हे सगळे शब्द वापरत असताना, यांचा नेमका अर्थ काय होतो? समाजामध्ये बुद्धिप्रामाण्यवाद रुजवायचा म्हणजे नेमकं काय? समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणं म्हणजे नेमकं काय? या दोन्ही गोष्टी एकच आहेत का? या प्रश्नांचा मुळातून अभ्यास करणं ही आजच्या काळाची गरज आहे. त्याच पद्धतीनं अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचीही ही अपरिहार्य अशी गरज आहे. ज्याला आपण इंग्रजीमध्ये फं३्रल्लं'्र२े असं म्हणतो, त्याचंच मराठीत केलेलं भाषांतर म्हणजे 'बुद्धिप्रामाण्यवाद'! साधरणत: विसाव्या शतकात हा शब्द मोठय़ा प्रमाणावर रूढ झाला, फं३्रल्लं'्र२े या नावाखाली मान्यता पावला. बुद्धिप्रामाण्यवाद फं३्रल्लं'्र२े हा एखादा इझम आहे का? जसा टं१७्र२े, र्रूं'्र२े व ¬ंल्लँ्रि२े मराठीत यांना म्हणतात मार्क्सवाद, समाजवाद, गांधीवाद. या व्यतिरिक्त आणखीही 'वाद' आहेत. या पद्धतीचा हा काही वाद आहे का? हा सुरवातीला तुमच्या-माझ्या मनामध्ये प्रश्न निर्माण होईल.पण ज्या अर्थाने आपण इझम किंवा वाद हा शब्द वापरतो, त्या अर्थाने 'बुद्धिप्रामाण्यवाद' हा कोणता वाद नाही. बुद्धिप्रामाण्यवाद यामध्ये 'वाद' हा शब्द जरी असला तरी खर्या अर्थानं ही एक प्रक्रिया आहे. त्याला आपण बुद्धिप्रामाण्य प्रक्रिया असं म्हणू शकतो. जीवनातल्या विविध अंगांच्या प्रश्नांची उत्तरं जरी आपल्याला या प्रक्रियेतून मिळत असली, तरी ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या वादांमध्ये जगाचं वा देशाचं अर्थशास्त्रं, समाजशास्त्र या अमूक पद्धतीचं असावं, राज्यव्यवस्था अमूक पद्धतीनं चालावी या विशिष्ट वादानुसार ती चालावी, असा आग्रह असतो. त्या पद्धतीनं बुद्धिप्रामाण्यवाद काही स्वतंत्र इझम किंवा वाद नाही. बुद्धिप्रामाण्यवाद भारताला नवा नाही! भारतीय परंपरेमध्ये बुद्धिप्रामाण्यवाद हा शब्द जरी नवा असला, तरी या पद्धतीची प्रक्रिया मात्र नवी नाही. 'चार्वाक ऋषींची परंपरा' ही एक वेदकालीन परंपरा आहे. चार्वाक त्या काळामध्ये विवेकवाद मांडत असत. ह्या विवेकवादाचं आजच्या काळातलं आधुनिक स्वरूप म्हणजेच बुद्धिप्रामाण्यवाद, असं आपल्याला म्हणता येईल.चार्वाकांचा विवेकवाद 'प्रत्यक्ष प्रमाण अधिक अनुमान' या स्वरूपाचा होता. म्हणजे प्रत्यक्ष प्रमाण अधिक अनुमान याच्या आधारावर जीवनातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण शोधलं पाहिजे. जीवनात जे सत्य आपल्याला शोधायचं आहे, त्याचं उत्तर प्रत्यक्ष प्रमाण आणि त्याच्या आधारावर केलेले अनुमान यातूनच आपल्याला मिळणार आहे किंवा तसं सत्य आपल्याला शोधता येणार आहे, या पद्धतीची चार्वाकांची मांडणी होती. तुम्हाला माहित आहे, की सत्य शोधण्याच्या प्रक्रियेतूनच धर्मांचा उदय झाला आहे किंवा किमान सगळ्या धर्मांनी, 'आम्ही अंतिम सत्य शोधण्याचा प्रय▪करत आहोत' असा दावा तरी केला आहे. प्रश्न एवढाच होता, की हे जे काही 'अंतिम सत्य' आहे ते म्हणजे नेमकं काय आहे? मानव जातीला दीर्घ काळापासून, अगदी पाषाणयुगापासून या विश्वासंबंधी विविध प्रश्न सतावत होते. जसे ही सृष्टी कशी निर्माण झाली? ही पृथ्वी कशी निर्माण झाली? सूर्य, चंद्र, तारे कसे निर्माण झाले? त्याच पद्धतीनं, हे का निर्माण झाले? हा प्रश्न प्रामुख्याने पडत होता.आता, हे का निर्माण झाले असावेत? आपोआप आणि विनाकारण तर हे नक्कीच निर्माण झाले नसावेत! मग कुणाची तरी यामागे एक सुनियंत्रित अशी योजना असली पाहिजे, एक कारण परंपरा असली पाहिजे आणि एका विशिष्ट उद्देशाने यांची निर्मिती झाली असली पाहिजे, या पद्धतीची मांडणी होणं स्वाभाविक होतं. ज्या कारणांकरिता सृष्टीची, माणसांची आणि इतर प्राण्यांची निर्मिती झाली, त्या कारणांचा शोध घेणं म्हणजेच 'अंतिम सत्याचा' शोध घेणं हा धर्माचा खरा उद्देश आहे, अशी मान्यता पुढे रूढ झाली.बरं, हे अंतिम सत्य म्हणजे काय? ईश्वर असेल, ब्रह्म असेल, ब्रह्मंड असेल, त्याही पलीकडे जाऊन प्रेमस्वरूप असेल किंवा आणखी काहीतरी असेल, या पद्धतीची मांडणी वेगवेगळ्या धर्मांनी आपापल्या पद्धतीनं केली आहे.चार्वाकांचं म्हणणं असं होतं, की 'हे अंतिम सत्य वगैरे जे काही आहे, त्याला मुळात अस्तित्वच नाही. या जागामध्ये अंतिम सत्य वगैरे काही नसतं. पण सत्य शोधण्याचा एकमात्र मार्ग आहे आणि तो म्हणजे 'प्रत्यक्ष प्रमाण' म्हणजे 'पुरावा' 'ढ१ा' ते 'ढ१ा' आणि त्याच्या आधारावर केलं जाणारं अनुमान, या दोन गोष्टींपेक्षा आणखी तिसर्या कोणत्याही मार्गानं आपल्याला खर्या अर्थानं सत्य गवसू शकत नाही किंवा सत्य शोधलं जाऊ शकत नाही'. या पद्धतीची मांडणी त्या काळामध्ये चार्वाकांनी केली. प्रत्यक्ष प्रमाण अधिक अनुमान आता हे आपण नेमकं समजून घेऊ, की प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे काय? त्याच्या आधारावर केलं जाणारं अनुमान म्हणजे काय? आपल्याला कल्पना असेल, की आजच्या काळामध्ये वैज्ञानिक प्रक्रिया रूढ झाली आहे म्हणून वादाचे मुद्दे फारसे उरत नाहीत, पण ज्या काळामध्ये माणसाला या पद्धतीची वैज्ञानिक प्रक्रिया आणि प्रगतीच माहीत नव्हती, त्या काळामध्ये तर्काच्या आधारावर ज्ञान मिळवणं हाही ज्ञानाच्या मार्गांमध्ये एक मार्ग मानला जात होता. कवेळ तर्क करून एका गोष्टीच्या आधारावर दुसर्या गोष्टीचं 'लॉजिक' आपण मांडत जायचं. तर्क करत जायचं आणि याच्या आधारावर सुद्धा आपल्याला ज्ञान मिळू शकतं, सत्य शोधून काढता येऊ शकतं, अशी मांडणी त्या काळामध्ये अनेक विद्वान, ऋषीमुनी आणि वैज्ञानिक करत असत. चार्वाकांचं म्हणणं असं होतं, की केवळ तर्काच्या आधारावर कोणतंही सत्य शोधलं जाऊ शकत नाही. हा तर्क किंवा अनुमान प्रत्यक्ष प्रमाणावरच आधारलेला असला पाहिजे. तरच आपल्याला खर्या अर्थानं सत्य शोधता येईल.प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे पुरावा. एखादी घडणारी घटना आपण पाचही इंद्रियांनी प्रत्यक्ष अनुभवली, ती घटना घडते आहे याचा पुरावा आपल्याला मिळाला, की त्याच्या आधारावर जे अनुमान आपण करू तेवढंच काय ते सत्य, बाकी सगळच्या सगळं असत्य. या पद्धतीनं ही मांडणी केली जाऊ शकते. याकरिता एक उदाहरण पाहू. समजा, जंगलामध्ये भटकत असताना आपण रस्ता विसरलो. कुठे जायचं याची कल्पना येत नसल्यामुळे रात्रीच्या अंधारात कुठेतरी आडोसा शोधून आपण बसलो आहोत. अशा अवस्थेत सकाळच्या झुंजूमुंजू वातावरणामध्ये सूर्याची किरणं नुकतीच पसरायला लागली आहेत. अशा वेळेस त्या अंधुकशा प्रकाशात आपल्याला कुठेतरी दूरवर धूर दिसतो. त्याबरोबर आपल्याला अत्यानंद होईल. आपण विचार करू, 'त्या ठिकाणी धूर दिसतो म्हणजे नक्कीच त्या ठिकाणी मनुष्यवस्ती असणार!' कडकडून भूक लागलेली आहे, प्रचंड तहान लागलेली आहे. त्या ठिकाणी मनुष्यवस्ती असल्यामुळे या दोन्ही गोष्टी मिळण्याची शक्यता आहे. तसेच मला आता एकटेपणाची भीती जाणवू लागली आहे. मी अडकून पडलो आहे. कदाचित मी हिंस्त्र श्वापदांना बळी पडेन. रात्रभर मी स्वत:ला कसंबसं वाचवलं आहे आणि आता मला त्या ठिकाणी तो निवारा, आसरा मिळण्याची शक्यता आहे. म्हणून आपल्या मनामध्ये अतिशय आनंद निर्माण होईल. (लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक आहेत.) भ्रमणध्वनी -९३७१0१४८३२ २ँ८ेंल्लं५.ु'ॅ२स्र३.्रल्ल |
Shyam Manav
Friday, 1 March 2013
बुद्धिप्रामाण्यवाद म्हणजे काय?
Tuesday, 26 February 2013
ज्योतिष्यांनो, या १४ प्रश्नांची उत्तरे द्या!
A A << Back to Headlines
<< Back to Headlines |
माणूस प्रेमात पडतो म्हणजे नेमकं काय होतं?
'प्रेम' हा माझ्या दृष्टीनं महत्त्वाचा, फार महत्त्वाचा, आदराचा, अभ्यास करण्याचा, समजून घेण्याचा विषय आहे. भाऊ, प्रेम म्हणजे नेमकं काय? हे सांगणं फार कठीण आहे. मी आधीच सांगितलं व्यक्तिपरत्वे प्रेमाची व्याख्या बदलते. बदलू शकते. व्यक्तीनुसार प्रेमाची तीव्रता, प्रेमभावनेची पातळी बदलते. तरी सर्व माणसांनी सर्वाच्या हृदयाला जाणवणारी, स्पर्शधारी ही भावना आहे. सर्वाना जाणवते, स्पर्शते, उसासो सोडायला लावते हाच या भावनेतला 'समान दुआ', 'समान धागा' आहे. आयुष्यात कधीच प्रेमात पडली नसेल अशी व्यक्ती अपवादच असली पाहिजे. माणूस प्रेमात कां पडतो? प्रेमात कसा पडतो? सामान्यत: एखादी विरुद्ध लिंगीय व्यक्ती आवडते. खूप खूप आवडते. फारच आवडते. तिच्याविषयी जबरदस्त ओढ वाटते. आकर्षण वाटतं. तिच्या सहवासात राहावसं वाटतं. तिला पाहत राहावसं वाटतं. तिच्यासोबत बोलत राहावसं वाटतं. समोर नसताना सारखी ती व्यक्ती आठवत राहते. तिच्या आठवणीत रमताना खूप छान वाटतं. ती अचानक समोर दिसली तर छातीत धडधड होते. पण ही 'धडधड' खूप छान, हवीहवीशी वाटते. ती हसली की, सारं आसमंत फुलल्यासारखं वाटतं. ती 'रडवेली' झाली, दु:खी झाली की, आसमंतात मळभ दाटून आल्यासारखं वाटतं. सारं विचारांचं, भावनांचं केंद्र ती व्यक्ती बनून बसते. असं काहीसं घडू लागलं की, माणूस प्रेमात पडला असं फार तर म्हणता येईल. दोन माणसं कोणत्या तरी निमित्तानं वा रस्त्यानं जाताना अचानक समोर येतात. सहज नजरानजर होते आणि एक घडलेला किस्सा. कॉलेज लायब्ररीतून 'तो' बाहेर पडला. वर्गात जाण्यासाठी तेवढय़ात जोरदार पावसाची सर आली. लायब्ररीसमोरून क्लासमध्ये जाणारी 'ती' पावसापासून वाचण्यासाठी लायब्ररीच्या व्हरांडय़ाच्या आडोशाला आली. काहीशी भिजलेली. केसांवर पाण्याचे थेंब मोत्यांसारखे चमकू लागलेले. सलवार कमीजचं कमीज अंगाला चिपकू लागलेलं. आपल्या वक्षस्थळाचं संरक्षण करण्यासाठी वह्या-पुस्तकांचा गठ्ठा तिनं छातीसमोर ढालीसारखा धरलेला. पण.. पावसाचा जोर वाढला. शिंतोडे अंगावर येऊ लागले. आत सरकण्यास जागा नाही. सारा व्हरांडा गर्दीनं ओसंडून वाहतोय. मुलांमध्ये शिरण्याची तिची हिंमत नाही. आतील पोलला लागून असलेल्या सुरक्षित जागी उभ्या असलेल्या त्याचं तिच्याकडे लक्ष जातं. डोळ्यानंच तो तिला जवळ येण्याची खूण करतो. पण ती कळूनही हिंमत करू शकत नाही. 'एका मुलाजवळ उभं राहायचं?' पुन्हा तो खुणावतो. आता पावसाचे शिंतोडे तिला अधिकच भिजवू लागलेले. नाइलाजानं ती तिथे येऊ लागते. तो अदबीनं सरकतो. तिला सुरक्षित जागेत घुसू देतो आणि तत्काळ तिथून हलून तिच्या भिजवणीच्या जागेवर जाऊन उभा राहतो. तिला खूप हायसं वाटतं. तो जवळ चिकटून उभं राहण्याचा चान्स त्यानं घेतला नाही म्हणून. पण त्याला थँक्स म्हणायला हवं. पण म्हणायचं कसं? त्याचं लक्षच नाही. शेवटी त्याचं लक्ष जातं. ती डोळ्यांनीच थँक्स म्हणून जाते. अन् त्यानं पहिल्यांदा तिचे ते टप्पोरे, शिलेदार, समुद्राच्या अथांग पाण्यासारखे पाणीदार डोळे पाहिले. इतके सुंदर डोळे? अन् तो त्या डोळ्यांतच अडकून जातो. एकसारखा एकटक पाहत राहतो. तिच्या डोळ्यांत डुबू लागतो. अथांग महासागरात खोल खोल उतरू लागतो. एकटक, एकाग्रतेनं पाहत राहतो. भान हरपून मनसोक्त खोल खोल जात राहतो. काही क्षण तीही भान हरपून, एकटक, एकाग्रतेनं पाहते. साध्याच दिसणार्या या तरुणाच्या भावपूर्ण, जितकं स्वच्छ डोळ्यांमध्ये आपण केव्हा अडकून पडलो हे तिच्या लक्षातच येत नाही. थोडय़ाच वेळात भानावर येते. नजर खाली घेते. पुन्हा पाहते तर तो भान हरपून पाहतोच आहे. त्याची ब्रह्मनंदी टाळी लागली आहे. पापणीही न हलवता तो सारखा पाहतोच आहे. तिला काय करावं ते कळतंच नाही. असा अनुभव तिनं कधी घेतलाच नाही. त्याच्या नजरेत अडकून जायला होतं. नजर काढता काढता येत नाही. काय आहे असं त्या डोळ्यांत? आतवर, खोलवर काहीतरी शिरतं सारं. हृदय आतून असं घुसळू लागतं. कसं कसं, पण छान छान वाटतं. बराच वेळ दोघांचे डोळे सारखे एकदुसर्यात गुंतत होते. ती सारखी नजर खाली घ्यायची, पण पुन्हा पाहण्याची अनिवार इच्छा व्हायची. पुन्हा पाहायची. डोळ्यांत अडकायची. तो मात्र एकटक पाहतच होता. अडकूनच पडला होता. किती वेळ उलटला माहीत नाही. पाऊस ओसरला. थांबला. व्हरांडा रिकामा होऊ लागला. नाइलाजानं तीही निघाली. पण त्याची नजर मात्र सारखी तिच्या डोळ्यांचाच वेध घेत होती. झालं तो तिच्या प्रेमात पडला. आकंठ बुडाला. तिच्यावर प्रेमकविता करू लागला. त्याचं सारं विश्व तिच्या अस्तित्वानं, तिच्या डोळ्यांनी व्यापलं. 1970च्या दशकातलं हे प्रेम. याला म्हणायचं 'लव्ह अँट फर्स्ट साईट'.'दिसताक्षणीच प्रेमात पडणं'. हा एक प्रेमाचा प्रकार, प्रेमाचा आविष्कार. माणूस दिसताक्षणीच कसा काय प्रेमात पडू शकतो? समोरची व्यक्ती कोण? कुठली? काय करते? काय योग्यतेची आहे? काहीच माहीत नसताना माणूस असा प्रेमात पडतो हे मात्र खरं आहे. अनेक माणसं प्रत्यक्ष जीवनात या प्रकारे प्रेमात पडली आहेत हेही तेवढंच खरं आहे. अशा प्रेमाची परिणती काय होते? प्रेमाची यशस्विता म्हणजे लगAात रूपांतर होणं असं मानलं तर कदाचित अशा प्रकारच्या प्रेमाचा सक्सेस रेट कमीच असणार आहे. कारण प्रेमात पडताना कुठलीच व्यावहारिक बाजू पाहिलेली नसल्यामुळं दोन पात्रांत जर फारच व्यावहारिक अंत असेल. उदा. जात, धर्म, खानदान, आर्थिक स्थिती, दोन्ही कुटुंबांतील संस्कृती, कर्मठपणा, आधुनिकपणा तर लगAात रूपांतर होणं अशक्यप्रायच होऊन बसतं. म्हणून काय ते प्रेम कमी दर्जाचं असतं? कम अस्सल असतं? पण तो तिच्या प्रेमात कां पडला? फक्त निळ्या डोळ्यांच्या प्रेमात पडला? मग कोणत्याही निळे डोळे असलेल्या मुलीच्या प्रेमात तो पडेल का? त्याने आधी निळे डोळे कधीच पाहिले नव्हते का? ती खूप सुंदर आहे म्हणून तो प्रेमात पडला कां? त्यापेक्षा अधिक सुंदर मुलगी त्यानं आधी पाहिली नव्हती कां? निळे डोळे असणारी मुलगी काही ही पहिलीच नाही आणि तिच्यापेक्षाही सुंदर मुली त्याच्या आसपास वावरतच होत्या. मग तो तिच्यात प्रेमात कां पडला? आणि नकळत प्रेमात पडला. खूप खूप सिर्मस प्रेमात पडला? का? या प्रश्नाचं उत्तर मी वर्षानुवर्षे शोधतोय. खूप लोकांचं 'लव्ह अँट फर्स्ट साईट' समजून घेतलं. मानसशास्त्रीय अंगानं अभ्यास केला. जे उत्तर गवसतं आहे ते देण्याचा प्रयत्न करतो आहे. माणूस जन्माला आल्यानंतर अगदी बालवयापासून तो माणसांना पारखू लागतो. ओळखू लागतो. काही माणसं त्याला खूप भावतात. काही माणसं खूप आवडतात. त्यांच्याजवळ ही मुलं चटकन जातात. रमतात, आनंदी होतात. कदाचित ही माणसं त्यांच्याशी खूप चांगली वागतात. त्यांना आवडेल अशा पद्धतीनं प्रेम करतात. त्यांना मुळीच वाईट अनुभव न देता फक्त चांगलेच अनुभव देतात, तर काही माणसांजवळ ही लहान मुलं मुळीच जात नाही. जाऊ इच्छित नाही. साधारणत: मुलं 4-5 वर्षाची व्हायला लागली की, त्यांना स्त्री, पुरुष वेगळे आहेत याची तीव्र जाणीव व्हायला लागते. विरुद्ध लिंगीय व्यक्तीविषयीच्या कुतूहलाचं, उत्सुकतेचं रूपांतर आकर्षणात होण्याच्या सुरुवातीचा हा कालावधी असतो. वय वर्ष 5 ते 10-11 वर्षापर्यंत अशी आवडणारी, भावणारी व्यक्ती जर वारंवार सहवासात आली, प्रेम करू लागली, गालगुच्चे घेऊ लागली, गालांचे चुंबन घेऊ लागली, छातीशी आवळू लागली, आलिंगन देऊ लागली, तर हे मूल त्या व्यक्तीच्या प्रेमात पडतं. कदाचित हे मूल 5-6 वर्षाचं असेल. ती विरुद्ध लिंगीय व्यक्ती 10 वर्षे ते 30-35 वर्षाचीही असेल तरी असं घडू शकतं, घडतं. अर्थात त्या मुलाला वा मुलीला आपण प्रेमात पडलो हे फार तीव्रतेनं कळतंच असं नाही. फक्त ती व्यक्ती खूप आवडते. तिचा सहवास खूप आवडतो एवढंच त्यावेळी कळत असतं. जर या दोघांमधले हे प्रेमसंबंध (अत्यंत निकोप, निर्वाज्य. यात कुठेही रूढार्थानं सेक्स नसतो, रोमांस नसतो.) काही काळ चालले तर त्या मुलांच्या मनात खोलवर ते घर करून जातात. प्रेमात पडलेल्या मोठय़ा वयाच्या व्यक्तीची प्रतिमा या मुलांच्या हृदयात बंदिस्त होते. अनेकदा ही प्रेम व्यक्ती जीवनातून निघून जाते, दूर जाते अथवा तिचं लगA होऊन ती वेगळ्या अर्थानं दुरावते. पण वाढत्या वयासोबत या मुलांच्या मनातील ती प्रेम-प्रतिमा तशीच हृदयात बंदिस्त राहते. वयात आल्यावर मनात खोलवर रुजलेल्या प्रेम-प्रतिमेसारखीच वा त्याच्या आसपासची एखादी व्यक्ती दिसताच आपल्या मनातील खोलवर रुजलेली प्रतिमा हीच आहे असं त्याच्या मनाला नकळत वाटतं आणि माणूस 'लव्ह अँट फर्स्ट साईट' पडू शकतो. खरं म्हणजे तो स्वत:च्या मनात रुजलेल्या प्रेमातच पुन्हा पडत असतो. (लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक, संघटक आहेत.) भ्रमणध्वनी - 9371014832 |
Monday, 11 February 2013
प्रेम म्हणजे नक्की काय? खरं प्रेम कशाला म्हणायचं?
प्रियकरानं प्रेयसीच्या बहिणीच्या घरासमोर स्वत:वर सपासप चाकूनं वार करून घेतलेत. खिशात चिठ्ठी सापडली, 'मी तुझ्याशिवाय जगूच शकत नाही म्हणून आत्महत्या करतोय.' काल-परवाची एक बातमी. एकतर्फी प्रेमातून प्रियकरानं प्रेयसीचा खून केला. प्रियकरानं प्रेयसीच्या तोंडावर अँसिड फेकले. कॉलेज परिसरात प्रियकरानं प्रेयसीच्या छाताडात सर्वासमक्ष बंदुकीच्या गोळ्य़ा घातल्या. या पद्धतीच्या कितीतरी बातम्या आपण सातत्यानं वाचत, ऐकत आलो आहोत. निसर्गानंच नर-मादीमध्ये जबरदस्त आकर्षण निर्माण केलं आहे. जेणेकरून स्त्री-पुरुषांनी एक-दुसर्याकडे प्रचंड ओढीनं आकर्षित व्हावं. एक-दुसर्यांसोबत प्रणयाराधन करावं. त्यातून अपत्य प्राप्ती व्हावी. माणसाचं मूल खूप परावलंबी असतं. ते स्वत:च्या भरवशावर जगण्यायोग्य बनेपर्यंत मातेनं त्याला सांभाळंलच पाहिजे. नाहीतर ते मरेल. म्हणून निसर्गानंच गर्भवती स्त्रीच्या मनात होणार्या बाळाविषयी प्रचंड ओढ निर्माण व्हावी, वाट्टेल त्या परिस्थितीत, प्रसंगी स्वत:चा जीव धोक्यात घालून आपल्या बाळाचं संरक्षण, संगोपन करावं असं वात्सल्ययुक्त प्रेम निर्माण केलं आहे. निसर्गाच्या या दोन्ही गरजा आहेत. त्यातून दोन प्रकारचं प्रेम. एक वैषयिक प्रेम आणि दुसरं वात्सल्ययुक्त प्रेम निर्माण झालं आहे. गुहांमध्ये राहणार्या रानटी नर-मादीचं पुढे जाऊन शेती करणार्या कुटुंबवत्सल माणसांमध्ये रूपांतर झालं. माणसानं लग्न संस्था निर्माण केली. एक नवरा, एक बायको असं नातं गेल्या शेकडो वर्षात रुजू लागलं. माणूस संस्कारित होत गेला आणि त्याची 'प्रेमाची गोष्ट' बदलत गेली. नर-मादीनं परस्परांजवळ यावं यासाठी निर्माण झालेलं प्रेम वात्सल्ययुक्त प्रेमाच्या सहवासात उन्नयीत होऊ लागलं. केवळ रतिक्रीडेपर्यंत मर्यादित असणारं नर-मादीमधील प्रेम, बदलून दीर्घकाळ टिकणारं, वात्सल्ययुक्त आणि वैषयिक या दोहोचं मिश्रण असणारं एक नवंच प्रेम उदयास आलं. या नव्या प्रेमाला समाजात, मानवी मनात प्रतिष्ठा प्राप्त झाली. हे अधिक सुसंस्कारित प्रेम मानलं जाऊ लागलं. आणि आजच्या समाजात जन्माला आल्यापासून कथा, कादंबर्या, सिनेमा, टी.व्ही. सार्या माध्यमातून 'प्रेम एके प्रेम, प्रेम दुने प्रेम' सारखं मनावर आदळत असतं. नैसर्गिक ओढ असतेच. त्यात संस्कारातून सारखं प्रेमाचं प्रोग्रामिंग मनात रुजत असतं. त्यामुळं वयात येताना, आल्यावर जवळपास प्रत्येक तरुण-तरुणी प्रेमात पडते. काही जण अलगदरीत्या नकळत प्रेम जाळ्य़ात अडकतात. आपण प्रेमात केव्हा पडलो हे त्यांना कळतही नाही. काही जणं समजून-सवरून-पाहून समोरचं पात्र आपल्या लायकीचं आहे, नाही याचा विचार करून प्रेमात पडतात आणि काही जण प्रेमात पडल्याचं दाखवतात. मोठय़ा शहरात कॉलेजियन्समध्ये बॉयफ्रेड, गर्लफ्रेड असणं हा स्टेटस् सिम्बॉल झाला आहे. त्यापेक्षा बॉयफ्रेंड नसणं हा फार मोठा 'पराभव' मानला जातो. त्यामुळं किमान दाखविण्यासाठी तरी बॉयफ्रेंड, गर्लफ्रेंड असली पाहिजे या अपरिहार्यतेतून प्रेमात असणं गरजेचं झालं आहे. प्रेमात पडणं जेवढं स्वाभाविक आहे तेवढंच प्रेमात आपटणंसुद्धा स्वाभाविक आहे. प्रेमभंग आजही होतात. एकीकडे आजही देवदास निर्माण होतात तर दुसरीकडे कॉलेजच्या 3-4 वर्षाच्या काळात 3-4 प्रेमप्रकरणं होणं, सिरियस अफेअर्स होणं, स्वाभाविक समजलं जाण्याइतपत कॉमन झालंय काही तरुणांच्या जीवनात. 'प्रेम' हा एक शब्द असला तरी त्याची अनुभूती, त्याचा अर्थ, त्याची व्याख्या व्यक्तिपरत्वे वेगवेगळी असू शकते. मोठय़ा शहरांनुसार, छोटय़ा गावांनुसारही ती बदलते. वयाच्या 19व्या वर्षापासून मी सामाजिक चळवळीत आहे. 14-15 वर्षे विविध वृत्तपत्रे, साप्ताहिकांमधून 'युथ कॉलम चालविले आहेत. युवकांकरता लिखाण केलं आणि गेली 23 वर्षे मुंबईतून व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळा चालविण्याच्या माध्यमात तरुण-तरुणींशी संवाद साधतो आहे. कौन्सिलिंगच्या निमित्तानं त्यांच्या प्रेम समस्या समजून घेतो आहे. पुण्या-मुंबईपासून ते कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अमरावती या शहरी भागातील युवकांसोबतच छोटय़ा गावातील युवकांनाही समजून घेण्याची संधी माझ्या कार्यशाळांमुळं मला सातत्यानं मिळते. त्यांचं भावविश्व, प्रेमविश्व मी दीर्घकाळापासून समजून घेतो आहे आणि म्हणूनच याही क्षेत्रात आपलं प्रशिक्षण होणं गरजेचं आहे असं तीव्रतेनं वाटतं. म्हणूनच या लेखाचा हा प्रपंच. कदाचित कळत-नकळत आणि जाणीवपूर्वकसुद्धा माझ्या आयुष्यात मला सगळ्य़ात जास्त प्रेम, प्रेम समस्या हाताळाव्या लागल्या. प्रेमात पडलेल्या, त्यापेक्षा जास्त प्रेमभंग झालेल्या तरुण-तरुणींना समजावावं लागलं, त्यांचं समुपदेशन करावं लागलं. एक चळवळीचा नेता, वृत्तपत्र-स्तंभलेखक आणि समुपदेशक या तिन्ही नात्यांनी 'प्रेम' या विषयाचा खूप अभ्यास करावा लागला. विचार करावा लागला. शिवाय एक व्यक्ती म्हणूनही या विषयाचा, प्रेमाचा व्यक्तिगत जीवनावर, जडणघडणीवर गहिरा परिणाम झाला आहे. गेल्या चाळीस वर्षात तीन पिढय़ांना मी 'प्रेम' करताना, जगताना पाहतो आहे. पण प्रेम म्हणजे नक्की काय? कशाला खरं प्रेम म्हणावं? कोणतं प्रेम उच्च दर्जाचं? कोणतं प्रेम कनिष्ठ दर्जाचं? कुणाचं प्रेम किती जास्त? कुणाचं किती कमी? खरं प्रेम आहे की फक्त इनफॅच्युएशन, 'आकर्षण' आहे. प्लॅटोनिक प्रेम श्रेष्ठ आणि वासनेनं भरलेलं प्रेम खालच्या पातळीचं समजायचं काय? माणूस आयुष्यात एकदाच प्रेम करतो का? जो एकदाच प्रेम करतो ते खरं प्रेम? जो एकापेक्षा अधिकदा प्रेम करतो ते खरं नाही का? का? एकतर्फी प्रेम अर्थहीन का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधतोय माणसांची मनं. मला छान कळतात असं खूप लोकांना वाटतं. मलाही कधीकधी तसं वाटतं. माझा मानसशास्त्राचा अभ्यासही चांगला आहे. या सगळ्य़ा प्रश्नांची उत्तरं निश्चित, ठळकपणे देता येणं शक्य नसलं तरी या विषयावर छान 'विचारमंथन' मांडलं जाऊ शकतं. यावर आपण विस्तारानं नंतर चर्चा करूच. पण आज मात्र काही अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी सगळ्य़ाच माणसांना, स्त्री-पुरुषांना, तरुण-तरुणींना, मुला-मुलींना सांगायच्या आहेत. मानव जातीच्या धारणेसाठी, मानवतेसाठी हे अत्यंत महत्त्वाचे नियम आहेत. कोणत्याही परिस्थितीत ते आपण पायदळी तुडवता कामा नये, हे आपण समजून घेतलं पाहिजे. एक - मानवी जीवनात प्रेम ही एक नितांत सुंदर भावना आहे. खूप हवीहवीशी वाटणारी, सार्या जीवनाचं सार्थक झाल्याचं वाटणारी भावना आहे. सारं जीवन व्यापून टाकणारी अद्वितीय भावना आहे. पण स्वत:चं आणि दुसर्याचं 'मानवी जीवन' त्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे. जगण्यापेक्षा प्रेम अधिक महत्त्वाचं असूच शकत नाही. 'सो नो टू डेथ.' मृत्यूला नकार द्या. स्वत:च्या, दुसर्याच्या आणि दोघांच्याही. आत्महत्या, खून दोन्हीही नाही. कितीही प्रेमात पडला, आकंठ बुडाला आणि पुढे, प्रेमभंग झाला तरी.. या प्रेमभंगातून बाहेर पडता येतं. पुन्हा सरसरून जगता येतं. प्रेमाबाहेरही जीवनात खूप काही करण्यासारखं असतं. जीवनातील अनेक क्षेत्रे आपल्या 'डिव्होशनची' वाट पाहत असतात. प्रेमाची ही ऊर्जा त्या कामात टाका. ते काम फुलून येईल. सरसरून, तरारून उठेल. त्याचा वटवृक्ष निर्माण होईल. देवदास हा मानवी जीवनातील आदर्श असूच शकत नाही. तो स्वत:ही कधी आनंदानं जगला नाही. त्यानं त्याच्या आई-वडिलांनाही आनंद दिला नाही आणि त्याच्यावर प्रेम करणार्या पारो, चंद्रमुखींनाही कधी आनंदानं जगू दिलं नाही. देवदास हा केवळ पराभूतांचा, षंढांचा, कर्तृत्वहीनांचाच आदर्श असू शकतो. त्याचं दाढी वाढवणं, त्याचं दारू ढोसणं, हाय चंद्रमुखी, हाय पारो म्हणत म्हणत, टाचा घासत घासत उसासे सोडणं सारंच त्याज्य आहे, नाकारणीय आहे. दोन - एकदा प्रेमात पडल्यावर, दोघांनीही प्रेमात पडल्याची कबुली दिल्यावर ते आयुष्यभर निभावलंच पाहिजे असा एक अलिखित नियमच प्रेम विश्वास निर्माण झाला आहे. हा नियम उत्तम असू शकतो, उत्तम आहे. पण.. नाहीतर धोका, बेवफाई हे लेबलही योग्य नाही. सुरुवातीस दोन पात्र एक-दुसर्यांना भेटतात तेव्हा सारंच नवं असतं. वरवरचं असतं. कदाचित एक-दुसर्यांची खरी ओळख पटण्याआधीच दोन वरवरचे मुखवटे एक-दुसर्याच्या प्रेमात पडतात. जसजसे जवळ येतात, काळ पुढे सरकतो, तसतसे मुखवटे गळून पडतात. आतला खरा माणूस बाहेर येतो. भारतीय समाजात या मुखवटय़ांचं प्रमाण खूपच जास्त आहे. कदाचित मुखवटय़ाआड दडलेला 'खरा माणूस एकदम वेगळाच आहे' असं नंतर लक्षात आल्यावर ते प्रेम सुरू राहणं शक्यच नसतं. अशावेळी एखाद्यानं माघार घ्यायचं ठरवलं तर तसं करण्याचा त्याला तिला अधिकार आहे हे आपण समजून घ्यायला हवं. असं समजून घेणं सोपं नाही. 'दिल टूटता है, टुकडे टुकडे होते है, हृदय छिन्न-भिन्न होतं.' हे सगळं मला कळतं. तरी ज्याच्यावर आपण एवढं प्रेम करतो त्याच्या माघारी फिरण्याच्या निर्णयाचा आपण मनापासून सन्मान केला पाहिजे, आदर केला पाहिजे. त्याचा मार्ग मोकळा केला पाहिजे. कोणत्याही प्रकारे इमोशनली ब्लॅकमेल न करता त्या व्यक्तीला जाऊ द्यायला हवं. व्यभिचारी, बेवफा म्हणणं, तोंडावर अँसिड फेकणं, तिची येनकेन प्रकारे बदनामी करणं, तिचं जीवन असह्य होईल असं आपण वागणं हा आपण करत असलेल्या प्रेमाचाच अपमान आहे हे समजून घेतलं पाहिजे. त्यानंतरही सामान्य मैत्री ठेवायची की नाही हा मात्र तुमचा अधिकार आहे. एकदा तुमच्या प्रेम पात्रानं नाही म्हटल्यावर सामान्य मैत्रीसुद्धा न ठेवता, कायमचे त्या व्यक्तीच्या आयुष्यातून निघून जाण्याचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे. थोडक्यात, तुम्हाला स्वत:ला वाचविण्याचा, मनाला कमीत कमी जखमा होतील याप्रमाणं वागण्याचा पुरेपूर अधिकार आहे. एकतर्फी प्रेमही तेवढंच खरं असतं. पण.. पुढे पाहू. (लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक आहेत.) भ्रमणध्वनी- 9371014832 |
परीक्षेच्या काळात माईंड रिलॅक्स ठेवा, टेन्शन अजिबात घेऊ नका
अनेक विद्यार्थी अशा नकारात्मक विचारांच्या दुष्टचक्रात अडकतात. पण हे स्वाभाविकपणे घडत असलं तरी अपरिहार्य नाही. आपण मनात जसा विचार करत जातो तसं आपल्याबाबत घडत जातं. आपण स्वत:च स्वत:शी सतत बोलत असतो. जसं आपण सतत स्वत:शी बोलू, सतत स्वत:ला सांगू तसंच आपल्याबाबत घडत जाणार आहे. त्यामुळं आपण स्वत:ला काय सांगतो ते फार महत्त्वाचं आहे.अशा वेळी स्वत:च स्वत:शी सेल्फ टॉक करावा. जाणीवपूर्वक स्वत:ला विधायक पद्धतीनं पटवावं. स्वत:चं नाव घेऊन म्हणावं, 'श्यामराव जमेल, अभ्यास जमेल. असा कंटाळा येऊन कसं चालेल? मन भरकटवून कसं चालेल? अभ्यासावर मन एकाग्र करा. बरोबर मन एकाग्र होईल. माझं मन एकाग्र होत आहे. जसा जसा मी अभ्यास करतो आहे तसंतसं ते अधिकाधिक एकाग्र होत आहे. अभ्यासातील गोडी वाढते आहे. अभ्यास करताना मला मनापासून आनंद होतो आहे. अधिकाधिक मन एकाग्र होत आहे. मला छान अभ्यास जमतो आहे.' असं वारंवार स्वत:ला नीट समजावून सांगावं. बरोबर अभ्यास अधिक चांगला जमू लागेल. संमोहनासारखी प्रक्रिया वापरून जर या पद्धतीच्या सूचना दिल्यात तर त्याचा खूप चांगला व प्रभावी परिणाम मिळतो. लवकर या दुष्टचक्रातून बाहेर पडण्याची संधी मिळते. पण संमोहन नीट शिकून घ्यावं. वैज्ञानिक पद्धतीनं शिकविणार्यांकडूनच शिकावं. आज बाजारात भरमसाट दावे करणारे अनेक संमोहनतज्ज्ञ आहेत. खोटे-नाटे दावे करून भलत्याच गोष्टी ते आपल्या माथी मारत असतात. त्यांच्यापासून आपण सावध राहावं. असल्या भोंदूंना ओळखण्याच्या काही खुणा आहेत. त्यापैकी एक 'माझ्या मित्राचं वा पाल्याचं अभ्यासात मन लागत नाही. परीक्षेची भीती वाटते. मला त्याच्यासाठी संमोहन शिकायचं आहे. मी शिकून त्याचा फायदा देता येईल का?' जो संमोहनतज्ज्ञ हो म्हणेल तो 100 टक्के भोंदू आहे हे तुमच्या लक्षात येईल. संमोहन, मेडिटेशन या सार्या प्रक्रिया स्वत:च स्वत:करता वापरता येतात. आपण वापरून इतरांना त्याचा काहीही फायदा देता येत नाही. परीक्षेचं फारच टेन्शन आलं तर स्वत:ला नीट समजावून सांगावं, 'जे होईल ते पाहिलं जाईल. मी आता माझं सारं लक्ष अभ्यासावर केंद्रित करतो आहे. नीट मन लावून, एकाग्रतेनं अभ्यास करणार आहे. मला जमेल तेवढय़ा उत्तमपणे मी पेपर सोडवेन. पुढचं पुढं पाहिलं जाईल. मी माझं कर्तव्य नीट पार पाडेन. अगदी रिलॅक्स राहून अभ्यास करेन. परीक्षा देईन. यश-अपयशाची आत्ताच चिंता न करता सारं लक्ष अभ्यासावरच केंद्रित करेन. उत्तम अभ्यास करेन' असं जर आपण वारंवार स्वत:ला सांगू लागलो तर अगदी तसाच परिणाम आपल्याला मिळू लागतो. कारण ज्यावेळी आपण टेन्शनमध्ये असतो, भीतीच्या आहारी असतो त्या वेळी आपण 'हायली सजेस्टिबल' असतो. या अवस्थेत जर आपण अशा विधायक सूचना दिल्यात तर त्या प्रभावीपणे अमलात येऊ शकतात, नव्हे येतात. फक्त या सूचना देताना काही क्षण डोळे मिटा. पूर्ण एकाग्रतेनं स्वत:ला अशा विधायक सूचना द्या. डोळे उघडा आणि पुन्हा अभ्यासाला सुरुवात करा. पुन्हापुन्हा असा प्रयत्न करत गेलात तर बरोबर तुम्हाला रिझल्ट मिळताहेत अशी प्रचिती येईल. स्वत:च स्वत:च्या अभ्यासाचा टाईमटेबल तयार करा. तो काटेकोरपणे पाळा. 'पण सर, मी अशा अवस्थेत परीक्षा दिली, मला कमी मार्क्स मिळाले, तर माझं अख्खं करिअर बरबाद होईल ना? त्यामुळं ड्रॉप घेणं उत्तम नाही का?' असा प्रश्न अनेकजण विचारतात. खरं म्हणजे परीक्षेचं, अभ्यासाचं टेन्शन टाळण्यासाठी, परीक्षेपासून पळ काढण्यासाठी 'ही ड्रॉपची आयडिया' आपल्याच मनानं काढलेली असते. त्याला आपण कधीही बळी पडता कामा नये. नाही तर आयुष्यभर आपल्याला पळावं लागेल. एखाद्या समस्येला सरळ न भिडता पळून जाण्याची सवय लागेल. आपल्या भविष्यासाठी, आयुष्यासाठी हे फार घातक आहे. त्यामुळे मनापासून ठरवून टाकायचं, 'मी पळून जाणार नाही. कितीही टेन्शन आलं, भीती वाटली तरी मी पळणार नाही. अभ्यास करेनच. परीक्षा देईनच. वाट्टेल ते झालं तरी मी हे करेनच' असं वारंवार स्वत:ला सांगायचं. पण परीक्षेत कमी मार्क्स मिळून करिअर बरबाद झालं तर? या प्रश्नाचंही सोपं उत्तर आपल्या मनाला देता येतं. ठीक आहे. तरी मी अभ्यास करेन. सार्या पेपर्सचा मन लावून अभ्यास करेन. सारे पेपर्स देईन. फक्त शेवटच्या पेपरच्या दिवशी मी ठरवेन, तो पेपर द्यायचा की नाही ते. मला मार्क्स कमी मिळून करिअर बरबाद होईल असं निश्चित वाटलं तर मी शेवटचा पेपर देणार नाही. त्यामुळं मला सारी परीक्षा पुन्हा दुसर्यांदा देण्याची संधीही मिळेल आणि आता अभ्यास, परीक्षा यापासून पळून जाण्याच्या मानसिकतेपासूनही मला स्वत:ला वाचवता येईल.' असं स्वत:ला नीट समजावून सांगून त्याप्रमाणं प्रत्यक्षात आपल्याला वागता येतं. टेन्शनही कमी होतं. टेन्शन कमी करण्याचे काही सुंदर उपाय आहेत. आजच्या आधुनिक काळाची ती देण आहे. माझ्या 'स्वसंमोहन व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळांमध्ये मी दोन प्रकारचं प्रोग्रामिंग विद्यार्थ्यांना शिकवतो. संमोहनात जाऊन अभ्यासाची गोडी-एकाग्रता वाढविण्याचं प्रोग्रामिंग शिकवतो. त्याप्रमाणे नियमित सराव करायला लागलात तर अभ्यासाची एकाग्रता-गोडी वाढू लागते आणि एकाग्रतेनं अभ्यास करू लागल्यामुळं अभ्यासाचा 'इनपूट' वाढतो. दुसरं परीक्षेची भीती आणि परीक्षेचं टेन्शन येऊ न देता रिलॅक्स अवस्थेत परीक्षा देण्याचं प्रोग्रामिंग शिकवतो. त्याचा नियमित सराव करायला लागलं की, रिलॅक्स अवस्थेत परीक्षा देणं जमू लागतं. परीक्षेच्या काळात आपलं माईंड जेवढं रिलॅक्स असेल तेवढी आपली स्मरणशक्ती उत्तम पद्धतीनं काम करते. आपला परीक्षेचा 'आऊटपूट' वाढतो. केवळ या दोन प्रोग्रामिंगमुळंसुद्धा आपणंच करत असलेल्या अभ्यासाच्या भरवशावर आपला परीक्षेतील परफार्मन्स सुधारतो. परीक्षेतील परसेन्टेज वाढतं. आजवर हजारो विद्यार्थ्यांनी याचा फायदा करून घेतला आहे.जरी आपण कार्यशाळा केली नाही तरी घरी बसल्या तुम्ही करू शकाल अशी एक सोपी रिलॅक्सेशन पद्धती सांगतो. अर्थात त्याला संमोहनाची सर नाही. तरी काही अंशी निश्चितपणे आपणास परिणाम मिळू शकतील.रिलॅक्स करणं म्हणजे आपल्या मसल्स ढिल्या सोडणं, ताणरहित अवस्थेत आणणं. आरामात खुर्चीवर बसा अथवा बेडवर झोपा. (उशी पातळ हवी.) सारं शरीर ढिलं सोडा. डोळे बंद करा. टप्प्याटप्प्यानं सारं शरीर रिलॅक्स करा. मनातल्या मनात म्हणा आणि तसं करा. पायांची बोटं रिलॅक्स, तळवे रिलॅक्स, पाय रिलॅक्स, गुडघे रिलॅक्स, मांडय़ा रिलॅक्स, कंबर रिलॅक्स, पोट रिलॅक्स, छाती रिलॅक्स, श्वासोच्छ्वास नॉर्मल, संथ, लयबद्ध होतोय. पाठ-पाठीचे रिलॅक्स, खांदे-दोन्ही हात-बोटं रिलॅक्स, मान रिलॅक्स, जबडा रिलॅक्स, गाल-कान रिलॅक्स, ओठ-नाक रिलॅक्स, डोळे-पापण्या रिलॅक्स, कपाळ रिलॅक्स, आठय़ा निघून जाताहेत. डोकं रिलॅक्स, डोक्यातला प्रत्येक मज्जातंतू रिलॅक्स होतोय. डावं डोकं रिलॅक्स, उजवं डोकं रिलॅक्स, डोकं खूप रिलॅक्स, रिलॅक्स हलकं हलकं झालंय. खूप शांत, आनंदित, टवटवीत वाटतंय असं 2 वेळा म्हणा. 2-4 सेकंद थांबा व पुढील सूचना द्या. मी घेत असलेल्या प्रत्येक श्वासासोबत मनाची एकाग्रता आणि आत्मविश्वास वाढतो आहे. दिवसेंदिवस माझी अभ्यासातील गोडी, एकाग्रता वाढते आहे.मी सोडत असलेल्या प्रत्येक श्वासासोबत माझ्या मनातील टेन्शन, नकारात्मक विचार, परीक्षेची भीती निघून जाते आहे आणि मी घेत असलेल्या प्रत्येक श्वासासोबत मनाची निर्भयता, रिलॅक्सेशन व विधायक विचार करण्याची क्षमता वाढते आहे.(हे सजेशन 2 ते 3 वेळा रिपीट करा.) मला खूप आनंदित, टवटवीत, रिलॅक्स, उत्साहित वाटतंय असं तीनदा म्हणत म्हणत हळूहळू डोळे उघडा आणि जागे व्हा. 5 ते 6 मिनिटांत ही प्रक्रिया पूर्ण होते. बस्स एवढंच. दरवेळी अभ्यासाला बसताना असा सराव करा. दिवसांतून किमान 3 ते 5 वेळा असा सराव करा आणि पाहा काय परिणाम मिळतात ते. (लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक, संघटक आहेत.) भ्रमणध्वनी - 9371014832 |
Wednesday, 23 January 2013
'लैंगिक तृप्ती'तूनच मिळतो मानवी जीवनाचा सर्वोच्च आनंद
कारण महाराष्ट्र हा देशातला सगळ्यात पुरोगामी प्रांत. जादूटोणाविरोधी बिलाच्या निमित्तानं मी मंत्रालयात, विधिमंडळात सारखे खेटे घालत होतो. आमचे मित्र त्या वेळचे शिक्षणमंत्री ना. वसंतराव पुरके यांनी सेक्स एज्युकेशनसंबंधी एक प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवला होता. सेक्स एज्युकेशन शब्द असला तरी ती टीनएजर्सला, पौगंडावस्थेतील मुलांना शरीराची साधी ओळख करून देण्याची तयारी होती. त्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षित करण्यासाठी एक पुस्तिका निर्माण करण्यात आली होती. ती पुस्तिका फडकवत, त्यातील स्त्रीपुरुष देहाची चित्रे दाखवत दाखवत अनेक जनप्रतिनिधी कडाडून तुटून पडले होते. भारतीय संस्कृतीचा हा अपमान आहे. नव्या पिढीला हे बिघडवायला निघाले आहेत. शाळाशाळांमध्ये कंडोम पुरविणार का? वगैरे वगैरे आक्षेप घेतले गेले. शेवटी या आरोपांच्या धुराळ्यात तो प्रस्ताव बाजूला पडला. वसंतराव पुरके यांनी दूरदृष्टी ठेवून नव्या पिढीच्या हितासाठी एक अत्यंत आवश्यक पाऊल उचलण्याची हिंमत केली होती, त्याबद्दल केव्हाही त्यांचं अभिनंदनच केलं पाहिजे. पण पुरोगामी महाराष्ट्रातल्या विरोध करणार्या जनप्रतिनिधीचं काय? एका माझ्या ओळखीच्या जनप्रतिनिधीला मी म्हटलं, तुम्ही खरं म्हणजे महाराष्ट्रातून एक मोठा मोर्चा मध्य प्रदेश आणि ओरिसात न्यायला हवा. कारण पुस्तकातील चित्रांवर तुम्ही एवढे खवळलात, तर खजुराहो व कोणार्क येथे तर रतिक्रीडेची कोरीव शिल्पे आहेत, संभोग दृश्य आहेत. हजारो शाळकरी मुलं ते पाहत असतात. त्यामुळं आपली भारतीय संस्कृती रसातळात जाते आहे आणि जगन्नाथ पुरीच्या मंदिराचं काय? भारतातील सर्वात मोठं, अत्यंत पुरातन, भारतीय संस्कृतीचं प्रतीक असलेलं हे मंदिर आहे. रोज किमान लाखभर लोक या मंदिरात दर्शनाला जातात. या मंदिराच्या घुमटावर संभोग दृश्य कोरलेली आहेत. भारतीय संस्कृती वाचविण्यासाठी खजुराहो, कोणार्क, पुरीचं जगन्नाथ मंदिर तिन्हीही जमीनदोस्त करायला नको का? आता तुमच्या लक्षात आलं असेल मला चीड का आली होती ते. भारतीय संस्कृतीच्या नावाखाली सेक्स एज्युकेशनला विरोध करणार्यांना भारत, भारतीय संस्कृती काहीही माहीत नसतं. इंग्रजांनी शंभर-दीडशे वर्षापूर्वी लॉर्ड मेकॉलेप्रणीत शिक्षण पद्धतीद्वारा पेरलेल्या सेक्सविषयीच्या विकृत कल्पना घेऊनच आजही या विषयाकडे आपण पाहतो आहोत. त्या काळात इंग्लंड सेक्स या विषयाकडे फार प्रतिगामी दृष्टिकोनातून पाहत असे. ºिश्चनातील कॅथॉलिक पंथीय सेक्सला फार वाईट समजत असत, अजूनही तो पगडा कायम आहे. पती-पत्नींनीसुद्धा रतिक्रीडेपासून दूर राहिलं पाहिजे. अपवाद फक्त अपत्यप्राप्ती उद्देशाचा. तेवढय़ापुरतंच पतिपत्नींनी एकत्र यावं. बाकी सेक्स म्हणजे पापाची खाण. त्या काळातील इंग्लंडवर या विचारधारेचा पगडा होता. सुशिक्षितांच्या माध्यमातून तो भारतीय संस्कृतीचा विचार ठरू पाहतोय. मधल्या काळात इंग्लंड खूप बदललं, पण भारतीय सुशिक्षितांची मानसिकता मात्र तशीच प्रतिगामीच राहिली.भारतीयांनी रतिक्रीडेला, कामाला पुरुषार्थ मानला आहे. हा अभ्यासाचा, जीवनात आनंद घेण्याचा विषय मानला आहे. म्हणूनच जगातलं पहिलं सेक्स एज्युकेशनवरचं पुस्तक लिहिणारा 'कामसूत्र' जनक वात्सायन ऋषी हा प्रतिष्ठित ऋषी होता. त्याचं नाव नेहमीच आदरानं घेतलं जातं. शशीकपूरनं यावर शेखर सुमन आणि रेखाला घेऊन एक सुंदर चित्रपट निर्माण केला होता. याद्वारे या विषयाची एक अल्पशी, पण सर्वागसुंदर ओळख भारतीयांना करून दिली. शाक्तपंथीय साधनेत, तंत्र साधनेत या विषयाकडे केवळ उदार दृष्टिकोनातूनच नव्हे, तर मोक्षप्राप्तीचा एक मार्ग म्हणूनसुद्धा पाहिलं जातं. महादेवाची पिंड गावागावांत असते. गावोगाव भक्तिभावानं व आदरानं त्याची पूजा केली जाते. पिंड हे स्त्री-पुरुष लिंगाचं प्रतीक आहे, हे प्रत्येक भारतीयाला माहीत असायलाच हवं. निसर्गानंच मानवी प्राण्यात सेक्स हा एक अपरिहार्य भाग म्हणून निर्माण केला आहे. निर्मिती, नवी निर्मिती ही निसर्गाची, प्राणिमात्राची गरज आहे. नर आणि मादी यांनी वारंवार एकत्र यावं. त्यातून गर्भधारणा राहावी, नव्या अपत्यांचा जन्म व्हावा म्हणूनच नर आणि मादीमध्ये जबरदस्त आकर्षण निर्माण होईल याची काळजी निसर्गानं घेतली आहे. आकर्षणामुळं एकत्र आलेल्या स्त्री-पुरुषांना रतिक्रीडा करावीशी वाटावी, त्यात त्यांना प्रचंड आनंद मिळावा. या आनंदासाठी त्यांनी वारंवार एकत्र यावं अशी रचनाच निसर्गानं निर्माण केली आहे. म्हणूनच आजही मानवी जीवनातील सर्वोच्च व परमोच्च आनंद स्त्री-पुरुष संबंधातील 'ऑरगॅझम'मधून रतिक्रीडेतील 'लैंगिक तृप्तीतून' मिळतो. केवळ आनंदच मिळत नाही तर संपूर्ण शरीर आणि मन 'ऑरगॅझम' नंतर पूर्णत: रिलॅक्स होतं. एवढं सुंदर रिलॅक्सेशन दुसर्या मार्गानं प्राप्त होत नाही. त्यामुळं सार्या टेंशन्स आणि ताणतणावांचा निचरा होतो. माणूस अंतर्बाह्य शांत, शांत होतो. त्यामुळं अधिक निरोगी बनण्याच्या दिशेनं वाटचाल करतो. स्वभावही अधिक संतुलित होऊ लागतो आणि यासाठी स्त्री आणि पुरुषांची मनापासून एकदुसर्याला साथ असावी लागते. तरच हे साध्य होतं. बलात्कारात हे शक्य असतं का? रतिक्रीडेतला आनंद ज्याला कळतो तो बलात्कार करणंच शक्य नाही. हे एज्युकेशन आम्हाला केव्हा व कसं मिळणार? (लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक आहेत.) भ्रमणध्वनी- 9371014832 |
Monday, 14 January 2013
आजच्या पिढीला 'सेक्स एज्युकेशन' आवश्यक!
वाईट याचंच वाटतं की, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम, संत तुकडोजी महाराज, संत गाडगे महाराज अशा समाजाचं प्रबोधन करणार्या, समाजाला चार पावलं पुढं नेणार्या संतांकरिता जी संत उपाधी वापरली जाते तीच उपाधी असल्या बेशरम माणसाकरिता महाराष्ट्रातील त्यांचे तथाकथित भक्त वापरतात.विनोबा भावेंनी 'संत' या शब्दाचा फार सुंदर अर्थ सांगितला आहे. 'सत्याचा आग्रह धरत जो समाजाला पुढे नेतो तो खरा संत' यानिमित्तानं अनेकांचं विकृत हृदय आणि विकृत विचार प्रगट झाले. 'स्त्रिया तोकडे कपडे घालतात म्हणून बलात्कार होतात. पाश्चत्त्य संस्कृतीचा पगडा असणार्या शहरी वातावरणात 'इंडियात' बलात्कार होतात. ग्रामीण भागात, 'भारतात' बलात्कार होत नाहीत.अर्थात, ज्यांना खरा भारत माहीत नाही, भारताशी ज्यांचा परिचय नाही, पुरुषी अहंगंडानं आणि काल्पनिक विश्वात रमण्याच्या ध्यासानं ज्यांची दृष्टी अधू बनली आहे अशांनी उधळलेली ही मुक्ताफळं आहेत. त्याला फारसं महत्त्व देण्याचं कारण नाही. बलात्कारी माणसाची मानसिकता नेमकी काय असते? या समाजात, पुरुषप्रधान समाजरचनेत, स्त्री ही उपभोगण्याची वस्तू आहे असाच संस्कार होतो. बोलण्यातून, म्हणीतून, वागण्यातूच हाच संस्कार सतत ध्वनित होत असतो. या संस्काराचा स्त्रीसुद्घा बळी आहे. दीर्घकाळ युवा चळवळींमध्ये असल्यामुळं, व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळांमुळं आणि तब्बल 15 वर्षे वृत्तपत्रांचे युवास्तंभ हाताळल्यामुळं भारतीय युवकांची मानसिकता फार जवळून अनुभवता आली. माझ्या जीवनात सगळ्यात जास्त प्रेमप्रकरणं मला हाताळावी लागली. 30-35 वर्षापूर्वी दोन मनांचं प्रेम आणि त्यात काही टक्क्यांमध्ये शारीरिक संबंध असायचे. पण अलीकडच्या काळात 'बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंड'च्या जमान्यात बहुतांश प्रेमसंबंध शारीरिकसुद्घा असतात. बरं, प्रेम सुरू करताना आयुष्यभराची साथ, लग्न असं काहीही कमिटमेंट नसतं. खरं म्हणजे आजच्या जमान्यात हे प्रेम शरीरसंबंध टूवे (दुतर्फा) असतात, असावेत. बरोबरीच्या नात्यानं हे रिलेशन असतं.पण जेव्हा काही कारणानं ही रिलेशनशिप तुटते तेव्हा चांगल्या सुशिक्षित, आधुनिक मुलीसुद्घा 'त्या मेल्यानं माझा भोग घेतला, मजा मारली आणि आता कंटाळा आला तर उडून चालला' या अर्थानं आरोप करतात. तेव्हा त्या आधुनिक कपडय़ाआड दडलेली, पण मुळात बुरसटलेली स्त्री बाहेर येते. या मुलींना सांगावं लागतं, तू असं बोलून स्वत:चा, तुझ्यातल्या स्त्रित्वाचा अपमानं करते आहेस. तुमच्यातले संबंध राजीखुशीचे होते. उपभोग घेतलाच असेल तर तुम्ही एक-दुसर्याचा घेतला आहे. खरं म्हणजे प्रेमाला 'उपभोग' हा शब्द वापरून प्रेमाचा आणि सेक्सचा दोहाेंचा तुम्ही अपमान करताहात. बलात्कारी मनोवृत्तीचा संबंध सरळ सरळ स्त्री-पुरुष संबंधांविषयी असलेल्या दृष्टिकोनाशी आहे. पुरुषप्रधान भारतीय संस्कृती असो अथवा पाश्चात्त्य संस्कृती, दोन्ही विचारधारा एकच आहेत. स्त्रीदेह हा भोगाचा विषय आहे. पुरुषानं स्त्रीचा भोग घ्यायचा असतो. स्त्री त्यासाठीच जन्माला आली असते. म्हणून तिला स्वातंर्त्य नाही. इति मनुस्मृती. लहानपणी पित्यानं, तरुणपणी पतीनं आणि म्हातारपणी मुलानं संरक्षण करण्याची ती वस्तू आहे.पित्यानं लग्न होईपर्यंत ती अनाध्रात राहील म्हणजे तिचा कौमार्यभंग होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. लग्नानंतर पतीच्या हाती तिला एकदाचं सोपवलं की, मग पित्याची सुटका होते. ही मानसिकता, ही विचारधारा आणि 'स्त्री ही भोग्य वस्तू आहे' ही विचारधारा एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. स्त्रीचं शील, चार्त्यि यांनी शुचितेशी जोडलेली विचारधारा अजूनही कायम आहे. शील आगपेटीच्या काडीसारखं असतं. एकदा ती उगाळली की, पुन्हा काडीपेटी उगाळता येत नाही. हा आदर्श, मानसिक संस्कार अजूनही तसाच आहे. फक्त प्रत्यक्षात तो अमलात येण्याची अपेक्षा ठेवण्याची कुणी हिंमत ठेवत नाही एवढंच. टीव्ही, इंटरनेटच्या जमान्यातील, आधुनिक कपडे घालणारी, इंग्रजी बोलण्यात भूषण मानणारी ही आधुनिक पिढी आगपेटीच्या काडीपासून लायटरपर्यंत (जो वारंवार पेटवला जाऊ शकतो, हवा तेव्हा पेटतो) प्रवासकर्ती झाली आहे आणि इंग्रजी बोलू न शकणारी, थोडंसं मॉडर्न बनण्याचा प्रयत्न करणारी, अजूनही ग्रामीण भाषेचा लेहजा असणारी सुशिक्षित पिढीही त्याच दिशेनं वाटचाल करते आहे.या सर्वाना इंटरनेटवर, मोबाईलवर स्त्री-पुरुष देहाची उघडीनागडी चित्र, ब्ल्यू फिल्म्स सतत आणि सहज पाहायला मिळतात. त्यातून पुन्हा मनात असलेला 'स्त्री ही उपभोग्य वस्तू आहे' जुनाच संस्कार पक्का होतो. विकृत पद्घतीनं चालवला जातो. बहुतांश ब्ल्यू फिल्म्स बलात्कारसदृशच असतात. शृंगार, रोमान्स या गोष्टींना फारसं स्थान नसतं. स्त्री-पुरुष प्रेमसंबंध म्हणजे फक्त 'इंटरकोर्स', 'भोगणं' हाच संस्कार अधिकाधिक पक्का होतो. दृक्-श्रव्य माध्यमामुळं तो अधिक तीव्र स्वरूपाची विकृती निर्माण करतो. चित्रपट, इंटरनेट, सेक्सी जाहिराती यातून असं चाळवलं गेलेलं मन, मुळात पुरुषी अहंगंडानं, पुरुषी मनोवृत्तीनं पछाडलं गेलेलं हे मन मग रस्त्यारस्त्यांवर छेडखानी करणं, अश्लील कॉमेंट्स करणं सुरू करतं. समाजात याविषयी 100 परसेन्ट टॉलरन्स असल्यामुळे ते चेकाळलेलं मन अधिकच सोकावतं, स्थिरावतं. अश्लील हातवारे करणं, विकृत हावभाव करणं, घाणेरडं टॉन्टिंग करणं हा आपला जन्मसिद्घ पुरुषी अधिकार आहे असं मानू लागतं आणि मग यातील काही महाभाग बलात्कारापर्यंत जाऊन पोहोचतात.बलात्काराचा इतिहास पाहिला, तपासला तर त्यातील पंचाण्णव टक्क्यांपेक्षा अधिक लोकांनी आधी छेडखानीचे, टॉन्टिंगचे प्रकार केले आहेत असं लक्षात येतं. मग यावर उपाय काय? सर्वप्रथम स्त्री ही उपभोग्य वस्तू आहे का? संस्कार बदलणं. मुलं आणि मुली दोन्हींबाबत. स्त्री ही बरोबरीचा माणूस आहे. तिचा, तिच्या देहाचा, तिच्या व्यक्तिमत्त्वाचा सन्मान राखणं हे माझं कर्तव्य आहे असं प्रत्येक पुरुषाला, मुलाला शिकवलं पाहिजे. लहानपणापासून तशा संस्कार शाळा, कॉलेज, प्रसिद्घिमाध्यमं आणि घरातूनसुद्घा बिंबवायला पाहिजे. त्याचप्रमाणं देहाच्या पलीकडे स्त्रीला अस्तित्व आहे. स्त्रीचं व्यक्तिमत्त्व, बुद्घिमत्ता, कर्तृत्व हे तिच्या सौंदर्याइतकच, किंबहुना जास्त महत्त्वाचं आहे असा संस्कार तिच्यावर केला पाहिजे. समजा, तिच्या इच्छेविरुद्घ तिच्यावर बलात्कार झालाच, तर एक अपघात, एक शारीरिक जखम एवढय़ाच अर्थानं त्याकडे पाहायला स्त्रीनं शिकलं पाहिजे, स्त्रीला शिकवलं पाहिजे अन्यथा एवढय़ा महत्प्रयासानं मिळालेलं स्वातंर्त्य स्त्रीला गमवावं लागेल आणि तेही काही विकृत पुरुषांच्या भीतीपोटी, तिचा काहीएक दोष नसताना स्वातंर्त्य तिला गमवावं लागेल. ज्युडो-कराटे शिकून स्त्रियांचा आत्मविश्वास वाढत असेल तर शिकायला, शिकवायला हरकत नाही. पण बलात्कार झाला तरी त्याला एका जखमेपेक्षा जास्त महत्त्व देणार नाही, हा संस्कार मात्र त्यासोबत तेवढाच प्रभावीपणे बिंबवला पाहिजे. तरच स्त्रिया मोकळेपणानं वावरू शकतील. नवी नवी क्षेत्रे पादाक्रांत करू शकतील. देशभर बलात्कारविरोधी वातावरण निर्माण झालं आहे. त्याचा फायदा उचलून सरकार-पोलिसांनी काही कडक पावलं उचलली पाहिजे. छेडखानी, अश्लील कॉमेंट्स याबाबत झिरो टॉलरन्स निर्माण झाला पाहिजे आणि या गुन्ह्याखाली अटक झालेल्या मुलांची व त्यांच्या आई-बापांची व शाळा-कॉलेजेसची नावं वृत्तपत्रात प्रसिद्घ केली पाहिजे. आपला दिवटा तरुण चिरंजीव मुलींना छेडत असेल तर आई-वडिलांनाही तेवढंच जबाबदार धरलं पाहिजे. कारण घरातला दुटप्पी संस्कार याला जबाबदार असतो. आपल्या मुलींना छेडलं तर जे आई-वडील गंभीर बनतात तेच आई-वडील मात्र आपल्या मुलाच्या अशा कृत्याकडे कानाडोळा करतात. हा अक्षम्य अपराध आहे. मी ज्या काळात विद्यापीठ परिसरात एम. ए. इंग्रजी करत होतो त्या काळात अशा छेडखानी करणार्या मुलांविरोधात मोहीम उघडली होती. हातात दै. 'तरुण भारत'चा 'महाविद्यालयाचा परिसर' कॉलम होता. आपलं नाव पेपरात छापून येईल या धाकानंच अनेकांचं 'पौरुष' थिजलं होतं. छेडखानी आटली होती. हा एक प्रभावी मार्ग बनू शकतो. शाळा-कॉलेजातूनही छेडखानीविरोधात मोहिमा राबवायला हव्यात. प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक यांनी पुढाकार घेऊन मुला-मुलींचं नीट प्रबोधन करायला हवं. सहजीवन, एक-दुसर्याचा सन्मान करायला, शिकवायला हवं. तशा चर्चा घडवून आणायला हव्यात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजच्या पिढीचं सेक्स एज्युकेशन करायला हवं. बलात्कार करून, ओरबाडून कोणताच आनंद मिळत नाही, तर दोघांच्या सहमतीनं, रोमान्ससह असलेल्या प्रेमसंबंधातूनच खरा आनंद मिळतो, हे ज्ञान सर्वापर्यंत पोहचवणं नितांत गरजेचं आहे. (लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक, संघटक आहेत.) भ्रमणध्वनी - 9371014832 |
Subscribe to:
Posts (Atom)