे पत्रक काढले व ते जगभर प्रसिद्ध केले. त्याबद्दल 'ज्योतिष अधिवेशना'चे काय मत आहे? ५) आजचे फलज्योतिषी ९ (किंवा १२) ग्रह मानतात. त्यात राहू, केतू नावाचे ग्रहही मानतात. प्रत्यक्षात राहू-केतू अस्तित्वातच नाहीत. ते ग्रहही नाहीत. तरी ज्योतिषी मात्र आजही जनतेच्या कुंडल्यांमध्ये (होरोस्कोप) राहू-केतू फिरवतच असतात. ते का? कसे? अस्तित्वात नसलेल्या राहू-केतूंना स्थान देणा?र्‍या कुंडल्या किती विश्‍वसनीय असू शकतात? व त्या आधारावर उभ्या असणा?र्‍या फलज्योतिषात कितपत अर्थ असू शकतो? ६) चंद्र-सूर्याला ग्रह म्हणून आजही स्थान दिले जाते. चंद्र हा उपग्रह आहे, हे खगोलशास्त्राच्या ज्ञानामुळे पाचव्या वर्गातल्या मुलालाही ज्ञात असते. तरी सुशिक्षित विद्वान ज्योतिषीही चंद्राला ग्रह म्हणूनच कुंडलीत स्थान देतात. अशा अवस्थेत विद्वान ज्योतिष्यांपेक्षा पाचव्या वर्गातल्या मुलांनाही अधिक ज्ञान असते, असे का मानू नये? ७) सूर्य हाही ग्रह म्हणूनच कुंडलीत मांडला जातो व आजही ज्योतिषी पृथ्वीभोवतीच (कुंडलीत) सूर्याला फिरवत असतात. सूर्य हा तारा आहे. तो ग्रह नाही व पृथ्वी इतर ग्रहांसोबत सूर्याभोवती फिरते हे शाळकरी मुलांना जसे शिकवले जाते तसेच ज्योतिष्यांना शिकवावे, प्रसंगी त्यांच्यासाठी स्वतंत्र शाळा काढाव्यात, अशी विनंती आम्ही

सरकारला करावी काय? ८) पृथ्वी हा ग्रह आहे. त्याचा पत्रिकेत ग्रह म्हणून का समावेश नाही? ९) ग्रहाचा मानवी जीवन प्रवाहावर परिणाम होतो असे फलज्योतिषी सांगतात व त्यावरच त्यांचे शास्त्र अवलंबून आहे. याला वैज्ञानिक आधार काय? एकाच स्थळी व एकाच ठिकाणी राहणा?र्‍या माणसांवर एकाच ग्रहाचे, ते केवळ वेगवेगळय़ा वेळी जन्मले म्हणून वेगवेगळे परिणाम कसे होतील? १0) सगळे ग्रह व सूर्य यांची भ्रमणकक्षा व काळ निश्‍चित आहे. पुढील पाच हजार वा पाच लाख वर्षांनंतर तो निश्‍चित ठरावीकच असणार आहे. याचाच अर्थ ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक मनुष्याचे भविष्य तो जन्मत:च ठरलेले असते. असे असतानाही अनेक ज्योतिषी ग्रहदशा बदलण्याचे व ग्रहांचे अरिष्ट टाळण्यासाठी अनेक पूजा, ताईत, खडे वगैरे उपाय सांगतात व ठरलेले आयुष्य बदलवता येते असेही सांगतात. ते कसे? ग्रहांची दिशा, स्थान व भ्रमण निश्‍चित असूनही या उपायांनी माणसांचे भविष्य बदलतेच कसे? हे सगळे उपाय म्हणजे सामान्य लोकांना लुबाडण्याची ज्योतिष्यांची एक क्लृप्ती नव्हे काय? मुळात माणसांचं आयुष्य ठरलेलं असतं हे सांगणंच लबाडी नव्हे काय? ११) माणसाचा जन्म आणि मृत्यू ठरलेला असतो का? ठरलेला नसेल तर फलज्योतिषाला काही आधार उरेल काय? पण जर जन्म ठरलाच असेल तर मनुष्य स्वत: निर्णय घेऊन आजच्या काळात भारतीय कायद्याच्या परवानगीने कृत्रिम गभर्पात करतो व जन्माला येणा?र्‍या नव्या मनुष्याचे अख्खे आयुष्यच थांबवतो, हे कसे? ठरलेला जन्म कृत्रिम उपायांनी थांबवणारा मनुष्य ग्रहांपेक्षा वा नियंत्यापेक्षा मोठा मानायचा का? १२) मृत्यू ठरलेला असतो का? अ) तो जर ठरलेला असेल तर, १९३0 साली भारतीय माणसाचे सरासरी आयुष्य केवळ १८ वर्षे होते. आता ते ६८ वर्षांपेक्षा अधिक झाले आहे. हे अधिकचे सरासरी आयुष्य भारतीयांच्या वाट्याला कुठून आले? याचे उत्तर फलज्योतिष्यांना पत्रिकांमध्ये दाखवता येईल का? आ) मृत्यू ठरलेला असतो असे मानणारे ज्योतिषी आपल्या घरच्यांना व स्वत:लाही औषधोपचार का करतात? ते डॉक्टरांची मदत का घेतात? जर मृत्यू ठरलेल्या क्षणीच होणार असेल तर डॉक्टरांची मदत घेऊन स्वत:चा व स्वत:च्या नातेवाईकांचा जीव वाचविण्याचा प्रय▪करून पैसा फुकट घालविणे मूर्खपणाचे नव्हे का? इ) एकाच अपघातात ज्यावेळी शेकडो लोक मरतात त्या वेळी त्या सगळय़ांचा मृत्युयोग असतो काय? नागासाकी-हिरोशिमा अणुस्फोट व सगळय़ाच मोठय़ा अपघातांबद्दल काय? तसा पुरावा पत्रिका तपासून देता येईल काय? १३) अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती गेल्या पंचवीस वर्षांपासून ज्योतिष्यांना सारखी आव्हाने देत आहे, तरी ज्योतिषी ती आव्हाने स्वीकारून अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे तोंड एकदाचे बंद का करीत नाही? १४) दोनदा २0-२0 पत्रिकांच्या आधारे, माणूस मेलेला आहे की जिवंत आहे व स्त्री की पुरुष आहे हे सांगा. दोन्ही वेळेस उत्तरे ९0 टक्क्यांपेक्षा अधिक ९५ टक्के अचूक निघायला हवीत, तर १५ लाख रुपयांचे पारितोषिक मिळेल किंवा मानवी जीवनातील, तपासून शहानिशा करता येतील अशा कोणत्याही पाच घटना (लग्न, मूल, नोकरी, शिक्षण, अपघात, बढती वगैरे) वीस पत्रिकांच्या आधारे सांगाव्यात. त्या ९0 टक्के ख?र्‍या ठराव्यात. दोनदा वीस-वीस पत्रिकांची भाकिते ९0 टक्के अचूक निघावीत. १५ लाख मिळतील; पण ७0 टक्के जरी खरी निघाली (दोनदा २0-२0) तरी ते शास्त्र असू शकते असे आम्ही मानू, अशी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन नागपूर समितीने पुणे, धुळे, अमरावती या चारही अ. भा. ज्योतिष अधिवेशनात जाहीर आव्हाने दिली होती. ती आव्हाने स्वीकारून आपली बाजू सत्य असल्याचे ज्योतिष महामंडळ का सिद्ध करू शकले नाही? याचा अर्थ, फलज्योतिषशास्त्र नाही असाच घ्यायचा का?

(लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक, संघटक आहेत.)

भ्रमणध्वनी - ९३७१0१४८३२

२ँ८ेंल्लं५.ु'ॅ२स्र३.्रल्ल
     

     << Back to Headlines     

माणूस प्रेमात पडतो म्हणजे नेमकं काय होतं?


मागचा प्रेमावरचा लेख प्रसिद्ध झाला आणि फोन सारखा खणखणू लागला. 'फार सुंदर', 'महत्त्वाच्या विषयाला चालना दिली अभिनंदन'! 'प्रेमाला प्रतिष्ठा दिली त्याबद्दल धन्यवाद'! असे खूप फोन होते. पण 'तुम्ही लिहिलं त्यात शेवटपर्यंत प्रेम म्हणजे काय ते कळलयच नाही'. 'विषयवासना, सेक्स म्हणजे प्रेम असं तुम्हांला म्हणायचं आहे का?' 'तुमच्यासारख्या विचारी माणसानं 'अशा' विषयावर का लिहावं? अशाही प्रतिक्रिया होत्या, तर काही फोन फारच विचित्र होते. माझ्या एका ओळखीच्या मुलीचं प्रेम जुळलं. त्या दोघांचं प्रेम मला तोडायचं आहे. ती त्याच्यासोबत कधीच सुखी होणार नाही. कसं तोडू हे प्रेम? कसं वाचवू तिला? तर प्रेम कसं करायचं? समोरच्या व्यक्तीला प्रेमात कसं पाडायचं? असे प्रश्न विचारणारेही काही फोन होते.

'प्रेम' हा माझ्या दृष्टीनं महत्त्वाचा, फार महत्त्वाचा, आदराचा, अभ्यास करण्याचा, समजून घेण्याचा विषय आहे. भाऊ, प्रेम म्हणजे नेमकं काय? हे सांगणं फार कठीण आहे. मी आधीच सांगितलं व्यक्तिपरत्वे प्रेमाची व्याख्या बदलते. बदलू शकते. व्यक्तीनुसार प्रेमाची तीव्रता, प्रेमभावनेची पातळी बदलते. तरी सर्व माणसांनी सर्वाच्या हृदयाला जाणवणारी, स्पर्शधारी ही भावना आहे. सर्वाना जाणवते, स्पर्शते, उसासो सोडायला लावते हाच या भावनेतला 'समान दुआ', 'समान धागा' आहे.

आयुष्यात कधीच प्रेमात पडली नसेल अशी व्यक्ती अपवादच असली पाहिजे. माणूस प्रेमात कां पडतो? प्रेमात कसा पडतो? सामान्यत: एखादी विरुद्ध लिंगीय व्यक्ती आवडते. खूप खूप आवडते. फारच आवडते. तिच्याविषयी जबरदस्त ओढ वाटते. आकर्षण वाटतं. तिच्या सहवासात राहावसं वाटतं. तिला पाहत राहावसं वाटतं. तिच्यासोबत बोलत राहावसं वाटतं. समोर नसताना सारखी ती व्यक्ती आठवत राहते.

तिच्या आठवणीत रमताना खूप छान वाटतं. ती अचानक समोर दिसली तर छातीत धडधड होते. पण ही 'धडधड' खूप छान, हवीहवीशी वाटते. ती हसली की, सारं आसमंत फुलल्यासारखं वाटतं. ती 'रडवेली' झाली, दु:खी झाली की, आसमंतात मळभ दाटून आल्यासारखं वाटतं. सारं विचारांचं, भावनांचं केंद्र ती व्यक्ती बनून बसते. असं काहीसं घडू लागलं की, माणूस प्रेमात पडला असं फार तर म्हणता येईल.

दोन माणसं कोणत्या तरी निमित्तानं वा रस्त्यानं जाताना अचानक समोर येतात. सहज नजरानजर होते आणि एक घडलेला किस्सा. कॉलेज लायब्ररीतून 'तो' बाहेर पडला. वर्गात जाण्यासाठी तेवढय़ात जोरदार पावसाची सर आली. लायब्ररीसमोरून क्लासमध्ये जाणारी 'ती' पावसापासून वाचण्यासाठी लायब्ररीच्या व्हरांडय़ाच्या आडोशाला आली. काहीशी भिजलेली. केसांवर पाण्याचे थेंब मोत्यांसारखे चमकू लागलेले. सलवार कमीजचं कमीज अंगाला चिपकू लागलेलं. आपल्या वक्षस्थळाचं संरक्षण करण्यासाठी वह्या-पुस्तकांचा गठ्ठा तिनं छातीसमोर ढालीसारखा धरलेला. पण.. पावसाचा जोर वाढला. शिंतोडे अंगावर येऊ लागले. आत सरकण्यास जागा नाही. सारा व्हरांडा गर्दीनं ओसंडून वाहतोय. मुलांमध्ये शिरण्याची तिची हिंमत नाही. आतील पोलला लागून असलेल्या सुरक्षित जागी उभ्या असलेल्या त्याचं तिच्याकडे लक्ष जातं. डोळ्यानंच तो तिला जवळ येण्याची खूण करतो. पण ती कळूनही हिंमत करू शकत नाही. 'एका मुलाजवळ उभं राहायचं?' पुन्हा तो खुणावतो. आता पावसाचे शिंतोडे तिला अधिकच भिजवू लागलेले. नाइलाजानं ती तिथे येऊ लागते. तो अदबीनं सरकतो. तिला सुरक्षित जागेत घुसू देतो आणि तत्काळ तिथून हलून तिच्या भिजवणीच्या जागेवर जाऊन उभा राहतो. तिला खूप हायसं वाटतं. तो जवळ चिकटून उभं राहण्याचा चान्स त्यानं घेतला नाही म्हणून. पण त्याला थँक्स म्हणायला हवं. पण म्हणायचं कसं? त्याचं लक्षच नाही. शेवटी त्याचं लक्ष जातं. ती डोळ्यांनीच थँक्स म्हणून जाते. अन् त्यानं पहिल्यांदा तिचे ते टप्पोरे, शिलेदार, समुद्राच्या अथांग पाण्यासारखे पाणीदार डोळे पाहिले. इतके सुंदर डोळे? अन् तो त्या डोळ्यांतच अडकून जातो. एकसारखा एकटक पाहत राहतो. तिच्या डोळ्यांत डुबू लागतो. अथांग महासागरात खोल खोल उतरू लागतो. एकटक, एकाग्रतेनं पाहत राहतो. भान हरपून मनसोक्त खोल खोल जात राहतो.

काही क्षण तीही भान हरपून, एकटक, एकाग्रतेनं पाहते. साध्याच दिसणार्‍या या तरुणाच्या भावपूर्ण, जितकं स्वच्छ डोळ्यांमध्ये आपण केव्हा अडकून पडलो हे तिच्या लक्षातच येत नाही. थोडय़ाच वेळात भानावर येते. नजर खाली घेते. पुन्हा पाहते तर तो भान हरपून पाहतोच आहे. त्याची ब्रह्मनंदी टाळी लागली आहे. पापणीही न हलवता तो सारखा पाहतोच आहे. तिला काय करावं ते कळतंच नाही. असा अनुभव तिनं कधी घेतलाच नाही. त्याच्या नजरेत अडकून जायला होतं. नजर काढता काढता येत नाही. काय आहे असं त्या डोळ्यांत? आतवर, खोलवर काहीतरी शिरतं सारं. हृदय आतून असं घुसळू लागतं. कसं कसं, पण छान छान वाटतं. बराच वेळ दोघांचे डोळे सारखे एकदुसर्‍यात गुंतत होते. ती सारखी नजर खाली घ्यायची, पण पुन्हा पाहण्याची अनिवार इच्छा व्हायची. पुन्हा पाहायची. डोळ्यांत अडकायची. तो मात्र एकटक पाहतच होता. अडकूनच पडला होता. किती वेळ उलटला माहीत नाही. पाऊस ओसरला. थांबला. व्हरांडा रिकामा होऊ लागला. नाइलाजानं तीही निघाली. पण त्याची नजर मात्र सारखी तिच्या डोळ्यांचाच वेध घेत होती. झालं तो तिच्या प्रेमात पडला. आकंठ बुडाला. तिच्यावर प्रेमकविता करू लागला. त्याचं सारं विश्व तिच्या अस्तित्वानं, तिच्या डोळ्यांनी व्यापलं. 1970च्या दशकातलं हे प्रेम. याला म्हणायचं 'लव्ह अँट फर्स्ट साईट'.'दिसताक्षणीच प्रेमात पडणं'.

हा एक प्रेमाचा प्रकार, प्रेमाचा आविष्कार. माणूस दिसताक्षणीच कसा काय प्रेमात पडू शकतो? समोरची व्यक्ती कोण? कुठली? काय करते? काय योग्यतेची आहे? काहीच माहीत नसताना माणूस असा प्रेमात पडतो हे मात्र खरं आहे. अनेक माणसं प्रत्यक्ष जीवनात या प्रकारे प्रेमात पडली आहेत हेही तेवढंच खरं आहे. अशा प्रेमाची परिणती काय होते? प्रेमाची यशस्विता म्हणजे लगAात रूपांतर होणं असं मानलं तर कदाचित अशा प्रकारच्या प्रेमाचा सक्सेस रेट कमीच असणार आहे. कारण प्रेमात पडताना कुठलीच व्यावहारिक बाजू पाहिलेली नसल्यामुळं दोन पात्रांत जर फारच व्यावहारिक अंत असेल. उदा. जात, धर्म, खानदान, आर्थिक स्थिती, दोन्ही कुटुंबांतील संस्कृती, कर्मठपणा, आधुनिकपणा तर लगAात रूपांतर होणं अशक्यप्रायच होऊन बसतं. म्हणून काय ते प्रेम कमी दर्जाचं असतं? कम अस्सल असतं?

पण तो तिच्या प्रेमात कां पडला? फक्त निळ्या डोळ्यांच्या प्रेमात पडला? मग कोणत्याही निळे डोळे असलेल्या मुलीच्या प्रेमात तो पडेल का? त्याने आधी निळे डोळे कधीच पाहिले नव्हते का? ती खूप सुंदर आहे म्हणून तो प्रेमात पडला कां? त्यापेक्षा अधिक सुंदर मुलगी त्यानं आधी पाहिली नव्हती कां? निळे डोळे असणारी मुलगी काही ही पहिलीच नाही आणि तिच्यापेक्षाही सुंदर मुली त्याच्या आसपास वावरतच होत्या. मग तो तिच्यात प्रेमात कां पडला? आणि नकळत प्रेमात पडला. खूप खूप सिर्मस प्रेमात पडला? का? या प्रश्नाचं उत्तर मी वर्षानुवर्षे शोधतोय. खूप लोकांचं 'लव्ह अँट फर्स्ट साईट' समजून घेतलं. मानसशास्त्रीय अंगानं अभ्यास केला. जे उत्तर गवसतं आहे ते देण्याचा प्रयत्न करतो आहे. माणूस जन्माला आल्यानंतर अगदी बालवयापासून तो माणसांना पारखू लागतो. ओळखू लागतो. काही माणसं त्याला खूप भावतात. काही माणसं खूप आवडतात. त्यांच्याजवळ ही मुलं चटकन जातात. रमतात, आनंदी होतात. कदाचित ही माणसं त्यांच्याशी खूप चांगली वागतात. त्यांना आवडेल अशा पद्धतीनं प्रेम करतात. त्यांना मुळीच वाईट अनुभव न देता फक्त चांगलेच अनुभव देतात, तर काही माणसांजवळ ही लहान मुलं मुळीच जात नाही. जाऊ इच्छित नाही.

साधारणत: मुलं 4-5 वर्षाची व्हायला लागली की, त्यांना स्त्री, पुरुष वेगळे आहेत याची तीव्र जाणीव व्हायला लागते. विरुद्ध लिंगीय व्यक्तीविषयीच्या कुतूहलाचं, उत्सुकतेचं रूपांतर आकर्षणात होण्याच्या सुरुवातीचा हा कालावधी असतो. वय वर्ष 5 ते 10-11 वर्षापर्यंत अशी आवडणारी, भावणारी व्यक्ती जर वारंवार सहवासात आली, प्रेम करू लागली, गालगुच्चे घेऊ लागली, गालांचे चुंबन घेऊ लागली, छातीशी आवळू लागली, आलिंगन देऊ लागली, तर हे मूल त्या व्यक्तीच्या प्रेमात पडतं. कदाचित हे मूल 5-6 वर्षाचं असेल. ती विरुद्ध लिंगीय व्यक्ती 10 वर्षे ते 30-35 वर्षाचीही असेल तरी असं घडू शकतं, घडतं. अर्थात त्या मुलाला वा मुलीला आपण प्रेमात पडलो हे फार तीव्रतेनं कळतंच असं नाही. फक्त ती व्यक्ती खूप आवडते. तिचा सहवास खूप आवडतो एवढंच त्यावेळी कळत असतं. जर या दोघांमधले हे प्रेमसंबंध (अत्यंत निकोप, निर्वाज्य. यात कुठेही रूढार्थानं सेक्स नसतो, रोमांस नसतो.) काही काळ चालले तर त्या मुलांच्या मनात खोलवर ते घर करून जातात. प्रेमात पडलेल्या मोठय़ा वयाच्या व्यक्तीची प्रतिमा या मुलांच्या हृदयात बंदिस्त होते.

अनेकदा ही प्रेम व्यक्ती जीवनातून निघून जाते, दूर जाते अथवा तिचं लगA होऊन ती वेगळ्या अर्थानं दुरावते. पण वाढत्या वयासोबत या मुलांच्या मनातील ती प्रेम-प्रतिमा तशीच हृदयात बंदिस्त राहते. वयात आल्यावर मनात खोलवर रुजलेल्या प्रेम-प्रतिमेसारखीच वा त्याच्या आसपासची एखादी व्यक्ती दिसताच आपल्या मनातील खोलवर रुजलेली प्रतिमा हीच आहे असं त्याच्या मनाला नकळत वाटतं आणि माणूस 'लव्ह अँट फर्स्ट साईट' पडू शकतो. खरं म्हणजे तो स्वत:च्या मनात रुजलेल्या प्रेमातच पुन्हा पडत असतो.

(लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक, संघटक आहेत.)

भ्रमणध्वनी - 9371014832

Monday 11 February 2013

प्रेम म्हणजे नक्की काय? खरं प्रेम कशाला म्हणायचं?

प्रेम, ढाई अक्षर प्रेम का. एक अद्भुत अनुभव. एक अवर्णनीय अनुभूती. सार्‍या जगाला वेड लावणारी गोष्ट. सामान्य माणसाकडून अतक्र्य गोष्ट घडवून आणण्याचं कारण. माणसाला जगण्याचा प्रेरणास्नेत ठरणारी तीव्रतर भावना. माणसाला जीवन संपवून टाकण्यास प्रवृत्त करणारी, निराशेचं टोक गाठायला लावणारी असहनीय भावना आणि दुसर्‍याचं जीवनचं संपवून टाकण्यास मजबूर करणारी, अमानुष कृत्याची जन्मदाती विखारी भावना. या सार्‍यांना प्रेमचं म्हणायचं?

प्रियकरानं प्रेयसीच्या बहिणीच्या घरासमोर स्वत:वर सपासप चाकूनं वार करून घेतलेत. खिशात चिठ्ठी सापडली, 'मी तुझ्याशिवाय जगूच शकत नाही म्हणून आत्महत्या करतोय.' काल-परवाची एक बातमी. एकतर्फी प्रेमातून प्रियकरानं प्रेयसीचा खून केला. प्रियकरानं प्रेयसीच्या तोंडावर अँसिड फेकले. कॉलेज परिसरात प्रियकरानं प्रेयसीच्या छाताडात सर्वासमक्ष बंदुकीच्या गोळ्य़ा घातल्या. या पद्धतीच्या कितीतरी बातम्या आपण सातत्यानं वाचत, ऐकत आलो आहोत.

निसर्गानंच नर-मादीमध्ये जबरदस्त आकर्षण निर्माण केलं आहे. जेणेकरून स्त्री-पुरुषांनी एक-दुसर्‍याकडे प्रचंड ओढीनं आकर्षित व्हावं. एक-दुसर्‍यांसोबत प्रणयाराधन करावं. त्यातून अपत्य प्राप्ती व्हावी. माणसाचं मूल खूप परावलंबी असतं. ते स्वत:च्या भरवशावर जगण्यायोग्य बनेपर्यंत मातेनं त्याला सांभाळंलच पाहिजे. नाहीतर ते मरेल. म्हणून निसर्गानंच गर्भवती स्त्रीच्या मनात होणार्‍या बाळाविषयी प्रचंड ओढ निर्माण व्हावी, वाट्टेल त्या परिस्थितीत, प्रसंगी स्वत:चा जीव धोक्यात घालून आपल्या बाळाचं संरक्षण, संगोपन करावं असं वात्सल्ययुक्त प्रेम निर्माण केलं आहे. निसर्गाच्या या दोन्ही गरजा आहेत. त्यातून दोन प्रकारचं प्रेम. एक वैषयिक प्रेम आणि दुसरं वात्सल्ययुक्त प्रेम निर्माण झालं आहे.

गुहांमध्ये राहणार्‍या रानटी नर-मादीचं पुढे जाऊन शेती करणार्‍या कुटुंबवत्सल माणसांमध्ये रूपांतर झालं. माणसानं लग्न संस्था निर्माण केली. एक नवरा, एक बायको असं नातं गेल्या शेकडो वर्षात रुजू लागलं. माणूस संस्कारित होत गेला आणि त्याची 'प्रेमाची गोष्ट' बदलत गेली. नर-मादीनं परस्परांजवळ यावं यासाठी निर्माण झालेलं प्रेम वात्सल्ययुक्त प्रेमाच्या सहवासात उन्नयीत होऊ लागलं. केवळ रतिक्रीडेपर्यंत मर्यादित असणारं नर-मादीमधील प्रेम, बदलून दीर्घकाळ टिकणारं, वात्सल्ययुक्त आणि वैषयिक या दोहोचं मिश्रण असणारं एक नवंच प्रेम उदयास आलं. या नव्या प्रेमाला समाजात, मानवी मनात प्रतिष्ठा प्राप्त झाली. हे अधिक सुसंस्कारित प्रेम मानलं जाऊ लागलं.

आणि आजच्या समाजात जन्माला आल्यापासून कथा, कादंबर्‍या, सिनेमा, टी.व्ही. सार्‍या माध्यमातून 'प्रेम एके प्रेम, प्रेम दुने प्रेम' सारखं मनावर आदळत असतं. नैसर्गिक ओढ असतेच. त्यात संस्कारातून सारखं प्रेमाचं प्रोग्रामिंग मनात रुजत असतं. त्यामुळं वयात येताना, आल्यावर जवळपास प्रत्येक तरुण-तरुणी प्रेमात पडते. काही जण अलगदरीत्या नकळत प्रेम जाळ्य़ात अडकतात. आपण प्रेमात केव्हा पडलो हे त्यांना कळतही नाही. काही जणं समजून-सवरून-पाहून समोरचं पात्र आपल्या लायकीचं आहे, नाही याचा विचार करून प्रेमात पडतात आणि काही जण प्रेमात पडल्याचं दाखवतात. मोठय़ा शहरात कॉलेजियन्समध्ये बॉयफ्रेड, गर्लफ्रेड असणं हा स्टेटस् सिम्बॉल झाला आहे. त्यापेक्षा बॉयफ्रेंड नसणं हा फार मोठा 'पराभव' मानला जातो. त्यामुळं किमान दाखविण्यासाठी तरी बॉयफ्रेंड, गर्लफ्रेंड असली पाहिजे या अपरिहार्यतेतून प्रेमात असणं गरजेचं झालं आहे.

प्रेमात पडणं जेवढं स्वाभाविक आहे तेवढंच प्रेमात आपटणंसुद्धा स्वाभाविक आहे. प्रेमभंग आजही होतात. एकीकडे आजही देवदास निर्माण होतात तर दुसरीकडे कॉलेजच्या 3-4 वर्षाच्या काळात 3-4 प्रेमप्रकरणं होणं, सिरियस अफेअर्स होणं, स्वाभाविक समजलं जाण्याइतपत कॉमन झालंय काही तरुणांच्या जीवनात.

'प्रेम' हा एक शब्द असला तरी त्याची अनुभूती, त्याचा अर्थ, त्याची व्याख्या व्यक्तिपरत्वे वेगवेगळी असू शकते. मोठय़ा शहरांनुसार, छोटय़ा गावांनुसारही ती बदलते. वयाच्या 19व्या वर्षापासून मी सामाजिक चळवळीत आहे. 14-15 वर्षे विविध वृत्तपत्रे, साप्ताहिकांमधून 'युथ कॉलम चालविले आहेत. युवकांकरता लिखाण केलं आणि गेली 23 वर्षे मुंबईतून व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळा चालविण्याच्या माध्यमात तरुण-तरुणींशी संवाद साधतो आहे. कौन्सिलिंगच्या निमित्तानं त्यांच्या प्रेम समस्या समजून घेतो आहे. पुण्या-मुंबईपासून ते कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अमरावती या शहरी भागातील युवकांसोबतच छोटय़ा गावातील युवकांनाही समजून घेण्याची संधी माझ्या कार्यशाळांमुळं मला सातत्यानं मिळते. त्यांचं भावविश्व, प्रेमविश्व मी दीर्घकाळापासून समजून घेतो आहे आणि म्हणूनच याही क्षेत्रात आपलं प्रशिक्षण होणं गरजेचं आहे असं तीव्रतेनं वाटतं. म्हणूनच या लेखाचा हा प्रपंच. कदाचित कळत-नकळत आणि जाणीवपूर्वकसुद्धा माझ्या आयुष्यात मला सगळ्य़ात जास्त प्रेम, प्रेम समस्या हाताळाव्या लागल्या. प्रेमात पडलेल्या, त्यापेक्षा जास्त प्रेमभंग झालेल्या तरुण-तरुणींना समजावावं लागलं, त्यांचं समुपदेशन करावं लागलं. एक चळवळीचा नेता, वृत्तपत्र-स्तंभलेखक आणि समुपदेशक या तिन्ही नात्यांनी 'प्रेम' या विषयाचा खूप अभ्यास करावा लागला. विचार करावा लागला. शिवाय एक व्यक्ती म्हणूनही या विषयाचा, प्रेमाचा व्यक्तिगत जीवनावर, जडणघडणीवर गहिरा परिणाम झाला आहे.

गेल्या चाळीस वर्षात तीन पिढय़ांना मी 'प्रेम' करताना, जगताना पाहतो आहे. पण प्रेम म्हणजे नक्की काय? कशाला खरं प्रेम म्हणावं? कोणतं प्रेम उच्च दर्जाचं? कोणतं प्रेम कनिष्ठ दर्जाचं? कुणाचं प्रेम किती जास्त? कुणाचं किती कमी? खरं प्रेम आहे की फक्त इनफॅच्युएशन, 'आकर्षण' आहे. प्लॅटोनिक प्रेम श्रेष्ठ आणि वासनेनं भरलेलं प्रेम खालच्या पातळीचं समजायचं काय? माणूस आयुष्यात एकदाच प्रेम करतो का? जो एकदाच प्रेम करतो ते खरं प्रेम? जो एकापेक्षा अधिकदा प्रेम करतो ते खरं नाही का? का? एकतर्फी प्रेम अर्थहीन का?

अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधतोय माणसांची मनं. मला छान कळतात असं खूप लोकांना वाटतं. मलाही कधीकधी तसं वाटतं. माझा मानसशास्त्राचा अभ्यासही चांगला आहे. या सगळ्य़ा प्रश्नांची उत्तरं निश्चित, ठळकपणे देता येणं शक्य नसलं तरी या विषयावर छान 'विचारमंथन' मांडलं जाऊ शकतं. यावर आपण विस्तारानं नंतर चर्चा करूच. पण आज मात्र काही अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी सगळ्य़ाच माणसांना, स्त्री-पुरुषांना, तरुण-तरुणींना, मुला-मुलींना सांगायच्या आहेत. मानव जातीच्या धारणेसाठी, मानवतेसाठी हे अत्यंत महत्त्वाचे नियम आहेत. कोणत्याही परिस्थितीत ते आपण पायदळी तुडवता कामा नये, हे आपण समजून घेतलं पाहिजे.

एक - मानवी जीवनात प्रेम ही एक नितांत सुंदर भावना आहे. खूप हवीहवीशी वाटणारी, सार्‍या जीवनाचं सार्थक झाल्याचं वाटणारी भावना आहे. सारं जीवन व्यापून टाकणारी अद्वितीय भावना आहे. पण स्वत:चं आणि दुसर्‍याचं 'मानवी जीवन' त्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे. जगण्यापेक्षा प्रेम अधिक महत्त्वाचं असूच शकत नाही. 'सो नो टू डेथ.' मृत्यूला नकार द्या. स्वत:च्या, दुसर्‍याच्या आणि दोघांच्याही. आत्महत्या, खून दोन्हीही नाही.

कितीही प्रेमात पडला, आकंठ बुडाला आणि पुढे, प्रेमभंग झाला तरी.. या प्रेमभंगातून बाहेर पडता येतं. पुन्हा सरसरून जगता येतं. प्रेमाबाहेरही जीवनात खूप काही करण्यासारखं असतं. जीवनातील अनेक क्षेत्रे आपल्या 'डिव्होशनची' वाट पाहत असतात. प्रेमाची ही ऊर्जा त्या कामात टाका. ते काम

फुलून येईल. सरसरून, तरारून उठेल. त्याचा वटवृक्ष निर्माण होईल.

देवदास हा मानवी जीवनातील आदर्श असूच शकत नाही. तो स्वत:ही कधी आनंदानं जगला नाही. त्यानं त्याच्या आई-वडिलांनाही आनंद दिला नाही आणि त्याच्यावर प्रेम करणार्‍या पारो, चंद्रमुखींनाही कधी आनंदानं जगू दिलं नाही. देवदास हा केवळ पराभूतांचा, षंढांचा, कर्तृत्वहीनांचाच आदर्श असू शकतो. त्याचं दाढी वाढवणं, त्याचं दारू ढोसणं, हाय चंद्रमुखी, हाय पारो म्हणत म्हणत, टाचा घासत घासत उसासे सोडणं सारंच त्याज्य आहे, नाकारणीय आहे.

दोन - एकदा प्रेमात पडल्यावर, दोघांनीही प्रेमात पडल्याची कबुली दिल्यावर ते आयुष्यभर निभावलंच पाहिजे असा एक अलिखित नियमच प्रेम विश्वास निर्माण झाला आहे. हा नियम उत्तम असू शकतो, उत्तम आहे. पण.. नाहीतर धोका, बेवफाई हे लेबलही योग्य नाही. सुरुवातीस दोन पात्र एक-दुसर्‍यांना भेटतात तेव्हा सारंच नवं असतं. वरवरचं असतं. कदाचित एक-दुसर्‍यांची खरी ओळख पटण्याआधीच दोन वरवरचे मुखवटे एक-दुसर्‍याच्या प्रेमात पडतात. जसजसे जवळ येतात, काळ पुढे सरकतो, तसतसे मुखवटे गळून पडतात. आतला खरा माणूस बाहेर येतो. भारतीय समाजात या मुखवटय़ांचं प्रमाण खूपच जास्त आहे. कदाचित मुखवटय़ाआड दडलेला 'खरा माणूस एकदम वेगळाच आहे' असं नंतर लक्षात आल्यावर ते प्रेम सुरू राहणं शक्यच नसतं. अशावेळी एखाद्यानं माघार घ्यायचं ठरवलं तर तसं करण्याचा त्याला तिला अधिकार आहे हे आपण समजून घ्यायला हवं. असं समजून घेणं सोपं नाही. 'दिल टूटता है, टुकडे टुकडे होते है, हृदय छिन्न-भिन्न होतं.' हे सगळं मला कळतं. तरी ज्याच्यावर आपण एवढं प्रेम करतो त्याच्या माघारी फिरण्याच्या निर्णयाचा आपण मनापासून सन्मान केला पाहिजे, आदर केला पाहिजे. त्याचा मार्ग मोकळा केला पाहिजे. कोणत्याही प्रकारे इमोशनली ब्लॅकमेल न करता त्या व्यक्तीला जाऊ द्यायला हवं. व्यभिचारी, बेवफा म्हणणं, तोंडावर अँसिड फेकणं, तिची येनकेन प्रकारे बदनामी करणं, तिचं जीवन असह्य होईल असं आपण वागणं हा आपण करत असलेल्या प्रेमाचाच अपमान आहे हे समजून घेतलं पाहिजे.

त्यानंतरही सामान्य मैत्री ठेवायची की नाही हा मात्र तुमचा अधिकार आहे. एकदा तुमच्या प्रेम पात्रानं नाही म्हटल्यावर सामान्य मैत्रीसुद्धा न ठेवता, कायमचे त्या व्यक्तीच्या आयुष्यातून निघून जाण्याचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे. थोडक्यात, तुम्हाला स्वत:ला वाचविण्याचा, मनाला कमीत कमी जखमा होतील याप्रमाणं वागण्याचा पुरेपूर अधिकार आहे. एकतर्फी प्रेमही तेवढंच खरं असतं. पण.. पुढे पाहू.

(लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक आहेत.)

भ्रमणध्वनी- 9371014832

परीक्षेच्या काळात माईंड रिलॅक्स ठेवा, टेन्शन अजिबात घेऊ नका

फेब्रुवारी उजाडला. अनेकांच्या परीक्षा जवळ आल्यात. अभ्यास जोमात, जोशात सुरू झाला असेल. 'परीक्षेत उत्तम यश मिळायला हवं. आजच्या स्पर्धेत टिकून राहायचं असेल तर उत्तम मार्क्‍स मिळालेच पाहिजेत. प्रयत्न तर सुरूच आहेत, पण उत्तम मार्क्‍स मिळाले नाही तर कसं होईल? आई-वडिलांना काय वाटेल? मित्र-मैत्रिणी काय म्हणतील? नातेवाईकांमध्ये हशा होईल! कुणाला तोंड दाखविण्याचीसुद्धा लाज वाटेल? खरंच असं झालं तर? नको नको, असं व्हायला नको, असे विचार मनात घोंगावत असतील.पण कितीही नको नको म्हटलं तरी मनात असा विचार वारंवार येतो. मनाचं टेन्शन वाढत जातं. जसंजसं टेन्शन वाढत जातं तसंतसं मन अस्वस्थ होतं. छातीत धडधड होते. ब्लडप्रेशर वाढू लागतं. आणखी असे नकारात्मक विचार येतात. मन अधिकाधिक अस्वस्थ होऊ लागतं. मनाची एकाग्रता ढळते. अभ्यासात लक्ष लागत नाही. परीक्षेची भीती वाटू लागते. खूप टेन्शन येतं. झोप उडू लागते.अनेकांबाबत या काळात असं घडतं. किमान परीक्षेचं टेन्शन आल्यामुळं अस्वस्थ व्हायला होतं. अभ्यासात मन एकाग्र करणं कठीण जातं. टेन्शन हा स्मरणशक्तीचा शत्रू आहे. त्यामुळं कितीही वेळा अभ्यास केला तरी तो नीट लक्षात राहत नाही. मग आणखीच टेन्शन वाढत जातं. काय करावं तेच कळत नाही.

अनेक विद्यार्थी अशा नकारात्मक विचारांच्या दुष्टचक्रात अडकतात. पण हे स्वाभाविकपणे घडत असलं तरी अपरिहार्य नाही. आपण मनात जसा विचार करत जातो तसं आपल्याबाबत घडत जातं. आपण स्वत:च स्वत:शी सतत बोलत असतो. जसं आपण सतत स्वत:शी बोलू, सतत स्वत:ला सांगू तसंच आपल्याबाबत घडत जाणार आहे. त्यामुळं आपण स्वत:ला काय सांगतो ते फार महत्त्वाचं आहे.अशा वेळी स्वत:च स्वत:शी सेल्फ टॉक करावा. जाणीवपूर्वक स्वत:ला विधायक पद्धतीनं पटवावं. स्वत:चं नाव घेऊन म्हणावं, 'श्यामराव जमेल, अभ्यास जमेल. असा कंटाळा येऊन कसं चालेल? मन भरकटवून कसं चालेल? अभ्यासावर मन एकाग्र करा. बरोबर मन एकाग्र होईल. माझं मन एकाग्र होत आहे. जसा जसा मी अभ्यास करतो आहे तसंतसं ते अधिकाधिक एकाग्र होत आहे. अभ्यासातील गोडी वाढते आहे. अभ्यास करताना मला मनापासून आनंद होतो आहे. अधिकाधिक मन एकाग्र होत आहे. मला छान अभ्यास जमतो आहे.' असं वारंवार स्वत:ला नीट समजावून सांगावं. बरोबर अभ्यास अधिक चांगला जमू लागेल. संमोहनासारखी प्रक्रिया वापरून जर या पद्धतीच्या सूचना दिल्यात तर त्याचा खूप चांगला व प्रभावी परिणाम मिळतो. लवकर या दुष्टचक्रातून बाहेर पडण्याची संधी मिळते. पण संमोहन नीट शिकून घ्यावं. वैज्ञानिक पद्धतीनं शिकविणार्‍यांकडूनच शिकावं. आज बाजारात भरमसाट दावे करणारे अनेक संमोहनतज्ज्ञ आहेत. खोटे-नाटे दावे करून भलत्याच गोष्टी ते आपल्या माथी मारत असतात. त्यांच्यापासून आपण सावध राहावं. असल्या भोंदूंना ओळखण्याच्या काही खुणा आहेत. त्यापैकी एक 'माझ्या मित्राचं वा पाल्याचं अभ्यासात मन लागत नाही. परीक्षेची भीती वाटते. मला त्याच्यासाठी संमोहन शिकायचं आहे. मी शिकून त्याचा फायदा देता येईल का?' जो संमोहनतज्ज्ञ हो म्हणेल तो 100 टक्के भोंदू आहे हे तुमच्या लक्षात येईल. संमोहन, मेडिटेशन या सार्‍या प्रक्रिया स्वत:च स्वत:करता वापरता येतात. आपण वापरून इतरांना त्याचा काहीही फायदा देता येत नाही. परीक्षेचं फारच टेन्शन आलं तर स्वत:ला नीट समजावून सांगावं, 'जे होईल ते पाहिलं जाईल. मी आता माझं सारं लक्ष अभ्यासावर केंद्रित करतो आहे. नीट मन लावून, एकाग्रतेनं अभ्यास करणार आहे. मला जमेल तेवढय़ा उत्तमपणे मी पेपर सोडवेन. पुढचं पुढं पाहिलं जाईल. मी माझं कर्तव्य नीट पार पाडेन. अगदी रिलॅक्स राहून अभ्यास करेन. परीक्षा देईन. यश-अपयशाची आत्ताच चिंता न करता सारं लक्ष अभ्यासावरच केंद्रित करेन. उत्तम अभ्यास करेन' असं जर आपण वारंवार स्वत:ला सांगू लागलो तर अगदी तसाच परिणाम आपल्याला मिळू लागतो. कारण ज्यावेळी आपण टेन्शनमध्ये असतो, भीतीच्या आहारी असतो त्या वेळी आपण 'हायली सजेस्टिबल' असतो. या अवस्थेत जर आपण अशा विधायक सूचना दिल्यात तर त्या प्रभावीपणे अमलात येऊ शकतात, नव्हे येतात.

फक्त या सूचना देताना काही क्षण डोळे मिटा. पूर्ण एकाग्रतेनं स्वत:ला अशा विधायक सूचना द्या. डोळे उघडा आणि पुन्हा अभ्यासाला सुरुवात करा. पुन्हापुन्हा असा प्रयत्न करत गेलात तर बरोबर तुम्हाला रिझल्ट मिळताहेत अशी प्रचिती येईल. स्वत:च स्वत:च्या अभ्यासाचा टाईमटेबल तयार करा. तो काटेकोरपणे पाळा. 'पण सर, मी अशा अवस्थेत परीक्षा दिली, मला कमी मार्क्‍स मिळाले, तर माझं अख्खं करिअर बरबाद होईल ना? त्यामुळं ड्रॉप घेणं उत्तम नाही का?' असा प्रश्न अनेकजण विचारतात. खरं म्हणजे परीक्षेचं, अभ्यासाचं टेन्शन टाळण्यासाठी, परीक्षेपासून पळ काढण्यासाठी 'ही ड्रॉपची आयडिया' आपल्याच मनानं काढलेली असते. त्याला आपण कधीही बळी पडता कामा नये. नाही तर आयुष्यभर आपल्याला पळावं लागेल. एखाद्या समस्येला सरळ न भिडता पळून जाण्याची सवय लागेल. आपल्या भविष्यासाठी, आयुष्यासाठी हे फार घातक आहे. त्यामुळे मनापासून ठरवून टाकायचं, 'मी पळून जाणार नाही. कितीही टेन्शन आलं, भीती वाटली तरी मी पळणार नाही. अभ्यास करेनच. परीक्षा देईनच. वाट्टेल ते झालं तरी मी हे करेनच' असं वारंवार स्वत:ला सांगायचं. पण परीक्षेत कमी मार्क्‍स मिळून करिअर बरबाद झालं तर? या प्रश्नाचंही सोपं उत्तर आपल्या मनाला देता येतं. ठीक आहे. तरी मी अभ्यास करेन. सार्‍या पेपर्सचा मन लावून अभ्यास करेन. सारे पेपर्स देईन. फक्त शेवटच्या पेपरच्या दिवशी मी ठरवेन, तो पेपर द्यायचा की नाही ते. मला मार्क्‍स कमी मिळून करिअर बरबाद होईल असं निश्चित वाटलं तर मी शेवटचा पेपर देणार नाही. त्यामुळं मला सारी परीक्षा पुन्हा दुसर्‍यांदा देण्याची संधीही मिळेल आणि आता अभ्यास, परीक्षा यापासून पळून जाण्याच्या मानसिकतेपासूनही मला स्वत:ला वाचवता येईल.' असं स्वत:ला नीट समजावून सांगून त्याप्रमाणं प्रत्यक्षात आपल्याला वागता येतं. टेन्शनही कमी होतं.

टेन्शन कमी करण्याचे काही सुंदर उपाय आहेत. आजच्या आधुनिक काळाची ती देण आहे. माझ्या 'स्वसंमोहन व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळांमध्ये मी दोन प्रकारचं प्रोग्रामिंग विद्यार्थ्यांना शिकवतो. संमोहनात जाऊन अभ्यासाची गोडी-एकाग्रता वाढविण्याचं प्रोग्रामिंग शिकवतो. त्याप्रमाणे नियमित सराव करायला लागलात तर अभ्यासाची एकाग्रता-गोडी वाढू लागते आणि एकाग्रतेनं अभ्यास करू लागल्यामुळं अभ्यासाचा 'इनपूट' वाढतो.

दुसरं परीक्षेची भीती आणि परीक्षेचं टेन्शन येऊ न देता रिलॅक्स अवस्थेत परीक्षा देण्याचं प्रोग्रामिंग शिकवतो. त्याचा नियमित सराव करायला लागलं की, रिलॅक्स अवस्थेत परीक्षा देणं जमू लागतं. परीक्षेच्या काळात आपलं माईंड जेवढं रिलॅक्स असेल तेवढी आपली स्मरणशक्ती उत्तम पद्धतीनं काम करते. आपला परीक्षेचा 'आऊटपूट' वाढतो. केवळ या दोन प्रोग्रामिंगमुळंसुद्धा आपणंच करत असलेल्या अभ्यासाच्या भरवशावर आपला परीक्षेतील परफार्मन्स सुधारतो. परीक्षेतील परसेन्टेज वाढतं. आजवर हजारो विद्यार्थ्यांनी याचा फायदा करून घेतला आहे.जरी आपण कार्यशाळा केली नाही तरी घरी बसल्या तुम्ही करू शकाल अशी एक सोपी रिलॅक्सेशन पद्धती सांगतो. अर्थात त्याला संमोहनाची सर नाही. तरी काही अंशी निश्चितपणे आपणास परिणाम मिळू शकतील.रिलॅक्स करणं म्हणजे आपल्या मसल्स ढिल्या सोडणं, ताणरहित अवस्थेत आणणं. आरामात खुर्चीवर बसा अथवा बेडवर झोपा. (उशी पातळ हवी.) सारं शरीर ढिलं सोडा. डोळे बंद करा. टप्प्याटप्प्यानं सारं शरीर रिलॅक्स करा. मनातल्या मनात म्हणा आणि तसं करा. पायांची बोटं रिलॅक्स, तळवे रिलॅक्स, पाय रिलॅक्स, गुडघे रिलॅक्स, मांडय़ा रिलॅक्स, कंबर रिलॅक्स, पोट रिलॅक्स, छाती रिलॅक्स, श्वासोच्छ्वास नॉर्मल, संथ, लयबद्ध होतोय. पाठ-पाठीचे रिलॅक्स, खांदे-दोन्ही हात-बोटं रिलॅक्स, मान रिलॅक्स, जबडा रिलॅक्स, गाल-कान रिलॅक्स, ओठ-नाक रिलॅक्स, डोळे-पापण्या रिलॅक्स, कपाळ रिलॅक्स, आठय़ा निघून जाताहेत. डोकं रिलॅक्स, डोक्यातला प्रत्येक मज्जातंतू रिलॅक्स होतोय. डावं डोकं रिलॅक्स, उजवं डोकं रिलॅक्स, डोकं खूप रिलॅक्स, रिलॅक्स हलकं हलकं झालंय. खूप शांत, आनंदित, टवटवीत वाटतंय असं 2 वेळा म्हणा. 2-4 सेकंद थांबा व पुढील सूचना द्या.

मी घेत असलेल्या प्रत्येक श्वासासोबत मनाची एकाग्रता आणि आत्मविश्वास वाढतो आहे. दिवसेंदिवस माझी अभ्यासातील गोडी, एकाग्रता वाढते आहे.मी सोडत असलेल्या प्रत्येक श्वासासोबत माझ्या मनातील टेन्शन, नकारात्मक विचार, परीक्षेची भीती निघून जाते आहे आणि मी घेत असलेल्या प्रत्येक श्वासासोबत मनाची निर्भयता, रिलॅक्सेशन व विधायक विचार करण्याची क्षमता वाढते आहे.(हे सजेशन 2 ते 3 वेळा रिपीट करा.) मला खूप आनंदित, टवटवीत, रिलॅक्स, उत्साहित वाटतंय असं तीनदा म्हणत म्हणत हळूहळू डोळे उघडा आणि जागे व्हा. 5 ते 6 मिनिटांत ही प्रक्रिया पूर्ण होते. बस्स एवढंच. दरवेळी अभ्यासाला बसताना असा सराव करा. दिवसांतून किमान 3 ते 5 वेळा असा सराव करा आणि पाहा काय परिणाम मिळतात ते.

(लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्धा

निर्मूलन समितीचे संस्थापक, संघटक आहेत.)

भ्रमणध्वनी - 9371014832

Wednesday 23 January 2013

'लैंगिक तृप्ती'तूनच मिळतो मानवी जीवनाचा सर्वोच्च आनंद

मध्य प्रदेशातील खजुराहो येथील मंदिरे मी बारकाईनं न्याहाळत होतो. स्त्रीपुरुष संबंधांविषयीची शिल्पकला अद्भुत होती, सुंदर होती, शृंगारिक होती, प्रणयदृश्य अत्यंत विलोभनीय होती, रतिक्रीडा जिवंत होऊन अवतरल्या होत्या. सौंदर्य, कला व ज्ञान याचा अत्यंत सुरेख संगम पाहायला मिळत होता. मी भान हरपून या सार्‍या शिल्पकलेचे फोटो काढत होतो. माझ्याजवळ निकॉन डी-80 हा प्रोफेशनल कॅमेरा होता. माझ्यासारखाच अत्यंत चोखंदळपणे निरीक्षण करीत गंभीरपणे फोटो काढणारा एक परदेशी अमेरिकन माणूस स्मित करत बोलू लागला. मी बहुधा प्रोफेशनल फोटोग्राफर आहे अशी त्याची समजूत झाली असावी. त्याच्याजवळही माझ्यासारखाच कॅमेरा आणि 70 टू 300 चा टेलिलेन्स होता. त्यामुळं आम्ही मंदिराच्या घुमटावरची बारीकसारीक शिल्पे टिपू शकत होतो. बोलता बोलता तो म्हणाला, ''तुम्ही भारतीय किती सुदैवी आहात, हजारो वर्षापासून तुम्हा भारतीयांना सेक्सविषयी, रतिक्रीडेविषयी किती उत्तम ज्ञान होतं. तुमचा वात्सायन आणि खजुराहो यांसारख्या मंदिरांनी जगाला सेक्सकडे विज्ञान म्हणून, ज्ञान म्हणून पाहायला शिकवलं. माणसांच्या या मूलभूत गरजेकडे उदारपणे, माणुसकीपूर्ण दृष्टिकोनातून पाहायला आणि विचार करायला शिकवलं.'' खरं म्हणजे एक भारतीय म्हणून या अमेरिकन माणसानं केलेलं कौतुक मी आनंदानं स्वीकारायला हवं होतं. अभिमानानं माझा ऊर भरून यायला हवा होता, पण झालं उलटंच. मला प्रचंड चीड आली. त्या अमेरिकनची नाही तर स्वत:चीच, स्वत: भारतीय असण्याची. का?

कारण महाराष्ट्र हा देशातला सगळ्यात पुरोगामी प्रांत. जादूटोणाविरोधी बिलाच्या निमित्तानं मी मंत्रालयात, विधिमंडळात सारखे खेटे घालत होतो. आमचे मित्र त्या वेळचे शिक्षणमंत्री ना. वसंतराव पुरके यांनी सेक्स एज्युकेशनसंबंधी एक प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवला होता. सेक्स एज्युकेशन शब्द असला तरी ती टीनएजर्सला, पौगंडावस्थेतील मुलांना शरीराची साधी ओळख करून देण्याची तयारी होती. त्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षित करण्यासाठी एक पुस्तिका निर्माण करण्यात आली होती. ती पुस्तिका फडकवत, त्यातील स्त्रीपुरुष देहाची चित्रे दाखवत दाखवत अनेक जनप्रतिनिधी कडाडून तुटून पडले होते. भारतीय संस्कृतीचा हा अपमान आहे. नव्या पिढीला हे बिघडवायला निघाले आहेत. शाळाशाळांमध्ये कंडोम पुरविणार का? वगैरे वगैरे आक्षेप घेतले गेले. शेवटी या आरोपांच्या धुराळ्यात तो प्रस्ताव बाजूला पडला. वसंतराव पुरके यांनी दूरदृष्टी ठेवून नव्या पिढीच्या हितासाठी एक अत्यंत आवश्यक पाऊल उचलण्याची हिंमत केली होती, त्याबद्दल केव्हाही त्यांचं अभिनंदनच केलं पाहिजे. पण पुरोगामी महाराष्ट्रातल्या विरोध करणार्‍या जनप्रतिनिधीचं काय?

एका माझ्या ओळखीच्या जनप्रतिनिधीला मी म्हटलं, तुम्ही खरं म्हणजे महाराष्ट्रातून एक मोठा मोर्चा मध्य प्रदेश आणि ओरिसात न्यायला हवा. कारण पुस्तकातील चित्रांवर तुम्ही एवढे खवळलात, तर खजुराहो व कोणार्क येथे तर रतिक्रीडेची कोरीव शिल्पे आहेत, संभोग दृश्य आहेत. हजारो शाळकरी मुलं ते पाहत असतात. त्यामुळं आपली भारतीय संस्कृती रसातळात जाते आहे आणि जगन्नाथ पुरीच्या मंदिराचं काय? भारतातील सर्वात मोठं, अत्यंत पुरातन, भारतीय संस्कृतीचं प्रतीक असलेलं हे मंदिर आहे. रोज किमान लाखभर लोक या मंदिरात दर्शनाला जातात. या मंदिराच्या घुमटावर संभोग दृश्य कोरलेली आहेत. भारतीय संस्कृती वाचविण्यासाठी खजुराहो, कोणार्क, पुरीचं जगन्नाथ मंदिर तिन्हीही जमीनदोस्त करायला नको का? आता तुमच्या लक्षात आलं असेल मला चीड का आली होती ते. भारतीय संस्कृतीच्या नावाखाली सेक्स एज्युकेशनला विरोध करणार्‍यांना भारत, भारतीय संस्कृती काहीही माहीत नसतं. इंग्रजांनी शंभर-दीडशे वर्षापूर्वी लॉर्ड मेकॉलेप्रणीत शिक्षण पद्धतीद्वारा पेरलेल्या सेक्सविषयीच्या विकृत कल्पना घेऊनच आजही या विषयाकडे आपण पाहतो आहोत.

त्या काळात इंग्लंड सेक्स या विषयाकडे फार प्रतिगामी दृष्टिकोनातून पाहत असे. ºिश्चनातील कॅथॉलिक पंथीय सेक्सला फार वाईट समजत असत, अजूनही तो पगडा कायम आहे. पती-पत्नींनीसुद्धा रतिक्रीडेपासून दूर राहिलं पाहिजे. अपवाद फक्त अपत्यप्राप्ती उद्देशाचा. तेवढय़ापुरतंच पतिपत्नींनी एकत्र यावं. बाकी सेक्स म्हणजे पापाची खाण. त्या काळातील इंग्लंडवर या विचारधारेचा पगडा होता. सुशिक्षितांच्या माध्यमातून तो भारतीय संस्कृतीचा विचार ठरू पाहतोय. मधल्या काळात इंग्लंड खूप बदललं, पण भारतीय सुशिक्षितांची मानसिकता मात्र तशीच प्रतिगामीच राहिली.भारतीयांनी रतिक्रीडेला, कामाला पुरुषार्थ मानला आहे. हा अभ्यासाचा, जीवनात आनंद घेण्याचा विषय मानला आहे. म्हणूनच जगातलं पहिलं सेक्स एज्युकेशनवरचं पुस्तक लिहिणारा 'कामसूत्र' जनक वात्सायन ऋषी हा प्रतिष्ठित ऋषी होता. त्याचं नाव नेहमीच आदरानं घेतलं जातं. शशीकपूरनं यावर शेखर सुमन आणि रेखाला घेऊन एक सुंदर चित्रपट निर्माण केला होता. याद्वारे या विषयाची एक अल्पशी, पण सर्वागसुंदर ओळख भारतीयांना करून दिली.

शाक्तपंथीय साधनेत, तंत्र साधनेत या विषयाकडे केवळ उदार दृष्टिकोनातूनच नव्हे, तर मोक्षप्राप्तीचा एक मार्ग म्हणूनसुद्धा पाहिलं जातं. महादेवाची पिंड गावागावांत असते. गावोगाव भक्तिभावानं व आदरानं त्याची पूजा केली जाते. पिंड हे स्त्री-पुरुष लिंगाचं प्रतीक आहे, हे प्रत्येक भारतीयाला माहीत असायलाच हवं. निसर्गानंच मानवी प्राण्यात सेक्स हा एक अपरिहार्य भाग म्हणून निर्माण केला आहे. निर्मिती, नवी निर्मिती ही निसर्गाची, प्राणिमात्राची गरज आहे. नर आणि मादी यांनी वारंवार एकत्र यावं. त्यातून गर्भधारणा राहावी, नव्या अपत्यांचा जन्म व्हावा म्हणूनच नर आणि मादीमध्ये जबरदस्त आकर्षण निर्माण होईल याची काळजी निसर्गानं घेतली आहे. आकर्षणामुळं एकत्र आलेल्या स्त्री-पुरुषांना रतिक्रीडा करावीशी वाटावी, त्यात त्यांना प्रचंड आनंद मिळावा. या आनंदासाठी त्यांनी वारंवार एकत्र यावं अशी रचनाच निसर्गानं निर्माण केली आहे. म्हणूनच आजही मानवी जीवनातील सर्वोच्च व परमोच्च आनंद स्त्री-पुरुष संबंधातील 'ऑरगॅझम'मधून रतिक्रीडेतील 'लैंगिक तृप्तीतून' मिळतो. केवळ आनंदच मिळत नाही तर संपूर्ण शरीर आणि मन 'ऑरगॅझम' नंतर पूर्णत: रिलॅक्स होतं. एवढं सुंदर रिलॅक्सेशन दुसर्‍या मार्गानं प्राप्त होत नाही. त्यामुळं सार्‍या टेंशन्स आणि ताणतणावांचा निचरा होतो. माणूस अंतर्बाह्य शांत, शांत होतो. त्यामुळं अधिक निरोगी बनण्याच्या दिशेनं वाटचाल करतो. स्वभावही अधिक संतुलित होऊ लागतो आणि यासाठी स्त्री आणि पुरुषांची मनापासून एकदुसर्‍याला साथ असावी लागते. तरच हे साध्य होतं. बलात्कारात हे शक्य असतं का? रतिक्रीडेतला आनंद ज्याला कळतो तो बलात्कार करणंच शक्य नाही. हे एज्युकेशन आम्हाला केव्हा व कसं मिळणार?

(लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्धा

निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक आहेत.)

भ्रमणध्वनी- 9371014832

Monday 14 January 2013

आजच्या पिढीला 'सेक्स एज्युकेशन' आवश्यक!

बलात्कार हा मानवी जीवनातील सर्वात भयानक, माणुसकीला काळिमा फासणारा, हत्येपेक्षाही जास्त गंभीर असा गुन्हा आहे. त्याचं कोणत्याही अवस्थेत समर्थन होऊच शकत नाही. स्वत:ला संत म्हणवणारे, पण खर्‍या अर्थानं सामान्य, सहृदय माणसाचीही पात्रता नसणारे आसाराम बापूंसारखे ढोंगी साधू यानिमित्तानं आपल्या अकलेचे तारे पाजळताहेत. 'दिल्लीच्या बलात्कारित मुलीनं 'भाऊ' म्हणून बलात्कार्‍यांना आवाहन केलं असतं तर त्यांनी तिला सोडून दिलं असतं. बलात्कार्‍यांइतकीच मुलगा मित्र असणारी ती मुलगी जबाबदार आहे. सरस्वतीला आवाहन केलं असतं तर देवानं तिचं रक्षण केलं असतं.'आता हे आसाराम बापू कोण? ज्यांच्या आश्रमात आपल्याच भक्त स्त्रियांना राधा बनवून त्यांच्यासोबत रासलीला रचल्या जातात. केवळ तेच नाही, तर त्यांचा मुलगाही हेच धंदे करतो. मुंबईच्या दोन सुशिक्षित भक्त मुलींवर आसारामच्या मुलानं बलात्काराचा प्रयत्न केल्याचे आरोप प्रसिद्घिमाध्यमांमध्ये आधीच प्रसिद्घ झाले आहेत. आपल्या 'दिव्य' ग्रंथामधून स्त्रियांविषयी अतिशय हिणकस विचार लिहिणार्‍या गुरूनं सांगितलेली प्रत्येक आज्ञा शिष्यांनी पाळलीच पाहिजे, असं सांगणार्‍या, विटाळशी बाई बागेत फिरायला गेली तर फुललेली फुलं कोमेजतात. निखालस खोटं, अवैज्ञानिक, निलाजरं विधान करणार्‍या महाविद्वान आसारामांविषयी काय बोलावं?

वाईट याचंच वाटतं की, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम, संत तुकडोजी महाराज, संत गाडगे महाराज अशा समाजाचं प्रबोधन करणार्‍या, समाजाला चार पावलं पुढं नेणार्‍या संतांकरिता जी संत उपाधी वापरली जाते तीच उपाधी असल्या बेशरम माणसाकरिता महाराष्ट्रातील त्यांचे तथाकथित भक्त वापरतात.विनोबा भावेंनी 'संत' या शब्दाचा फार सुंदर अर्थ सांगितला आहे. 'सत्याचा आग्रह धरत जो समाजाला पुढे नेतो तो खरा संत' यानिमित्तानं अनेकांचं विकृत हृदय आणि विकृत विचार प्रगट झाले. 'स्त्रिया तोकडे कपडे घालतात म्हणून बलात्कार होतात. पाश्चत्त्य संस्कृतीचा पगडा असणार्‍या शहरी वातावरणात 'इंडियात' बलात्कार होतात. ग्रामीण भागात, 'भारतात' बलात्कार होत नाहीत.अर्थात, ज्यांना खरा भारत माहीत नाही, भारताशी ज्यांचा परिचय नाही, पुरुषी अहंगंडानं आणि काल्पनिक विश्वात रमण्याच्या ध्यासानं ज्यांची दृष्टी अधू बनली आहे अशांनी उधळलेली ही मुक्ताफळं आहेत. त्याला फारसं महत्त्व देण्याचं कारण नाही. बलात्कारी माणसाची मानसिकता नेमकी काय असते? या समाजात, पुरुषप्रधान समाजरचनेत, स्त्री ही उपभोगण्याची वस्तू आहे असाच संस्कार होतो. बोलण्यातून, म्हणीतून, वागण्यातूच हाच संस्कार सतत ध्वनित होत असतो. या संस्काराचा स्त्रीसुद्घा बळी आहे.

दीर्घकाळ युवा चळवळींमध्ये असल्यामुळं, व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळांमुळं आणि तब्बल 15 वर्षे वृत्तपत्रांचे युवास्तंभ हाताळल्यामुळं भारतीय युवकांची मानसिकता फार जवळून अनुभवता आली. माझ्या जीवनात सगळ्यात जास्त प्रेमप्रकरणं मला हाताळावी लागली. 30-35 वर्षापूर्वी दोन मनांचं प्रेम आणि त्यात काही टक्क्यांमध्ये शारीरिक संबंध असायचे. पण अलीकडच्या काळात 'बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंड'च्या जमान्यात बहुतांश प्रेमसंबंध शारीरिकसुद्घा असतात. बरं, प्रेम सुरू करताना आयुष्यभराची साथ, लग्न असं काहीही कमिटमेंट नसतं. खरं म्हणजे आजच्या जमान्यात हे प्रेम शरीरसंबंध टूवे (दुतर्फा) असतात, असावेत. बरोबरीच्या नात्यानं हे रिलेशन असतं.पण जेव्हा काही कारणानं ही रिलेशनशिप तुटते तेव्हा चांगल्या सुशिक्षित, आधुनिक मुलीसुद्घा 'त्या मेल्यानं माझा भोग घेतला, मजा मारली आणि आता कंटाळा आला तर उडून चालला' या अर्थानं आरोप करतात. तेव्हा त्या आधुनिक कपडय़ाआड दडलेली, पण मुळात बुरसटलेली स्त्री बाहेर येते. या मुलींना सांगावं लागतं, तू असं बोलून स्वत:चा, तुझ्यातल्या स्त्रित्वाचा अपमानं करते आहेस. तुमच्यातले संबंध राजीखुशीचे होते. उपभोग घेतलाच असेल तर तुम्ही एक-दुसर्‍याचा घेतला आहे. खरं म्हणजे प्रेमाला 'उपभोग' हा शब्द वापरून प्रेमाचा आणि सेक्सचा दोहाेंचा तुम्ही अपमान करताहात. बलात्कारी मनोवृत्तीचा संबंध सरळ सरळ स्त्री-पुरुष संबंधांविषयी असलेल्या दृष्टिकोनाशी आहे. पुरुषप्रधान भारतीय संस्कृती असो अथवा पाश्चात्त्य संस्कृती, दोन्ही विचारधारा एकच आहेत. स्त्रीदेह हा भोगाचा विषय आहे. पुरुषानं स्त्रीचा भोग घ्यायचा असतो. स्त्री त्यासाठीच जन्माला आली असते. म्हणून तिला स्वातंर्त्य नाही. इति मनुस्मृती. लहानपणी पित्यानं, तरुणपणी पतीनं आणि म्हातारपणी मुलानं संरक्षण करण्याची ती वस्तू आहे.पित्यानं लग्न होईपर्यंत ती अनाध्रात राहील म्हणजे तिचा कौमार्यभंग होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. लग्नानंतर पतीच्या हाती तिला एकदाचं सोपवलं की, मग पित्याची सुटका होते. ही मानसिकता, ही विचारधारा आणि 'स्त्री ही भोग्य वस्तू आहे' ही विचारधारा एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. स्त्रीचं शील, चार्त्यि यांनी शुचितेशी जोडलेली विचारधारा अजूनही कायम आहे. शील आगपेटीच्या काडीसारखं असतं. एकदा ती उगाळली की, पुन्हा काडीपेटी उगाळता येत नाही. हा आदर्श, मानसिक संस्कार अजूनही तसाच आहे. फक्त प्रत्यक्षात तो अमलात येण्याची अपेक्षा ठेवण्याची कुणी हिंमत ठेवत नाही एवढंच. टीव्ही, इंटरनेटच्या जमान्यातील, आधुनिक कपडे घालणारी, इंग्रजी बोलण्यात भूषण मानणारी ही आधुनिक पिढी आगपेटीच्या काडीपासून लायटरपर्यंत (जो वारंवार पेटवला जाऊ शकतो, हवा तेव्हा पेटतो) प्रवासकर्ती झाली आहे आणि इंग्रजी बोलू न शकणारी, थोडंसं मॉडर्न बनण्याचा प्रयत्न करणारी, अजूनही ग्रामीण भाषेचा लेहजा असणारी सुशिक्षित पिढीही त्याच दिशेनं वाटचाल करते आहे.या सर्वाना इंटरनेटवर, मोबाईलवर स्त्री-पुरुष देहाची उघडीनागडी चित्र, ब्ल्यू फिल्म्स सतत आणि सहज पाहायला मिळतात. त्यातून पुन्हा मनात असलेला 'स्त्री ही उपभोग्य वस्तू आहे' जुनाच संस्कार पक्का होतो. विकृत पद्घतीनं चालवला जातो. बहुतांश ब्ल्यू फिल्म्स बलात्कारसदृशच असतात. शृंगार, रोमान्स या गोष्टींना फारसं स्थान नसतं. स्त्री-पुरुष प्रेमसंबंध म्हणजे फक्त 'इंटरकोर्स', 'भोगणं' हाच संस्कार अधिकाधिक पक्का होतो. दृक्-श्रव्य माध्यमामुळं तो अधिक तीव्र स्वरूपाची विकृती निर्माण करतो. चित्रपट, इंटरनेट, सेक्सी जाहिराती यातून असं चाळवलं गेलेलं मन, मुळात पुरुषी अहंगंडानं, पुरुषी मनोवृत्तीनं पछाडलं गेलेलं हे मन मग रस्त्यारस्त्यांवर छेडखानी करणं, अश्लील कॉमेंट्स करणं सुरू करतं. समाजात याविषयी 100 परसेन्ट टॉलरन्स असल्यामुळे ते चेकाळलेलं मन अधिकच सोकावतं, स्थिरावतं. अश्लील हातवारे करणं, विकृत हावभाव करणं, घाणेरडं टॉन्टिंग करणं हा आपला जन्मसिद्घ पुरुषी अधिकार आहे असं मानू लागतं आणि मग यातील काही महाभाग बलात्कारापर्यंत जाऊन पोहोचतात.बलात्काराचा इतिहास पाहिला, तपासला तर त्यातील पंचाण्णव टक्क्यांपेक्षा अधिक लोकांनी आधी छेडखानीचे, टॉन्टिंगचे प्रकार केले आहेत असं लक्षात येतं. मग यावर उपाय काय? सर्वप्रथम स्त्री ही उपभोग्य वस्तू आहे का? संस्कार बदलणं. मुलं आणि मुली दोन्हींबाबत. स्त्री ही बरोबरीचा माणूस आहे. तिचा, तिच्या देहाचा, तिच्या व्यक्तिमत्त्वाचा सन्मान राखणं हे माझं कर्तव्य आहे असं प्रत्येक पुरुषाला, मुलाला शिकवलं पाहिजे. लहानपणापासून तशा संस्कार शाळा, कॉलेज, प्रसिद्घिमाध्यमं आणि घरातूनसुद्घा बिंबवायला पाहिजे. त्याचप्रमाणं देहाच्या पलीकडे स्त्रीला अस्तित्व आहे. स्त्रीचं व्यक्तिमत्त्व, बुद्घिमत्ता, कर्तृत्व हे तिच्या सौंदर्याइतकच, किंबहुना जास्त महत्त्वाचं आहे असा संस्कार तिच्यावर केला पाहिजे. समजा, तिच्या इच्छेविरुद्घ तिच्यावर बलात्कार झालाच, तर एक अपघात, एक शारीरिक जखम एवढय़ाच अर्थानं त्याकडे पाहायला स्त्रीनं शिकलं पाहिजे, स्त्रीला शिकवलं पाहिजे अन्यथा एवढय़ा महत्प्रयासानं  मिळालेलं स्वातंर्त्य स्त्रीला गमवावं लागेल आणि तेही काही विकृत पुरुषांच्या भीतीपोटी, तिचा काहीएक दोष नसताना स्वातंर्त्य तिला गमवावं लागेल. ज्युडो-कराटे शिकून स्त्रियांचा आत्मविश्वास वाढत असेल तर शिकायला, शिकवायला हरकत नाही. पण बलात्कार झाला तरी त्याला एका जखमेपेक्षा जास्त महत्त्व देणार नाही, हा संस्कार मात्र त्यासोबत तेवढाच प्रभावीपणे बिंबवला पाहिजे. तरच स्त्रिया मोकळेपणानं वावरू शकतील. नवी नवी क्षेत्रे पादाक्रांत करू शकतील. देशभर बलात्कारविरोधी वातावरण निर्माण झालं आहे. त्याचा फायदा उचलून सरकार-पोलिसांनी काही कडक पावलं उचलली पाहिजे. छेडखानी, अश्लील कॉमेंट्स याबाबत झिरो टॉलरन्स निर्माण झाला पाहिजे आणि या गुन्ह्याखाली अटक झालेल्या मुलांची व त्यांच्या आई-बापांची व शाळा-कॉलेजेसची नावं वृत्तपत्रात प्रसिद्घ केली पाहिजे. आपला दिवटा तरुण चिरंजीव मुलींना छेडत असेल तर आई-वडिलांनाही तेवढंच जबाबदार धरलं पाहिजे. कारण घरातला दुटप्पी संस्कार याला जबाबदार असतो. आपल्या मुलींना छेडलं तर जे आई-वडील गंभीर बनतात तेच आई-वडील मात्र आपल्या मुलाच्या अशा कृत्याकडे कानाडोळा करतात. हा अक्षम्य अपराध आहे. मी ज्या काळात विद्यापीठ परिसरात एम. ए. इंग्रजी करत होतो त्या काळात अशा छेडखानी करणार्‍या मुलांविरोधात मोहीम उघडली होती. हातात दै. 'तरुण भारत'चा 'महाविद्यालयाचा परिसर' कॉलम होता. आपलं नाव पेपरात छापून येईल या धाकानंच अनेकांचं 'पौरुष' थिजलं होतं. छेडखानी आटली होती. हा एक प्रभावी मार्ग बनू शकतो. शाळा-कॉलेजातूनही छेडखानीविरोधात मोहिमा राबवायला हव्यात. प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक यांनी पुढाकार घेऊन मुला-मुलींचं नीट प्रबोधन करायला हवं. सहजीवन, एक-दुसर्‍याचा सन्मान करायला, शिकवायला हवं. तशा चर्चा घडवून आणायला हव्यात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजच्या पिढीचं सेक्स एज्युकेशन करायला हवं. बलात्कार करून, ओरबाडून कोणताच आनंद मिळत नाही, तर दोघांच्या सहमतीनं, रोमान्ससह असलेल्या प्रेमसंबंधातूनच खरा आनंद मिळतो, हे ज्ञान सर्वापर्यंत पोहचवणं नितांत गरजेचं आहे.

(लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक, संघटक आहेत.)

भ्रमणध्वनी - 9371014832

बलात्कारास प्रोत्साहन देणारी मानसिकता विकृत

भारताची राजधानी दिल्ली येथे झालेल्या अमानुष बलात्कार प्रकरणाने सारा देश ढवळून निघाला आहे. सर्वसामान्यांच्या विशेषत: तरुण-तरुणींच्या तीव्र सक्रिय प्रतिक्रिया एक नवा इतिहास निर्माण करताहेत. कोणत्याही सहृदय, संवेदनशील माणसाचं मन पिळवटून टाकणारी ही घटना आहे. आपल्यातला 'माणूस' अस्वस्थ करणार्‍या या घटनेनं अनेक प्रश्न निर्माण केले आहेत.

यावर केल्या जाऊ शकणार्‍या उपायांचा, सूचनांचा पाऊस पडतो आहे. बलात्कार्‍याला फाशी द्या, त्याला नपुंसक करा, कायदा कडक करा इत्यादी सूचना, उपाय सुचविले जाताहेत. कायदा कडक झाला पाहिजे. बलात्कारी पुरुषाला आयुष्यभराची अद्दल घडली पाहिजे. एवढी कडक शिक्षा झाली पाहिजे की जेणेकरून पुन्हा दुसरा कुणी बलात्कार करण्यास धजावणार नाही. असं घडावं याविषयी दुमत असण्याचं कारण नाही.

बलात्काराचं, कोणत्याही अवस्थेत, कोणत्याही कारणानं, कोणत्याही काळी समर्थन होऊच शकत नाही. कुणीही सहृदय माणूस बलात्काराचं समर्थन करण्यास, धजावणारचं नाही हे खरं असलं तरी बलात्कार होतात का होतात? यामागच्या मनोवृत्तीचा, मानसिक कारणांचा शोध घेण्याचा आपण प्रयत्न करू या. एबीपी माझा या वृत्तवाहिनींनं आयोजिलेल्या बलात्कार या विषयावरील एका चर्चात्मक कार्यक्रमात गेल्या पंधरवडय़ात मी सहभागी झालो होतो. त्या वेळी काही गोष्टी प्रकर्षानं लक्षात आल्या. यानिमित्तानं काही महत्त्वाच्या बाबींकडे, इतिहासाकडे लक्ष वेधून घेण्याची गरज वाटते.

1975 साली 25 जूनला 'आणीबाणी' घोषित झाली आणि 27 जूनला आम्ही काही सहकारी वर्धा जेलमध्ये कोंबले गेलो. मी, चंद्रकांत वानखेडे, सुभाष इथापे हे तीन विद्यार्थी वगळता बाकी 900 कैदी हे गुन्हेगार होते. अनेक अट्टल गुन्हेगार होते. त्यात एक गोरा गोमटा, उंचपुरा, स्मार्ट कैदी होता. पुलगाव सैनिक कॅम्पमधील एक माजी सैनिक पण अख्ख्या जेलमधील एकही कैदी त्याच्याशी बोलत नसे, संपर्क ठेवत नसे. सारे त्याच्याशी अत्यंत तुच्छतेनं वागत असत. पुढे कारण कळलं. त्यानं त्याच्याच ऑफिसरच्या बायकोवर बलात्कार केला आहे. म्हणून सार्‍या कैद्यांनी त्याच्यावर बहिष्कार टाकला होता.

पुढे अनेक कैदी मित्र झाले. त्यांच्या अंतरंगात शिरण्याची संधी मिळाली. तेव्हा कळले की गुन्हेगारांचीसुद्धा एक मूल्यव्यवस्था असते. चोर, दरोडेखोर, खुनी माणसंसुद्धा बलात्कारी गुन्हेगाराला 'गया गुजरा', 'एकदम हिणकस,' हमारे साथ बैठने लायक नही' समजतात. हे कळल्यावर एका बाजूनं आश्चर्य वाटलं; पण दुसर्‍या बाजूनं फार बरं वाटलं. असाच प्रसंग आता घडला. दिल्लीतील तरुणीवर बलात्कार करणार्‍या संशयित गुन्हेगाराला तिहाड जेलमधील कैद्यांनीच बदडून काढलं. बलात्कार हा गुन्हा, हे कृत्य अट्टल गुन्हेगारांनासुद्धा तिरस्करणीय वाटतं ही आनंदाची गोष्ट आहे.

पण 1992-93 च्या मुंबई दंगलीमध्ये आणि गुजरातच्या दंगलींमध्ये अनेक स्त्रियांवर बलात्कार झाले. पण हे बलात्कार करणारे कुणी अट्टल गुन्हेगार नव्हते, अथवा चवचाल, विकृत समजले जाणारे तरुण नव्हते. तर उलट धर्माभिमानी म्हणविणार्‍यांनी, काही तथाकथिक सुसंस्कृत लोकांनी, हे बलात्कार केले होते आणि तेही धर्माच्या, धर्मरक्षणाच्या नावावर बलात्कार केले होते. त्यातील काही केसेस तर काळजाचा थरकाप उडविणार्‍या आहेत. दंगली आधी ज्या घरांसोबत घरोबा होता. एका घरात शिजलेली भाजी दुसर्‍या घरात जात असे. एवढे जिव्हाळ्य़ाचे संबंध आहेत. अशा दुसर्‍या धर्माच्या घरातील स्त्रीवर ओळखीच्या पुरुषांनी बलात्कार केलेत आणि हे बलात्कार करविण्यात पुढाकार घेणार्‍या स्त्रिया आहेत. आपल्याच तरुण मुलांना रोजारणीवर बलात्कार करण्यास प्रोत्साहन देताहेत, अशा किमान दोन केसेस मला माहीत आहेत. पोलीस तपास अधिकार्‍यांच्या तोंडूनच त्या ऐकल्या आहेत.

अर्थात, याच मुंबई दंगलीत इतर धर्मातील स्त्रियांना प्रसंगी स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचविल्याची, बलात्कार वाचविल्याची व शेजारधर्म प्रखरपणे पाळल्याची अनेक उदाहरणंही मला माहीत आहेत. म्हणूनच माणुसकीवरचा विश्वास अजून कायम आहे. पण याच दंगलीच्या काळात इतर धर्मीयांवर बलात्कार करण्यास प्रोत्साहन देणार्‍या नेत्याचा अत्यंत बीभत्स चेहरा सप्रमाण उघड झाला होता, हेही अत्यंत विदारक सत्य आहे.

1971-72 सालच्या बांगलादेश युद्धाच्या आधी आम्ही काही 'तरुण शांती सैनिक' बंगालमधील 'बनगाव' या बॉर्डरच्या गावी काही सेवा कार्य करीत होतो. पाकिस्तान बॉर्डर केवळ तीन-चार किलोमीटर अंतरावर होती. हजारो बंगाली पाकिस्तानी शरणार्थी भारताच्या सीमेत प्रवेश करीत होते. त्यांची व्यवस्था 'बनगाव' कॅम्पमध्ये केली जात असे. त्यामध्ये अनेक बलात्कारित स्त्रिया असत. अनेक तरुणींचे स्तन कापले असत. योनीमध्ये संगिनी खुपसल्या असत. बांगला स्त्रियांचा अपमान करणं, सूड उगवणं हे परमराष्ट्रीय धर्मकर्तव्य आहे असं समजून पाकिस्तानी मिल्ट्री हे करीत असे. पाकिस्तानी बंगाली स्त्रियांना भारतीय बॉर्डरमध्ये शिरण्याआधी सर्वासमक्ष पकडून पाकिस्तानी सैनिक बलात्कार करीत आणि बंदुका, रायफली ताणून उभ्या असलेल्या भारतीय सैनिकांना खिजविण्यासाठी, तुम्ही आमचं काही बिघडवू शकत नाही असं दाखविण्यासाठी तर अधिकच चेकाळून ही कृत्य केली जात.

त्या वेळी बॉर्डरवरच्या या सैनिकांची चाललेली मानसिक उलाघाल आम्ही प्रत्यक्ष अनुभवली आहे. आपल्या समक्ष बलात्कार केले जाताहेत, स्तन कापले जाताहेत, संगिनी योनीत खुपसल्या जाताहेत, नग्न केलं जात आहे. केवळ काही फर्लाग अंतरावर हे संगळं घडताना दुर्बिणीशिवाय प्रत्यक्ष डोळ्य़ांनी दिसत आहे. हातात शस्त्र आहे, लढण्याची खुमखुमी आहे. पण ऑर्डर नाही म्हणून हात चोळत बसण्याशिवाय काहीही करता येत नाही. अशा अत्यंत उद्विग्न मनोवस्थेत असलेल्या सैनिकांना आम्ही पाहिलं आहे. सैनिकांचं नियंत्रण सुटून आदेशाशिवाय युद्धाची ठिणगी पडू नये म्हणून आपल्या सैनिकांची एका बाजूनं समजूत काढत असतानाच आतून मात्र संतापानं प्रचंड पेटलेले सैनिक अधिकारीही त्या वेळी जवळून पाहिले आहेत.

या सर्व परिस्थितीमुळेच त्या वेळी पंतप्रधान इंदिरा गांधींना पूर्व पाकिस्तानवर चढाई करण्याचा निर्णय घेण्यास भाग पडलं असावं. पण पुढचं आम्हाला काही पाहता आलं नाही. युद्ध सुरू झालं. पेटलेल्या सैनिकांनी अवघ्या काही दिवसांत अख्खा पूर्व पाकिस्तान ताब्यात घेतला आणि 1 लाख पाकिस्तानी सैनिकांनी शरणागती पत्करून स्वत:ला भारतीय सैन्याच्या हवाली केलं. जगाच्या इतिहासात यापूर्वी एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर एकाचवेळी एवढय़ा मोठय़ा संख्येनं शस्त्रसज्ज सैनिकांनी शरणागती पत्करली नव्हती. भारतीय सैन्यानं इतिहास घडविला.

पाकिस्तानी सैनिक बॉर्डरवर बलात्कार करताना, छळताना विचार करीत नसत की, ही स्त्री कोणत्या धर्माची आहे. दोन्ही धर्माच्या स्त्रियांवर बलात्कार करीत असत. सैनिक आणि बलात्कार हा युद्धाच्या इतिहासाचा अविभाज्य भाग राहिला आहे. पहिल्या आणि दुसर्‍या अशा दोन्ही महायुद्धात मोठय़ा प्रमाणात स्त्रियांवर बलात्कार झाले आहेत. हिटलरच्या नाझी सैन्यानं जसे असंख्य अमानुष बलात्कार केलेत तसंच प्रमाण कमी असलं तरी दोस्त राष्ट्रांच्या सैनिकांनीही बलात्कार केले आहेत.

सैनिकांच्या बलात्कारांनी तर सारा भारताचा इतिहास भरलेला आहे. शिवाजी राजांच्या उदयाच्या आधी युद्धात प्रदेश जिंकला की जिंक णारे सैनिक, सरदार सारेच त्या परिसरातील तरुण, सुंदर स्त्रियांना पकडून बलात्कार करीत असत. तेवढय़ानं मन भरलं नाही तर त्यातील विशेष सुंदर स्त्रियांना सोबत घेऊन जात आणि आपल्या नाटक शाळेत व जनानखान्यात भरती करीत असत. युद्धात जिंकण्यासोबतच पराजित परिसरातील स्त्रियांना भोगण्याचा, पळविण्याचा, बलात्कार करण्याचा अधिकारच प्राप्त होतो. असा समज आणि शिरस्ता त्या काळी होता.

आपल्या सैनिकांना असे बलात्कार करण्यास बंदी घालणारा, ही आज्ञा मोडल्यास कुणाचाही मुलाहिजा न ठेवता त्याला कडक शिक्षा करणारा पहिला राजा इतिहासानं पाहिला तो शिवाजी राजा. स्त्रियांचा सन्मान राखणारा, तो सन्मान राखलाच जाईल याची काळजी घेणारा जाणता राजा म्हणूनच अद्वितीय आहे, महान आहे.

पण शिवाजी राजा नंतर काय? काश्मीर, पंजाब, नागालंॅड वगैरे परिसरात काय घडलं? भारतीय सैनिकांवर बलात्काराचे अनेक आरोप झालेत. भारतीय कायद्यानुसार काही सैनिकांना शिक्षाही झाली.

पुरुष स्त्रीवर बलात्कार का करतो? बलात्कार करणारा पुरुष विकृत असतो का? की बलात्कार करण्यास प्रोत्साहन देणारी मानसिकता घडविणारी परिस्थिती विकृत असते? या परिस्थितीला पुरुषप्रधान संस्कृती म्हणतात का? या संस्कारात घडलेल्या प्रत्येक पुरुषाच्या मनाच्या एका कोपर्‍यात बलात्कारी दडला आहे का? पुढे शोधू या प्रश्नांची उत्तरं.

(लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्धा

निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक आहेत )

भ्रमणध्वनी : 9371014832

एारळश्र- ीहूरारपर्रीùीशवळषषारळश्र.लेा