Friday 9 November 2012

सृष्टीनिर्मितीबाबत डार्विनचा सिद्धांत जगन्मान्य



आपण का बरं जन्माला आलो? ईश्वरानं का बरं आपल्याला जन्माला घातलं असावं? आपल्या जगण्याचा खरा उद्देश काय आहे? का बरं आपण जगतो? ही सृष्टी कुणी निर्माण केली असेल? ही सृष्टी निर्माण करण्यामागे काय उद्देश असावा? असे अनेक प्रश्न, प्रत्येक विचारी माणसाच्या मनात निर्माण होतात. अगदी माणूस विचार करायला लागला, तेव्हापासून या प्रकारचे प्रश्न माणसाला पडत आले आहेत. त्यांचा शोध घेण्याचा तो प्रयत्न करत आला आणि या शोध-प्रयत्नातूनच त्याला काही प्रश्नांची उत्तरं सापडली आहेत. शोध-प्रयत्नाची धडपडच कदाचित मानवाच्या प्रगतीची कहाणी बनली आहे. थोडक्यात ही कहाणी आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू या. ही आपली कहाणी आहे. या सृष्टीची निर्मिती कशी झाली असावी? कुणी निर्माण केली असावी? मानवी जगण्याच्या 10 लाख वर्षाच्या इतिहासात अगदी अलीकडच्या काळात धर्माची निर्मिती झाली. सगळ्याच धर्मानी या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. नव्हे, या प्रश्नाचं उत्तर दिल्याशिवाय कदाचित धर्माना एवढा व्यापक पाठिंबा, एवढय़ा संख्येनं अनुयायी लाभलेच नसते. एवढा महत्त्वाचा हा प्रश्न होता.

ºिश्चन धर्माच्या 'ओल्ड टेस्टामेंट'मध्ये ही 'जेनेसिस'ची म्हणजे सृष्टी उत्पत्तीची कल्पना मांडली आहे. एकूण सात दिवसात ईश्वरानं सृष्टी निर्माण केली. पहिल्या दिवशी ईश्वर म्हणाला, 'लेट देअर बी लाईट', 'तिथे प्रकाश असू दे' आणि पहिल्या दिवशी प्रकाश निर्माण झाला. दुसर्‍या दिवशी ईश्वर म्हणाला, 'लेट देअर बी वॉटर', 'तिथे पाणी असू दे' आणि दुसर्‍या दिवशी पाणी निर्माण झालं. पाचव्या दिवशी म्हणाला, 'आदम असू दे' आणि पहिला माणूस निर्माण झाला. तो एकटाच पृथ्वीवर, सृष्टीमध्ये वावरू लागला. ईश्वराला आदमची दया आली. बिचारा एकटाच हिंडतोय म्हणून सहाव्या दिवशी ईश्वरानं आदमच्या हाडापासून 'ईव्ह'ची निर्मिती केली. ही पहिली मानवी स्त्री. सौंदर्यवती स्त्री. पण ईश्वरानं तिला धोक्याचा इशारा दिला. ''बाई, या ईडन गार्डनमध्ये पाहिजे तेवढं भटक. मौज कर. खा, पी पण ज्ञानाचं फळ मात्र चाखू नकोस.'' या सगळ्या सृष्टी निर्माणप्रक्रियेत ईश्वर खूप थकला. म्हणून सातव्या दिवशी म्हणजे संडेला, रविवारी त्यानं विश्रंती घेतली म्हणून रविवार हा अजूनही सुट्टीचा दिवस मानतो आपण. पण एक अघटित घडलं. सौंदर्यवान ईव्ह अतिशय पवित्र होती. निर्मळ होती. आदम आणि ईव्ह दोघंही गुण्यागोविंदानं जगत होते. भाऊबहिणीप्रमाणं नांदत होते. पण ईव्हच्या डोक्यात एक विचार सारखा यायचा. का बरं ईश्वरानं, हे सुंदर दिसणारं, ज्ञानाचं फळ चाखण्यास मनाई केली? काय असावं त्यात? कसं असेल ते चवीला? एक दिवस तिला राहावलं नाही. खूप हिंमत करून तिनं ते 'ज्ञानाचं फळ' चाखलंच. ते चाखताच तिला ज्ञान झालं. आपण स्त्री आहोत. तिच्या मनात कामवासना निर्माण झाली. तिनं बरोबर आदमला फशी पाडलं. त्यामुळं ती गर्भवती राहिली. मूल जन्माला आलं. अशा प्रकारे मानवजात निर्माण झाली. जर ईव्हने चुकून ते ज्ञानाचं फळ चाखलं नसतं तर तिच्या मनात पाप, कामवासना निर्माण झाली नसती आणि तुमचा-माझा जन्म झाला नसता आणि हे जीवन जगण्याची तुम्हाला-मला गरज पडली नसती. ज्यातून माणसाचं जीवन निर्माण होतं, त्या प्रक्रियेला पाप ठरवलं. कामवासना म्हणजे पाप. ज्ञानाचं फळ चाखणं म्हणजे पापाला निमंत्रण देणं. 'ओल्ड टेस्टामेंट' हा धर्मग्रंथ केवळ ºिश्चनांनाच प्रिय, श्रद्धेय नाही. तर यहुदी (ज्यु) व मुस्लिम धर्मीयांनाही तेवढाच श्रद्धेय आहे. या तिन्ही धर्माचे धर्म संस्थापक ईश्वर मानले जात नाहीत. ते देवदूत, प्रेषित होते असं मानलं जातं. त्यामुळं येशू ºिस्त आणि महम्मद पैगंबर हे दोघेही ईश्वराचे प्रेषित आहेत आणि या तिन्ही धर्माचा मूळ ग्रंथ 'ओल्ड टेस्टामेंट' आहे हे तिन्ही धर्म सृष्टीनिर्मितीची समान कल्पना मानतात. आदम आणि ईव्हची, आदम आणि हौवा होते एवढाच काय तो फरक.

भारतीय धर्मामध्ये जेनेसिस, सृष्टीनिर्मितीची कल्पना खूप वेगवेगळ्या प्रकारे सांगितली आहे. बायबल, कुराण यांसारखा 'एखादाच' प्रमाण ग्रंथ नाही. त्यामुळं नेमकी एकच सृष्टीनिर्मितीची कल्पना सांगणं कठीण आहे. तरी सगळ्यात लोकप्रिय असणारी एक कल्पना आपण समजून घेऊ. मनुस्मृती आणि सरस्वती पुराण यामध्ये ही कल्पना मांडली आहे. ईश्वर, ब्रह्म स्वयं निर्माण झाले. ते अप्सरांचा नाच पाहू लागले. नाच पाहता पाहता उत्तेजित झाले. त्यामुळं त्यांचं वीर्यस्खलन झालं. ते द्रोणात गोळा केलं. या द्रोणातून अगस्ती ऋषींचा जन्म झाला. हा पहिला माणूस, आदम. एकदा अगस्ती ऋषी असाच अप्सरांचा नाच पाहत होते. त्यांचंही स्खलन झालं. ते द्रोणात गोळा केलं. त्यातून सरस्वतीचा जन्म झाला. सरस्वती खूप लावण्यवती होती. तिचं, पहिल्या मानवी स्त्रीचं, लावण्य पाहून ब्रह्मदेव भाळले. ब्रह्मदेव आणि सरस्वती यांच्या मिलनातून माणूस जन्माला आला आणि पुढे या पद्धतीनं मानव जात निर्माण झाली. किमान या सृष्टीनिर्मिती कल्पनेत 'पाप', 'वासना' असे नकारात्मक शिक्के नैसर्गिक प्रक्रियेला (स्त्री-पुरुष संबंधाला) मारले नाहीत. ही किती चांगली गोष्ट आहे. आज माहीत असलेले मोठे धर्म साधारणत: अडीच ते दीड हजार वर्षापूर्वी निर्माण झाले आहेत. त्या काळात उपलब्ध असणार्‍या ज्ञानाच्या आधारावर 'सृष्टी उत्पन्नाची' कल्पना प्रत्येक धर्मग्रंथ लेखकानं मांडण्याचा प्रयत्न केला. खरं म्हणजे या सार्‍या कल्पना त्या त्या ग्रंथकत्र्यांच्या उत्तम प्रतिभेचा, कल्पनाशक्तीचा आविष्कार आहे. त्याचं आपण मनापासून कौतुक केलं पाहिजे. पण खरं काय आहे?

डार्विनचा उत्क्रांतीवादाचा सिद्धांत. आपण याविषयी ऐकलं असेलच. हे

जगन्मान्य झालेलं संशोधन आहे. याचा अर्थ वैज्ञानिकदृष्टय़ा सिद्ध झालेलं संशोधन आहे. सृष्टीनिर्मितीच्या या मांडणीत एखाद्या दुसर्‍या गोष्टींचे तपशील, कालावधी थोडासा बदलू शकतो. नव्या पुराव्यांनुसार तो अधिक अचूक ठरू शकतो; पण मूळ उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मात्र बदलू शकत नाही, बदलणार नाही, बदलणं शक्य नाही. हे जगातील सर्वात जास्त क्रांतिकारी संशोधन होतं. या संशोधनामुळं कदाचित मानवीजीवन समृद्ध होण्यात सरळ हातभार लागला नसेल. पण मानवी जीवनातील विचारांना मात्र क्रांतिकारक बदल करण्यास भाग पाडणारं हे संशोधन आहे. साधारणत: साडेचारशे कोटी वर्षापूर्वी सूर्याच्या गोळ्यापासून पृथ्वी वेगळी झाली. पुढे ती सूर्याभोवती फिरत फिरत थंड होत गेली. वायुरूप गोळा थंड होताना, सूर्यापासून पृथ्वीचं अंतर अनुकूल असल्यामुळं पाणी-सागर निर्माण झालेत. भूकंपामुळं आतील खनिज वर येऊन पाण्याहून जास्त उंचावर स्थिरावून, पहाड-

जमीन निर्माण झाली. साधारणत: अडीचशे कोटी वर्षापूर्वी या पृथ्वीवरील वातावरणात असे अनुकूल बदल झालेत की, त्यातून एक पेशीम आमिबासारखे प्राणी निर्माण झालेत. त्यातून आधी जलचर निर्माण झालेत. नंतर स्थलचर (जमिनीवर वावरणारे) प्राणी निर्माण झालेत. उत्क्रांतीच्या प्रक्रियेनुसार व लामार्कच्या 'विकासवादी' सिद्धांतानुसार प्राण्यांचा विकास होत गेला. ते बदलत गेले. म्युटेशनमुळं, निसर्गातील अपघातांमुळं नवनव्या प्राण्यांच्या जाती निर्माण होत गेल्या. त्यातील ज्या टिकण्यासारख्या होत्या त्या जाती जिवंत राहिल्यात. ज्या निसर्गाच्या कालचक्रात वा अपघातात टिकू शकल्या नाहीत त्या नामशेष झाल्यात. डायनासोर्स, मास्तोडॉन (महाकाय हत्तींची जात) असे कितीतरी प्राणी नष्ट झालेत. यातूनच वानर, माकड अशा दोन पायांवर चालू शकणार्‍या प्राणिजाती निर्माण झाल्यात. त्यातून साधारणत: 10 लाख वर्षापूर्वी जमिनीवर सरळ चालू शकणारी मानवी जात निर्माण झाली. 10 लाख वर्षापूर्वी ही मानवी जातही इतर प्राण्यांसारखीच होती. त्याच्याजवळ कपडे नव्हते, घर नव्हतं, अन्न शिजवण्याची अक्कल नव्हती. केस कापण्यासाठी कैची नव्हती. स्वत:चं संरक्षण करण्यासाठी, लढण्यासाठी दोन हात, पळण्यासाठी दोन पाय वगळता कोणतंही शस्त्र नव्हतं.

फक्त त्याला अतिशय उत्क्रांत असा प्राणी जगतातील सगळ्यात विकसित असा मेंदू लाभला होता. या मेंदूत विचार करण्याची शक्ती होती; पण माणूस शारीरिकदृष्टय़ा मात्र दुबळा होता. त्याच्याजवळ हत्तीसारखं प्रचंड बळ नव्हतं. सिंहासारखे ताकदवान पंजे नव्हते. त्यामुळं दुबळा असणारा हा माणूस प्राणी जिवंत राहण्यासाठी झुंडीत राहू लागला. ती त्याच्या जगण्याची अपरिहार्यता होती. यातूनच तो समाजशील प्राणी बनण्याच्या दिशेनं वाटचाल करू लागला. झुंडीत, समूहात राहणार्‍या प्राण्यांना संवादाची गरज असते. रानटी अवस्थेत खाणाखुणांच्या भाषेनं संवाद साधणारा हा माणूस हळूहळू आवाज करण्याच्या क्षमतेतून भाषा निर्माण करू लागला. भाषानिर्मितीमुळं त्याला अधिक चांगला संवाद साधता आला. त्यामुळं समूहाची परस्परांसोबत देवाणघेवाण वाढली. त्यातून जीवन सुरक्षितता व समृद्धी वाढली. एका छोटय़ा चार-पाच लोकांच्या टोळक्याला लागलेला शोध सगळ्या टोळीचा ठरू लागला. त्या डोंगरापलीकडे खूप फळं आहेत. इकडच्या डोंगरापलीकडे खूप हिंस्र जनावरं आहेत. सगळ्यांना माहिती कळू लागली. त्यामुळं सुरक्षितताही वाढली. माणसाच्या मेंदूत विचार करण्याची क्षमता होती, म्हणून त्यानं आवाज-भाषा निर्माण केली. जसजशी भाषा विकसित होत गेली तसतशी त्याची विचार करण्याची क्षमता वाढत गेली. त्यामुळं आणखीच भाषा विकसित झाली. म्हणूनच आज कोणत्याही संस्कृतीचा विकास तिच्या भाषा समृद्धीवरून ओळखला जातो. आपल्या चिमुकल्या मेंदूचा वापर करून थंडीपासून, उन्हापासून संरक्षण करण्यासाठी पानांपासून, प्राण्यांच्या कातडीपासून त्यानं वस्त्रं निर्माण केली. काडय़ांना अणकुचीदार दगडं बांधून भाले निर्माण केले आणि हातांची क्षमता वाढवणारी शस्त्र निर्माण केलीत. निसर्गानं निर्माण केलेल्या डोंगरातील गुहांमध्ये घरं निर्माण केलीत. निसर्गात निर्माण केलेल्या डोंगरातील गुहांमध्ये घरं निर्माण केली. निसर्गात अपघातानं लागलेल्या आगीला जपून ठेवलं. त्याचा उपयोग इतर प्राण्यांपासून संरक्षणासाठी शस्त्रासारखा केला. अन्न, मांस शिजवून ते दीर्घकाळ टिकविण्याची क्षमता प्राप्त केली. धान्याचा शोध लागल्यावर डोंगरावरून खाली पठारावर उतरून शेती करू लागला. या निसर्गातून लोखंड शोधलं. त्यातून तलवारी, भाले निर्माण केले. त्याचप्रमाणं नांगर निर्माण केले. निसर्गात सापडलेल्या कापसातून वस्त्रं निर्माण केली. समृद्ध भाषा निर्माण केली. समाज निर्माण केला. अर्थव्यवस्था निर्माण केली. संस्कृती निर्माण केली. विवाहसंस्था निर्माण केली. गाव, शहरं निर्माण केलीत. धर्म निर्माण केलेत. या चिमुकल्या मेंदूच्या भरवशावरच हा सारा प्रगतीचा आलेख माणसानं निर्माण केला आहे. प्रेम, त्याग, बंधुता, स्वातंर्त्य, समता, सत्याचा आग्रह, दया ही चांगली मूल्येही निर्माण केलीत आणि राग, असूया, द्वेष, बदला यातून युद्ध, भांडणं, मारामारीही निर्माण केली. आज मानवजातीत जे काही चांगलं आहे तेही मानवानंच निर्माण केलं आहे. आज जे काही वाईट शिल्लक आहे तेही आपणच निर्माण केलं आहे. आजही आपल्यापैकी अनेकांना वाटतं की आपण खास देवाची निर्मिती आहोत, देवाचे लाडके पुत्र आहोत. खरंच? तसं असतं तर देवानं आपल्याला जन्माला घालतानाच म्हटलं असतं, ''अरे लाडक्या मानवा, तू जंगलात जातो आहेस. खूप हिंस्र श्वापदं आहेत. जरा सोबत डबल बॅरलची बंदूक घेऊन जा. खूप थंडी आहे, जरा जाड लोकरीचे कपडे घेऊन जा.'' आणि जन्मत:च आपल्याजवळ बंदूक असती, लोकरीचे कपडे असते; पण आपण तर उघडेबोडकेच जन्माला येतो. मग? तरी?

(लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन

समितीचे संस्थापक, संघटक आहेत.)

भ्रमणध्वनी- 937101483

No comments:

Post a Comment