Friday 3 August 2012

मनाचं सामर्थ्य जेवढं विधायक तेवढंच धोकादायक


मनाचा खेळ अद्भुत आहे. मानवीजीवनाच्या इतिहासात तो दीर्घकाळ अनाकलनीय होता. मानवप्राण्याची मूळ भाषा पाच इंद्रियांची. पाहणं, ऐकणं, स्पर्श, वास, चव या पाच इंद्रियांच्या अनुभव माध्यमानं आपण सारं जग समजून घेतो, ज्ञान प्राप्त करतो. आपण जे पाहतो त्याची प्रतिमा आपल्या मेंदूत उमटते. आपली इच्छा असेल तेव्हा ही मेंदूत उमटलेली प्रतिमा पुन्हा पाहता येते. याचाच आधार घेऊन मानवजातीला भाषा निर्माण करता आली आहे. समजा घोडा प्रत्यक्ष पाहिला. घोडय़ाची प्रतिमा मेंदूत प्रतिबिंबित झाली. त्याला माणसानं 'घोडा' या उच्चारासोबत जोडलं. जेव्हा जेव्हा तो घोडा प्रत्यक्ष पाहतो तेव्हा तेव्हा त्याला 'घोडा' हा उच्चार आठवतो. जेव्हा कुणीतरी 'घोडा' असा उच्चार करतो तेव्हा त्याला मेंदूत उमटलेला 'घोडा' प्रत्यक्ष (समोर नसतानाही) दिसतो. प्रत्यक्ष ती गोष्ट, घोडा समोर नसतानाही ती घोडय़ाची प्रतिमा आपण पुन्हा पाहू शकतो. याला आपण आजच्या काळात तर्ळीरश्रळीश करणं, चित्ररूप कल्पनेत पाहणं असं म्हणतो. माणसानं आपल्या याच सामर्थ्याचा उपयोग करून भाषा निर्माण केली आहे.

हे चित्ररूप कल्पनेत पाहणं, तर्ळीरश्रळीश करण्याचं सामर्थ्य प्रत्येक माणसात असतं. बालपणात ते विलक्षण असतं. पण आजच्या सुसंस्कृत व समृद्ध जगात वाढत्या वयासोबत हे तर्ळीरश्रळीश करण्याचं सामर्थ्य कमीकमी होत जातं. डोळ्यापुढे चित्रमालिका उभी करण्याचा प्रयत्न केला तर काही लोकांना चित्रमालिका कल्पनेत दिसत नाही. काही लोकांना कल्पना केल्यावर चित्रमालिका प्रत्यक्ष दिसते आणि काही लोकांना तर ही चित्रमालिका अतिशय जिवंत दिसते. प्रत्यक्ष अनुभव घेतल्यासारखी वाटते. इतकी की कल्पना व प्रत्यक्ष यातील फरकही करता येत नाही. माणसाच्या मनाच्या या सामर्थ्यानं दीर्घकाळापासून माणसाला भुरळ घातली आहे आणि कोडंही घातलं आहे. रोज रात्री आपण सात-आठ तासांच्या झोपेत 30 मिनिटांपासून ते 150 मिनिटांपर्यंत स्वप्न पाहत असतो. प्रत्येक जण रोज स्वप्न पाहतच असतो. स्वप्न पाहताना ती आपण जगत असतो. त्या क्षणी ती आपल्याला 100 टक्के खरीच वाटत असतात. खडबडून जागं झाल्यावर आपल्या लक्षात येतं, अरे, 'हे खरं नव्हतं हे तर स्वप्न होतं.' पण मनुष्यजात मात्र दीर्घकाळ स्वप्नांना खरं मानत असे. त्यांना वाटत असे आपला आत्मा प्रत्यक्ष त्या ठिकाणी गेला होता, भटकून त्या पद्धतीचा अनुभव घेऊन तो शरीरात पुन्हा परत आला. माणसानं वेगवेगळ्या प्रार्थनेच्या, मनाच्या एकाग्रतेच्या प्रक्रिया शोधल्या. त्यांचा संस्कृती, धर्म, आराधना इत्यादींच्या नावाने वापर केला. त्यात नवेनवे प्रयोग केले. त्यातून वेगवेगळ्या मेडिटेशनच्या प्रक्रिया विकसित केल्या आणि त्याला अद्भुत खजिन्याचा शोध लागला. मनाच्या विशिष्ट अवस्थेत त्याला अधिक चांगली दृश्य मालिका दिसते. एरव्ही जागृत अवस्थेत जे दिसत नाही, कल्पना केल्यावरही दिसत नाही ते मात्र मेडिटेशनद्वारा विशिष्ट अवस्थेत गेल्यावर दिसतं. जिवंत दृश्य अनुभव घेतल्यासारखं दिसतं म्हणून याला आधिभौतिक, पारलौकिक अनुभव मानणं स्वाभाविकच होतं. स्वप्नांमध्ये सलगता नसते, प्रतिमा सारख्या बदलत असतात. अनेकदा स्वप्नांमध्ये प्रतिमा बदलत जाते, पण विचार मात्र तोच असतो. प्रतिमांशी न जुळणारा असतो. हा स्वप्नांचा अनुभव घेणार्‍या माणसाला हे मेडिटेशनमधलं तर्ळीरश्रळीरींळेप खूप प्रभावित करून घेतं. हे वरच्या दर्जाचं अनुभूतीचं क्षेत्र आहे असं त्याला वाटू लागलं. हे तर्ळीरश्रळीरींळेप त्याला खरी अनुभूती वाटू लागली. हजारो वर्षापासून, धर्माच्या उदयाच्या आधीपासून मानवजातीला या आधिभौतिक, पारलौकिक अनुभूतींनी झपाटून टाकलं. आपण आता एकविसाव्या शतकात जगत आहोत. विसाव्या शतकात या क्षेत्रात खूप अभ्यास झाला. सगळेच विषय वैज्ञानिक शिस्तीनं तपासायचे, त्यात काटेकोर संशोधनं करून निखळ सत्य स्वीकारायचं या सवयीमुळं याही क्षेत्रात संशोधने झालीत. त्यात गवसलेलं सत्य मी तुमच्यासमोर मांडत आहे. मन एकाग्र करणारी प्रक्रिया वापरली आणि एकाग्र अवस्थेत माणसाचं शरीर आणि मन पुरेसं रिलॅक्स झालं की माणूस अल्फा रिदम्च्या अवस्थेत जातो. म्हणजे त्याच्या मेंदूचे ए.ए.ऋ. तपासले तर या अवस्थेत ते 8 ते 12 सायकल्स परसेकंद असतात. प्रार्थना, मेडिटेशन, संमोहन, आराधना, भजन, कीर्तन या कोणत्याही माध्यमाद्वारे ही अवस्था माणूस गाठू शकतो. या अवस्थेत असल्यानंतर साधारणत: 50 ते 60 टक्के लोकांना उत्तम होतं आणि यातील 25 ते 35 टक्के लोकांना उत्तम करश्रश्र्रीलळपरींळेप (भ्रम) होतं, होऊ शकतं. तर्ळीरश्रळीरींळेप होणार्‍यांना आपण दृश्य मालिका पाहत आहोत असं दिसतं. तर करश्रश्र्रीलळपरींळेपी होणार्‍यांना जी दृश्य मालिका दिसते त्यासोबत त्यांना ऐकू येतं, वास येतो, स्पर्श जाणवतो, चवही येते. पाचही इंद्रियांचे अनुभव येतात. विशेष म्हणजे आपण प्रत्यक्ष तो अनुभव जगत आहोत असं त्यांना वाटतं. मी उदाहरणाच्या माध्यमातूनच हा मुद्दा अधिक स्पष्ट करतो. 1983 सालची गोष्ट. 1982 सालच्या डिसेंबर महिन्यात मी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नावे चळवळ सुरू केली. त्या वेळी मी पत्रकार होतो. माझा एक पत्रकार मित्र अशोक एकबोटे याने गोव्यात 10 अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रमांचा दौरा आखला. त्या वेळी तो गोव्यातील महाराष्ट्र शासनाच्या परिचय केंद्रात अधिकारी म्हणून काम करीत होता. या आयोजनात त्याने काही डॉक्टर्स, प्राध्यापक यांना जोडून घेतलं होतं. पणजीतील 'बीडीएस' मेडिकलचे खूप विद्यार्थी-विद्यार्थिनी या दौर्‍यात सहभागी झाले. गोवा अंधश्रद्धांबाबत खूपच संवेदनशील प्रदेश आहे. छोटसं राज्य. सारा प्रदेश ढवळून निघाला. प्रचंड ताणतणावाखाली हा दौरा पार पडला. पुढे वर्षभर या दौर्‍याच्या क्रिया-प्रतिक्रिया गोव्यातील वृत्तपत्रांतून उमटत राहिल्या.

या 'बीडीएस'च्या तरुण विद्यार्थ्यांशी छान गट्टी जमली. माझ्या भाषणात 'संमोहनात अशा अनुभूती घेता येतात,' असा उल्लेख प्रत्येक भाषणात व्हायचा. सगळी तरुण मुलं मागे लागलीत म्हणून त्यांच्यावर संमोहन-प्रयोग करायचं असं आम्ही ठरविलं. तोवर माझा संमोहनशास्त्राचा थिअरॉटिकल चांगला अभ्यास होता, पण मी फारसे कुणावर प्रॅक्टिकल्स केले नव्हते. पण माझ्या 'देखा जायेगा' स्वभावाप्रमाणं प्रयोग करायचा निर्णय घेऊन टाकला. 40-50 तरुण मुलं-मुली आणि चार वयस्क मोठी माणसं या कार्यक्रमात सहभागी झालीत. त्यातील 20-25 मुलं-मुली व हे चार ज्येष्ठ नागरिक खोल संमोहनात गेले. बाकीच्यांना मी संमोहनातून बाहेर काढून प्रेक्षक बनवलं. (हे चारही ज्येष्ठ नागरिक अध्यात्माचा खूप अभ्यास करणारे होते. नियमित मेडिटेशनचा सराव करणारे होते, पण त्यांना आध्यात्मिक अनुभूती मात्र आल्या नव्हत्या. म्हणून आग्रहानं ते या प्रयोगात सामील झाले होते.)

बाकी तरुण मुलांवर मी प्रयोग सुरू केले. त्यावेळच्या स्वप्नसुंदरी हेमामालिनीच्या बंगल्यावर मुला-मुलींना पाठवलं. हिमालयात घेऊन गेलो, अंतराळात भटकवून आणलं. म्हणजे ते खोल संमोहनात असताना ''तुम्ही आता हेमामालिनीच्या बंगल्यात शिरता आहात. ती हसतमुखानं तुमचं स्वागत करीत आहे, हस्तांदोलन करीत आहे.. वगैरे..'' शब्दांमध्ये मी वर्णन केलं. ज्येष्ठ लोकांना

हेमामालिनीच्या बंगल्यावर पाठविणं योग्य नाही आणि त्यांना आध्यात्मिक अनुभूतीची ओढ आहे म्हणून त्यांना सांगितलं की आता तुम्ही ''बाळ कृष्णांच्या गोकुळात पोहोचला आहात. बाळकृष्ण रांगत रांगत तुमच्या मांडीवर येऊन बसले आहेत. त्यांचे हात दुधादह्यानं माखले आहेत. ते तुमच्या तोंडात दूधदही घालताहेत.. बाळकृष्णांसोबत तुम्ही खेळता आहात.. बाळकृष्णांसोबत तुम्ही आहात..'' असं म्हणून मी त्यांना सोडून दिलं. इतर तरुणांवर वेगवेगळे प्रयोग करू लागलो. तीन तासांचा कार्यक्रम संपल्यावर सगळ्यांना मी अनुभव विचारू लागलो. माझ्या डायरीत नोंदवू लागलो. मी शब्दांत बोललो ते सगळ्यांनाच प्रत्यक्ष दिसलं, पण प्रत्येकाचा अनुभव वेगळा होता. एका तरुणाला आंघोळ करून टॉवेल गुंडाळून बाहेर आलेली ओलेती हेमामालिनी दिसली. त्याला लक्स साबणाचा वासही आला. दुसर्‍या एकाचं मध्येच आलेल्या धर्मेद्रशी भांडण झालं. मारामारी होता होता वाचली. हेमामालिनीनं या तरुणाची बाजू घेतली म्हणून तणतणत धर्मेद्र बाहेर गेला.. वगैरे..

चार ज्येष्ठांना मी अनुभव विचारला. एकाचे बाळकृष्ण रांगतेच राहिले. दुसर्‍याचे भगवद्गीतेपर्यंत पोहोचले. तिसर्‍याचे रासक्रीडेत रमले.. वगैरे. शेवटी मी विचारलं, ''हे अनुभव खरे होते का?'' यावर सगळी मुलं-मुली गंभीर होऊन म्हणाली, ''सर, आम्ही जे पाहिलं, अनुभवलं ते 100 टक्के खरं होतं असं वाटतं, पण पणजीतल्या एका हॉलमधून एवढय़ा कमी वेळात आम्ही मुंबईत- हेमामालिनीच्या बंगल्यावर, हिमालयात, अंतराळात कसं जाऊ शकणार? हा तार्किक विचार केल्यानंतर असं वाटतं की हे तुम्ही सांगता तसं (करश्रश्र्रीलळपरींळेप) भ्रम असावेत. पण आम्ही थोडसं संभ्रमात आहोत. अजूनही हिमालयातील बर्फाळ थंडी जाणवत आहे.. वगैरे.'' चार ज्येष्ठ नागरिक सांगत होते, ''सर, खूपच चांगला अनुभव आला. आम्ही इतके वर्षे मेडिटेशन करीत आहोत, पण कधी बाळकृष्णांचं दर्शन झालं नव्हतं. खूप सुंदर अनुभूती आली.''

एका ज्येष्ठाने मात्र माझ्या भ्रम (करश्रश्र्रीलळपरींळेपी) या शब्दाबद्दल आक्षेप घेतला. ते म्हणाले, ''मानव, याला भ्रम कसं म्हणायचं? अहो, बाळकृष्णांनी माझ्या तोंडात घातलेल्या दह्याची चव अजूनही माझ्या तोंडात रेंगाळत आहे. एवढं अवीट गोडीचं दही माझ्या आयुष्यात यापूर्वी मी कधी खाल्लं नाही.. कुरुक्षेत्रावर अजरुनाला गीता सांगताना भगवान कृष्णांना मी प्रत्यक्ष पाहिलं आहे. गीता सांगतानाचा कृष्णांचा आवाज मी ऐकला आहे. अजून ते शब्द, तो आवाज माझ्या कानात घुमतो आहे.. तरी याला भ्रम कसं मानायचं?'' मला महत्प्रयासानं हे भ्रमच आहेत, असं समजावून सांगावं लागलं. त्या वेळी ठामपणे ते मी सांगितलंही. पण डीप ट्रान्समध्ये जो करश्रश्र्रीलळपरींळेपी चा अनुभव येतो तो एवढा खरा वाटतो, जिवंत वाटतो की त्याला खोटा ठरवणं, भ्रम मानणं शक्य होत नाही हे त्या वेळी माझ्या लक्षात आलं. त्यानंतर मी ठरवून टाकलं. यापुढे संमोहनात कधीही देवाचं करश्रश्र्रीलळपरींळेपी सांगायचं नाही. हेमामालिनीच्या बंगल्यावर एवढय़ा दूर जाणं शक्य नाही. तिच्या बंगल्यावर सिक्युरिटी असते. असा सहज प्रवेश मिळू शकत नाही. हे पटू शकतं. पण देव कुठेही, केव्हाही भक्ताला भेटू शकतो या श्रद्धेमुळं अशा अनुभवांना भक्त भ्रम समजू शकत नाही हे माझ्या तीव्रतेनं लक्षात आलं. त्यानंतर मी पाच हजारापेक्षा जास्त तरुण-तरुणींना डीप ट्रान्समध्ये टाकून त्यांच्यावर प्रयोग केले. त्यांचे अनुभव रेकॉर्ड केले. त्यानंतर गेली 22 वर्षे मुंबईतून महाराष्ट्रभर व्यावसायिक पद्धतीनं ''स्वसंमोहन व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळा'' चालवीत आहे. दीड लाख लोकं तरी कार्यशाळेत सहभागी झाले आहेत. ''सुंदर बागेत भटकता आहात.. सुंदर पक्षी, फुलं, हरणं, ससे, पिसारे फुलवलेले मोर आहेत.. टूमदार घरात शिरता आहात. हे एक तर्ळीरश्रळीरींळेप आणि समुद्रकिनारी पोहोचलात.. वाळूवर मोठय़ा बलूनला एक सुंदर झोपडी लटकली आहे. त्यात बसून अंतराळात जाता आहात.. समुद्रपक्षी.. पृथ्वीचा सुंदर गोल, चंद्र, मंगळ, गुरू, शनी सगळ्यांजवळून जाता आहात..'' हे दोन्ही अनुभव प्रत्येक कार्यशाळेतील विद्यार्थ्यांना देतो. त्यातील निम्मे लोकांना एकतर तर्ळीरश्रळीरींळेप होतं वा प्रत्यक्ष करश्रश्र्रीलळपरींळेपी होतं. अनेकांना हा अनुभव अद्भुत वाटतो. हेलावून टाकणारा, चक्रातून सोडणारा वाटतो, पण हा अनुभव खरा नाही.; हे केवळ भ्रम आहेत असं मी आधीपासून सांगत असल्यामुळं कुणाची फसगत होत नाही.25-35 टक्के लोकांना होऊ शकणारं इतकं खरं वाटतं की, तो भ्रम वाटतच नाही. पाचही इंद्रियांना अनुभव येतो. आपणच प्रत्यक्ष तिथे गेलो, पाचही इंद्रियांनी अनुभवून आलो असं वाटतं.

माणसाच्या मनाच्या या सामर्थ्याचे खूप विधायक फायदेही आहेत आणि चलाख बदमाशांच्या हाती लागलं तर फसवणुकीसाठी वापरलं जाऊ शकणारं प्रभावी हत्यारसुद्धा आहे. कसं? पुढे पाहू.

(लेखक श्याम मानव  अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष आहेत.)

भ्रमणध्वनी-9371014832

No comments:

Post a Comment