Saturday 29 December 2012

मनातील भावनांचा मोकळेपणाने निचरा करा

'ताणतणावाचं नियोजन तुमच्याच हाती' हा गेल्या शनिवारचा लेख प्रसिद्ध झाला. सारखा फोन खणखणू लागला. ''आपल्या जीवनात खूप टेंशन आहे. ते हाताळणं जमत नाही. त्यामुळं त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात,'' असे सांगणारे असंख्य फोन आले. तर तुम्ही फार सुंदर मार्ग सांगितलात, टेंशन हाताळण्यासाठी खूप लोकांनी अभिनंदनही केलं. 'ताणतणाव नियोजन' हा आपणा सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा विषय. आजचं युगच हे टेंशनचं युग मानलं जातं. प्रचंड धावपळीचं जीवन, जीवघेणी स्पर्धा, पैसे मिळविण्याचं वाढलेलं प्रेशर, यशस्वी होण्यासाठी धडपड करण्याची अपरिहार्यता या सगळ्यांचा परिणाम म्हणजे टेंशन, टेंशन, टेंशन. हे हाताळण्यासाठी, वेळोवेळी टेंशन कमी करण्यासाठी, त्याचा निचरा करण्यासाठी रिलॅक्सेशन तंत्र वापरणं अपरिहार्य आहे आणि संमोहन प्रक्रिया ही प्रभावी रिलॅक्सेशन निर्माण करणारी प्रक्रिया आहे.

मी नियमितपणे स्वसंमोहन व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळा चालवितो. त्यामध्ये 'ताणतणाव नियोजन' हा विषय प्रभावीपणे तर शिकविला जातोच, पण सोबत संमोहन प्रक्रियाही शिकवली जाते. जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात विदर्भात पाच-सहा ठिकाणी या कार्यशाळा होणार आहेत.

सुरुवातीला मनात निर्माण झालेलं टेंशन तसंच साचत गेलं, तर पुढे त्याचं रूपांतर अँनक्झायटीमध्ये- चिंता, काळजी, अस्वस्थता होतं. त्याचे शरीरावर, मनावर खूप दुष्परिणाम होतात.

शरीरावर होणारे दुष्परिणाम-विकार- कशरीं वशीशरीश, रक्तदाब - इश्रेव झीशर्ीीीश, मधुमेह- ऊळरलशींशी, सांधेदुखी, डोकेदुखी, अनेक प्रकारचे चर्मरोग, दमा-अस्थमा, निद्रानाश, इतर मनोविकार आजार.

मनावर होणारे दुष्परिणाम

बुद्धिकौशल्यावर प्रतिकूल परिणाम, निर्णयक्षमतेवर प्रतिकूल परिणाम, आत्मविश्वास ढासळतो, स्वत:वरचे नियंत्रण सुटते, स्मरणशक्ती खालावते.

मागच्या लेखात आपण ताणतणावावर नियंत्रण मिळविण्यासाठी वा ताणतणाव सहजासहजी आपल्या जीवनात निर्माणच होणार नाही यासाठी काय करायचे ते पाहिलं होतं. एकूण 11 उपाय आपण करू शकतो, वापरू शकतो याचा विस्तारानं आढावा घेतला होता. आता पुढील उपाय पाहू या.

वेळच्या वेळी आपल्याला आपल्या भावनेचा निचरा करता आला पाहिजे : काय होतं की, दरवेळी आपल्या सगळ्याच भावना आपल्या जीवनामध्ये व्यक्त करता येत नाहीत, कारण काही सामाजिक दडपणं आणि नीतिनियम असतात.

एवढंच नव्हे, तर सभ्यपणाच्या कल्पना असतात. त्यामुळे अनेकदा वेगवेगळ्या प्रकारच्या भावना आपल्याला दाबून टाकाव्या लागतात आणि मग या जर तशाच साचत गेल्या तर अत्यंत वाईट असे दुष्परिणाम आपल्याला पुढच्या जीवनामध्ये भोगावे लागतात. त्यामुळे भावनेचा निचरा करणारे तंत्र आपल्या जीवनामध्ये असणं नितांत गरजेचं आहे. याला 'कॅथारसिस' असा शब्द इंग्रजीमध्ये वापरला जातो. 'परझीन'-'शुद्ध होणं.' एखादा स्पंज आहे. हा स्पंज ज्यावेळेस घाण गोळा करतो आणि या स्पंजला दाबून आपण ती घाण काढून टाकतो, त्या पद्धतीने आपल्या मनाचं शुद्धीकरण झालं पाहिजे, ही कल्पना या कॅथारसिसमागे आहे.

नाटक-सिनेमामधूनसुद्धा आपल्या भावनेचा सुंदर निचरा होतो. याकरिता मला एक उदाहरण तुम्हाला सांगावसं वाटतं. माझ्याकडं एक विदर्भातील बाई काम करायला होती. विजय कोंडकेचा 'माहेरची साडी' नावाचा सिनेमा लागला होता. ती मला म्हणायला लागली, ''साहेब, मी काही दोन-तीन दिवस कामाला येणार नाही. मी ममईला (मुंबईला) सिनेमा पाहायला चालले.'' मी म्हटलं, ''दोन-तीन दिवस कशाला पाहिजे?'' खरं म्हणजे, मी नालासोपार्‍याला राहायचो. मुंबई म्हणजे काही दूर नव्हती. ''तू एका दिवसात जाऊन पाहून ये आणि मग दुसर्‍या दिवशी कामाला ये.'' ''नाय जी, म्हणे दोन-तीन दिवस तर लागलंच मले. सिनेमा पाहून तर यायचंच आहे.'' आता ही बाई गेली आणि तब्बल चार-पाच दिवसांनी आली.

''काय गं, तू सिनेमा पाहायला गेली होती एक दिवसाकरिता आणि तीन-चार दिवसांनी परत येते म्हणजे काय?''

ती म्हणाली, ''अजी तुम्हाला काय सांगू, अरे इतका मस्त सिनेमा आहे ना? अवं, मी गेले सिनेमाले अन् आतमध्ये गेल्या गेल्या जी धो-धो रडायला लागली. सिनेमाभर रडत होती. लई बरं वाटलं. म्या म्हटलं काय, लई चांगला सिनेमा आहे. पुन्हा पाहिल्याशिवाय काय परत जायचंच नाही. लागली म्हणे लाईनीत. अहो कायची! लवकर सिनेमाची एक तिकीट मिळते का? एवढी मोठी रांग! चौथ्या दिवशीचं तिकीट भेटलं, मी राहिली तिकडं. चौथ्या दिवशीचा सिनेमा पाहूनच परत आली.'' आता 'माहेरची साडी' हा सिनेमा आहे, जो आतमध्ये शिरल्यापासून शेवटपर्यंत स्त्रियांना धो धो रडवतो. त्या सिनेमाने आजपर्यंतचे मराठीतले उत्पन्नाचे सगळे रेकॉर्ड्स मोडले, एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर हा सिनेमा चालला आणि या सिनेमाचा प्रेक्षकवर्ग नव्वद टक्क्यांपेक्षा अधिक स्त्रिया होत्या, याचं कारण काय आहे?

मनामध्ये साचून असलेल्या सगळय़ा भावनांचा निचरा करण्याची संधी मिळते. धो धो रडूनसुद्धा आपलं मन निर्मळ झाल्यामुळे, परझीन झाल्यामुळे, कॅथारसिस झाल्यामुळे आपल्याला खूप बरं वाटतं. हीही मानवी जीवनातली एक नितांत आवश्यक गरज असू शकते. नाटक-सिनेमामधून कॅथारसिस घडतं याला अत्यंत महत्त्व आहे. त्याकरिता केवळ नाटक- सिनेमाच पुरेसे आहेत असं नव्हे. तुमच्या-

माझ्या जीवनामध्ये आपल्याला वेगवेगळे मित्र-मैत्रिणी जोडता आले पाहिजेत. त्यांच्यासोबत छानपैकी आपल्याला आपल्या मनातलं बोलता आलं पाहिजे.

मनामध्ये जे काही आहे ते उत्तम पद्धतीनं व्यक्त करता आलं पाहिजे. याबाबत मी जेव्हा नेहमी सगळय़ांसोबत बोलतो. प्रामुख्याने ज्या वेळेस हिपनोथेरपिस्ट कोर्समध्ये संमोहन उपचारांचा भाग शिकवत असताना स्त्रियांच्या कौन्सिलिंगबद्दल काही गोष्टी मला सांगाव्या लागतात, तेव्हा एक गोष्ट मी आवर्जून सांगत असतो. भारतीय स्त्रीबाबत एक अडचण आहे. तिला आपल्या मनातलं इतरांजवळ बोलता येत नाही.

मी असं म्हटल्यानंतर, तुम्ही कदाचित मला हसाल. कारण स्त्रिया खूप बोलतात अशी आपली समजूत आहे. हे खरं आहे की, स्त्रिया खूप बोलतात. चार स्त्रिया एकत्र आल्या की प्रचंड बोलत बसतात; पण आपल्या मनातलं सोडून बाकी सगळं बोलतात. कारण लहानपणापासून त्यांना अनुभव आलेला असतो की, आपल्या मनातील एखादं गुपित कोणाला सांगितलं किंवा अगदी आतली गोष्ट कुणाजवळ सांगितली की, ती गोष्ट बाहेर फुटते आणि त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात. त्यामुळे हळूहळू स्त्री हे शिकते की, सगळं बोलायचं, पण आपल्या मनातलं गुपित मात्र कोणाजवळ सांगायचं नाही. आपल्या मनात दबून असलेल्या भावना कुणाला सांगायच्या नाहीत. त्यामुळे वर्षानुवर्षे या भावना मनामध्ये साचत जातात, साचत जातात, साचत जातात आणि त्याचे दुष्परिणाम मनोरुग्ण बनून मग त्यांना भोगावे लागतात किंवा वेगवेगळय़ा पद्धतीचे मानसिक आजार पुढे जाऊन भोगावे लागतात.

त्यामुळे मी नेहमी म्हणत असतो की, प्रत्येक स्त्रीला आपल्या मनातलं मोकळेपणाने बोलता येईल असं स्थान असण्याची गरज आहे; आणि जे थेरपिस्ट आहेत, कौन्सिलर्स आहेत त्यांचं हे महत्त्वाचं काम आहे की, त्यांनी विश्वासाचा एक असा खांदा स्त्रीला उपलब्ध करून दिला पाहिजे की, ज्या खांद्यावर डोकं ठेवून, विश्वासाने त्यांना जे सांगावसं वाटतं ते सांगता आलं पाहिजे आणि मोकळेपणानं रडता आलं पाहिजे. पण हे प्रत्येकालाच काही शक्य नाही किंवा दरवेळी आपल्याला कौन्सिलरची किंवा या पद्धतीच्या समंजस थेरपिस्टची मदत मिळेलच असं नाही. याकरिता दुसरा पर्याय आहे. स्त्रियांनीसुद्धा आपल्या जीवनामध्ये अशा काही समंजस स्त्रियांसोबत मैत्री निर्माण केली पाहिजे की, ज्या समजून घेऊ शकतात, आपल्या मनातलं ऐकू शकतात आणि हे गुपित दुसर्‍याजवळ न सांगण्याइतपत समंजसपणा त्यांच्यामध्ये आहे, असा विश्वास तुम्हाला वाटतो. या पद्धतीचे काही चांगले मित्र-मैत्रिणी जोडणं हेसुद्धा आवश्यक आहे. त्यातून उत्तम पद्धतीने भावनेचा निचरा होऊ शकतो.

थोडक्यात, जी माणसं मनातल्या मनात साठवून ठेवतात, सहजासहजी आपल्या भावना मोकळेपणाने व्यक्त करत नाहीत, ती माणसं या पद्धतीच्या आजारांना म्हणजे एंग्झायटी प्रोन आजारांना मोठय़ा प्रमाणावर बळी पडत असतात. त्यामुळे या माणसांनी आपल्या भावना मोकळेपणाने इतरांजवळ व्यक्त केल्या पाहिजेत.

समजा, तुम्हाला एखाद्या व्यक्तीपुढे या भावना मोकळेपणाने व्यक्त करणं अडचणीचं वाटत असेल, तर आजच्या आधुनिक काळामध्ये काही दुसरेही पर्याय आहेत. उदाहरणार्थ,आपण एखाद्या मैत्रिणीशी किंवा मित्राशी बोलत आहात असं समजून बोलत जावं आणि टेपरेकॉर्डर ऑन ठेवावा. टेपरेकॉर्डरमध्ये आपण जे काही बोलतो ते नंतर एक-दोनदा ऐकावं. त्यातून बोलण्याचं समाधान मिळतं. पुन्हा ते ऐकल्यामुळे आपल्याला त्याची खात्री वाटते की, हे सगळं आपण बोललेलो आहोत. त्यातूनसुद्धा भावनेचा निचरा होऊ शकतो. दुसरा पर्याय 'लिखाण' हासुद्धा असू शकतो. आपण कागद-पेन घेऊन बसावं आणि आपल्याला जे वाटतं ते सगळंच्या सगळं कागदावर उतरवावं. त्यातूनसुद्धा आपल्या भावनेचा निचरा होऊ शकतो.

क्रिएटिव्हिटी : आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये निर्मितीचा आनंद देणारं काम असणं किंवा असला काही छंद असणं नितांत गरजेचं आहे. खरं म्हणजे आपण जे काम करतो, त्यातूनच जर आपल्याला निर्मितीचा आनंद मिळत असेल, तर डेफिनेटली आपल्या जीवनाचं सार्थक बनून जातं, कारण त्यातून आपल्याला इतका सुंदर आनंद मिळत राहतो की, एकूणच सगळय़ा रपुळशीूं आणि ींशपीळेप चा निचरा होत जातो आणि एक निरोगी, आनंदमय जीवन जगण्याची आपल्याला संधी मिळते. पण मॅक्झिमम लोकांना आपल्याला आवडेल किंवा निर्मितीचा आनंद देईल असं काम करण्याची संधी मिळत नाही. त्यावेळेस असे काही छंद आपल्याला जोपासता आले पाहिजेत. कितीतरी प्रकारचे, निर्मितीचा आनंद देणारे छंद असू शकतात. त्याला आपण चित्रकला-पेंटिंग म्हणतो किंवा मूर्तिकला म्हणतो, त्याशिवाय फोटोग्राफीसारखं तंत्र की, ज्यातून आपल्याला निर्मितीचा आनंद मिळू शकेल. संगीत आहे. लेखन आहे. साधं बागकाम आहे. एवढंच नव्हे, तर वेगवेगळ्या पद्धतीच्या कला आहेत. या कलांमधून हा आनंद आपल्याला मिळू शकतो. सगळं जाऊ द्या, साधा उत्तम स्वयंपाक करण्यातसुद्धा आनंद आहे. अशा कितीतरी क्रिएटिव्ह गोष्टी आपल्या जीवनात असू शकतात. ज्या आपल्याला आवडतात. ज्यातून आपल्याला आनंद मिळतो आणि त्या उपयुक्तसुद्धा आहेत. याचं जर कॉम्बिनेशन करता आलं तर पुन्हा रपुळशीूं आणि ींशपीळेप चा निचरा होण्यास प्रचंड मदत मिळते. कारण या सगळ्या क्रिएटिव्ह कामांमध्ये आपण पूर्ण एकाग्र होतो, समरस होतो आणि समरसतेने आणि एकाग्रतेने आपणास जो आनंद मिळायचा तो मिळतो.

आता आपल्याला या तेरा मुद्यांचा मी जो उल्लेख केला; हे सगळेच्या सगळे तेरा मुद्दे आपल्या जीवनात अंतर्भूत करता येतीलच असं नाही; पण किमान पहिले पाच मुद्दे कम्पलसरी आपल्याला जीवनात आणावे लागतात. एखादं रिलॅक्सेशन तंत्र, आपल्या विचारप्रक्रियेमध्ये विधायक विचार करण्याचा बदल, आयुष्याबद्दलचा एक विधायक दृष्टिकोन स्वीकारणं, स्वभावामध्ये अनुकूल बदल करणं आणि शांत, खोल, समाधानकारक झोप मिळणं हे पाच मुद्दे आपल्यापैकी प्रत्येकाच्या जीवनात आपल्याला अंतर्भूत करताच आले पाहिजेत. त्यानंतर पुढचे जे काही आठ मुद्दे आहेत, त्यापैकी किमान चार ते पाच मुद्दे आपल्या जीवनामध्ये अंतर्भूत करता आले म्हणजे, एकूण नऊ ते दहा मुद्दे जर आपल्या जीवनामध्ये असू शकले तर मग आपल्याला रपुळशीूं आणि ींशपीळेप पासून कायमचं दूर राहून अतिशय शांत-रिलॅक्स-आनंदी जीवन जगण्याची संधी घेता येते. मला वाटतं, जे काही मी तुमच्यापुढे मांडलं आहे त्याचा नीट विचार करा. आयुष्यामध्ये अशी मनोवृत्ती निर्माण करा की, कोणत्याच प्रकारचे रपुळशीूं आणि ींशपीळेप आपल्या मनामध्ये निर्माण होणार नाहीत. आपलं जीवन पाहिलं तर ते अतिशय सुंदर आहे, सोपं आहे, सहज आहे, आनंदाने जगण्यासारखं आहे. आनंदाने जगणं हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे. त्यामुळे मी एवढंच सांगेन की, या मुद्यांचा नीट विचार करून आजपासूनच आपलं जीवन अतिशय शांत, रिलॅक्स, आनंदी अवस्थेत जगायचं, असं ठरवू या.

(लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक आहेत.)

भ्रमणध्वनी-9371014832

Tuesday 25 December 2012

ताणतणावाचं नियोजन तुमच्याच हाती

तुम्हाला जर ताणतणावरहित जगायचं असेल तर आयुष्यामध्ये रिलॅक्सेशन तंत्राची जोड देणं अपरिहार्य आहे. तुम्ही त्याकरिता साधे रिलॅक्सेशन वापरा, संमोहन उपचार वापरा, योगा किंवा मेडिटेशन वापरा किंवा इतर कोणतेही रिलॅक्सेशनचे तंत्र वापरा; पण त्याची जोड देणे नितांत गरजेचे आहे. कारण आपल्या शरीरामध्ये ज्या प्रकारची रपुळशीूं आणि ींशपीळेप निर्माण होतात, अँंड्रीनॅलीन आणि स्टीरॉईड्सचं प्रमाण साचत जातं त्याचा निचरा करण्यासाठी रिलॅक्सेशन अपरिहार्य आणि आवश्यक आहे. त्याशिवाय एवढय़ा उत्तम पद्धतीने निचराच होऊ शकत नाही हे कृपया आपण समजून घ्या. संमोहन उपचाराचा उपयोग तुम्ही व्यक्तिमत्त्व विकासाकरिता करता. इतरही अनेक गोष्टींचा उपयोग व्यक्तिमत्त्व विकासासारखा तुम्ही करू शकाल; पण रिलॅक्सेशन, संमोहनाचा उपयोग स्वत:चं शरीर उत्तम पद्धतीने रिलॅक्स करण्याकरिता जो करू शकतो त्याला मात्र दुसरा पर्याय नाही हे कृपया समजून घ्या.

आपल्या विचारप्रक्रियेमध्ये बदल केला पाहिजे - आपल्याला जर नकारात्मक विचार करण्याची सवय असेल तर सातत्याने आपण आपल्या मनामध्ये ताणतणावच निर्माण करत जाणार आहोत. त्यामुळं आपल्याला विधायक विचार करण्याची सवय निर्माण करणं नितांत गरजेचं आहे. त्याकरिता एक तर संमोहन उपचार आपल्याला वापरता येतात आणि त्यातून ही सवय निर्माण करता येते, तर दुसर्‍या बाजूने सातत्याने आपल्या कॉन्शस माईंडमध्ये स्वत:च स्वत:ला सांगून, 'अरे, मला नकारात्मक विचार नाही करायचा बरं का! आता मी सतत पॉझिटिव्ह विचार करणार आहे,' असं दरवेळी स्वत:ला दक्ष राहून सांगत जाण्यातूनसुद्धा आपल्यामध्ये बदल घडवून आणता येतो. जीवनाकडे पाहण्याचा एक व्यापक, विधायक माणुसकीपूर्ण दृष्टिकोन स्वीकारणे आपल्याला नितांत गरजेचं आहे. त्यामुळे आपण स्ट्रेस आणि इतर सगळं टेन्शन्स आपल्या जीवनातून घालवू शकतो.

आपल्या स्वभावामध्ये बदल करणं - जोपर्यंत आपण आपल्या स्वभावामध्ये विधायक बदल करू शकणार नाही, तोपर्यंत या स्ट्रेसपासून आणि टेन्शनपासून आपण कधीही स्वत:ला वाचवू शकणार नाही. अर्थात याकरिता पुन्हा संमोहन उपचार आपल्याला ताकदीने मदत करतात. स्वभावामध्ये बदल करण्यासाठी त्या पद्धतीचे बदल आपल्याला घडवून आणता येतात.

शांत, खोल आणि समाधानकारक झोप मिळाली पाहिजे - झोप हे टेन्शन-ताणतणाव याचा निचरा करणारं अतिशय उत्तम औषध आहे. जर आपल्याला रोज शांत, खोल आणि गाढ झोप लागत राहिली तर फारसे ताणतणाव शिल्लकच राहत नाहीत; पण यात एक अडचण आहे. ज्यावेळेस आपल्या मनावरच्या ताणाचे प्रमाण वाढते, टेन्शनचे प्रमाण वाढते, रपुळशीूं खूप वाढते त्यावेळेस आपल्याला झोपच येत नाही. रपुळशीूं आणि ींशपीळेप हे खर्‍या अर्थाने झोपेचे शत्रू आहेत. म्हणजे ज्यांच्यामुळे त्याचा निचरा होतो आणि आपण नॉर्मल होतो, पूर्ववत होतो, ती झोपच जर आपल्याला मिळाली नाही तर आपल्याला खर्‍या अर्थानं अतिशय कठीण समस्येला तोंड द्यावं लागतं. याकरिता पुन्हा आपल्याला संमोहन उपचारांची मदत होते. समजा एखाद दिवशी ताणाचे प्रमाण वाढलेले असल्यामुळे झोप येत नसेल, तर संमोहन उपचार करा. कॅसेट ऐका.. तुमच्या मनावरचे ताण कमी होतील. तरीही झोप आली नाही तर पुन्हा दुसर्‍यांदा ऐका, तिसर्‍यांदा ऐका! मनावरचे ताण बरेचसे कमी झाले की तुम्हाला छानपैकी झोप लागेल. त्यामुळे शांत, खोल व समाधानकारक झोप हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. अर्थात कुणी किती तास झोपायचं हे व्यक्तिपरत्वे अवलंबून असतं. याबाबत कोणताही असा नियम सांगत नाही की सहा तास, सात तास झोप पुरेशी होते. काही माणसांना साडेसात-आठ तासांची झोप आवश्यक वाटते. काही माणसांना पाच तासातसुद्धा झोप पूर्ण होते याचे समाधान मिळते. त्यामुळे माणसानुसार, त्याच्या व्यक्तिमत्त्वानुसार, त्याच्या आवश्यकतेनुसार त्याच्या झोपेचे प्रमाण कमी-अधिक असू शकते; पण शांत, खोल आणि समाधानकारक झोप मिळणं हे मात्र नितांत गरजेचं आहे.

व्यायाम - नियमित आणि आवश्यक तेवढा व्यायाम जर आपण करत गेलो, तर जे अँंड्रीनॅलीन आणि स्टीरोईड्स अतिरिक्त प्रमाणात आपल्या शरीरात साचतात त्यांचा निचरा होण्यासाठी मदत मिळते. कारण व्यायाम करताना जी अँक्शन घडते त्यातून घाम येऊन पुढील क्रियेसाठी स्नायू तयार होतात आणि त्यामुळे शरीरात अतिरिक्त प्रमाणात साचलेली अँड्रीनॅलीन आणि स्टीरॉईड्स कमी होतात. त्यामुळे त्याचे दुष्परिणाम आपल्याला कमी प्रमाणात भोगावे लागतात.

आहार - आहारसुद्धा आवश्यक आहे. योग्य आणि आवश्यक तेवढा संपूर्ण आहार नितांत गरजेचा आहे.

आपल्याला व्यसनांपासून दूर राहता आलं पाहिजे - दारू, तंबाखू, सिगारेट यासारख्या व्यसनांपासून आपण दूर राहिलो पाहिजे. मला पुन्हा एकदा प्रकर्षाने तुम्हाला जाणीव करून द्यावीशी वाटते की दारू, सिगारेट, तंबाखू अशी व्यसनं रपुळशीूं ीिेपश व्यसनं आहेत. आपल्यापैकी अनेक सिगारेट ओढणार्‍यांना असं वाटतं की सिगारेट ओढल्यानंतर रपुळशीूं निघून जाते व आपण रिलॅक्स होतो; पण ही वस्तुस्थिती नाही. सिगारेटची सवय आपल्या शरीराला लागलेली असते. त्यामुळे मुद्दाम शरीर कृत्रिम रपुळशीूं निर्माण करतं. जेणेकरून आपण सिगारेट ओढावी आणि मग सिगारेट ओढल्यानंतर आपलं शरीर थोडंसं रिलॅक्स होतं. पुन्हा रपुळशीूं लीशरींश होते. पुन्हा ताणतणाव निर्माण होतात. यातून सातत्याने ताणतणाव निर्माण करून घेण्याची सवय दारू पिणार्‍या माणसाला, सिगारेट ओढणार्‍या माणसाला, तंबाखू खाणार्‍या माणसाला लागते. तथापि या व्यसनांमुळे आपल्याला रिलॅक्सेशन मिळते हा केवळ गैरसमज आहे हे कृपया आपण समजून घ्या.

जीवनामध्ये काही अर्थपूर्ण नाती असली पाहिजेत, प्रेम असले पाहिजे - जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये प्रेम नाही, प्रेमाला वाव देणारी माणसं नाहीत तोपर्यंत आपल्या जीवनात जगण्यात अर्थ वाटत नाही आणि मग ही परिस्थिती रपुळशीूं आणि टेन्शन निर्माण करणारी परिस्थिती ठरते. म्हणून आयुष्यामध्ये चांगले मित्र असणं, चांगल्या मैत्रिणी असणं, मुलं असणं, जोडीदार असणं, इतर कौटुंबिक नाती असणं हे नितांत गरजेचं आहे.

समाधान देणारा सेक्स - खरं म्हणजे पती-पत्नीच्या संबंधांमध्ये दोघांनाही पुरेशी तृप्ती मिळाली पाहिजे. दोघांनाही समाधान देणारा सेक्स असला पाहिजे. मानवी जीवनामध्ये सेक्समधून जेवढा रपुळशीूं आणि ींशपीळेप चा निचरा होतो तेवढा सुंदर निचरा होण्याचे दुसरे उदाहरण नाही. माणूस अंतर्बाह्य सुंदर पद्धतीने रिलॅक्स होतो. भारतीय माणूस सेक्सला फार महत्त्व देत नाही. खरं म्हणजे अनेकदा पती-पत्नीसुद्धा सेक्स या विषयावर परस्परांसोबत बोलत नाहीत. त्यातल्या त्यात साधारणत: असं मानलं जातं की, पुरुषाची तृप्ती झाली की संपलं. त्यातून स्त्रियांमधलं असमाधान मात्र वाढत जातं. हा आपल्या देशामधला सगळय़ात मोठा समस्या असणारा संदर्भ अनेकांना माहीतसुद्धा नसतो. त्यामुळे दोघांचीही लैंगिक तृप्ती हा मुद्दा आहे. पती-पत्नीने हा मुद्दा समजून घेतला पाहिजे आणि नियमितपणे दोघांनाही समाधान देणारा सेक्स उपलब्ध होईल याची काळजी घेतली पाहिजे. त्यामध्ये जर काही अडचणी येणार असतील तर त्यावर मात केली पाहिजे. संमोहन उपचार पद्धती अतिशय उत्तम पद्धतीने त्यावर मात करण्यासाठी आपल्याला मदत करू शकतात.

सेक्सच्या आड येणारा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रपुळशीूं आणि ींशपीळेप. अपुळशीूं आणि ींशपीळेप हे सेक्सचा शत्रू आहेत. समजा काही कारणामुळे पतीला किंवा पत्नीला, कोणालाही प्रचंड प्रमाणावर मनावर जर ताण निर्माण झालेला असेल, कोणत्याही एखाद्या गोष्टीमुळे ती किंवा तो अस्वस्थ असेल तर दोघांना सेक्समध्ये सहभागी होता येत नाही आणि पतीबाबत ही बाब असेल तर त्याला परफॉर्मन्स करता येत नाही. त्यामुळे दोघांमध्ये उत्तम सेक्स तर सोडाच, पण साधं सेक्श्युल लाईफसुद्धा उरू शकत नाही. त्यामुळे स्वाभाविकच यावर मात करण्यासाठी रिलॅक्सेशनचं तंत्र उपयोगी पडतं. आधी जर आपण संमोहन किंवा कोणतंही रिलॅक्सेशनचं तंत्र वापरलं तर स्वाभाविकच रपुळशीूं आणि ींशपीळेप चं प्रमाण कमी होतं आणि ते पुरेसे कमी झाल्यानंतर सेक्सचा झशीषेीारपलश उत्तमपणे साधता येतो. त्यामुळे संमोहन उपचार पद्धती सेक्सवरच्या प्रत्येक समस्येला घालवण्यासाठी, त्यावर मात करण्यासाठी आपल्याला सुंदररीत्या मदत करू शकते.

मनोरंजन - मनाला पुरेसा विरंगुळा देणारं मनोरंजन आपल्या जीवनामध्ये असलं पाहिजे. आपण नाटक पाहतो. नाटकामध्ये खर्‍या अर्थाने शिरतो, समरस होतो, त्याचा आनंद आपण घेतो. त्यातून आपल्याला मनोरंजन मिळतं. सिनेमामध्ये आपण याच पद्धतीने शिरतो, खर्‍या अर्थाने त्याच्याशी तादात्म्य होतो. त्यातून आपल्याला आनंद मिळतो. डान्स आहे, गाणी आहेत, दूरदर्शन आहे. या सगळय़ाच प्रकारच्या मनोरंजनाला एक खास महत्त्व आपल्या जीवनामध्ये आहे. जर आपण यामध्ये मनापासून सहभागी झालो, तर संपूर्ण मन त्यामध्ये गुंतल्यामुळे स्वाभाविकच सगळय़ा प्रकारच्या ींशपीळेपी आणि रपुळशींळशी चा निचरा व्हायला मदत मिळते आणि पुन्हा ताजेतवाने होऊन आपण जीवनाला सुरुवात करू शकतो. यातलं सगळय़ात उत्तम जर कोणतं मनोरंजन असेल तर ते डान्स आहे. कारण डान्समध्ये तीन गोष्टी एकत्र येतात. यामध्ये रिदम-ताल, शारीरिक व्यायाम आणि गाणी या तीन गोष्टी एकत्र येतात.

महाराष्ट्रीयन माणसं याबाबतीत मात्र बरीचशी नतद्रष्ट आहेत. महाराष्ट्रीयन माणसं काय म्हणतात, तू नाच आम्ही पाहतो. ते तमासगिरांना नाचायला लावतात. थोडक्यात 'तुम्ही निरोगी रहा, आम्ही तुम्हाला पाहत पाहत रोगी बनत जातो', या पद्धतीच्या मनोवृत्तीने जगणारी आपण महाराष्ट्रीयन माणसं आहोत. नाचणार्‍यांबाबत आपण बोलतानासुद्धा 'नाच्या', 'तमासगीर' असे शब्द वापरतो. भारतामधल्याच इतर काही कल्चर आहेत, ज्यांच्या जीवनाचा 'नाच' हा अविभाज्य भाग आहे. आदिवासी, पंजाबी, गुजराती अशा बहुतांश कल्चरमध्ये 'नाच' हा त्यांच्या जीवनाचा 'अपरिहार्य आणि अविभाज्य' भाग आहे. एवढेच नव्हे तर साऊथ इंडियन्समध्येसुद्धा 'नाच' हा त्यांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा, प्रतिष्ठेचा, सन्मानाचा भाग आहे. महाराष्ट्रीयन माणसं मात्र याबाबत नतद्रष्ट आहेत.

(लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन

समितीचे संस्थापक, संघटक आहेत.)

भ्रमणध्वनी-9371014832

जादूटोणाविरोधी विधेयकातून नवे क्रांतिपर्व सुरू होईल

नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात जादूटोणाविरोधी विधेयक चर्चेला येणार अशा बातम्या वृत्तपत्रांमधून झळकताहेत. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या दोघांचेही या अर्थाची वक्तव्ये प्रसिद्ध झाली आहेत. सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे जाहीररीत्या आणि खाजगीतही या अधिवेशनात हे विधेयक चर्चेला घेऊन संमत करणार असं बोलताहेत.

पहिल्या आठवडय़ात विधानमंडळाचे कामकाज सुरळीत चालू शकले नाही. या आठवडय़ात ते सुरळीत चालू शकले तर कदाचित हे जादूटोणाविरोधी बिल चर्चेला येऊ शकेल. पण नेहमीप्रमाणेच, ''आमच्या धर्मावर गदा येणार, वारीला जाणं, सत्यनारायण करणं, घरीसुद्धा पूजा करणं गुन्हा ठरणार, हे विधेयक केवळ हिंदूंच्या विरुद्ध आहे,'' असा आरडाओरडा हितसंबंधी मंडळींनी आणि विशेषत: सनातन संस्थेवाल्या सनातन्यांनी सुरू केला आहे. जादूटोणाविरोधी विधेयक संमत झालं तर सनातन संस्था, हिंदू जनजागरण समिती व या सनातनी विचारांचे इतर लोक अडचणीत येतील. त्यांना विखारी अंधश्रद्धाळू अमानुष सनातनी प्रचार थांबवावा लागेल अथवा जेलची हवा खावी लागेल हे खरं आहे. सनातन संस्थेवर बंदी घालण्याची शिफारस महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे केली आहे. त्यामुळे त्यांनी जीव तोडून या बिलाला विरोध करणं स्वाभाविक आहे. पण इतरांनी का विरोध करावा? काय आहे या बिलात? त्यावेळचे सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हंडोरे, मुख्यमंत्री विलासराव देशमुख, उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या पुढाकाराने सध्याचे जादूटोणाविरोधी विधेयकाचे प्रारूप तयार झाले आहे. 16 डिसेंबर 2005 साली ते विधानसभेत नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात पारित झाले होते. पुढे ते विधानपरिषदेत अडकले. विधानसभेत पारित झालेले विधेयक संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठविल्यामुळे ते शून्यावर आहे. आता सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनी पुन्हा ते विधानसभेत मांडले आहे. फक्त विधेयकाच्या नावात बदल केला. बाकी जसेच्या तसे आहे. सध्याच्या विधेयकातील शब्दन्शब्द विचारपूर्वक ठरविण्याची संधी माजी सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्यासोबत मला मिळाली. ना. हंडोरे त्यांचे खासगी सचिव मिलिंद शंभरकर आणि मी अशा तिघांनी या विधेयकाचे अंतिम प्रारूप ठरविण्यात प्रचंड मेहनत घेतली. त्यामुळे या विधेयकात आलेल्या प्रत्येक शब्दामागचा, बदलामागचा इतिहास मला ठाऊक आहे. तो वाचकांसोबत शेअर करण्याची संधी मी घेतो आहे. अनेकांना वाटते हे विधेयक फार कमजोर आहे. असं वाटणं चांगली गोष्ट आहे. पण गेल्या 30 वर्षात अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ लढाऊपणे तळागाळातून चालविणार्‍या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला माहीत आहे की, हा कायदा अतिशय ताकदवान आहे. सरकारच्या कर्तव्याच्या आणि भारतीय राज्यघटनेच्या सध्याच्या मर्यादेत राहून यापेक्षा प्रभावी विधेयक तयार करणे शक्य नाही. पण हा कायदा महाराष्ट्र सरकारचा आहे. आम्हा अंधश्रद्धा निर्मूलन चळवळवाल्यांचा नाही. तसा तो असता तर फलज्योतिषापासून पर परासानशास्त्रीय दावे करणार्‍यांपर्यंत सारे या विधेयकात ओढले गेले असते, पण ते शक्य नव्हते. कारण अंधश्रद्धा निर्मूलन करणं हे प्रबोधनाचं काम आहे. हे प्रबोधन आमच्यासारख्या कार्यकत्र्यांनी प्रसिद्धिमाध्यमांनी व सरकारनेही केलं पाहिजे. पण राज्यसरकारनं जिथे माणसाची उघड फसवणूक होते, लुबाडणूक होते, जीव धोक्यात येतो तिथेच कायद्याद्वारा हस्तक्षेप केला पाहिजे याचे नीट भान ठेवून सध्याचे प्रारूप तयार झाले आहे. सध्याच्या विधेयकाचा मथळा आहे 'महाराष्ट्र नरबळी व अन्य अमानवीय, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध व त्यांचे समूळ उच्चाटन अधिनियम 2011' अमानवीय, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा, नरबळी याचा अर्थ काय? 2 ख. नुसार याची व्याख्या सोपी करून टाकली. परिशिष्टात जोडलेली 12 कलमं म्हणजेच अमानवीय, अनिष्ट, अघोरी प्रथा, जादूटोणा, नरबळी या बाहेरची एकही गोष्ट या विधेयकात अंतर्भूत नाही, अशी अपवादात्मक व सोपी सुटसुटीत व्याख्या सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांच्यामुळं करण्यात आली. त्यांनी खूप मेहनतीनं हे विधेयक सोपं, सुटसुटीत करण्यात मोलाचं मार्गदर्शन केलं. सर्वसाधारण विधेयकात शब्दांची व्याख्या करावी लागते. त्यात खूप गोष्टी येऊ शकतात आणि म्हणून काही लोक अमानवीय, अघोरी, अनिष्ट प्रथा यात अनेक प्रथांवर बंदी येईल, अशी भीती व्यक्त करतात, पण केवळ व्याख्येद्वारा 12 कलमांच्या मर्यादेतच हे विधेयक बंदिस्त केले आहे. त्यात इतर प्रथा येत नाहीत. हा पहिला महत्त्वाचा मुद्दा.

परिशिष्टातील 12 कलमासंबंधी कृती घडली की, संबंधितांसाठी शिक्षा मात्र कठोर आहे. सहा महिने ते सात वर्षे कारावास आणि पाच हजार ते पन्नास हजार रुपये दंड. शिवाय या अपराधाचा प्रसार-प्रचार करणार्‍यासही एवढीच कठोर शिक्षा आहे. शिवाय हा अपराध दखलपात्र व अजामीनपात्र आहे. त्यामुळं पोलिसांना गुन्हा नोंदवावाच लागेल व जामीन न्यायालयातून घ्यावा लागेल. पण अपराध काय?

परिशिष्टातील ही 12 कलमं वाचा

1. भूत उतरविण्याच्या बहाण्याने बांधून ठेवून वा अन्यरीत्या मारहाण करणे, मिरचीची धुरी देणे, पादत्राणे भिजवलेले पाणी पाजणे, छताला टांगणे, तापलेल्या वस्तूंचे चटके देणे, जबरदस्तीने मूत्र, विष्ठा पाजणे, केस उपटणे इत्यादी प्रकारे छळ करणे.

(भूत उतरविण्यासाठी मंत्र-प्रार्थना, पूजा करणे गुन्हा नाही)

2. एखाद्या व्यक्तीने (जिवंत) तथाकथित चमत्कार करून आर्थिक प्राप्ती करणे, फसवणूक, ठकविणे, दहशत बसविणे. 3. जीवाला धोका निर्माण होतो किंवा शरीराला जीवघेण्या जखमा होतात अशा अनिष्ट व अघोरी प्रथांचा अवलंब करणे, उत्तेजन देणे, सक्ती करणे, 4. कोणतेही अमानुष कृत्य करणे, नरबळी देणे, सल्ला देणे, प्रोत्साहन देणे, प्रवृत्त करणे. 5. अतिंद्रिय शक्ती संचारली असे भासवून भीती निर्माण करणे, न ऐकल्यास वाईट परिणाम होतील, अशी धमकी देणे.

(केवळ देव-देवी अंगात येणे गुन्हा नाही)

6. एखादी व्यक्ती करणी करते. काळी विष्ठा करते, भूत लावले, जनावराचे दूध आटविते, अपशकुनी आहे, रोगराई पसरविणे, सैतान आहे असे जाहीर करणे व त्या व्यक्तीचे जगणे त्रासदायक करणे. 7. करणी, चेटूक केलं या सबबीखाली मारहाण करणे, धिंड काढणे, वाळीत टाकणे. 8. भुताची भीती घालणे, शारीरिक इजा भुतामुळं झाली सांगणे, वैद्यकीय उपचार घेण्यापासून रोखून मंत्रतंत्र अघोरी उपाय करणे, मृत्यूची भीती घालणे. 9. कुत्रा, साप, विंचू चावल्यास वैद्यकीय उपचार घेण्यापासून रोखून त्याऐवजी मंत्रतंत्र यांसारखे उपचार करणे.

(कुर्त्यावर अँन्टीरेबीज, अँन्टीव्हेनम (स्नेक) इंजेक्शन्स वेळीच घेतल्यास माणसं वाचू शकतात. कोकणातल्या विंचूदंशानं माणूस मरू शकतो, पण वैद्यकीय उपचारांनी वाचू शकतो.). 10. बोटाने शस्त्रक्रिया करतो वा गर्भवती स्त्रीचे गर्भलिंग बदलवितो असा दावा करणे. 11. अवतार असल्याचे सांगून व पूर्वजन्मी प्रियकर, प्रेयसी, पती, पत्नी असल्याचे सांगून लैंगिक संबंध ठेवणे. 12. मंदबुद्धीच्या व्यक्तीमध्ये शक्ती आहे असे भासवून त्या व्यक्तीचा धंदा व व्यवसाय करणे. आता या 12 कलमांत विरोध करण्यासारखे काय आहे? कुणीतरी सुबुद्ध माणूस याला विरोध करणे शक्य आहे का? ही 12 कलमं म्हणजेच कायदा आहे. मग हे सत्यनारायण, वारी, पूजेला कायदा विरोध करतो हे कुठून आलं? त्याला आधार काय?

भारतीय जनता पक्षाचा या बिलाला संपूर्ण पाठिंबा होता. आजही असलाच पाहिजे. त्यांना विरोध करण्याचा नैतिक अधिकारच नाही. त्या वेळचे भाजपचे महाराष्ट्र अध्यक्ष नितीन गडकरी माझे जुने मित्र. विद्यार्थिदशेपासूनचे स्नेही. मी दै. 'तरुण भारत' (नागपूर) चा युवास्तंभ चालवीत असे. त्या वेळी ते विद्यार्थी परिषदेत सक्रिय होते. तेव्हापासूनची मैत्री. त्यांनी माझं काम एकदम सोपं करू टाकलं. जादूटोणाविरोधी बिलासंबंधी सारे निर्णय घेण्यासाठी

भाजपतर्फे अशोक मोडक या आमदाराला प्रतिनिधी नेमून टाकलं. विधिमंडळाच्या भाजप कार्यालयात गोपीनाथ मुंडे, विरोधी पक्षनेते पांडुरंग फुंडकर यांच्यासमोर नितीन गडकरींनी माझ्यासमक्ष विषय काढला आणि चारही प्रमुख नेत्यांनी अशोक मोडक म्हणतील तर भाजपचं अंतिम मत असेल असं एक मतानं सांगितलं.

अशोक मोडक अतिशय आग्रही; पण खूप प्रगल्भ विचारांचे असल्यामुळे आमचं काम फारच सोपं झालं. एका महत्त्वाच्या बैठकीत तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख, उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील, सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्या उपस्थितीत अशोक मोडक यांनी या बिलावर अंतिम शिक्कामोर्तब केलं. त्यांनी सुचवलेले सारे बदल मान्य केले. मोडकांच्या आग्रहाखातर बिलात सार्वजनिक चळवळी म्हटल्याचं स्थान देणारी एक तरतूद होती. तीही आम्ही काढून टाकली. त्यामुळे या बिलाला विरोध करण्याचा कोणताही नैतिक अधिकार भाजपला नाही. माझे स्नेही नितीन गडकरी नेहमी म्हणतात,''मी दिलेला शब्द कधीही मोडत नाही.'' आता तर ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यामुळं त्यांचा शब्द त्यांच्या पक्षाचा अधिकृत शब्द खरा करण्यासाठी जबाबदारी ते पार पाडतील याची मला खात्री आहे. 2003 सालच्या हिवाळी अधिवेशनाआधी झालेल्या याच महत्त्वाच्या बैठकीच्या वेळी भाजपचे आ. मंगलप्रसाद लोढा यांच्या नेतृत्वाखाली जैन धर्मीयांचे एक शिष्टमंडळ मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना भेटायला आलं. खरं म्हणजे ते हे बिल मंजूर करू नका, असं सांगण्यासाठी आले होते. मुख्यमंर्त्यांनी त्यांच्याशी मला चर्चा करायला सांगितले. सारं बिल शिष्टमंडळानं समजावून घेतल्यावर आ. मंगलप्रसाद लोढा म्हणाले,''मानव, हे तर फारच चांगलं बिलं झालं आहे. यात विरोध करण्यासारखं काहीच नाही. उगाच गैरसमज पसरविला जातो आहे. आम्हा धार्मिक माणसांचा गैरसमज दूर करण्यासाठी या बिलात काही तसे टाका.'' चांगल्या धार्मिक रूढी, परंपरांना हे बिल लागू पडत नाही असं काहीतरी मी त्यांना मुख्यमंर्त्यांना सांगायला सांगितलं. ''आपल्याला असं काही टाकता आलं तर टाका,'' असं मुख्यमंत्री म्हणाले, म्हणून आम्ही (मी, तत्कालीन सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हंडोरे, पी. एस. मिलिंद शंभरकर) त्या पद्धतीनं एक वाक्य तयार केलं. कायदा खात्याच्या माणसांना ते दिलं. या बिलात व्यक्तीचं शारीरिक, मानसिक, आर्थिक नुकसान न करणार्‍या कोणत्याही चांगल्या रूढी, परंपरेचा समावेश नाही अशी तळटीप टाकायचं आम्ही ठरवलं होतं. कायदा खात्यानं त्याचं तेरावं कलम करून टाकलं. त्यांच्या पद्धतीप्रमाणे त्याचं शब्दांकन तयार केलं. ते समजायला कठीण आहे हे माझ्या लक्षात आलं होतं; पण वेळ नव्हता. नागपूर अधिवेशनात बिल मांडायचं असल्यामुळं आणि बिलाचं अंतिम रूप तयार करण्याची जबाबदारी व अधिकार कायदा खात्याचाच असल्यामुळे आम्ही गप्प बसलो.

काय आहे ते कलम?

शंका दूर करण्यासाठी याद्वारे असे घोषित करण्यात येते की, ज्यामुळे व्यक्तीला मानसिक, शारीरिक वा आर्थिक बाधा पोहोचत नाही असे कोणतेही धार्मिक विधी व धार्मिक कृत्ये अंतर्भूत असलेल्या कृतींनी या अधिनियमातील कोणतीही गोष्ट लागू होणार नाही. याचा खरा अर्थ असा होतो की, परिशिष्टातील 12 कलमांत एखादी रूढी, विधी, कृत्य येत असेल, कारण या 12 व्या

कलमाव्यतिरिक्त इतर कशालाच हे बिल लागू होत नाही, असं व्याख्येत 1 (ख), स्पष्टच केलं आहे) आणि त्याद्वारे व्यक्तीला मानसिक, शारीरिक, आर्थिक बाधा पोहोचत नसेल तर त्यालाही हे बिल लागू होणार नाही. ती गोष्ट शिक्षापात्र ठरणारं नाही. चांगल्या रूढी, परंपरांना हे बिल लागू होत नाही हे सांगण्यासाठी हे तेरावं कलम समाविष्ट केलं अहे. त्याचा अर्थ हाच होता. फार गदारोळ व्हायला लागल्यानंतर मी पुन्हा सुप्रीम कोर्टात माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांच्याकडे गेले. कायदा खात्याच्या शब्दरचनेनुसार टाकलेलं हे तेरावं कलम त्यांनी बारकाईनं पाहिलं आणि निर्वाळा दिला. भाषा उगीच क्लिष्ट केली आहे. न्यायमूर्तीनी अगदी सुरुवातीलाच मला समजावून सांगितलं होतं. बिलाची भाषा सोपी हवी. कुणालाही कळली पाहिजे. बिल मराठीतच तयार करायचं. मग त्याचं इंग्रजीत भाषांतर करायचं. नाहीतर इंग्रजीत बिल बनवितात. अशा क्लिष्ट मराठीत त्याचं भाषांतर करतात हे योग्य नाही. त्यासाठी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानला तयार केलेले कायदे वाचा. एवढय़ावर ते त्या वेळी थांबले नाहीत. तर अनेक तास माझ्यासोबत असून त्यांनी या बिलातील महत्त्वाची कलमं सोप्या मराठी भाषेत तयार करून दिली होती. त्यामुळं या वेळी क्लिष्ट भाषेविषयी (13 व्या कलमाच्या) त्यांनी नापसंती व्यक्त केली.

पण पुढे म्हणाले, पण अर्थ बरोबर आहे. व्यक्तीचं मानसिक, शारीरिक, आर्थिक नुकसान न करणार्‍या रूढी, परंपरांना (विधी, कृत्ये) यातून सूट दिली आहे. त्या शिक्षापात्र ठरणार नाही, असाच याचा अर्थ निघतो. व्यक्तीचं मानसिक, शारीरिक, आर्थिक नुकसान करणार्‍या धार्मिक विधी, कृत्यांना हे बिल लागू होतं असा अर्थ निघूच शकत नाही. कुणालाही तो काढता येणार नाही. कायद्याचा उलटा अर्थ काढता येत नसतो. सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती पी. बी. सावंतांनी हा निर्वाळा दिल्यावर मी रिलॅक्स झालो. ना. चंद्रकांत हंडोरेही रिलॅक्स झाले. तरी पण मग उद्या आम्ही आमच्या घरी सत्यनारायणाची पूजा केली तर तुम्ही म्हणाल व्यक्तीचं आर्थिक नुकसान झालं. आम्हाला 6 महिने जेलमध्ये पाठवलं. पंढरपूरच्या वारीला पायी गेलो तर म्हणाल. शारीरिक नुकसान झालं. आम्हाला 6 महिने जेलमध्ये पाठवलं. आम्ही घरी देवाची 2 तास पूजा करीत असलो तर म्हणाल, तुमचं मानसिक नुकसान झालं. 6 महिने जेलमध्ये पाठवाल, असे आ. दिवाकर रावते विधानपरिषदेत बोलले. वृत्तपत्रांत मोठमोठे मथळे, बातम्या, छापून आल्यात आणि महाराष्ट्रभर गैरसमज पसरला. असं बिलात कुठेही नसताना आ. दिवाकर रावते मुद्दाम बोलले. पुढे त्यावर चर्चाच न झाल्यामुळं हे मत कुणीही विधानपरिषदेच्या फ्लोअरवर खोडून काढलं नाही. सनातन्यांच्या हाती कोलीत मिळालं. ते ह्या बातम्या, मथळे दाखवून दाखवून मुद्दाम गैरसमज पसरवताहेत.

खरं म्हणजे शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धवजी ठाकरेंना बिलासंदर्भात मातोश्रीवर भेटलो होतो, 'अंधविश्वास शब्द काढून टाका, अघोरी प्रथा म्हणा,' अशी त्यांनी केलेली सूचना मान्य झाली. त्या वेळच्या मुख्यमंर्त्यांनी बिलाचा मथळाच बदलून टाकला. बिल छपाईला जाण्याआधी आ. सुभाष देसाईंनी अनेक शाब्दिक बदल सुचविले. ते बिलात केले गेले. शिवसेनेचा 100 टक्के सहभाग मिळण्याआधीच हे बिल विधानसभेत मांडून संमत झाले होते. हे खरे असले तरी सगळ्याच पक्षांशी चर्चा करून जास्तीतजास्त सहमतीनं प्रारूप ठरविण्याचा विचार अमलात आणला होता हेही खरं आहे. सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांच्याशी मंत्रालयात झालेल्या चर्चेत त्यांनी या नव्या बिलातील काही बदल करण्याचे मान्य केले. त्यामुळं मुद्दाम विरोध करणार्‍यांना निष्प्रभ करता येईल हे त्यांनाही पटले. एकतर हे तेरावं कलम मुळातूनच विधेयकातून वगळावं. त्यामुळे विधेयक, कुठेही कमकुवत होत नाही. दुसरं पाचवं कलम ट्रस्ट कंपनीसंबंधी आहे. तेही काढून टाकावं. हिंदूंचे ट्रस्ट ताब्यात घेण्याचे षड्यंत्र अशी ओरड करणार्‍या सनातन्यांची हवाच निघून जाईल. तिसरं पुन्हा अंधविश्वास हा शब्द नव्या बिलात टाकला आहे. मागील सरकारनं कार्याध्यक्ष उद्धवजी ठाकरेंची सूचना सन्मानपूर्वक मानली होती. त्याचा आदर राखावा. बिल चर्चेला येतानाचे हे बदल करण्याची तयारी सरकारनं दाखवली तर विरोध करण्यासारखं काहीही उरणार नाही. उत्तम वातावरणात चर्चा होऊ शकेल. हे जादूटोणाविरोधी बिल संमत झालं तर संपूर्ण देशाला हे कळत नकळत लागू होईल. किमान प्रसिद्धिमाध्यमांसाठी तरी ते देशभर लागू होईल. कारण परिशिष्टातील 12 कलमांचा प्रचार-प्रसार करणं हाही कायद्यानं गुन्हा ठरणार आहे. मुंबईत प्रसारित झाल्याशिवाय भारतातील कोणताच टीव्ही चालू शकत नाही. पर्यायानं देशभरातील सार्‍याच टीव्ही व इतर प्रसिद्धिमाध्यमांना या बिलाचा अभ्यास करूनच आपल्या कार्यक्रमांना, जाहिरातींना, बातम्यांना प्रसारित करावं लागेल. शिवाय महाराष्ट्रातील हजारो, लाखो माणसांचे जीव वाचतील. लाखो लोकांची लुबाडणूक थांबेल. एक नवे क्रांतिपर्व सुरू होईल.

(लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन

समितीचे संस्थापक, संघटक आहेत.)

भ्रमणध्वनी-9371014832

Friday 14 December 2012

ज्योतिषी ठगांना आव्हान देण्याची वेळ आली आहे


हिंदुत्ववादी समजल्या जाणार्‍या स्वामी विवेकानंदांची एक कथा सांगून लेखाचा शेवट करतो. दुसर्‍या धर्मीयांचा द्वेष न करता त्यांच्याबद्दल पुरेपूर बंधुभाव बाळगून टिळा, जानवं, पूजाअर्चा, कर्मकांड, वर्णश्रेष्ठत्व, अंधश्रद्धा नाकारूनही माणूस हिंदू असू शकतो. नव्हे तोच खरा हिंदू असतो. असं प्रभावीपणे मांडणार्‍या स्वामी विवेकानंदांच्या शब्दाइतका प्रभावी, समर्पक शेवट दुसरा असू शकतो का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हिंदुत्वाचा कैफ लादून ज्योतिष पसरवणार्‍या षडयंत्राला दुसरं प्रभावी उत्तर असू शकतं का? नियती, नशीब या संकल्पनांवर विश्वास ठेवल्यामुळे या देशातील जनता दुर्बळ होते. त्यामुळेच हा देश रसातळास पोहोचला आहे. हे नेमकेपणानं ओळखून माणसाचं कर्तृत्व जागवण्यासाठी स्वामी विवेकानंद एका ज्योतिष्याची कथा आवर्जून सांगत असत. एक चक्रवर्ती राजा होता. त्याच्या पदरी एक फार मोठा विद्वान ज्योतिषी होता. नव्यानचं रुजू झाला होता. कुंडली मांडून अतिशय अचूक असं भूतभविष्य-वर्तमान सांगतो अशी त्या ज्योतिष्याची ख्याती होती. त्यानं वर्तवलेलं भविष्य म्हणजे काळ्या दगडावरची रेघ असते असं समजलं जायचं. राजाच्या पदरी असणारा प्रधान परदेश प्रवासाला गेला होता. एक दिवस राजाला स्वत:चं भविष्य विचारण्याची हुक्की आली. त्यानं ज्योतिष्याला स्वत:चं भविष्य विचारलं.

राजे महोदय, सहा महिन्यांत मृत्युयोग

ज्योतिष्यानं राजाच्या कुंडलीचा नीट अभ्यास केला. त्याचा चेहरा पडला. तो बोलेनाच. राजानं फारच आग्रह केल्यावर तो भविष्य सांगायला तयार झाला. तो म्हणाला, ''राजे महोदय, मला सांगायला फार वाईट वाटतं, दु:खही होतं; पण सत्य सांगणं माझं कर्तव्य आहे म्हणून सांगतो. आपल्याजवळ फार कमी वेळ आहे. केवळ सहा महिन्यांचा अवधी आहे. आतापासून सहाव्या महिन्याच्या शेवटी, सातवा महिना सुरू होण्याच्या आधी आपल्याला हे जग सोडून जावं लागेल. मृत्युयोग आहे. कोणत्याही परिस्थितीत न टळणारा मृत्युयोग.'' राजाला प्रचंड हादरा बसला. आपण मरणार या कल्पनेनंच राजा झुरू लागला. हळूहळू त्याचं राज्यकारभारावरून लक्ष उडालं. तो आपल्या शयनगृहातच राहू लागला. दरबारात येईनासा झाला. ही बातमी बाहेर फुटली. राजा दुबळा होतोय हे लक्षात येताच मांडलिक राजांनी गुप्त तयारी सुरू केली. सैन्याची जमवाजमव सुरू केली. हेरखात्याकडून ही बातमी परदेशात असलेल्या प्रधानाला समजली. 'राज्य' धोक्यात आहे हे लक्षात येताच प्रधान आपली यात्रा अर्धवट टाकून राज्यात परत आला. तोवर दोन महिन्यांचा कालावधी उलटला होता. ज्योतिष्याच्या भविष्यकथनामुळं राजाचं मन राज्यकारभारातून उडालं, हे प्रधानाला हेरखात्याकडून कळलं होतंच. तातडीनं प्रधानानं राजाची भेट घेतली. भविष्यकथनात काही अर्थ नसतो. कदाचित एखाद्या शत्रूचं हे षडयंत्र असावं, असंही प्रधानानं सांगून पाहिलं. पण काही उपयोग झाला नाही. राजाचा या नव्या ज्योतिष्याच्या भविष्यकथनावर अढळ विश्वास बसला आहे, आपण कितीही समजावून सांगितलं तरी राजा ऐकणार नाही, हे प्रधानाच्या लक्षात आलं. प्रधानानं खूप विचार केला, निर्णय घेतला आणि निश्चयानं कामाला लागला.

राजदरबार भरला

दुसर्‍या दिवशी दुपारी 12 वाजता राजदरबार भरणार असा तातडीचा आदेश प्रधानानं काढला. सगळ्यांना सूचना गेल्या. महत्त्वाच्या मंर्त्यांना संदेश गेले. सैन्याला आणि हेरखात्याला जय्यत तयार राहण्याचे आदेश सुटले. 'राजाही दरबारात हजर राहणार आहे' असे निरोप गेले. खूप दिवसांनंतर राजदरबार भरला. राजदरबारात सगळे मंत्री, सेनापती, मानकरी तर हजर होतेच; पण राज्यातील

महत्त्वाचे व मान्यवर नागरिकही मोठय़ा संख्येनं प्रधानानं हजर ठेवले होते. बरोबर 12 वाजता खचाखच भरलेल्या दरबारात राजेमहोदयांना प्रधान जातीनं घेऊन आले. सारे आपापल्या स्थानावर विराजमान झाले. प्रधानानं बोलायला सुरुवात केली. ज्योतिष्याला त्याच्या भविष्य कथनाच्या सामर्थ्याविषयी प्रश्न केला. ''ज्योतिष हे गणित आहे. माझं गणित अचूक असतं, माझं भविष्यकथन काळ्या दगडावरची रेघ असते.'' वगैरे ज्योतिष्यानं सांगितलं. ''आपण राजाचं भविष्य सांगितलं. मी पुन्हा तुम्हाला एक संधी देतो. पुन्हा राजाच्या कुंडलीचा अभ्यास करा. पुन्हा राजाचे भविष्य सांगा.'' प्रधानानं आज्ञा सोडली. ''माझं भविष्य-गणित कधीच चुकत नाही. खरं म्हणजे मी कधीच पुन्हा दुसर्‍यांदा गणित करत नाही. तरी तुमचा आग्रह आहे म्हणून अभ्यास करतो. राजाचं भविष्यकथन असल्यामुळंच मी माझा नियम मोडायला तयार आहे.'' असं म्हणून ज्योतिष्यानं पुन्हा राजाच्या कुंडलीचा अभ्यास सुरू केला. बराच वेळ आकडेमोड केली आणि शेवटी निर्धारपूर्वक सांगितलं. ''माझं भविष्यकथन अगदी अचूक होतं. राजाचा मृत्युयोग निश्चित आहे. आता केवळ चारच महिने उरलेत. त्यात कालत्रयीही बदल होणं शक्य नाही.'' हे भविष्यकथन ऐकताच संपूर्ण दरबार शहारला. आतापर्यंत केवळ कुजबुज ऐकू येत होती. पण आता खरंच राजा 4 महिन्यांत मरणार म्हटल्यावर सार्‍या दरबारावर शोककळा पसरली. राण्या रडायला लागल्या. पण प्रधानानं मुळीच विचलीत न होता ज्योतिष्याला विचारलं - ''ज्योतिषी महोदय, तुमची कुंडली तुम्हाला माहीत आहे का?''

मी अजून 55 वर्षे जगणार आहे

ज्योतिषी हसून म्हणाला, ''अहो, हे काय प्रधान महोदय, माझी कुंडली मला ठाऊक नसेल? अगदी मुखोद्गत आहे मला ती.'' ''तुमचं आयुष्य किती आहे?'' प्रधान. ज्योतिषी, ''अहो, आता तर मी कुठे पस्तीस वर्षांचा आहे. अगदी वयाच्या नव्वद वर्षांपर्यंत माझं आयुष्य आहे. अजून पंचावन्न वर्षे मी जगणार आहे.'' प्रधान , ''उत्तम गोष्ट आहे. तुम्ही पंचावन्न वर्षे अजून जगणार; दीर्घायू आहात. तरी माझ्याखातर पुन्हा तुम्ही तुमच्या कुंडलीचा अभ्यास करा; तुमचं आयुष्य किती ते मला सांगा.'' ज्योतिषी हसून आकडेमोड करायला लागला.. म्हणाला, ''प्रधानजी, तुमच्या सांगण्यावरून मी माझ्या कुंडलीचा पुन्हा एकदा अभ्यास केला. आकडेमोड केली. माझं भविष्य बरोबर आहे. मी दीर्घकाळ जगणार. वयाच्या नव्वदीपर्यंत जगणार..''

हे ऐकताच.. डोळ्यांचं पातं लवतं न लवतं तोच प्रधानजी ज्योतिष्याजवळ झेपावले. क्षणात आपली तलवार म्यानातून काढली. कचकन ज्योतिष्याचं मुंडकं उडवलं. धडापासून वेगळं झालेलं रक्ताळलेलं ज्योतिष्याचं मुंडकं राजाच्या पायाजवळ पडलं.

संपूर्ण दरबार शहारून गेला. स्मशानशांतता पसरली. प्रधान धीरगंभीर आवाजात सांगू लागला, ''राजे महोदय, मला माफ करा! आयुष्यात पहिल्यांदा तुमच्या परवानगीशिवाय मी एक निर्णय घेतला! पण माझा उद्देश तुमच्या लक्षात आल्यावर तुम्ही मला माफ कराल. एवढच नव्हे, तर तुम्ही, हा सारा देश, सारे प्रजाजन माझा निर्णय योग्य होता असंच म्हणतील याची मला खात्री आहे. राजे महोदय, या ज्योतिष्यानं आपण सहा महिन्यांत मरणार असं भविष्य कथन केलं. ते आपण खरंच धरून चाललात. कारण आपला ज्योतिषावर, भविष्यकथनावर प्रचंड विश्वास आहे. नाइलाजानं मी कठोर निर्णय घेतला. असल्या दैववादी बनवणार्‍या, नियतीवादी बनवणार्‍या ज्योतिषावर लोकांचा विश्वास वाढवणार्‍या ज्योतिष्याचं पितळ उघडं पाडण्याचा मी निश्चय केला. पण राजे महोदय, काल रात्री घेतलेला निर्णय, त्याचा मृत्यू त्याला कळू शकला नाही. त्याचे बदललेले ग्रह त्याला दिसले नाहीत. काही मिनिटांत येणारा मृत्यू ज्या ज्योतिष्याला दिसू शकला नाही, स्वत:चा मृत्युयोग ज्याला कळू शकला नाही, तो ज्योतिषी तुमचा मृत्युयोग कसा काय सांगू शकतो, महाराज? मला सांगा, कसा काय सांगू शकतो?'' प्रधान या ठिकाणी थांबला.. दरबारात स्मशानशांतता पसरली. थोडय़ा वेळानं हळूच राजानं दोन्ही हात उचलले. टाळी वाजवायला सुरुवात केली. सार्‍या दरबारानं टाळ्या वाजवून-वाजवून, टाळ्यांच्या गजरानं सभागृह दणाणून सोडलं. स्वामी विवेकानंद ही गोष्ट आवर्जून का सांगायचे, ते आपण समजून घेऊ, नीट मनात ठसवू. यानंतर कोणत्याच प्रकारचं भविष्य पुढील आयुष्यात पाहणार नाही, भविष्यावर विश्वास ठेवणार नाही असं ठरवू आणि नियतीवादी बनवणारं, पराक्रमशून्य बनवणारं हे ज्योतिषी षडयंत्र उलथवून टाकू !

आजवर कोणीही ''ज्योतिष हे शास्त्र आहे'' हे सिद्ध करू शकला नाही!

1985 सालापासून ज्योतिष्यांना आम्ही सतत आव्हान देत आलो आहे. आम्ही वीस पत्रिका देतो, ज्योतिष्यांनीच तयार केलेल्या पत्रिका देतो, त्यातील कोण जिवंत आहे व कोण मेलं आहे एवढंच 95 टक्के अचूक सांगा आणि 15 लाखांचं (2009 सालात ते 15 लाखांचं झालेलं आहे.) पारितोषिक घेऊन जा. काही ज्योतिषी पुढे म्हणू लागले. आमच्या शास्त्रानुसार मृत्यू सांगायचा नसतो. पुन्हा ही एक पळवाट, बनवेगिरी. ठीक आहे. त्याचाही फायदा आम्ही त्यांना घेऊ दिला. तुम्हाला ज्या विषयाचं भविष्य सांगता येतं असे किमान 5 मुद्दे ठरवा. आम्ही दिलेल्या वीस कुंडल्यांच्या आधारावर या 5 मुद्यांबाबतचं (कदाचित शिक्षण, नोकरी/ व्यवसाय, लग्न, मुलं, अपघात) भविष्य किमान 90 टक्के जरी अचूक सांगितलं तरी हे पारितोषिक मिळेल; पण हे पारितोषिक मात्र आजवर कुणीही जिंकू शकलेलं नाही किंवा त्याच्या जवळपाससुद्धा कुणी येऊ शकलेलं नाही.

काहींनी आव्हान स्वीकारण्याचा दावा केला. तसं वृत्तपत्रांमधून जाहीरही केलं; पण प्रत्यक्षात मात्र, वेळ आल्यावर नेहमीच आव्हानातून पळ काढला.

फक्त अशोक तोमर नावाच्या मुंबईत अँस्ट्रॉलॉजिकल इन्स्टिटय़ूट चालवणार्‍या ज्योतिष्यानं नाशिकात हे आव्हान पार पाडलं. 1985 साली सार्‍या पत्रकारांसमोर पार पडलेल्या या आव्हानात 10 कुंडल्यांच्या आधारे भाकितं केली. केवळ 32 टक्के अचूक ठरलीत, त्याचा दारुण पराभव झाला.

दिल्ली स्टार न्यूजच्या चंद्रगहणाच्या एका लाईव्ह कार्यक्रमात मीरा महाजन नावाच्या एका टीव्ही स्टार ज्योतिषीने जाहीर आव्हान स्वीकारण्याचे लाईव्ह मान्य केले. पण पुढे तिने चक्क पळ काढला. पुढे चार दिवस मी दिल्लीत थांबलो, पण ती चॅनेलवाल्यांनाही सापडली नाही.

फलज्योतिषावर आक्षेप : 186 वैज्ञानिकांचे पत्रक

फलज्योतिष हे विज्ञान नव्हे, असे जगभरातील शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. फलज्योतिषाला विरोध करणारे परिपत्रकच शास्त्रज्ञांनी तयार केले आहे आणि त्यावर विविध देशांतील महत्त्वाच्या 186 शास्त्रज्ञांनी सह्या केल्या आहेत. सह्या करणार्‍यांमध्ये 19 नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ आहेत. त्यात भारतातील सी.चंद्रशेखर या एकुलत्या एक शास्त्रज्ञाची सही आहे.

या परिपत्रकाचा मूळ मसुदा असा आहे :

जगभरातील विविध क्षेत्रांत फलज्योतिष अधिकाधिक स्वीकारले जात आहे. हे पाहून विविध क्षेत्रांतील आम्हा वैज्ञानिकांना काळजी वाटते. आम्ही खाली स्वाक्षरी करणारे-खगोलशास्त्रज्ञ, अँस्ट्रोफिजिसिस्ट आणि इतर क्षेत्रातील वैज्ञानिक (ज्योतिष्यांकडून वैयक्तिक आणि सार्वजनिकरीत्या सांगितली जाणारी भाकिते व सल्ले, जे चिकित्साही न करता स्वीकारले जातात त्या विरोधात) लोकांना सावध करू इच्छितो. ज्यांना ज्योतिषशास्त्रावर विश्वास ठेवावासा वाटतो त्यांनी जाणून असावं, की ज्योतिषशास्त्रातील गृहीतांना कोणताही पाया नाही, आधार नाही.

लोक फलज्योतिषावर विश्वास का ठेवतात? आजच्या अनिश्चिततेच्या काळात योग्य निर्णय घेण्याचं मार्गदर्शन मिळवण्यासाठी, समाधानकारक सल्ला मिळवण्यासाठी ते आसुसलेले असतात. त्यामुळे त्यांच्या आवाक्यापलीकडे असणारे आकाशस्थ ग्रहगोल त्यांचे नशीब (नियती) आधीच ठरवतात, यावर विश्वास ठेवणं त्यांना आवडत असेल. तरीपण आपण सगळ्यांनी वस्तुस्थितीला सामोरं गेलं पाहिजे आणि भविष्य हे आपल्यावर अवलंबून असतं, ग्रह-तार्‍यांवर नव्हे, हे समजून घेतलं पाहिजे.

आजच्या आधुनिक काळात, आधुनिक शिक्षणाच्या आणि आधुनिक दृष्टीच्या प्रकाशात आपण हे समजून घेतलं पाहिजे की, अंधश्रद्धा आणि जादुई चमत्कारांवर विश्वास ठेवणं, विसंबून राहणं म्हणजे स्वत:चीच फसवणूक करून घेणं होईल. तरीही आजच्या आधुनिक समाजामध्ये फलज्योतिषावरील विश्वास वाढतो आहे. आज केल्या जाणार्‍या भविष्यकथनांवर, त्यांची कसलीही तपासणी न करता प्रसिद्धिमाध्यमं (अगदी प्रतिष्ठित दैनिकं, मासिकं, पुस्तक प्रकाशकसुद्धा) प्रसिद्धी देतात. यामुळं आम्ही वैज्ञानिक अस्वस्थ झालो आहोत.

या परिस्थितीची परिणती अतार्किकता आणि भोंगळवाद वाढवण्यातच होईल. आम्हाला असं वाटतं, की या ज्योतिषी ठगांच्या दिखाऊ दाव्यांना सरळ आणि पूर्ण शक्तिनिशी आव्हान देण्याची वेळ आता आली आहे.

(लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक, संघटक आहेत.)

भ्रमणध्वनी-9371014832

दैनिक पुण्यनगरी - दिवाळी अंक २०१२- विशेष लेख - 'इंडिया आणि 'भारत' यातील अंतर कमी करण्याची गरजसमाजाच्या सर्वच क्षेत्रांत भारत देश प्रगती करतो आहे. भारत महासत्ता बनण्याच्या दिशेनं वाटचाल करतो आहे असं मानणारा एक मोठा इंडियन वर्ग या देशात आहे. इंडिया शायनिंग अशी आरोळी या देशात ठोकली गेली. खरंच इंडिया शायनिंग होताना दिसतो आहे?
तर समाजाच्या सर्वच क्षेत्रांत मूल्य èहास होताना दिसतो आहे. सर्वच क्षेत्रांतला दर्जा खालावताना दिसतो आहे. समाज मूल्यात्मकरीत्या नीचांकी पातळी गाठतो आहे. सगळ्याच क्षेत्रांत भ्रष्टाचार माजतो आहे असे मानणारा, त्यामुळे कासावीस होणारा एक संवेदनशील वर्गही या देशात आहे.
खरं काय आहे?
भारतासारख्या देशात या सत्याचा शोध घेणं वाटतं तितकं सोपं नाही. आपण कोणत्या दृष्टिकोनातून भारताकडे पाहतो त्यावर त्याचं उत्तर अवलंबून आहे.
सुरुवात आजच्या सद्य:स्थितीपासून आपण करू या! आज शहरी भागात चकचकीत मॉल संस्कृती दिसते आहे. भरपूर पैसे असणारा, पैसे उधळणारा, चकचकीत दिखाऊ राहमीमान जगणारा, पण 'आंग्लाळलेला' एक मोठा वर्ग 'शायनिंग इंडिया'चं आभासी सत्य प्रदर्शित करतो आहे. उच्च राहणीमान आणि आंग्लाळलेपण हे सिनॉनिमस-स्थितिदर्शक शब्द बनले आहेत. ग्लोबलायजेशनचा, जागतिकीकरणाचा सगळ्यात मोठा फायदा मिळवणारा हा इंडिया आहे.
याच चंगळवादी वर्गाचं, इंडियाचं चित्रण टीव्ही आणि इतर प्रसिद्धिमाध्यमांमधून सारखं ग्रामीण भागातील सामान्य आणि शहरी भागातील निम्न मध्यमवर्गीय व झोपडपट्टीतील गरीब माणसांपर्यंत, भारतापर्यंत पोहोचतं आहे. हा ६०-६५ टक्के असणारा भारत रोज शहरात भटकताना गावात टीव्हीवरून शायqनग इंडिया पाहतो आहे. काही प्रश्नांची उत्तरं देऊन माणसांना करोडपती बनताना पाहतो आहे. वेगवेगळ्या रिअ‍ॅलिटी शोमधून पाहता पाहता काही माणसांना, मुलांना स्टार बनताना पाहतो आहे. कोट्यवधी रुपये कमावणाèयांच्या यशोगाथा ऐकतो, पाहतो आहे आणि कोट्यवधी रुपये अनैतिक मार्गाने इकडचे तिकडे होताना पाहतो आहे. रोज नवीनवी रंगीत स्वप्ने पाहतो आहे. येनकेन प्रकारे धनप्राप्ती करणे म्हणजेच यश प्राप्त करणं होय हे सप्रमाण शिकतो आहे. त्यामुळं चकचकीत रंगीन टीव्हीवरील स्वप्नरंजनामुळं त्याला स्वत:च्या समस्यांकडे दुर्लक्ष करणं जमतं आहे. पण महागाईमुळं जगणं असह्य झालंय. दोन वेळच्या जेवणाची सोय करता करता नाकीनऊ येतंय. मुलांचं शिक्षण करणं अशक्यप्राय बनतं आहे. आजूबाजूला राहणीमान उंचावणाèया साधनांनी बाजारपेठ ओसंडून वाहते आहे; पण ती साधनं विकत घेण्याची क्षमता नाही. मुलांना चकचकीत स्वप्नांपासून दूर करता येत नाही आणि त्यांचे हट्ट, आकांक्षाही पुरवता येत नाहीत. अशा जीवघेण्या कात्रीत जगणारा, पण आज नाही उद्या आपणही या शायनिंग इंडियाचा भाग बनू या स्वप्नरंजनात, आशेत जगणारा फार मोठा निम्न मध्यमवर्गीय भारत आहे.
पण अशाच मन:स्थितीत-स्थितीत जगणारा, स्वप्न-आशा पूर्ण होण्याविषयी साशंक असणारा, शेतीआधारित जीवन जगणारा, शेतकरी, शेतमजुरांचा एक भारत आहे. हा ग्रामीण कृषीआधारित बहुसंख्य भारत मात्र निराशेच्या काळोख्या आवर्तनात अडकला आहे. त्याला स्वत:ला कोणताही आशेचा किरण दिसत नाही. पण त्याला एक अंधूक आशा वाटते. आपली मुलं उद्या इंग्रजी शिकतील. इंडियामध्ये प्रवेश मिळवतील. कदाचित आपली आजची स्थिती निराशा- गरिबी-हताशा बदलेल.
आज टीव्ही, मोबाईलमुळं सारा देश जवळ आल्यासारखा वाटतो आहे. पण या देशामधील इंडिया आणि भारत यामधील अंतर मात्र खूप वाढलं आहे.  आपल्या देशात दोन देश आहेत. एक इंडिया आणि दुसरा भारत. स्वातंत्र्यानंतर या दोहोंमधलं अंतर कमी करण्याचा वादा पंडित जवाहरलाल नेहरूंच्या सरकारनं, महात्मा गांधींच्या वारसदारांनी केला होता. नव्हे, इंडिया, भारत हे दोन्ही देश एक होतील असा आशावाद स्वातंत्र्य आंदोलनाच्या घुसळणीतून नवनीतासारखा (लोण्यासारखा) निर्माण झाला होता. नेहरू सरकारनं तसा प्रयत्नही केला. म्हणूनच पूर्ण भांडवलशाही (अमेरिका, इंग्लंडसारखी) वा कम्युनिस्ट, शास्त्रीय समाजवादी अर्थरचना न स्वीकारता लोकशाही समाजवादी ही मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली. त्यांच्या (नेहरूंच्या) हयातभर प्रामाणिकपणे राबण्याचा प्रयत्न केला. अर्थात, हे गांधींचं स्वप्न नव्हतं. गांधींना ग्रामस्वराज्य हवं होतं. स्वयंपूर्ण खेडी असणारी विकेंद्रित अर्थव्यवस्था. ज्या अर्थव्यवस्थेत सगळ्यांना काम मिळेल, सगळ्यांचं पोट नीट भरेल, सगळ्यांच्या किमान गरजा पूर्ण होतील अशी अर्थव्यवस्था. पण गांधींचं स्वप्न, इच्छा कधीच पूर्ण झाली नाही.
३० जानेवारी, १९४८ साली नथुराम गोडसेनं त्यांना संपवलं नसतं, आणखी दहा वर्षे गांधी जिवंत राहिले असते तर या देशात वेगळी अर्थव्यवस्था निर्माण झाली असती. कदाचित त्यासाठी गांधी-नेहरू संघर्ष निर्माण झाला असता. कदाचित दोघं एकदुसèयांविरुद्ध उभे ठाकल्याचं दृश्य जगाला पाहायला मिळालं असतं. पण त्यातून भारताची अर्थव्यवस्था, भारतीय अर्थव्यवस्था जन्माला आली असती.
पंडित जवाहरलाल नेहरूंच्या प्रामाणिकपणाबद्दल, देशप्रेमाबद्दल, देशभक्तीबद्दल त्यांचा शत्रूही शंका घेऊ शकणार नाही. तरीपण ते खूप आंग्लाळलेले होते. कळत-नकळत ते इंडियाचं प्रतिनिधित्व करत होते. महात्मा गांधींच्या सहवासात स्वातंत्र्य आंदोलनात ते खूप भारताळले. पण महात्मा गांधींसारखे निखळ भारतीय कधीच बनू शकले नाहीत.
भारत आणि इंडिया ही टर्मिनॉलॉजी, संकल्पना शेतकरी आंदोलनाचे प्रणेते शरद जोशी यांनी लोकप्रिय केली. त्यामुळं ती अलीकडच्या काळात म्हणजे १९७८-८२च्या काळात निर्माण झाल्याचं आपल्याला वरपांगी दिसतं. पण त्याची मुळं या भूमीत हजारो वर्षांपासून रुजली आहेत.
इंडिया म्हणजे 'आहे रे' वर्ग. जो सधन आहे. ज्यांच्या हातात सारी सूत्रं आहेत, साèया सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय नाड्या आहेत आणि जो इतरांच्या शोषणावर जगतो आहे, पुष्ट-बलिष्ट झाला आहे.
भारत म्हणजे 'नाही रे' वर्ग. जो रात्रंदिवस राबराब राबतो, कष्ट करतो, संपत्ती निर्माण करतो; पण धड जगण्यासाठी आवश्यक त्या गरजा पूर्ण करता करताच ज्याच्या नाकीनऊ येतं. पण इतरांना 'आहे रे' वर्गाला मात्र संपन्न करतो. इतरांकडून स्वत:चं शोषण करवून घेतो आणि ही सारी परिस्थिती दैवाचा भोग म्हणून निमूटपणे स्वीकारतो.
भारतात दीर्घकाळापासून हे दोन वर्ग होतेच. तसे ते जगभरच होते; पण भारतात मात्र ते जातिआधारित होते. वर्णव्यवस्थेच्या नावाखाली होते.
उच्च तीन वर्ण. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य हा 'आहे रे' वर्ग. म्हणजे आजच्या आधुनिक भाषेत बोलायचं झालं तर इंडिया. सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय, सामाजिक, आर्थिक नाड्या या तीन वर्णांच्या हातात हजारो वर्षे होत्या, आजही आहेत.
'नाही रे' वर्ग हा शूद्रांचा, शेतकèयांचा व बारा बलुतेदारांचा. राबराब राबणारा, संपत्ती निर्माण करणारा; पण त्याचा उपभोग घेण्याची संधी वरील तीन वर्णांना देणारा हा भारत. बहुसंख्यांचा खरा भारत.
एके काळी म्हणे, भारतात सोन्याचा धूर निघत असे. पण किमान जेव्हापासून या देशात शंकराचार्यांच्या चार पीठांनी 'मनुस्मृती' राबवायला सुरुवात केली असेल त्या १५०० ते २५०० वर्षांपासून तरी या देशातल्या बहुसंख्य शूद्र, अतिशूद्रांना शोषित जीवनच जगावं लागलं आहे.
खरा भारत समजून घ्यायचा असेल, तर प्रत्येक देशप्रेमी, समाजप्रेमी, धर्मप्रेमी माणसानं 'मनुस्मृती' किमान एकदा तरी वाचली पाहिजे. त्याशिवाय त्याला खरा भारत कळणार नाही, खरा धर्म कळणार नाही; भारतातील खèया समस्या कळणार नाहीत.
भारतातील वर्णव्यवस्थेचे काही फायदेही झालेत; पण तोटे मात्र अगणित झालेत. अनेक धर्मप्रेमी असं मानतात, की आधी या देशात आदर्श वर्णव्यवस्था होती. गुणांनुसार, माणसाच्या कर्तृत्वानुसार त्याला कोणत्याही वर्णात प्रवेश करता येत असे. नंतर काही हितसंबंधीयांनी या वर्णव्यवस्थेचं जातिव्यवस्थेत रूपांतर केलं. ती बंदिस्त केली.
एके काळी मलाही असं वाटत असे. याचे पुरावे मिळविण्यासाठी खूप अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. वर्णव्यवस्था ही चांगली व्यवस्था आहे असं मानणाèयांशी खूप चर्चा केली; पण पुरावे मिळू शकले नाहीत. तरी त्या सनातन वादात न पडताही समाजशास्त्राचा, मानववंशशास्त्राचा अभ्यास आपल्याला या प्रश्नाचं नि:संदिग्ध उत्तर देऊ शकतो. अ‍ॅबसोल्युट पॉवर करप्ट्स अ‍ॅबसोल्युटली, निरंकुश सत्ता, निरंकुश भ्रष्टाचारी बनवते.
वर्णव्यवस्थेत ब्राह्मणवर्णाला निरंकुश सत्ता मिळाली. परिणामत: ब्राह्मणवर्ण निरंकुश भ्रष्टाचारी बनला. त्याचा 'मनुस्मृती' हा जिताजागता पुरावा आहे.
याचा परिणाम अपरिहार्य होता. गुलामगिरी हा देश तब्बल तेराशे वर्षे परकीयांच्या आक्रमणाखाली होता. ८००-९०० वर्षे तर सरळ सरळ दुसèयाच्या शासनाखाली गुलामगिरीत जगत होता.
जो समाज स्वत:तील बहुसंख्य कष्टकरी श्रमानं संपत्ती निर्माण करणाèया हातांचं बळ वापरणाèया माणसांना गुलाम बनवतो, त्यांना अस्मिताहीन बनवतो तो समाज गुलाम बनणारच ना? या देशातही तसंच झालं.
पुरातन काळात लढताना संख्या फार महत्त्वाची असे. कारण एकासोबत एक लढाई होत असे. अशा काळात बाहूत खरी शक्ती असणारा मोठा वर्ग होता तो शूद्रातिशूद्रांचा. पण त्याला लढण्याचा अधिकार नाही. शस्त्र परजण्यासाठी आवश्यक ती धार्मिक मान्यता नाही, अस्मिता नाही. ब्राह्मणांनी लढायचं नसतं. मूठभर वैश्यांचं ते काम नाही. लढाईत सतत मरणाèया क्षत्रियांची संख्या मर्यादित. ५-१० टक्के लोक कसं ९० टक्के लोकांचं संरक्षण करणार?
चातुर्वण्र्य संकल्पनेतच गुलामगिरीची मुळं दडली आहेत. म्हणूनच भारत एवढा दीर्घकाळ गुलाम राहिला.
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आपल्या पुस्तकात याचे अनेक पुरावे मांडले आहेत. त्यातलं एक उदाहरण - काशी, बनारस मुस्लिम राजाच्या ताब्यात होती. अटकेपार झेंडे रोवणारे मराठे सरदार काशीभोवताली तळ ठोकून बसले. काशीला घेराव, वेढा घातला. सारी रसद तोडली. हिंदूंचं सगळ्यात पवित्र तीर्थक्षेत्र धार्मिक अस्मितेचं केंद्रqबदू असणारी काशी ताब्यात घेण्याचा त्यांचा निश्चय होता. मुस्लिम राजा हुशार. त्यानं पेशव्यांना निरोप धाडला. तुमच्या सरदारांनी काशीवर स्वारी केली तर काशीमधील साèया गाई आणि सारे ब्राह्मण मी मारून टाकीन. त्यांचा शिरच्छेद करेन. त्यांना वाचवायचं असेल तर मराठे सरदारांना परत बोलवा. पेशव्यांचा दूत तातडीनं दौडला. मराठ्यांना वेढा उठवून माघारी फिरण्याचा आदेश तत्काळ पोहोचला.
मूठभर ब्राह्मणांना व गायींना वाचविण्यासाठी काशी मुस्लिम राजाच्याच ताब्यात राहिली. लढाईत हजारो मरतच होते. अशा लढाईत स्थानिक ग्रामीण, शेतकरी, कष्टकरी उद्ध्वस्त होत मारले जात, बलात्कार होत. पण मूठभर ब्राह्मण मरता कामा नयेत हा राजदंडक, धर्मदंडक, वर्णव्यवस्था प्रबंधन.
समोर गायींचा तांडा दौडवून कितीदा तरी हिंदूंचा त्या काळात मुस्लिमांनी पराभव केला आहे. त्याची अनेक उदाहरणं स्वातंत्र्यवीर सावरकर आणि प्रबोधनकार ठाकरेंनी मांडली आहेत. पण एवढ्या सगळ्या आक्रमणानंतरही, वारंवार बेचिराख झाल्यावरही निसर्गाच्या भूकंप, दुष्काळ, पूर इत्यादी आपत्तीनंतरही पुन्हापुन्हा भारतीय खेडी उभी राहत असत. जिवंत राहत असत. खेडी दीर्घकाळ टिकली यामागचं रहस्य येथे स्वयंपूर्ण ग्रामरचना होती यात आहे. शेतकरी आणि बारा बलुतेदार मिळून बनलेली एक स्वयंपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्था.
साèया गावाच्या गरजा पूर्ण करणारी व्यवस्था गावातच होती. सारं कौशल्य, कारागीर गावातच तयार होत. सारी तरबेज माणसं मारली गेली तरी त्यांच्या नातेवाइकांना दुसèया गावातून सहज आयात केलं जाऊ शकत असे. पुन्हा गाव सरसरून उभं राहत असे. हे भारतीय ग्रामीण अर्थव्यवस्थेचं बलस्थान म. गांधींच्या आधी जाणता राजा शिवाजीराजेंनी बरोबर ओळखलं. जातिव्यवस्था व वर्णव्यवस्थेमुळं होणारं नुकसानही जाणत्या राजानं नेमकेपणानं ओळखलं. म्हणून त्यांनी अठरापगड जातींच्या माणसांना, बारा बलुतेदारांना, शेतकèयांना शिपाई बनवलं. त्यांना शस्त्र चालवणं शिकवलं, सन्मान दिला. ज्या काळात शिपाईगिरी हा पूर्णवेळ व्यवसाय होता त्या काळात, शेतीच्या काळात शेतीची कामं करा. नंतर ती आटोपली, की सैनिक बना. असं अर्धवेळ सैन्य निर्माण केलं.
'आहे रे' आणि 'नाही रे' यांच्यातील दरी कमी करण्याचा प्रयत्न केला. मूल्याधारित अभ्रष्ट राज्यव्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला. भारताला अस्मिता देण्याचा प्रयत्न केला.
गेल्या दोन हजार वर्षांतील हा पहिला प्रयोग होता. राजाच्या लहरीनुसार, मर्जीनुसार नव्हे, तर कायद्यानुसार राज्य चालावे अशी व्यवस्था केली. सामान्य माणसाचा, स्त्रीचा सन्मान राखला जाईल अशी नैतिक मूल्यव्यवस्था, मानवी मूल्यव्यवस्था रुजविण्याचा प्रयत्न केला. सैन्यानं लुटावे अशी प्रथा असण्याच्या काळात सैन्यानं काहीही प्रजेकडून फुकटात घेऊ नये असे आदेश दिले. नव्हे, ते कडकपणे अमलात येतील यासाठी दक्ष राहिले. ब्राह्मणी वर्ण, शोषण व्यवस्थेला शह दिला. तटस्थ न्यायव्यवस्था उभी केली. म्हणून मी नेहमी म्हणतो, 'भारतीयांची अस्मिता सर्वांगीणरीत्या उंचावणारा पहिला खरा 'भारतीय' हा शिवाजी राजा होता.' किमान जो इतिहास आज आपल्याजवळ उपलब्ध आहे त्यानुसार तरी दुसरे उदाहरण नाही अन्यथा या देशात सामाजिक, आर्थिक, धार्मिक, राजकीय क्षेत्रांत अराजकच होते. स्वतंत्र ग्रामीण अर्थव्यवस्थेमुळे हा देश विपरीत परिस्थितीतही जिवंत होता. पण जातिव्यवस्थेमुळे ही ग्रामीण अर्थव्यवस्था शोषणाचं प्रकट हत्यारही बनली होती म्हणूनच डॉ. आंबेडकरांनी या व्यवस्थेला विरोध केला. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या वर्णत्रयीचंचं सारं राज्य होतं. (शिवाजी राजे क्षत्रिय नव्हते.) राज्य कुणाचंही असो, राजा कोणत्याही धर्माचा असो, या वर्णत्रयीचं सारं सुखनैव चालत असे. अधूनमधून एखादा झक्की मुस्लिम राजा जिझिया कर (इतर धर्मीयांना कर) लावत असे. त्याचा जेवढा त्रास होत असे तेवढाच. एखाद्या क्षत्रिय राजाचं राज्य जात असे एवढंच. पण तो एखाद्या बादशहाचा मांडलिक वा सरदार बनून सारे स्वत:चे फायदे राखत असे.
या अशा गुलामगिरीच्या वातावरणात काही धार्मिक, कर्मठ आचार वगळता फारशा नीतिमूल्यांची बूज राखली जात नसे. नैतिक मूल्यांना तशी फारशी प्रतिष्ठा नसे. काही विशिष्ट जाती, काही लोक 'प्राण जाये पर वचन ना जाये' हा सिद्घान्त पाळायचे. दिलेल्या शब्दाखातर जीव द्यायलाही सज्ज असायचे. पण 'वचन पाळणे' म्हणजे नीतिमूल्ये पाळणे नव्हे.
दानदक्षिणा प्रकरण तर इतकं बोकाळलं होतं, की जगातल्या सगळ््या प्रकारची पापं धुण्याच्या यंत्रणा ब्राह्मणांनी निर्माण केल्या होत्या. मुळात 'पापक्षालन' ही फार चांगली प्रक्रिया आहे. एखादी चूक झाली. पश्चात्ताप करा. पुन्हा ही चूक करणार नाही असं ठरवून टाका आणि पश्चात्तापाच्या अग्नीत शुद्घ होऊन, अधिक उत्तम माणूस बनून पुढची पाऊलवाट पूर्ण करा. अशी ही एक उत्तम मानसशास्त्रीय प्रक्रिया आहे. ख्रिश्चन धर्मात ही प्रक्रिया 'कन्फेशन' नावानं ओळखली जाते. पण निरंकुश सत्तेनं, ब्राह्मण वर्णानं, दानदक्षिणेच्या लोभानं या 'पापक्षालना'चा पार व्यापार करून टाकला. ते पाप दूर करण्याचे कंत्राट घेऊ लागले. त्याचा परिणाम असा झाला, की  वाट्टेल तेवढं पाप करा, पापक्षालन करा, दानदक्षिणा द्या. पुन्हापुन्हा पाप करा. नो प्रॉब्लेम. फक्त दानदक्षिणा द्या. त्यामुळं या पुरोहित पापक्षालन प्रक्रियेनं अपराधीपणाची टोचणीच काढून टाकली. माणसांनी पापी बनण्यास प्रोत्साहित करणारी ही यंत्रणा बनली. आजही हे दृश्य सर्व धर्मस्थळी आढळतं. हजारो कोटी रुपये दानधर्मात येतात. हे सरळ, प्रामाणिक मार्गानं आलेले पैसे असतात का? बहुतांशी वाममार्गाची कमाई असते.
ज्या धर्मानं उच्च माणुसकीपूर्ण, नैतिक मूल्ये रुजवावी अशी अपेक्षा असते तोच धर्म या देशात भ्रष्ट, निरंकुशांच्या हातचं बाहुलं बनल्यामुळं नैतिक मापदंड निर्माण करण्यात अपुरा पडू लागला. जातिव्यवस्थेमुळं, अस्पृश्यतेमुळं साधा मानवी सन्मानही न मिळणारा मोठा शूद्र वर्ग मोठ्या प्रमाणावर धर्मांतर करू लागला. वरपांगी बरोबरीच्या नात्यानं वागवणारा, सर्वांना किमान जेवणात समानता देणारा, जेत्यांचा मुस्लिम धर्म या देशात वाढू लागला. पुढे इंग्रजांच्या प्रवेशानंतर ईसाई धर्मप्रसार पावू लागला. पण या वर्णत्रयीला ना त्याची खंत ना दु:ख होतं. अशा काळात अख्ख्या जगावर साम्राज्य निर्माण करणाèया इंग्रजांचं बस्तान या देशात बसू लागलं. एकोणिसाव्या शतकात ब्रिटनमध्ये औद्योगिक क्रांती रुजू लागली होती.
मशीनच्या साहाय्यानं हजारो मानवी हातांइतकं काम वेगानं करता येणं शक्य होऊ लागलं. हा माल जगभर विकता येणं गरजेचं होतं. शिवाय चिमुकल्या ब्रिटनजवळ कच्चा माल अपुरा होता. पण भारत, आफ्रिका इंग्रजांच्या ताब्यात होते. दोन्ही देशांत कच्चा माल मुबलक उपलब्ध होता. मानवी मजूरही मुबलक उपलब्ध होते. पण भारताची स्वतंत्र आर्थिक खेडीरचना या इंग्रजांच्या विकासाच्या, औद्योगिक प्रगतीच्या आड येत होती.
इंग्रजांनी पहिलं काम केलं ही स्वतंत्र आर्थिक रचना मोडीत काढण्याचा निश्चय केला. भारतातला कच्चा माल इंग्लंडला पाठवणं व तेथून निर्माण झालेला पक्का माल भारतीय बाजारात विकणं ही यंत्रणा सुरू केली. तो खेड्यात निर्माण होणाèया मालापेक्षा स्वस्तात निर्माण व्हावा व स्वस्तात गावोगाव पोहोचावा म्हणून टड्ढाम, रेल्वे, बस इत्यादी दळणवळणाची साधनं निर्माण केली. यासाठी लागणारी यंत्रणा सुरळीत चालावी म्हणून या देशात नव्या 'इंडिया'ची निर्मिती सुरू केली. त्यासाठी लॉर्ड मेकॉलेनं गुलामी मनोवृत्ती निर्माण करणारी शिक्षणव्यवस्था निर्माण केली. सरकारी नोकरदारवर्ग निर्माण केला. अर्थातच, या 'इंडिया' यंत्रणेत सर्वांत पहिले उत्साहानं या देशातील आधीचे  'आहे रे' असणारा वर्ग, 'वर्णत्रयी' सामील झाला. काही क्षत्रिय मांडलिक होतेच. ब्राह्मण शिक्षणव्यवस्थेत सरकारी कारभारात सामील झाले. व्यापारउदिमात असणारे वैश्य कारखानदारीचा भाग बनले. म्हणजे या देशातील 'आहे रे' 'इंडियन' बनले.
गुलामी मनोवृत्ती शिक्षणानं त्यांच्यात रुजवली. 'आंग्लाळलेपण' सुरू झालं. पण याच इंग्रजी भाषेनं स्वातंत्र्य, समता, बंधुता या युरोपात प्रतिष्ठित झालेल्या. मानवी सर्वश्रेष्ठ मूल्यांचा परिचय करून दिला. युरोपमध्ये वाहणाèया स्वातंत्र्याचा परिचय झाला. बहुसंख्याकांनी या 'ज्ञानाचा' उपयोग अधिक उत्तम गुलाम बनण्यासाठी, अधिक उत्तम पोटार्थी बनण्यासाठी केला. पण काही संवेदनशील 'इंडियन्स'साठी ही इंग्रजी भाषा वाघिणीचं दूध ठरली. कायद्याचा अभ्यास करणाèया काही वकिलांनी काही जुजबी हक्क मिळविण्यासाठी एकत्र येऊन काँग्रेस काढली. जुजबी हक्कांविषयी बोलणारी काँग्रेस हळूहळू या देशाच्या मर्यादित स्वातंत्र्याविषयी बोलू लागली. 'स्वराज्य' वगैरे शब्द उच्चारू लागली. तिकडे आफ्रिकेत एका इंडियन वकिलाला तो काळा आहे म्हणून रेल्वेच्या फस्र्ट क्लासच्या डब्यातून, फस्र्ट क्लासचं तिकीट असूनही खाली प्लॅटफॉर्मवर
फेकलं. या इंडियन वकिलाचा प्रचंड अपमान झाला. पण यानं तो व्यक्तिगत अपमान न मानता मानवी अस्मितेचा अपमान मानला आणि सर्वतोपरी बलिष्ठ असणाèया, सारं जग पादाक्रांत करणाèया इंग्रजांविरुद्घ लढाई सुरू केली.
बंदूक, तोफांनी लढणाèयाला कसं हरवायचं ते इंग्रजांना चांगलंच माहीत होतं. पण अहिंसेनं, सविनय कायदेभंगाचं हत्यार वापरणाèयाशी कसं लढायचं ते उच्च सैन्याधिकारी असणाèया, अनेक लढाया जिंकलेल्या द. आफ्रिका प्रमुखाला कळेना. तो या नव्या हत्यारापुढे बिचकू लागला. दबकू लागला. मोहनदास करमचंदची सरशी होऊ लागली. त्यातून महात्मा मोहनदास करमचंद गांधींचा उदय होऊ लागला. या प्रक्रियेत 'इंडियन' गांधी खूप धार्मिक व आध्यात्मिक असल्यामुळं वेगळा विचार करू लागला. 'इंडियन'पण सोडून माणुसकीचा विचार करू लागला.
१९१४ साली भारतात आला. भारतात एका छोट्या गावात जन्मलेला हा इंडियन भारत समजण्यासाठी 'भारत यात्रा' करू लागला. त्याला 'खरा भारत' इथला शूद्रातिशूद्र समाज कळू लागला. या साèया प्रक्रियेत तो 'भारतीय' बनत गेला. १९२० सालापासून कळत-नकळत त्यानं न मागता देशाच्या स्वातंत्र्य आंदोलनाचं नेतृत्व त्याच्या हातात आलं. अत्यंत धार्मिक व आध्यात्मिक असणाèया, भारतीय बनलेल्या गांधीनं आपल्या सगळ््या कृतीला, कार्याला, स्वातंत्र्य आंदोलनाला एक नैतिक अधिष्ठान दिलं. प्रामाणिकपणाचे, सत्याचे, साधनशुचितेचे मापदंड रुजवले. उत्तम साध्य साधण्यासाठी ते प्राप्त करण्याचा मार्गही उत्तम नैतिक असला पाहिजे असा आग्रह धरला.
ही सारी नीतिमूल्ये खरं म्हणजे समाजात, धर्मस्थळांत कुठेच दिसत नव्हती. धर्मस्थळं तर भ्रष्टाचाराची, अनाचाराची केंद्रस्थानं झाली होती. अगदी इंग्रजांचं राज्य रुजेपर्यंत तीर्थयात्रेला आलेल्या श्रीमंत भाविकांचे, पूजेच्या दरम्यान मुडदे पाडून त्यांची सारी संपत्ती लुटण्याची परंपरा निर्माण झाली होती. दिलीपकुमार, संजीवकुमार, वैजयंतीमाला यांनी काम केलेल्या 'संघर्ष' चित्रपटात याचं अत्यंत विदारक व प्रभावी चित्रण केलं आहे. काशीचं हे चित्रण आहे. पण हिंदू धर्मात ही सारी नीतिमूल्ये आहेत असं मानणाèया, श्रद्घा असणाèया गांधींनी समाजकारणात, अर्थकारणात, राजकारणात, जीवनातल्या सगळ््याच अंगांत उच्च मानवी नीतिमूल्ये जोपासण्याचा, रुजविण्याचा आग्रह धरला.
गांधींचं स्वातंत्र्य आंदोलन हे केवळ स्वातंत्र्य आंदोलन राहिलं नाही. ते सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक अंगांनी
फुलत गेलं. बहरत गेलं. पत्रकार असणाèया गांधींनी आणि अनेक स्वातंत्र्य आंदोलनांतील इतर नेत्यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रातही नीतिमूल्यांचे मापदंड निर्माण केले. सार्वजनिक क्षेत्रात नीतिमूल्यांचा आग्रह व मापदंड निर्माण करण्याचा प्रयत्न करणं व त्याबाबत यशस्वी होणं ही देशातील 'खरी पहिली क्रांती' होती आणि तिचा पिता होता महात्मा गांधी.
हिंदू धर्मात जन्मलेला हा माणूस सगळ््याच धर्मांचा अभ्यासक व चाहता असल्यामुळं सर्वच धर्मांतील उच्च नीतिमूल्ये अंगीकारणारा व रुजविणारा ठरला. त्यांनी आपल्या प्रार्थनेत सर्वच धर्मांच्या चांगल्या गोष्टींचा अंतर्भाव केला. सर्वधर्मसमभाव पहिल्यांदा राष्टड्ढीय धर्म बनविला. परिणामत: स्वातंत्र्य आंदोलनात घुसळून निघालेल्या पिढीत मानवी मूल्यांचा व सगळ््याच क्षेत्रांत नीतिमूल्यांचा आग्रह रुजला. त्याचा परिणाम भारतातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, पत्रकारिता या सगळ््याच क्षेत्रांवर झालेला दिसतो. स्वातंत्र्य आंदोलनापासून सक्रिय असणाèया मध्यमवर्गाची ही कळत-नकळत नीतिमूल्ये बनली. केवळ स्वत:चा, स्वत:च्या हिताचा विचार करण्यापेक्षा इतरांच्या हिताचाही विचार करून जगणं, त्यासाठी प्रयत्न करणं हे उत्तम जगणं आहे नव्हे, माणूस म्हणून खरं जगणं हेच आहे अशी मान्यता निर्माण झाली. याप्रमाणं जगणारी, दुसèयांसाठी झटणारी अशी अनेक उत्तुंग व्यक्तिमत्त्वाची माणसं झाली. अगदी ७०-८० सालापर्यंत अशी माणसं मोठ्या प्रमाणावर दिसत होती.
खरं म्हणजे मी स्वातंत्र्यानंतर जन्मलो १९५१ साली. माझे वडील विनोबांचे शिष्य. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन, कॉलेज शिक्षण सोडून ते भूदान चळवळीत सामील झाले. पूर्णवेळ काम करू लागले. त्याचे खूप आर्थिक चटके आम्हांला लहानपणी भोगावे लागले. म्हणून मी ठरवलं होतं, 'मी कधीही सार्वजनिक काम, समाजसेवा करणार नाही. पूर्णवेळ कार्यकर्ता तर कधीच बनणार नाही.' खरं म्हणजे तसा मनोमन निश्चय केला होता. पण वर्धा शहरात राहणं आणि विनोबा, जयप्रकाश नारायण, आचार्य दादा धर्माधिकारी या गांधी शिष्यांचा सहवास-प्रभावच असा होता, की स्वत:साठी छान नोकरी करण्याचा निश्चय केव्हा मागे पडला आणि सार्वजनिक जीवनात केव्हा ओढला गेलो ते कळलंच नाही.
पुढे तब्बल ४२ वर्षे सार्वजनिक जीवनात काम करतो आहे. त्यातील तब्बल १०-११ वर्षे कोणत्याही प्रकारचं मानधन न घेता पूर्णवेळ काम केलं आहे. बरं, आपण फार विशेष करतो आहे असंही वाटे ना! कारण कितीतरी दिग्गज माणसांना तसं करताना पाहत होतो. नारायणभाई देसाई, बाबा आमटे, रावसाहेब पटवर्धन, यदुनाथ थत्ते, चंद्रकांत शहा, ठाकूरदास बंग, (माझ्या वडिलांचे प्राध्यापक होते. प्राध्यापकी सोडून कार्यकर्ते झाले.) गोविंदराव शिंदे, रामभाऊ म्हसकर असे अनेक इतर वडिलांचे सहकारी, सर्वोदयी कार्यकर्ते.
१९७० साली जयप्रकाश नारायणांच्या तरुण शांती सेनेत सामील झालो. दादा धर्माधिकारींच्या वैचारिक परिपोषणावर पुष्ट झालो. बिहार आंदोलनासारखं आंदोलन वाट्याला आलं. त्या काळात विविध आंदोलनातले तरुण सहकारी नेते मित्र झाले. डॉ. कुमार सप्तर्षी, डॉ. अरुण लिमये, प्रमोद महाजन, अशोक बंग, डॉ अभय बंग, डॉ. उल्हास जाजू, चंद्रकांत वानखडे, सुधाकर जाधव, किशोर देशपांडे, शुभमूर्ती, कलानंद मणी, बाळ सरोदे, एकनाथ उगवार हे तरुण शांती सेनेचे सहकारी. आधी डॉ. रूपा कुळकर्णींसोबत 'हुंडाविरोधी आघाडी'त काम केलं. १९८२ साली अखिल भारतीय अंधश्रद्घा निर्मूलनाची चळवळ सुरू केली. त्या वेळी अनेक क्षेत्रांत विविध चळवळी सुरू होत्या. बाबा आमटेंचं आनंदवन हा एक चांगला प्लॅटफॉर्म होता. सगळ््या संघटनांचं पहिलं शिबीर डॉ. विकास आमटेंच्या सक्रिय सहकार्यानं आनंदवनलाच आयोजिलं होतं. तिथून अंधश्रद्घा निर्मूलनाचं काम सुरू झालं. डॉ. प्रकाश आमटेंचं हेमलकसाचं काम आम्हा सगळ्यांसाठीच आत्मीयतेचा व प्रेरणेचा विषय होता. त्याच काळात डॉ. रूपा कुळकर्णी, डॉ. सीमा साखरे यांचे नागपुरातून तर पुण्यातून विद्या बाळ, छाया दातार, शारदा साठे यांचे मुंबईतून स्त्रियांसंबंधीचे आंदोलन सुरू होते. डॉ. बाबा आढावांचे विषमता निर्मूलन कार्य सुरू होते. युनोतील मोठ्या पगाराची नोकरी सोडून शरद जोशी यांनी शेतकरी आंदोलनाचा धडाका लावला होता.
मी पत्रकारितेत दाखल झालो १९७८ साली. नागपूरच्या दै. 'तरुण भारता'तून सुरुवात केली. 'तरुण भारत' आरएसएसचं मुखपत्र श्री. मा. गो. वैद्य व श्री. दि. भा. घुमरे या संपादकांच्या हाताखाली काम केलं. माझे विचार वेगळे. ३ वर्षे 'तरुण भारता'त स्तंभलेखन करत होतो. पुढे सहा महिने १९८२ साली 'तरुण भारता'त नोकरीही केली. पण मला मान्य नसलेले विचार मी कधी लिहिले नाहीत व माझ्या संपादकांनीही कधी मी त्यांच्या धोरणाप्रमाणं लिहावं असा आग्रह धरला नाही.
१९८२ पर्यंत माझ्या विचारात फारच परिवर्तन झालं. 'तरुण भारता'च्या धोरणाला ते पेलवेना. तेव्हा डायरेक्टर बोर्डानं फार आग्रह धरला तरी मा. गो. वैद्यांनी मला नोकरीवरून काढून टाकण्यास मान्यता दिली नाही. शेवटी ज्या सा. 'तरुण भारता'त माझी नेमणूक होती ते साप्ताहिकच बंद करण्याचा निर्णय डायरेक्टर बोर्डानं घेतला. तेव्हा आपसूकच माझी नोकरी संपली.
मी १९ वर्षे पत्रकारिता केली; पण  कधीच मनाला न पटणारं लिहिलं नाही. खोटं लिहिलं नाही. कधी भ्रष्टाचाराला साथ वा वाव दिला नाही. पण त्याचं फारसं नवल नव्हतं. कारण गोविंद तळवलकर, यदुनाथ थत्ते, 'माणूस'चे माजगावकर, 'सोबत'चे ग. रा. बेहरे, मुकुंदराव किर्लोस्कर, मा. गो. वैद्य, म.प. दळवी, विद्याधर गोखले, माधव गडकरी, कुमार केतकर, विद्या बाळ यांच्यासारखे अनेक तत्त्वनिष्ठ व विचारस्वातंत्र्याचा आग्रह धरणारे संपादक त्या काळात होते. पत्रकारिता हे मिशन आहे असं उघडपणे ही संपादक मंडळी बोलत असे, लिहीत असे; तसं वागत असे. त्याचा परिणाम माझ्यासारखा संवेदनशील व नवख्या पत्रकारांवर होत असे.
शैक्षणिक क्षेत्रातही असे उच्च मापदंड होते. प्राचार्य राम शेवाळकर, प्राचार्य नरहर कुरुंदकर, भा. ल. भोळे यांच्यासारखे कितीतरी उत्तम शिक्षक व समाजशिक्षक एकाच शरीरात नांदत होते. प्राध्यापकांनी शिकवण्याचं काम उत्तमपणे करता करताच सामाजिक कार्यात उत्तम योगदान दिलं पाहिजे अशी मान्यता होती. प्रा. राम बापट, प्रा. ग.प्र. प्रधान यांसारखे कितीतरी प्राध्यापक अनेक प्राध्यापक-विद्याथ्र्यांचे प्रेरणास्थान होते. कारण अजूनही म. गांधींनी रुजवलेल्या मानवतावादी व मूल्याधिष्ठित जगण्याला, साध्या राहणीमानाला प्रतिष्ठा होती. आर्थिक संपन्न जीवनापेक्षा मानसिक संपन्न जीवन उच्च दर्जाचं  असतं असा प्रबळ सामाजिक संस्कार अजून जिवंत होता. तसे प्रत्यक्ष जिवंत आदर्श 'याचि देही याचि डोळा' पाहायला मिळत असत. पण याच काळात दुसèया बाजूनं प्रचंड प्रमाणावर मूल्य èहासाला सुरुवातही झाली होती. भ्रष्टाचार हा या देशाचा अविभाज्य भाग आहे. ज्या देशात, जी माणसं देवासारख्या पवित्र क्षेत्रात सौद्यापासून सुरुवात करतात तिथे दुसरंकाय होणार? 'देवा अमुक झालं तर तुला तमुक वाहीन, एवढ्याची पूजा घालेन' असा सौदा भक्त करतात आणि पुजाèयाला वा डायरेक्ट देवाला जेवढे अधिक पैसे देऊ तेवढी तो अधिक कृपा करेल असं मानतात त्या देशात भ्रष्टाचाराची गंगोत्री निर्माण होणारच! ती आधी धार्मिक क्षेत्रात होती. ती आता जीवनाच्या सगळ््या अंगांत पसरू लागली आहे.
प. जवाहरलाल नेहरूंच्या काळात थोडाबहुत भ्रष्टाचार असेल; पण त्यांनी कधीही अंधश्रद्घांना, भ्रष्टाचाराला, धर्मवादाला प्रतिष्ठित केलं नाही. या देशाची एक सेक्युलर प्रतिमा राखण्याचा प्रयत्न केला. प्रामाणिकता रुजविण्याचा प्रयत्न केला; पण त्यांची मुलगी इंदिरा गांधी, रणरागिणी, दुर्गा होती. प्रबळ, प्रभावी शासक होती; पण असुरक्षित होती. त्यातून या देशाचा पंतप्रधान पहिल्यांदा उघड अंधश्रद्घांना प्रतिष्ठा देऊ लागला. मंदिराचे आशीर्वाद घेत हिंडू लागलेल्या पंतप्रधान इंदिरा गांधींनी राजकारणात धर्म आणला आणि निवडणूक राजकारणासाठी भ्रष्टाचार, आर्थिक भ्रष्टाचारही प्रतिष्ठित केला. जिथे पंंतप्रधानच प्रवाहपतित होतो तिथे दुसरं काय होणार?
जयप्रकाश यांचं आंदोलन, भ्रष्टाचारविरोधी आंदोलन, म. गांधींची मूल्यव्यवस्था पुन्हा रुजवणारं उत्तम साधन बनावं असा प्रयत्न होता. जयप्रकाश यांचा हा प्रामाणिक प्रयत्न होता. त्यामुळं पहिल्यांदा या देशातील सरकार बदललं. काँग्रेसऐवजी दुसरं सरकार आलं. पण ज्याच्या नैतिक बळावर हा बदल झाला तोच जयप्रकाश या जगातून निघून गेला. या देशात दुसèयांदा इतिहासाला तसंच नकारात्मक वळण लागलं.
म. गांधींनी काही भरीव करण्याची गरज होती त्या वेळी गोडसेंनी त्यांना संपवलं आणि आता सत्तेबाहेर राहून पुन्हा देशातील सर्वच क्षेत्रांत काही उच्च नैतिक मापदंड निर्माण करण्याची क्षमता असणारे जयप्रकाश नारायणही नाहीसे झालेत.
या देशाचा सर्वांगाने èहास सुरूच राहिला. भ्रष्टाचारविरोधी आंदोलनातले आमचे काही सहकारी राजकारणात जाऊन भ्रष्टाचार-सहकारी ठरले.
पंतप्रधान राजीव गांधींना म्हणावं लागलं, की १ रुपयापैकी केवळ १० पैसेच गरिबांपर्यंत पोहोचतात. ९० पैसे मधली पैसे पोहोचवणारी यंत्रणा नाहीसे करू लागली.
पंतप्रधान विश्वनाथ प्रतापसिंगांच्या काळात शूद्रांमधल्या काही जातींना आरक्षणाच्या निमित्तानं बळ मिळालं. त्यांची अस्मिता जागी झाली. ते राजकारणात प्रभावी बनू लागले. काहीअंशी सत्तेची सूत्रं त्यांच्या हाती येऊ लागली. पण त्यांचं भारतीयकरण होण्याची प्रक्रिया सुरू नसल्यामुळं ते 'इंडिया'त दाखल होऊ लागले. खरा इंडियनाईज बदल झाला तो पंतप्रधान नरसिंह रावांच्या काळात. राजीव गांधींनी आधुनिकीकरण स्वीकारलं होतं; पण मिश्र अर्थव्यवस्था कायम होती. राजीव गांधींना कदाचित भारत कळत नव्हता; पण तो एक प्रामाणिक माणूस होता. आपल्या आईपेक्षा निश्चित अधिक प्रामाणिक होता. पण अत्यंत अंधश्रद्घा आणि भ्रष्टाचाराचं, अनैतिक मार्गांचं मुळीच सोयरसुतक नसलेले, तथाकथित विद्वान नरसिंह रावांनी व डॉ. मनमोहन सिंगांनी ग्लोबलायजेशन, जागतिकीकरण स्वीकारलं. म्हणजे मिश्र अर्थव्यवस्था टाकून देऊन, कल्याणकारी राज्याची कल्पना सोडून देऊन खुली भांडवलशाही अर्थव्यवस्था स्वीकारली. त्या दिशेनं पावलं टाकायला सुरुवात झाली आणि देशाचं 'इंडियनायजेशन' उघडपणे सुरू झालं. 'भारता'चा कुणीच वाली उरला नाही. उलट 'भारत' हा अर्थव्यवस्थेवरचा भार आहे अशी धारणा सर्वच क्षेत्रांत रुजू लागली.
पैसा आणि पैशालाच प्रचंड प्रतिष्ठा प्राप्त झाली. सारे यशाचे मापदंड बदलले. पैसा म्हणजेच यश, पैसा हेच साध्य, पैसा हेच ध्येय हा खुल्या भांडवलशाहीचा संस्कार सर्वच क्षेत्रांत रुजू लागला. परिणामत: पैसा ध्येय प्राप्त करण्याकरता पैसा साधनाचा वापर होऊ लागला. भ्रष्टाचार जो आधीच या देशाचा संस्कार होता तो आता जीवनाचा भाग बनला, शिष्टाचार झाला; प्रतिष्ठित झाला. मानवी जीवनमूल्ये, उच्च नैतिक मूल्ये रुजवणारी प्रक्रियाच अवरुद्घ झाली. पैशाची आणि दानधर्माची बटिक बनलेली भ्रष्ट, धार्मिक व्यवस्था अधिकच भ्रष्ट झाली. ती दिवसेंदिवस श्रीमंत आणि भ्रष्ट होते आहे. मानवी मूल्ये रुजविण्याचं कार्य या देशात धर्म करू शकत नाही. कारण तो पुरोहितशाहीचं शोषणाचं हत्यार बनला आहे.
म. गांधींनी मानवी, नैतिक मूल्ये रुजविण्याची प्रक्रिया सुरू केली. त्याची खूप चांगली फळे ४०-५० वर्षे दिसली. आता ती प्रक्रिया अवरुद्घ झाली आहे. मधे एक आशेचा किरण उद्भवला होता. अण्णा हजारेंचं भ्रष्टाचारविरोधी आंदोलन. म्हणूनच साèया देशातील सारे 'इंडियन' तरुणही त्यांच्यामागे उभे राहिले. त्यांच्यात म. गांधींना पाहू लागले. पण वरपांगी म. गांधी दिसणाèया अण्णा हजारेंना इंडिया आणि भारत यातलं नेमकं अंतर कळतं काय? ते भारतात जन्मले, भारतीय कपडे घालतात, भारतात ग्रामीण भागात राहतात. पण त्यांना खरा भारत कळताना दिसत नाही. तेवढा आवाका, तेवढा अभ्यास, तेवढं आकलन त्यांना आहे हे जाणवत नाही. त्यामुळं त्यांच्यावर एका मर्यादेपेक्षा जास्त अपेक्षा लादणं हा त्यांच्यावरचाच अन्याय ठरेल.
आज आहे त्या परिस्थितीचा विचार केला तर दिवसेंदिवस 'इंडिया' प्रगत, बलिष्ठ, श्रीमंत होत जाणार आहे. त्यातील अनेकांची विक एण्ड घरं अमेरिका, युरोप, ऑस्टड्ढेलियात निर्माण होतील आणि 'भारत' दिवसेंदिवस गरीब होणार, कुपोषित होणार; आत्महत्येस प्रवृत्त होणार. पण हे डिटोरिएशन एका मर्यादेपलीकडे 'इंडिया'ला परवडणारं नाही. कारण पैसे पोट जाळू शकत नाही. त्यासाठी अन्नधान्यच लागतं आणि ते 'भारत'च पिकवू शकतो. एवढ्या मोठ्या लोकसंख्येला अन्नधान्य पुरविण्याची क्षमता जगात इतर कुणामध्येच नाही. त्यामुळे 'इंडिया'ला जगण्यासाठी 'भारता'ला जिवंत ठेवावंच लागणार आहे. 'भारता'च्या अस्तित्वावरच इंडियाची मिजास, प्रगती अवलंबून आहे. त्यामुळं जेव्हा परिस्थिती फारच रसातळाला जायला सुरुवात होईल तेव्हा याच भारतातून इंडियात जाऊ इच्छिणाèया आणि इंडियात असणाèया काही संवेदनशील माणसांना 'भारत' समजून घेण्याची इच्छा होईल. त्यातून त्यांना भारत कळताना उच्च मानवी मूल्ये व उच्च नैतिक मूल्यांचं महत्त्व पटेल. ते रुजविण्याचा ते आटोकाट प्रयत्न करतील आणि त्यातून पुन्हा जीवनातल्या सर्वच अंगांत उच्च मानवी मूल्याधारित मापदंड प्रस्थापित होतील. ते मापदंड स्वत:च्या जगण्यात स्थापित करणाèया अनेक व्यक्ती पुन्हा या समाजात बहुसंख्येत दिसू लागतील. ती प्रक्रिया सुरू झाली आहे. राजा, कलमाडी यांचं तुरुंगात जाणं, अण्णा हजारे, केजरीवाल यांचं आंदोलन ही सारीच त्या दिशेनं 'भारत' चालत जाण्याची शक्यता दर्शविणारी सुचिन्हे आहेत.  मावनी जीवनाचं एक जैविक वैशिष्ट्य आहे. त्याच्या साèया जगण्याची धडपडच सुख, आनंद मिळविण्यासाठी असते. 'पैशातून हवं ते सुख मिळवता येतं' हा संस्कार जागतिकीकरणामुळं मोकाट सुटलेली भांडवलशाही रुजविण्यात यशस्वी झाली आहे. पण माणसाचा शोध असतो तो 'दीर्घकाळ टिकणाèया सुखाचा.' आणि पैसा, वस्तू, चैनीची साधनं, तात्पुरता सेक्स कधीच दीर्घकाळ टिकणारं सुख देऊ शकत नाही. त्यातून मिळणारं सुख खूप क्षणिक असतं. काही संवेदनशील माणसांना हे तीव्रतेनं लक्षात येतं. एखाद्या प्रसंगामुळं, घटनेमुळं ते भानावर येतात आणि मग त्यांचा दीर्घकाळ मिळणाèया सुखाचा शोध सुरू होतो. काही वाट चुकलेले हिमालयात जातात सुख शोधायला आणि देव देव करत बसतात.
काही वाट गवसलेले 'माणसांना जोडून घेण्यात' सुख शोधतात आणि मग अशांच्या सुख शोधण्याच्या प्रक्रियेतून नैतिक मूल्ये रुजवणारी क्रांती घडून येते. माणसाला माणूसपण देणारी प्रक्रिया घडून येते. अशांमुळेच मानवजात टिकून आहे. जिवंत आहे. प्रगतिपथावर आहे... असणार आहे.
भ्रमणध्वनी - ९३७१०१४८३२

Friday 7 December 2012

ज्योतिष्यांनो, हिंमत असेल तर या प्रश्नांचे उत्तर द्या


शेगावला अखिल भारतीय ज्योतिष परिषद दि. 7 डिसेंबरपासून सुरू झाली आहे. 8,9 डिसेंबरपर्यंत चालेल. त्यानिमित्तानं देशभरातील ज्योतिषी शेगावला दाखल झाले असणार!

अर्थात, कुणालाही परिषद भरविण्याचा अधिकार आपल्या भारतीय घटनेनेच दिला आहे. त्या स्वातंर्त्याचा, अधिकाराचा आम्ही अखिल भारतीय अंधश्रद्धा

निर्मूलन समितीचे कार्यकर्ते आदर राखून काही जाहीर प्रश्न उपस्थित करू इच्छितो.

अर्थात, आजवर आम्ही कधीही कायदा हातात घेतला नाही. गेल्या 30 वर्षात कधीही अलोकतांत्रिक कृती केली नाही. त्यामुळे ज्योतिष परिषदेला डिस्टर्ब करण्याचा वा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचा प्रयत्न आम्ही मुळीच करणार नाही. ज्योतिष्यांनी नि:शंक मनाने आपली परिषद एन्जॉय करावी. पण जर अजूनही थोडीशी सद्सद्विवेकबुद्धी शाबूत असेल, तर आपण लोकांची लुबाडणूक करणारे; त्यांच्यावर झालेल्या लहानपणापासूनच्या संस्काराचा गैरफायदा घेऊन त्यांना फसवून स्वत:च्या पोटाची खळगी भरणारे; गंडांतर, अरिष्ट, ग्रहशांती, राहू वक्री सांगून त्यांना घाबरवून त्यांच्या खिशावर डल्ला मारणारे तर नाही ना? याचा अत्यंत गंभीरतेने विचार करावा.

एकेकाळी माझी श्रद्धा होती, फलज्योतिष खरंच शास्त्र आहे असा विश्वास होता. त्या काळी काही काळ मीही भविष्यकथन केलं आहे. पण जेव्हा मला त्यातला फोलपणा लक्षात आला तेव्हा मी ते सोडलं. माझ्या संपर्कात आलेल्या अनेक ज्योतिष्यांनी, ज्योतिष्याचा खोटेपणा लक्षात आणून दिल्यावर आपला ज्योतिषी व्यवसाय बंद केला.

गेल्या 30 वर्षाच्या कामातून एक गोष्ट तीव्रतेनं लक्षात आली. किमान पाच-दहा वर्षे व्यावसायिक पद्धतीनं फलज्योतिष सांगणार्‍या सार्‍यांच्याच लक्षात येतं की, शास्त्रानुसार आपली अनेक भाकितं चुकतात, निम्म्याहून अधिक चुकतात. थोडासा मानसशास्त्राचा, लोकांच्या बॉडीलॅंग्वेजचा आधार घेऊन अंदाजे ठोकताळे आपण करीत असतो. आपल्या ज्योतिष्यांना (नक्की काहीही) माहीत नसतं. पण सामान्य जनता मात्र श्रद्धेमुळं ज्योतिष्याच्या भाकितांवर विश्वास ठेवून जीवनातील खूप महत्त्वाचे निर्णय घेते. अशा वेळी ज्योतिषी व्यवसाय करणार्‍या माणसाचं मन ही 'फसवणूक' कशी सुरू ठेवू देते?

दहा एक वर्षे व्यवसाय केल्यावर तरी या शास्त्रातील फोलपणा कळतोच कळतो. तरी जे त्यानंतरही ज्योतिष व्यवसाय सुरू ठेवतात त्यांना काय म्हणावं?

इतरांना फसविण्याची मानसिक तयारी असल्याशिवाय ज्योतिषी आपला व्यवसाय व परिषदा रेटून नेऊ शकतील का?

गर्भवती बाईला मुलगा होईल की मुलगी याचा अंदाज वर्तविणार्‍या कुणाही अडाणी माणसाची भाकितं 50 टक्के खरी ठरू शकतात. 100 स्त्रियांविषयीच्या भाकितात हाच आकडा 30 टक्के ते 70 टक्क्यांपर्यंत खरा ठरू शकतो. याला 'लॉ ऑफ प्रॉबॅबिलिटी', शक्याशक्यतेचा नियम म्हणतात. केवळ याचाच फायदा ज्योतिषी उचलत असतात. त्यांची भाकितं कधीही अंदाज नियमापेक्षा अधिक अचूक ठरत नाही. म्हणूनच अँस्ट्रॉलॉजी, फलज्योतिष्याला कधीच वैज्ञानिक मान्यता व दर्जा मिळू शकला नाही.

जर ज्योतिष्यांची सद्सद्विवेकबुद्धी जागृत असेल तर, 'जोवर फलज्योतिष हे शास्त्राच्या कसोटय़ांवर सिद्ध होत नाही तोवर आम्ही लोकांना त्यांचं भविष्य सांगून त्यांची दिशाभूल करणार नाही, त्यांना फसवणार नाही,' असा निर्णय अखिल भारतीय ज्योतिष परिषद का घेत नाही? या आधीही अखिल भारतीय ज्योतिष परिषदांना आम्ही आव्हानं दिलीत.

2, 3 डिसेंबर 1985 साली पुण्यात झालेल्या अखिल भारतीय ज्योतिष परिषदेला पत्रकं वाटून जाहीर आव्हानं दिली. त्यानंतर धुळय़ाच्या 86 सालच्या अखिल भारतीय ज्योतिष परिषदेला जाहीर आव्हान टाकण्यासाठी संपूर्ण धुळे परिसरात प्रबोधनाची राळ उडवून दिली.

पोलिसांना आणि डीआयजी अरविंद इनामदारांना आम्ही आधीच सांगितलं होतं. ज्योतिष्यांच्या परिषदस्थळी आम्ही काहीही करणार नाही. कारण आम्ही लोकशाही मानणारे लोक आहोत. सर्व प्रकारच्या व्यावसायिकांना परिषद भरविण्याचा अधिकार आहे, असला पाहिजे. चोरांनासुद्धा संमेलन भरविण्याचा, परिषद भरविण्याचा अधिकार असला पाहिजे.(यावर डीआयजी खळखळून हसले होते.) त्यामुळं आदल्या दिवसापर्यंत आम्ही प्रबोधन करू; पण ज्योतिष परिषदेत मात्र आम्ही गोंधळ घालणार नाही, धुमाकूळ घालणार नाही. त्यामुळं आपण निश्चिंत असावं. आदल्या रात्रीपर्यंत प्रचारसभा घेऊन मी व माझ्या प्रमुख कार्यकत्र्यांनी धुळे शहर सोडलं.

आमचे काही पत्रकार कार्यकर्ते परिषदेत हजर होते. संपूर्ण परिषदेवर आंदोलनाची छाया होती. आम्ही आतमध्ये घुसून काहीतरी गोंधळ घालू या भीतीने ते डोळय़ात तेल घालून पहारा देत होते. प्रत्येक परिसंवादात, उद्घाटनाच्या भाषणात आमच्या आव्हानाचं प्रतिबिंब पडत होतं. ज्योतिष्यांची नुसती तारेवरची कसरत सुरू होती.

त्यानंतर अमरावतीला अखिल भारतीय ज्योतिष परिषद झाली. त्यालाही आमच्या कार्यकत्र्यांनी आव्हान टाकलंच; पण आम्ही जनजागरण सभा घेण्याच्या भानगडीत पडलो नाही. अर्थात, याही वेळी ज्योतिष्यांनी आव्हान स्वीकारलंच नाही.

उपाध्येंच्या मुलींचा गोंधळ..

पुढे 1991 साली मुंबईला अखिल भारतीय परिषद भरली. मी तिथेच असल्यामुळं परिषदेच्या दोन दिवस आधी 'फलज्योतिष : एक थोतांड' या विषयावर एक व्याख्यान दादरच्या छबिलदास शाळेच्या हॉलमध्ये आयोजिलं. या व्याख्यानात आव्हान न स्वीकारता, तशी तयारीही न दाखवता, ज्योतिषी शरद उपाध्येंच्या ज्योतिष वर्गातील विद्यार्थ्यांनी व खास करून विद्यार्थिनींनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. तरुण सुशिक्षित मुलींनी आमच्या कार्यक्रमात गोंधळ घालण्याची ही पहिलीच वेळ होती. सभ्य दिसणार्‍या मुली असं वागू शकतात यावर विश्वास ठेवणं फार कठीण जात होतं. पण त्या वेळी त्यांना फारसं काही करता आलं नाही. तरी त्यामुळे ज्योतिष परिषदेला आम्हाला पुन्हा आव्हान टाकावं लागलं. काही जाहीर प्रश्न विचारावे लागले. तशी वृत्तपत्रांतून प्रसिद्धी द्यावी लागली.

पुढे नागपूरला ज्योतिष परिषद भरली आणि ज्योतिषविरोधी प्रबोधनानं नागपूर दणाणून सोडलं. नियोजित उद्घाटक मुख्यमंत्री मनोहर जोशी व स्वागताध्यक्ष बांधकाममंत्री नितीन गडकरी परिषदेला उपस्थितच राहिले नाही. नागपूर श्रमिक पत्रकार संघानं प्राचार्य राम शेवाळकरांच्या अध्यक्षतेखाली मी व ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर असा परिसंवाद घडवून आणण्याचा प्रयत्न केला. ऐनवेळी (आधी शेवाळकरांना व पत्रकारांना संमती देऊनही) कालनिर्णयकार साळगावकरांनी ज्योतिष परिषद परवानगी देत नाही या सबबीखाली माघार घेतली.

म्हणून पुन्हा अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशनास अ.भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जाहीर सवाल..

1) फलज्योतिष हे शास्त्र आहे का? 2) पूर्वी फलज्योतिष आणि खगोलशास्त्र एकत्र होते. ग्रीकांपासून, आर्यभट्टापासून ते गॅलिलिओ- कोपर्निकसपर्यंत अनेक सुप्रसिद्ध खगोलशास्त्री ज्योतिषीही होते, पण एकोणिसाव्या शतकात खगोलशास्त्र व फलज्योतिष वेगळे झाले, ते का? 3) खगोलशास्त्र ही विज्ञानाची व वैज्ञानिक अभ्यासाची महत्त्वाची शाखा झाली. त्याचा अभ्यास जगभराच्या सगळय़ा विद्यापीठांमधून होता; परंतु फलज्योतिष मात्र चोथा समजून विज्ञानाने फेकून दिले. असे का? 4) जगभराच्या 186 वैज्ञानिकांनी, ज्यात 19 नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ आहेत, 'फलज्योतिष हे शास्त्र नाही. तो केवळ काही लोकांचा पोट भरण्याचा धंदा आहे. त्यावर जनतेने विश्वास ठेवू नये,' असे पत्रक काढले व ते जगभर प्रसिद्ध केले. त्याबद्दल 'ज्योतिष अधिवेशनाचे' काय मत आहे? 5) आजचे फलज्योतिषी 9 (किंवा 12) ग्रह मानतात. त्यात राहू, केतू नावाचे ग्रहही मानतात. प्रत्यक्षात राहू-केतू अस्तित्वातच नाहीत. ते ग्रहही नाहीत. तरी ज्योतिषी मात्र आजही जनतेच्या कुंडल्यांमध्ये (होरोस्कोप) राहू-केतू फिरवतच असतात. ते का? कसे? अस्तित्वात नसलेल्या राहू-केतूंना स्थान देणार्‍या कुंडल्या किती विश्वसनीय असू शकतात? व त्या आधारावर उभ्या असणार्‍या फलज्योतिषात कितपत अर्थ असू शकतो?

6) चंद्र-सूर्याला ग्रह म्हणून आजही स्थान दिले जाते. चंद्र हा उपग्रह आहे, हे खगोलशास्त्राच्या ज्ञानामुळे पाचव्या वर्गातल्या मुलालाही ज्ञात असते. तरी सुशिक्षित विद्वान ज्योतिषीही चंद्राला ग्रह म्हणूनच कुंडलीत स्थान देतात. अशा अवस्थेत विद्वान ज्योतिष्यांपेक्षा पाचव्या वर्गातल्या मुलांनाही अधिक ज्ञान असते, असे का मानू नये? 7) सूर्य हाही ग्रह म्हणूनच कुंडलीत मांडला जातो व आजही ज्योतिषी पृथ्वीभोवतीच (कुंडलीत) सूर्याला फिरवत असतात. सूर्य हा तारा आहे. तो ग्रह नाही व पृथ्वी इतर ग्रहांसोबत सूर्याभोवती फिरते हे शाळकरी मुलांना जसे शिकवले जाते तसेच ज्योतिष्यांना शिकवावे, प्रसंगी त्यांच्यासाठी स्वतंत्र शाळा काढाव्यात, अशी विनंती आम्ही सरकारला करावी काय? 8) पृथ्वी हा ग्रह आहे. त्याचा पत्रिकेत ग्रह म्हणून का समावेश नाही? 9) ग्रहाचा मानवी जीवन प्रवाहावर परिणाम होतो असे फलज्योतिषी सांगतात व त्यावरच त्यांचे शास्त्र अवलंबून आहे. याला वैज्ञानिक आधार काय? एकाच स्थळी व एकाच ठिकाणी राहणार्‍या माणसांवर एकाच ग्रहाचे, ते केवळ वेगवेगळ्या वेळी जन्मले म्हणून वेगवेगळे परिणाम कसे होतील? 10) सगळे ग्रह व सूर्य यांची भ्रमणकक्षा व काळ निश्चित आहे. पुढील पाच हजार वा पाच लाख वर्षानंतर तो निश्चित ठरावीकच असणार आहे. याचाच अर्थ ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक मनुष्याचे भविष्य तो जन्मत:च ठरलेले असते. असे असतानाही अनेक ज्योतिषी ग्रहदशा बदलण्याचे व ग्रहांचे अरिष्ट टाळण्यासाठी अनेक पूजा, ताईत, खडे वगैरे उपाय सांगतात व ठरलेले आयुष्य बदलवता येते असेही सांगतात. ते कसे? ग्रहांची दिशा, स्थान व भ्रमण निश्चित असूनही या उपायांनी माणसांचे भविष्य बदलतेच कसे? हे सगळे उपाय म्हणजे सामान्य लोकांना लुबाडण्याची ज्योतिष्यांची एक क्लृप्ती नव्हे काय? मुळात माणसांचं आयुष्य ठरलेलं असतं हे सांगणंच लबाडी नव्हे काय? 11) माणसाचा जन्म आणि मृत्यू ठरलेला असतो का? ठरलेला नसेल तर फलज्योतिषाला काही आधार उरेल काय? पण जर जन्म ठरलाच असेल तर मनुष्य स्वत: निर्णय घेऊन आजच्या काळात भारतीय कायद्याच्या परवानगीने कृत्रिम गर्भपात करतो व जन्माला येणार्‍या नव्या मनुष्याचे अख्खे आयुष्यच थांबवतो, हे कसे? ठरलेला जन्म कृत्रिम उपायांनी थांबवणारा मनुष्य. ग्रहांपेक्षा वा नियंत्यापेक्षा मोठा मानायचा का? 12) मृत्यू ठरलेला असतो का? अ) तो जर ठरलेला असेल तर, 1930 साली भारतीय माणसाचे सरासरी आयुष्य केवळ 18 वर्षे होते. आता ते 68 वर्षापेक्षा अधिक झाले आहे. हे अधिकचे सरासरी आयुष्य भारतीयांच्या वाटय़ाला कुठून आले? याचे उत्तर फलज्योतिष्यांना पत्रिकांमध्ये दाखवता येईल का? आ) मृत्यू ठरलेला असतो असे मानणारे ज्योतिषी आपल्या घरच्यांना व स्वत:लाही औषधोपचार का करतात? ते डॉक्टरांची मदत का घेतात? जर मृत्यू ठरलेल्या क्षणीच होणार असेल तर डॉक्टरांची मदत घेऊन स्वत:चा व स्वत:च्या नातेवाईकांचा जीव वाचविण्याचा प्रयत्न करून पैसा फुकट घालविणे मूर्खपणाचे नव्हे का? इ) एकाच अपघातात ज्यावेळी शेकडो लोक मरतात त्या वेळी त्या सगळ्यांचा मृत्युयोग असतो काय? नागासाकी-हिरोशिमा अणुस्फोट व सगळ्याच मोठय़ा अपघातांबद्दल काय? तसा पुरावा पत्रिका तपासून देता येईल काय? 13) अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती गेल्या पंचवीस वर्षापासून ज्योतिष्यांना सारखी आव्हाने देत आहे, तरी ज्योतिषी ती आव्हाने स्वीकारून अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे तोंड एकदाचे बंद का करीत नाही? 14) दोनदा 20-20 पत्रिकांच्या आधारे, माणूस मेलेला आहे की जिवंत आहे व स्त्री की पुरुष आहे हे सांगा. दोन्ही वेळेस उत्तरे 90 टक्क्यांपेक्षा अधिक 95 टक्के अचूक निघायला हवीत. तर 15 लाख रुपयांचे पारितोषिक मिळेल किंवा मानवी जीवनातील, तपासून शहानिशा करता येतील अशा कोणत्याही पाच घटना (लग्न, मूल, नोकरी, शिक्षण, अपघात, बढती वगैरे) वीस पत्रिकांच्या आधारे सांगाव्यात. त्या 90 टक्के खर्‍या ठराव्यात. दोनदा वीस-वीस पत्रिकांची भाकिते 90 टक्के अचूक निघावीत. 15 लाख मिळतील; पण 70 टक्के जरी खरी निघाली (दोनदा 20-20) तरी ते शास्त्र असू शकते असे आम्ही मानू, अशी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन नागपूर समितीने पुणे, धुळे, अमरावती या चारही अ. भा. ज्योतिष अधिवेशनात जाहीर आव्हाने दिली होती. ती आव्हाने स्वीकारून आपली बाजू सत्य असल्याचे ज्योतिष महामंडळ का सिद्ध करू शकले नाही? याचा अर्थ, फलज्योतिषशास्त्र नाही असाच घ्यायचा का? 15) कोणताही महत्त्वाचा ज्योतिषी वा ज्योतिष महामंडळ, या आव्हानानंतर पुढे आले नाही; पण श्री. एम. कटककर नावाचे ज्योतिषी मात्र आव्हान स्वीकारण्याची एक बालिश भाषा घेऊन पुढे आले होते. ते म्हणाले होते, मी माणसांची स्वभाववैशिष्टय़े सांगतो. त्या वेळी अ. भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने हे आव्हान एका अटीवर स्वीकारण्याचे मान्य केले. कटककरांसोबत पाचव्या वर्गातील, फलज्योतिषाचे कुठलेही ज्ञान नसलेली कुठलीही 10 मुले बसवू. त्या दहा मुलांना पत्रिका न पाहताच अंदाजे स्वभाववैशिष्टय़े सांगावीत व श्री. कटककर महाशयांनी पत्रिका पाहून स्वभाववैशिष्टय़े सांगावीत. एका जरी शाळकरी मुलाने कटककरांपेक्षा अधिक गुण प्राप्त केले, तर मात्र कटककरांनी त्या मुलाची व जनतेची जाहीर माफी मागावी व धंदा बंद करावा. त्या वेळी या प्रतिआव्हानातून एम. कटककरांनी चक्क पळ काढला. तरी असा पळपुटा ज्योतिषी, ज्योतिष महामंडळाच्याच नव्हे, तर अधिवेशनाच्या स्टेजवरही दिमाखाने मिरवतो आहे, हे ज्योतिष्यांना व अधिवेशनाला कितपत भूषणावह आहे? या प्रश्नांची उत्तरं ज्योतिष्यांनी जाहीररीत्या द्यावीत. पण ज्योतिषी या प्रश्नांची उत्तरं न देता ज्योतिष्यावरची टीका म्हणजे हिंदू धर्मावरचा हल्ला अशी ओरड करतात. मग स्वातंर्त्यवीर सावरकर, स्वामी विवेकानंद हिंदू नव्हते का?

पेशव्यांची पेशवाई पाण्यात गणपतीसारखीच बुडाली

स्वातंर्त्यवीर सावरकर फलज्योतिषाद्वारे मुहूर्त पाहण्यावर कडाडून हल्ला करताना फार सुंदर युक्तिवाद वापरतात.

''मुहूर्तावर मुळीच विश्वास न ठेवणार्‍या मूठभर इंग्रजांनी पृथ्वीवर सूर्य मावळणार नाही एवढय़ा विस्तीर्ण प्रदेशावर-भूमीवर साम्राज्य निर्माण केलं आणि मुहूर्तावर, शुभ-अशुभावर विश्वास ठेवणारे पेशवे, डावा पाय पुढे ठेवायचा की उजवा पाय पुढे ठेवायचा हे ज्योतिष्याला विचारून ठरविणारे पेशवे, संकट आलं की विघ्नहर्त्या गणपतीस पाण्यात बुडवून ठेवत असत. अशा पेशव्यांची पेशवाई इंग्रजांमुळं गणपतीसारखीच पाण्यामध्ये बुडाली.''

स्वातंर्त्यवीर सावरकर एवढय़ावरच थांबत नाहीत, तर वर्णवर्चस्ववादी ब्राह्मणी मनोवृत्तीवर टीका करणारे, जन्मानं चित्पावन ब्राह्मण असलेले सावरकर म्हणतात,''आम्ही ब्राह्मण शेंडय़ा का ठेवतो? कारण अखिल ब्रह्मंडात असलेल्या सगळ्या ज्ञानलहरी (सगळं ज्ञान) केवळ आमच्याच डोक्यात शिराव्यात म्हणून आम्ही रेडिओच्या एरिअलसारख्या शेंडय़ा ठेवतो.''

भविष्यावर विश्वास म्हणजे कर्तृत्वाला सोडचिठ्ठी

भविष्यावर विश्वास म्हणजेच नशिबावर विश्वास; आपलं भविष्य आधीपासूनच ठरलं आहे असं मानलं तरच ज्योतिषी ते ओळखून आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करताहेत असं मानता येईल ना? नशिबावर विश्वास ही गोष्ट कोणत्याही राष्ट्राच्या उत्थानाकरिता, नागरिकांच्या स्वकर्तृत्वाकरिता घातकच आहे.

स्वामी विवेकानंदांसारख्या, हिंदू धर्माची पताका समुद्रापार पोहोचविणार्‍या द्रष्टय़ालासुद्धा आग्रहानं सांगावं लागलं की,''जोवर या देशातले तरुण नशिबावर आणि दैवावर विसंबून राहताहेत तोवर या देशाला भवितव्य नाही.'' ज्योतिषाचं समर्थन म्हणजेच दैववादाचं समर्थन, नशिबाचं समर्थन, माणूस नियतीच्या हातचं बाहुलं असल्याचं समर्थन नव्हे का? (क्रमश:)

(लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्धा

निर्मूलन समितीचे संस्थापक, संघटक आहेत.)

भ्रमणध्वनी-9371014832

Wednesday 5 December 2012

आनंदानं जगायचं असेल, तर अतिशय निर्भय बना


समस्या, प्रत्येकाच्या जीवनात समस्याच समस्या असतात. काही माणसं समस्यांखाली पार पिचून जातात, गलितगात्र होतात. काही माणसं माझ्या जीवनात समस्याच समस्या आहेत अशी सारखी ओरड करीत असतात. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला फ्रान्समध्ये एमिले कोया नावाचा एक मानसोपचार करणारा व्यक्ती होऊन गेला. त्याच्याकडे हजारोंच्या संख्येने लोक येत असत, उपचार घेत असत आणि रोगदुरुस्त होऊन जात असत. खरं म्हणजे ºिश्चन धर्मात 'फेथ हिलिंग' नावाची प्रक्रिया आहे. येशू ºिस्ताच्या नावावर ही प्रक्रिया चालते. रोगदुरुस्तीकरिता मोठय़ा प्रमाणावर वापरली जाते. भारतात त्याला 'चंगाई सभा' असंही म्हटलं जातं. या फॉर्मासिस्ट असणार्‍या एमिले कोयाने 'फेथ हिलिंग'चं नाव घेतलं असतं तर जगभरात मानसन्मान, पैसा, कीर्ती त्याला प्राप्त झाली असती; पण तो एवढा वैज्ञानिक मनोवृत्तीचा व प्रामाणिक गृहस्थ होता की, आलेल्या प्रत्येक रोग्याला म्हणायचा, ''तुम्ही दुरुस्त झाला आहात हे तुमच्या मनाचं सामर्थ्य आहे. मी फक्त तुम्हाला ते वापरायला शिकवलं आहे, प्रवृत्त केलं आहे.''

असंच एकदा त्याच्याकडे आलेल्या पेशंट बाईने तिच्या समस्या सांगायला सुरुवात केली. त्याने तिचं म्हणणं समजून घेतलं आणि तिला म्हणाला,''बाई, तुम्ही काय करता की तुमच्या जीवनात निर्माण झालेली एखादी छोटीशी जरी समस्या असेल तरी तुम्ही सारखा तिचाच विचार करता. विचार करून करून मुळात उंदराएवढी असलेली समस्या डोंगराएवढी करून ठेवता आणि मग त्या डोंगराएवढय़ा समस्येच्या ओझ्याखाली पार पिचून जाता. समस्या केवळ विचार करून करून कधीच सुटत नसतात. या जगात समस्या सोडविण्याचे दोनच मार्ग आहेत. एक जी समस्या तुमच्या जीवनात निर्माण झाली असेल तिचा एकदाच विचार करा. ती सोडविण्यासंबंधीच्या मार्गाचा विचार करा. निर्णय घ्या! आणि तडकाफडकी समस्या सोडवून मोकळे व्हा! योग्य, अचूक मार्गाचा वापर करा आणि त्या समस्येपासून मुक्त व्हा!

समजा ती समस्या तुम्हाला सोडवणं शक्यच नसेल. तुमच्या अधिकारक्षेत्राच्या, क्षमतेच्या, ताकदीच्या बाहेरची असेल तर ती समस्या आपल्या जीवनात नाहीच आहे, असं गृहीत धरून जगायला शिका. समस्या सोडविण्याचा हा दुसरा मार्ग आहे.''

एमिले कोयाने समस्या सोडविण्याचे हे दोन मार्ग सांगितले आहेत. तेवढेच हे दोन मार्ग या जगात आहेत. आपण सर्वसामान्य माणूस काय करतो की, समस्या सोडविण्याविषयीचा निर्णय घ्यायला घाबरतो. अनिर्णीत अवस्थेत राहिल्यामुळे प्रचंड नुकसान होतं. अनेकदा असं आपल्याला वाटतं,''मी निर्णय घेतला आणि तो चुकला तर?'' कदाचित काही काळ वाट पाहिल्यानंतर समस्या आपोआप सुटेल अथवा अधिक अचूक निर्णय घेण्याची संधी मिळेल; पण असं दरवेळी घडणं शक्य नसतं. आपला हॅम्लेट झाला असेल, द्विधा मन:स्थिती झाली असेल, तर कागदपेनाचा वापर करावा, या समस्येबाबत 'अ' निर्णय घेतला तर काय फायदे होतील, काय तोटे होतील हे लिहून काढावे. हा विचार करीत असताना मी 'अ'च निर्णय घेणार आहे, असं गृहीत धरून सखोल, सांगोपांग विचार करावा व फायदे-तोटे तपशीलवार लिहून काढावेत. थोडय़ा वेळानंतर 'ब' निर्णय घेतला तर काय फायदे-तोटे होतील हेही तपशीलवार लिहून काढावे. कदाचित या समस्येत तिसराही निर्णय घेणे शक्य असेल तर तिसरा 'क' निर्णय घेतल्यावर काय फायदे-तोटे होतील तेही विस्तारानं कागदावर नोंदवावं. ही कसरत करताना आपल्याच विचारांना दिशा मिळते. मनाचा गुंता, विचारांचा गुंता सोडवायला मदत होते. वाटल्यास तेव्हाच वा एखाद्या दिवसानंतर पुन्हा 'अ', 'ब' व 'क' नीट वाचावं आणि सर्वात जास्त योग्य वाटेल (त्या वेळी) तो निर्णय घेऊन मोकळं व्हावं. हा निर्णय घेण्याचा उत्तम व जास्तीतजास्त अचूक ठरू शकणारा मार्ग आहे. केवळ समस्येकरिताच नव्हे, तर कोणताही निर्णय घेण्याबाबत साशंक असाल त्या वेळी हा मार्ग वापरता येईल.

काही समस्या आपल्याला सोडविता येत नसतात. ही जीवनातील वस्तुस्थिती आहे. अशा वेळी हे सत्य स्वीकारून ही समस्या अशीच राहणार आहे असं गृहीत धरून जगावं लागतं. जगायला शिकावं लागतं. आपल्या आजूबाजूला कसंही वातावरण असलं तरी त्याचा मनावर परिणाम न होऊ देण्याचं सामर्थ्य आपल्या मनात आहे. हे आपण आधीच्या लेखांमध्ये पाहिलेलं आहे. यालाच ती समस्या अस्तित्वातच नाही, असं गृहीत धरून जगायला शिकणं म्हणतात.

आपल्या जीवनात आनंदानं जगायचं असेल आणि दुसर्‍यालाही आनंदानं जगू द्यायचं असेल तर काही दृष्टिकोन स्वीकारावे लागतात.

एक विधायक विचार करा! आणि विधायकच वागा! आपण नाटक पाहतो, सिनेमा पाहतो, कादंबर्‍या वाचतो. या सगळय़ांमधून 'टिट फॉर टॅट'. 'कोणी आरे म्हटलं तर त्याला कारे म्हणायचं,' असं शिकवलं जातं. त्यामुळे बदला, प्रतिशोध, दुश्मनी निभावणं यात सर्वसामान्य माणून अडकून पडतो. आपल्या आजूबाजूची माणसं आपल्याविषयी वाईटसाईट बोलतात, टीका करतात, चिखल फेकण्याचा प्रयत्न करतात. हे ऐकलं की आपण पिसाळतो, आपण त्यांच्याबद्दल वाईटसाईट बोलतो. उत्तरं देण्याच्या प्रयत्नात चिखलफेक करतो. आपली सगळी निर्मितीक्षमता, ऊर्जा असल्या निर्थक गोष्टींत खर्च करतो. परिणामत: आपल्या आजूबाजूच्या खुज्या माणसांप्रमाणे आपणही खुजे बनत जातो आणि मग 'अवघे खुजे धरू सुपंथ' या पद्धतीने जगत जातो. ही अत्यंत वाईट गोष्ट आहे. आपली एनर्जी असल्या क्षुल्लक गोष्टीत खर्च न करता सगळी निर्मितीक्षमता आणि ऊर्जा चांगल्या कामात खर्च करावी. स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाची उंची वाढविण्यात खर्च करावी. स्वत: एवढं वाढत जावं की, बोलणार्‍याची टीका आपल्या कानापर्यंत पोहोचूच नये. कुणी थुंकण्याचा प्रयत्न केला तर त्याची थुंकी आपल्यापर्यंत पोहोचूच नये. हा खरा विधायक मार्ग आहे. मानवी जीवनात खूप विधायक पद्धतीने वागता येतं. त्यासाठी एक छोटीशी गोष्ट सांगतो.

एक ऋषी महोदय सकाळच्या वेळी सूर्याला अघ्र्य देण्यासाठी नदीच्या पात्रात उभे होते. ते ओंजळीत पाणी घेऊ लागले. त्यांच्या हातात पाण्यासोबत एक विंचू आला, चावला. विंचवाला सोडायचं म्हणून त्यांनी ओंजळीतील पाण्यासोबत विंचवाला सोडून दिलं. पुन्हा ओंजळीत पाणी घेऊ लागले. पुन्हा विंचू ओंजळीत आला. फरक जाणवला. हे वारंवार घडायला लागलं. त्यांच्या बाजूला उभा असलेला त्यांचा शिष्य म्हणाला,''गुरू महोदय, हे तुम्ही काय करता आहात? (एकदा तुम्ही त्या विंचवाला जीवदान दिलं हे मी समजू शकतो; पण तो वारंवार तुमच्या ओंजळीत येतो. वारंवार चावतो तेव्हा एकदाचं ह्या विंचवाला ठेचून मारा आणि सूर्याला अघ्र्य अर्पण करण्याचं पवित्र कार्य निर्विघ्नपणे पार पाडा.'' यावर गुरू महोदय मिस्कीलपणे उद्गारले, ''मित्रा, त्याचं असं आहे की, चावणं हा कदाचित त्या विंचवाचा धर्म असेल. (संस्कृत भाषेत 'धर्म' या शब्दाचा दुसरा अर्थ 'स्वभाव'सुद्धा होतो.) प्राणिमात्रांवर दया करणं हा माझा धर्म आहे. तो त्याचा धर्म पाळतो आहे, मी माझा धर्म पाळतो आहे.'' एवढय़ा एक्सटेंटपर्यंत, या मर्यादेपर्यंत तरी माणसाला विधायक वागता येतं आणि आपण तसं वागायला हवं. किमान जोपर्यंत कुणी आपल्या जीवावरच हल्ला करीत नाही, अस्तित्वच खुंटवून टाकत नाही तोपर्यंत तरी आपल्याला विधायक विचार करता येतो आणि विधायक वागता येतं.

खूप माणसं आयुष्यात जगताना भीतभीत जगत असतात. कोण काय म्हणेल? लोक काय म्हणतील? समाज काय म्हणेल? अशा प्रश्नांच्या दडपणापोटी मनापासून जे करायचं असतं तेही करीत नाही. अनेक प्रकारांची भीती बाळगतात. उद्या काय होईल? भविष्यात काय घडेल? या काल्पनिक ओझ्याखाली दडपून जातात. भूतकाळामधल्या नकारात्मक गोष्टी आठवून आठवून स्वत:चं नुकसान करून घेतात. भूतकाळातील सावली सतत त्यांचा पिच्छा पुरवीत असते.

जीवनात खरंच जगायचं असेल, आनंदानं जगायचं असेल तर सगळय़ा प्रकारची भीती मनातून काढून टाका. अतिशय निर्भय बना, जीवनामध्ये जगत असताना प्रत्येक क्षण आणि क्षण समरसून जगा. समरसतेनं, एकाग्रतेनं जगलेला प्रत्येक क्षण आपल्याला आनंद देऊन जातो. खेळण्याच्या मैदानावर आपण दोन तास समरसून खेळतो. प्रचंड थकतो. अक्षरश: घामानं निथळतो. तरी त्या क्षणी आपल्या मनाला खूप आनंद होतो. कारण ते खेळण्याचे दोन तास आपण एकाग्रतेनं समरसून घालविलेले असतात. कितीही कष्टाचं काम असेल, मेहनतीचं, वेदनादायक काम असेल आणि ते आपण मनापासून एकाग्रतेनं करणार असू, तर त्या कामातून आपल्याला आनंदच प्राप्त होतो.

जर आपण आपल्या जीवनात प्रत्येक काम मनापासून करू लागलो, समरसून करू लागलो तर आपलं सारं जीवनच आनंदमय बनून जाईल. त्यामुळे जीवनात जे काही करायचं आहे ते मनापासून, समरसून, एकाग्रतेनं करा! वर्तमानकाळातला प्रत्येक क्षण जगताना त्यावर भूतकाळाची सावली पडू देऊ नका आणि भविष्यकाळातील काल्पनिक ओझंही पडू देऊ नका.

जीवनात जेव्हा एखाद्या गोष्टीला मनापासून 'हो' म्हणावसं वाटत असेल, तर आतून झालेल्या सद्सद्विवेकबुद्धीनुसारसुद्धा 'हो'च म्हणावसं वाटत असेल तर 'हो'च म्हणा! कारण एकदा आलेली संधी पुन्हा येतेच असं नाही.

ज्यावेळी मनापासून, आतून सद्सद्विवेकबुद्धीनुसारसुद्धा 'नाही'च म्हणावसं वाटत असेल तेव्हाही ठामपणे 'नाही'च म्हणा! फक्त समोरच्या व्यक्तीला नीट समजावून सांगून, नम्रपणे 'नाही' म्हणा! सर्वसामान्य माणूस दडपणाखाली वा प्रेमाच्या शोषणाला बळी पडून (आई म्हणते म्हणून, नवरा म्हणतो म्हणून, मुलं म्हणतात म्हणून दबावाला बळी पडतो.)'हो' म्हणतो. परिणामत: आपण सद्सद्विवेकबुद्धीनुसार वागत नाही. आपल्या मनाचं ऐकत नाही. त्यामुळं आपल्या व्यक्तिमत्त्वाचा र्‍हास होतो आणि ज्या व्यक्तीला दडपणाखाली 'हो' म्हटलेलं असतं त्या व्यक्तीच्या कामालाही योग्य न्याय देऊ शकत नाही. दुहेरी नुकसान होतं. आपल्या सद्सद्विवेकबुद्धीनुसार निर्णय घ्यावेत. ''माझी सद्सद्विवेकबुद्धी चुकली तर? या भीतीला हद्दपार करा! आपली सद्सद्विवेकबुद्धी केव्हा मॅच्युअर होणार? त्याला वयाची लिमिट काय असू शकते? याचं काहीही गणित असू शकत नाही. आपल्या सद्सद्विवेकबुद्धीवर विश्वास ठेवा! तिच्यावर विसंबून राहा! आयुष्यात जेव्हा 'हो' म्हणायचं असेल तेव्हा 'हो' म्हणा! 'नाही' म्हणायचं असेल तेव्हा 'नाही'च म्हणा! चूक होईल याची भीती बाळगू नका! मानवी जीवनात कितीही प्रयत्न केला तरी चुका होतातच. झालेली चूक स्वीकारा. चूक दुरुस्त करण्याची यंत्रणा स्वत:त निर्माण करा. चुकांपासून शिकत जा! आणि सातत्यानं यशाच्या दिशेनं वाटचाल करीत जा. आनंदानं जगत जगत कितीही कष्ट पडले तरी हसतमुखानं वाटचाल करीत जात हे मानवी जीवनाच्या सुखाचं, यशाचं रहस्य आहे, मर्म आहे.

(लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन

समितीचे संस्थापक, संघटक आहेत.)

भ्रमणध्वनी-9371014832