कारण महाराष्ट्र हा देशातला सगळ्यात पुरोगामी प्रांत. जादूटोणाविरोधी बिलाच्या निमित्तानं मी मंत्रालयात, विधिमंडळात सारखे खेटे घालत होतो. आमचे मित्र त्या वेळचे शिक्षणमंत्री ना. वसंतराव पुरके यांनी सेक्स एज्युकेशनसंबंधी एक प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवला होता. सेक्स एज्युकेशन शब्द असला तरी ती टीनएजर्सला, पौगंडावस्थेतील मुलांना शरीराची साधी ओळख करून देण्याची तयारी होती. त्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षित करण्यासाठी एक पुस्तिका निर्माण करण्यात आली होती. ती पुस्तिका फडकवत, त्यातील स्त्रीपुरुष देहाची चित्रे दाखवत दाखवत अनेक जनप्रतिनिधी कडाडून तुटून पडले होते. भारतीय संस्कृतीचा हा अपमान आहे. नव्या पिढीला हे बिघडवायला निघाले आहेत. शाळाशाळांमध्ये कंडोम पुरविणार का? वगैरे वगैरे आक्षेप घेतले गेले. शेवटी या आरोपांच्या धुराळ्यात तो प्रस्ताव बाजूला पडला. वसंतराव पुरके यांनी दूरदृष्टी ठेवून नव्या पिढीच्या हितासाठी एक अत्यंत आवश्यक पाऊल उचलण्याची हिंमत केली होती, त्याबद्दल केव्हाही त्यांचं अभिनंदनच केलं पाहिजे. पण पुरोगामी महाराष्ट्रातल्या विरोध करणार्या जनप्रतिनिधीचं काय? एका माझ्या ओळखीच्या जनप्रतिनिधीला मी म्हटलं, तुम्ही खरं म्हणजे महाराष्ट्रातून एक मोठा मोर्चा मध्य प्रदेश आणि ओरिसात न्यायला हवा. कारण पुस्तकातील चित्रांवर तुम्ही एवढे खवळलात, तर खजुराहो व कोणार्क येथे तर रतिक्रीडेची कोरीव शिल्पे आहेत, संभोग दृश्य आहेत. हजारो शाळकरी मुलं ते पाहत असतात. त्यामुळं आपली भारतीय संस्कृती रसातळात जाते आहे आणि जगन्नाथ पुरीच्या मंदिराचं काय? भारतातील सर्वात मोठं, अत्यंत पुरातन, भारतीय संस्कृतीचं प्रतीक असलेलं हे मंदिर आहे. रोज किमान लाखभर लोक या मंदिरात दर्शनाला जातात. या मंदिराच्या घुमटावर संभोग दृश्य कोरलेली आहेत. भारतीय संस्कृती वाचविण्यासाठी खजुराहो, कोणार्क, पुरीचं जगन्नाथ मंदिर तिन्हीही जमीनदोस्त करायला नको का? आता तुमच्या लक्षात आलं असेल मला चीड का आली होती ते. भारतीय संस्कृतीच्या नावाखाली सेक्स एज्युकेशनला विरोध करणार्यांना भारत, भारतीय संस्कृती काहीही माहीत नसतं. इंग्रजांनी शंभर-दीडशे वर्षापूर्वी लॉर्ड मेकॉलेप्रणीत शिक्षण पद्धतीद्वारा पेरलेल्या सेक्सविषयीच्या विकृत कल्पना घेऊनच आजही या विषयाकडे आपण पाहतो आहोत. त्या काळात इंग्लंड सेक्स या विषयाकडे फार प्रतिगामी दृष्टिकोनातून पाहत असे. ºिश्चनातील कॅथॉलिक पंथीय सेक्सला फार वाईट समजत असत, अजूनही तो पगडा कायम आहे. पती-पत्नींनीसुद्धा रतिक्रीडेपासून दूर राहिलं पाहिजे. अपवाद फक्त अपत्यप्राप्ती उद्देशाचा. तेवढय़ापुरतंच पतिपत्नींनी एकत्र यावं. बाकी सेक्स म्हणजे पापाची खाण. त्या काळातील इंग्लंडवर या विचारधारेचा पगडा होता. सुशिक्षितांच्या माध्यमातून तो भारतीय संस्कृतीचा विचार ठरू पाहतोय. मधल्या काळात इंग्लंड खूप बदललं, पण भारतीय सुशिक्षितांची मानसिकता मात्र तशीच प्रतिगामीच राहिली.भारतीयांनी रतिक्रीडेला, कामाला पुरुषार्थ मानला आहे. हा अभ्यासाचा, जीवनात आनंद घेण्याचा विषय मानला आहे. म्हणूनच जगातलं पहिलं सेक्स एज्युकेशनवरचं पुस्तक लिहिणारा 'कामसूत्र' जनक वात्सायन ऋषी हा प्रतिष्ठित ऋषी होता. त्याचं नाव नेहमीच आदरानं घेतलं जातं. शशीकपूरनं यावर शेखर सुमन आणि रेखाला घेऊन एक सुंदर चित्रपट निर्माण केला होता. याद्वारे या विषयाची एक अल्पशी, पण सर्वागसुंदर ओळख भारतीयांना करून दिली. शाक्तपंथीय साधनेत, तंत्र साधनेत या विषयाकडे केवळ उदार दृष्टिकोनातूनच नव्हे, तर मोक्षप्राप्तीचा एक मार्ग म्हणूनसुद्धा पाहिलं जातं. महादेवाची पिंड गावागावांत असते. गावोगाव भक्तिभावानं व आदरानं त्याची पूजा केली जाते. पिंड हे स्त्री-पुरुष लिंगाचं प्रतीक आहे, हे प्रत्येक भारतीयाला माहीत असायलाच हवं. निसर्गानंच मानवी प्राण्यात सेक्स हा एक अपरिहार्य भाग म्हणून निर्माण केला आहे. निर्मिती, नवी निर्मिती ही निसर्गाची, प्राणिमात्राची गरज आहे. नर आणि मादी यांनी वारंवार एकत्र यावं. त्यातून गर्भधारणा राहावी, नव्या अपत्यांचा जन्म व्हावा म्हणूनच नर आणि मादीमध्ये जबरदस्त आकर्षण निर्माण होईल याची काळजी निसर्गानं घेतली आहे. आकर्षणामुळं एकत्र आलेल्या स्त्री-पुरुषांना रतिक्रीडा करावीशी वाटावी, त्यात त्यांना प्रचंड आनंद मिळावा. या आनंदासाठी त्यांनी वारंवार एकत्र यावं अशी रचनाच निसर्गानं निर्माण केली आहे. म्हणूनच आजही मानवी जीवनातील सर्वोच्च व परमोच्च आनंद स्त्री-पुरुष संबंधातील 'ऑरगॅझम'मधून रतिक्रीडेतील 'लैंगिक तृप्तीतून' मिळतो. केवळ आनंदच मिळत नाही तर संपूर्ण शरीर आणि मन 'ऑरगॅझम' नंतर पूर्णत: रिलॅक्स होतं. एवढं सुंदर रिलॅक्सेशन दुसर्या मार्गानं प्राप्त होत नाही. त्यामुळं सार्या टेंशन्स आणि ताणतणावांचा निचरा होतो. माणूस अंतर्बाह्य शांत, शांत होतो. त्यामुळं अधिक निरोगी बनण्याच्या दिशेनं वाटचाल करतो. स्वभावही अधिक संतुलित होऊ लागतो आणि यासाठी स्त्री आणि पुरुषांची मनापासून एकदुसर्याला साथ असावी लागते. तरच हे साध्य होतं. बलात्कारात हे शक्य असतं का? रतिक्रीडेतला आनंद ज्याला कळतो तो बलात्कार करणंच शक्य नाही. हे एज्युकेशन आम्हाला केव्हा व कसं मिळणार? (लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक आहेत.) भ्रमणध्वनी- 9371014832 |
Wednesday, 23 January 2013
'लैंगिक तृप्ती'तूनच मिळतो मानवी जीवनाचा सर्वोच्च आनंद
Monday, 14 January 2013
आजच्या पिढीला 'सेक्स एज्युकेशन' आवश्यक!
वाईट याचंच वाटतं की, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम, संत तुकडोजी महाराज, संत गाडगे महाराज अशा समाजाचं प्रबोधन करणार्या, समाजाला चार पावलं पुढं नेणार्या संतांकरिता जी संत उपाधी वापरली जाते तीच उपाधी असल्या बेशरम माणसाकरिता महाराष्ट्रातील त्यांचे तथाकथित भक्त वापरतात.विनोबा भावेंनी 'संत' या शब्दाचा फार सुंदर अर्थ सांगितला आहे. 'सत्याचा आग्रह धरत जो समाजाला पुढे नेतो तो खरा संत' यानिमित्तानं अनेकांचं विकृत हृदय आणि विकृत विचार प्रगट झाले. 'स्त्रिया तोकडे कपडे घालतात म्हणून बलात्कार होतात. पाश्चत्त्य संस्कृतीचा पगडा असणार्या शहरी वातावरणात 'इंडियात' बलात्कार होतात. ग्रामीण भागात, 'भारतात' बलात्कार होत नाहीत.अर्थात, ज्यांना खरा भारत माहीत नाही, भारताशी ज्यांचा परिचय नाही, पुरुषी अहंगंडानं आणि काल्पनिक विश्वात रमण्याच्या ध्यासानं ज्यांची दृष्टी अधू बनली आहे अशांनी उधळलेली ही मुक्ताफळं आहेत. त्याला फारसं महत्त्व देण्याचं कारण नाही. बलात्कारी माणसाची मानसिकता नेमकी काय असते? या समाजात, पुरुषप्रधान समाजरचनेत, स्त्री ही उपभोगण्याची वस्तू आहे असाच संस्कार होतो. बोलण्यातून, म्हणीतून, वागण्यातूच हाच संस्कार सतत ध्वनित होत असतो. या संस्काराचा स्त्रीसुद्घा बळी आहे. दीर्घकाळ युवा चळवळींमध्ये असल्यामुळं, व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळांमुळं आणि तब्बल 15 वर्षे वृत्तपत्रांचे युवास्तंभ हाताळल्यामुळं भारतीय युवकांची मानसिकता फार जवळून अनुभवता आली. माझ्या जीवनात सगळ्यात जास्त प्रेमप्रकरणं मला हाताळावी लागली. 30-35 वर्षापूर्वी दोन मनांचं प्रेम आणि त्यात काही टक्क्यांमध्ये शारीरिक संबंध असायचे. पण अलीकडच्या काळात 'बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंड'च्या जमान्यात बहुतांश प्रेमसंबंध शारीरिकसुद्घा असतात. बरं, प्रेम सुरू करताना आयुष्यभराची साथ, लग्न असं काहीही कमिटमेंट नसतं. खरं म्हणजे आजच्या जमान्यात हे प्रेम शरीरसंबंध टूवे (दुतर्फा) असतात, असावेत. बरोबरीच्या नात्यानं हे रिलेशन असतं.पण जेव्हा काही कारणानं ही रिलेशनशिप तुटते तेव्हा चांगल्या सुशिक्षित, आधुनिक मुलीसुद्घा 'त्या मेल्यानं माझा भोग घेतला, मजा मारली आणि आता कंटाळा आला तर उडून चालला' या अर्थानं आरोप करतात. तेव्हा त्या आधुनिक कपडय़ाआड दडलेली, पण मुळात बुरसटलेली स्त्री बाहेर येते. या मुलींना सांगावं लागतं, तू असं बोलून स्वत:चा, तुझ्यातल्या स्त्रित्वाचा अपमानं करते आहेस. तुमच्यातले संबंध राजीखुशीचे होते. उपभोग घेतलाच असेल तर तुम्ही एक-दुसर्याचा घेतला आहे. खरं म्हणजे प्रेमाला 'उपभोग' हा शब्द वापरून प्रेमाचा आणि सेक्सचा दोहाेंचा तुम्ही अपमान करताहात. बलात्कारी मनोवृत्तीचा संबंध सरळ सरळ स्त्री-पुरुष संबंधांविषयी असलेल्या दृष्टिकोनाशी आहे. पुरुषप्रधान भारतीय संस्कृती असो अथवा पाश्चात्त्य संस्कृती, दोन्ही विचारधारा एकच आहेत. स्त्रीदेह हा भोगाचा विषय आहे. पुरुषानं स्त्रीचा भोग घ्यायचा असतो. स्त्री त्यासाठीच जन्माला आली असते. म्हणून तिला स्वातंर्त्य नाही. इति मनुस्मृती. लहानपणी पित्यानं, तरुणपणी पतीनं आणि म्हातारपणी मुलानं संरक्षण करण्याची ती वस्तू आहे.पित्यानं लग्न होईपर्यंत ती अनाध्रात राहील म्हणजे तिचा कौमार्यभंग होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. लग्नानंतर पतीच्या हाती तिला एकदाचं सोपवलं की, मग पित्याची सुटका होते. ही मानसिकता, ही विचारधारा आणि 'स्त्री ही भोग्य वस्तू आहे' ही विचारधारा एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. स्त्रीचं शील, चार्त्यि यांनी शुचितेशी जोडलेली विचारधारा अजूनही कायम आहे. शील आगपेटीच्या काडीसारखं असतं. एकदा ती उगाळली की, पुन्हा काडीपेटी उगाळता येत नाही. हा आदर्श, मानसिक संस्कार अजूनही तसाच आहे. फक्त प्रत्यक्षात तो अमलात येण्याची अपेक्षा ठेवण्याची कुणी हिंमत ठेवत नाही एवढंच. टीव्ही, इंटरनेटच्या जमान्यातील, आधुनिक कपडे घालणारी, इंग्रजी बोलण्यात भूषण मानणारी ही आधुनिक पिढी आगपेटीच्या काडीपासून लायटरपर्यंत (जो वारंवार पेटवला जाऊ शकतो, हवा तेव्हा पेटतो) प्रवासकर्ती झाली आहे आणि इंग्रजी बोलू न शकणारी, थोडंसं मॉडर्न बनण्याचा प्रयत्न करणारी, अजूनही ग्रामीण भाषेचा लेहजा असणारी सुशिक्षित पिढीही त्याच दिशेनं वाटचाल करते आहे.या सर्वाना इंटरनेटवर, मोबाईलवर स्त्री-पुरुष देहाची उघडीनागडी चित्र, ब्ल्यू फिल्म्स सतत आणि सहज पाहायला मिळतात. त्यातून पुन्हा मनात असलेला 'स्त्री ही उपभोग्य वस्तू आहे' जुनाच संस्कार पक्का होतो. विकृत पद्घतीनं चालवला जातो. बहुतांश ब्ल्यू फिल्म्स बलात्कारसदृशच असतात. शृंगार, रोमान्स या गोष्टींना फारसं स्थान नसतं. स्त्री-पुरुष प्रेमसंबंध म्हणजे फक्त 'इंटरकोर्स', 'भोगणं' हाच संस्कार अधिकाधिक पक्का होतो. दृक्-श्रव्य माध्यमामुळं तो अधिक तीव्र स्वरूपाची विकृती निर्माण करतो. चित्रपट, इंटरनेट, सेक्सी जाहिराती यातून असं चाळवलं गेलेलं मन, मुळात पुरुषी अहंगंडानं, पुरुषी मनोवृत्तीनं पछाडलं गेलेलं हे मन मग रस्त्यारस्त्यांवर छेडखानी करणं, अश्लील कॉमेंट्स करणं सुरू करतं. समाजात याविषयी 100 परसेन्ट टॉलरन्स असल्यामुळे ते चेकाळलेलं मन अधिकच सोकावतं, स्थिरावतं. अश्लील हातवारे करणं, विकृत हावभाव करणं, घाणेरडं टॉन्टिंग करणं हा आपला जन्मसिद्घ पुरुषी अधिकार आहे असं मानू लागतं आणि मग यातील काही महाभाग बलात्कारापर्यंत जाऊन पोहोचतात.बलात्काराचा इतिहास पाहिला, तपासला तर त्यातील पंचाण्णव टक्क्यांपेक्षा अधिक लोकांनी आधी छेडखानीचे, टॉन्टिंगचे प्रकार केले आहेत असं लक्षात येतं. मग यावर उपाय काय? सर्वप्रथम स्त्री ही उपभोग्य वस्तू आहे का? संस्कार बदलणं. मुलं आणि मुली दोन्हींबाबत. स्त्री ही बरोबरीचा माणूस आहे. तिचा, तिच्या देहाचा, तिच्या व्यक्तिमत्त्वाचा सन्मान राखणं हे माझं कर्तव्य आहे असं प्रत्येक पुरुषाला, मुलाला शिकवलं पाहिजे. लहानपणापासून तशा संस्कार शाळा, कॉलेज, प्रसिद्घिमाध्यमं आणि घरातूनसुद्घा बिंबवायला पाहिजे. त्याचप्रमाणं देहाच्या पलीकडे स्त्रीला अस्तित्व आहे. स्त्रीचं व्यक्तिमत्त्व, बुद्घिमत्ता, कर्तृत्व हे तिच्या सौंदर्याइतकच, किंबहुना जास्त महत्त्वाचं आहे असा संस्कार तिच्यावर केला पाहिजे. समजा, तिच्या इच्छेविरुद्घ तिच्यावर बलात्कार झालाच, तर एक अपघात, एक शारीरिक जखम एवढय़ाच अर्थानं त्याकडे पाहायला स्त्रीनं शिकलं पाहिजे, स्त्रीला शिकवलं पाहिजे अन्यथा एवढय़ा महत्प्रयासानं मिळालेलं स्वातंर्त्य स्त्रीला गमवावं लागेल आणि तेही काही विकृत पुरुषांच्या भीतीपोटी, तिचा काहीएक दोष नसताना स्वातंर्त्य तिला गमवावं लागेल. ज्युडो-कराटे शिकून स्त्रियांचा आत्मविश्वास वाढत असेल तर शिकायला, शिकवायला हरकत नाही. पण बलात्कार झाला तरी त्याला एका जखमेपेक्षा जास्त महत्त्व देणार नाही, हा संस्कार मात्र त्यासोबत तेवढाच प्रभावीपणे बिंबवला पाहिजे. तरच स्त्रिया मोकळेपणानं वावरू शकतील. नवी नवी क्षेत्रे पादाक्रांत करू शकतील. देशभर बलात्कारविरोधी वातावरण निर्माण झालं आहे. त्याचा फायदा उचलून सरकार-पोलिसांनी काही कडक पावलं उचलली पाहिजे. छेडखानी, अश्लील कॉमेंट्स याबाबत झिरो टॉलरन्स निर्माण झाला पाहिजे आणि या गुन्ह्याखाली अटक झालेल्या मुलांची व त्यांच्या आई-बापांची व शाळा-कॉलेजेसची नावं वृत्तपत्रात प्रसिद्घ केली पाहिजे. आपला दिवटा तरुण चिरंजीव मुलींना छेडत असेल तर आई-वडिलांनाही तेवढंच जबाबदार धरलं पाहिजे. कारण घरातला दुटप्पी संस्कार याला जबाबदार असतो. आपल्या मुलींना छेडलं तर जे आई-वडील गंभीर बनतात तेच आई-वडील मात्र आपल्या मुलाच्या अशा कृत्याकडे कानाडोळा करतात. हा अक्षम्य अपराध आहे. मी ज्या काळात विद्यापीठ परिसरात एम. ए. इंग्रजी करत होतो त्या काळात अशा छेडखानी करणार्या मुलांविरोधात मोहीम उघडली होती. हातात दै. 'तरुण भारत'चा 'महाविद्यालयाचा परिसर' कॉलम होता. आपलं नाव पेपरात छापून येईल या धाकानंच अनेकांचं 'पौरुष' थिजलं होतं. छेडखानी आटली होती. हा एक प्रभावी मार्ग बनू शकतो. शाळा-कॉलेजातूनही छेडखानीविरोधात मोहिमा राबवायला हव्यात. प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक यांनी पुढाकार घेऊन मुला-मुलींचं नीट प्रबोधन करायला हवं. सहजीवन, एक-दुसर्याचा सन्मान करायला, शिकवायला हवं. तशा चर्चा घडवून आणायला हव्यात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजच्या पिढीचं सेक्स एज्युकेशन करायला हवं. बलात्कार करून, ओरबाडून कोणताच आनंद मिळत नाही, तर दोघांच्या सहमतीनं, रोमान्ससह असलेल्या प्रेमसंबंधातूनच खरा आनंद मिळतो, हे ज्ञान सर्वापर्यंत पोहचवणं नितांत गरजेचं आहे. (लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक, संघटक आहेत.) भ्रमणध्वनी - 9371014832 |
बलात्कारास प्रोत्साहन देणारी मानसिकता विकृत
यावर केल्या जाऊ शकणार्या उपायांचा, सूचनांचा पाऊस पडतो आहे. बलात्कार्याला फाशी द्या, त्याला नपुंसक करा, कायदा कडक करा इत्यादी सूचना, उपाय सुचविले जाताहेत. कायदा कडक झाला पाहिजे. बलात्कारी पुरुषाला आयुष्यभराची अद्दल घडली पाहिजे. एवढी कडक शिक्षा झाली पाहिजे की जेणेकरून पुन्हा दुसरा कुणी बलात्कार करण्यास धजावणार नाही. असं घडावं याविषयी दुमत असण्याचं कारण नाही. बलात्काराचं, कोणत्याही अवस्थेत, कोणत्याही कारणानं, कोणत्याही काळी समर्थन होऊच शकत नाही. कुणीही सहृदय माणूस बलात्काराचं समर्थन करण्यास, धजावणारचं नाही हे खरं असलं तरी बलात्कार होतात का होतात? यामागच्या मनोवृत्तीचा, मानसिक कारणांचा शोध घेण्याचा आपण प्रयत्न करू या. एबीपी माझा या वृत्तवाहिनींनं आयोजिलेल्या बलात्कार या विषयावरील एका चर्चात्मक कार्यक्रमात गेल्या पंधरवडय़ात मी सहभागी झालो होतो. त्या वेळी काही गोष्टी प्रकर्षानं लक्षात आल्या. यानिमित्तानं काही महत्त्वाच्या बाबींकडे, इतिहासाकडे लक्ष वेधून घेण्याची गरज वाटते. 1975 साली 25 जूनला 'आणीबाणी' घोषित झाली आणि 27 जूनला आम्ही काही सहकारी वर्धा जेलमध्ये कोंबले गेलो. मी, चंद्रकांत वानखेडे, सुभाष इथापे हे तीन विद्यार्थी वगळता बाकी 900 कैदी हे गुन्हेगार होते. अनेक अट्टल गुन्हेगार होते. त्यात एक गोरा गोमटा, उंचपुरा, स्मार्ट कैदी होता. पुलगाव सैनिक कॅम्पमधील एक माजी सैनिक पण अख्ख्या जेलमधील एकही कैदी त्याच्याशी बोलत नसे, संपर्क ठेवत नसे. सारे त्याच्याशी अत्यंत तुच्छतेनं वागत असत. पुढे कारण कळलं. त्यानं त्याच्याच ऑफिसरच्या बायकोवर बलात्कार केला आहे. म्हणून सार्या कैद्यांनी त्याच्यावर बहिष्कार टाकला होता. पुढे अनेक कैदी मित्र झाले. त्यांच्या अंतरंगात शिरण्याची संधी मिळाली. तेव्हा कळले की गुन्हेगारांचीसुद्धा एक मूल्यव्यवस्था असते. चोर, दरोडेखोर, खुनी माणसंसुद्धा बलात्कारी गुन्हेगाराला 'गया गुजरा', 'एकदम हिणकस,' हमारे साथ बैठने लायक नही' समजतात. हे कळल्यावर एका बाजूनं आश्चर्य वाटलं; पण दुसर्या बाजूनं फार बरं वाटलं. असाच प्रसंग आता घडला. दिल्लीतील तरुणीवर बलात्कार करणार्या संशयित गुन्हेगाराला तिहाड जेलमधील कैद्यांनीच बदडून काढलं. बलात्कार हा गुन्हा, हे कृत्य अट्टल गुन्हेगारांनासुद्धा तिरस्करणीय वाटतं ही आनंदाची गोष्ट आहे. पण 1992-93 च्या मुंबई दंगलीमध्ये आणि गुजरातच्या दंगलींमध्ये अनेक स्त्रियांवर बलात्कार झाले. पण हे बलात्कार करणारे कुणी अट्टल गुन्हेगार नव्हते, अथवा चवचाल, विकृत समजले जाणारे तरुण नव्हते. तर उलट धर्माभिमानी म्हणविणार्यांनी, काही तथाकथिक सुसंस्कृत लोकांनी, हे बलात्कार केले होते आणि तेही धर्माच्या, धर्मरक्षणाच्या नावावर बलात्कार केले होते. त्यातील काही केसेस तर काळजाचा थरकाप उडविणार्या आहेत. दंगली आधी ज्या घरांसोबत घरोबा होता. एका घरात शिजलेली भाजी दुसर्या घरात जात असे. एवढे जिव्हाळ्य़ाचे संबंध आहेत. अशा दुसर्या धर्माच्या घरातील स्त्रीवर ओळखीच्या पुरुषांनी बलात्कार केलेत आणि हे बलात्कार करविण्यात पुढाकार घेणार्या स्त्रिया आहेत. आपल्याच तरुण मुलांना रोजारणीवर बलात्कार करण्यास प्रोत्साहन देताहेत, अशा किमान दोन केसेस मला माहीत आहेत. पोलीस तपास अधिकार्यांच्या तोंडूनच त्या ऐकल्या आहेत. अर्थात, याच मुंबई दंगलीत इतर धर्मातील स्त्रियांना प्रसंगी स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचविल्याची, बलात्कार वाचविल्याची व शेजारधर्म प्रखरपणे पाळल्याची अनेक उदाहरणंही मला माहीत आहेत. म्हणूनच माणुसकीवरचा विश्वास अजून कायम आहे. पण याच दंगलीच्या काळात इतर धर्मीयांवर बलात्कार करण्यास प्रोत्साहन देणार्या नेत्याचा अत्यंत बीभत्स चेहरा सप्रमाण उघड झाला होता, हेही अत्यंत विदारक सत्य आहे. 1971-72 सालच्या बांगलादेश युद्धाच्या आधी आम्ही काही 'तरुण शांती सैनिक' बंगालमधील 'बनगाव' या बॉर्डरच्या गावी काही सेवा कार्य करीत होतो. पाकिस्तान बॉर्डर केवळ तीन-चार किलोमीटर अंतरावर होती. हजारो बंगाली पाकिस्तानी शरणार्थी भारताच्या सीमेत प्रवेश करीत होते. त्यांची व्यवस्था 'बनगाव' कॅम्पमध्ये केली जात असे. त्यामध्ये अनेक बलात्कारित स्त्रिया असत. अनेक तरुणींचे स्तन कापले असत. योनीमध्ये संगिनी खुपसल्या असत. बांगला स्त्रियांचा अपमान करणं, सूड उगवणं हे परमराष्ट्रीय धर्मकर्तव्य आहे असं समजून पाकिस्तानी मिल्ट्री हे करीत असे. पाकिस्तानी बंगाली स्त्रियांना भारतीय बॉर्डरमध्ये शिरण्याआधी सर्वासमक्ष पकडून पाकिस्तानी सैनिक बलात्कार करीत आणि बंदुका, रायफली ताणून उभ्या असलेल्या भारतीय सैनिकांना खिजविण्यासाठी, तुम्ही आमचं काही बिघडवू शकत नाही असं दाखविण्यासाठी तर अधिकच चेकाळून ही कृत्य केली जात. त्या वेळी बॉर्डरवरच्या या सैनिकांची चाललेली मानसिक उलाघाल आम्ही प्रत्यक्ष अनुभवली आहे. आपल्या समक्ष बलात्कार केले जाताहेत, स्तन कापले जाताहेत, संगिनी योनीत खुपसल्या जाताहेत, नग्न केलं जात आहे. केवळ काही फर्लाग अंतरावर हे संगळं घडताना दुर्बिणीशिवाय प्रत्यक्ष डोळ्य़ांनी दिसत आहे. हातात शस्त्र आहे, लढण्याची खुमखुमी आहे. पण ऑर्डर नाही म्हणून हात चोळत बसण्याशिवाय काहीही करता येत नाही. अशा अत्यंत उद्विग्न मनोवस्थेत असलेल्या सैनिकांना आम्ही पाहिलं आहे. सैनिकांचं नियंत्रण सुटून आदेशाशिवाय युद्धाची ठिणगी पडू नये म्हणून आपल्या सैनिकांची एका बाजूनं समजूत काढत असतानाच आतून मात्र संतापानं प्रचंड पेटलेले सैनिक अधिकारीही त्या वेळी जवळून पाहिले आहेत. या सर्व परिस्थितीमुळेच त्या वेळी पंतप्रधान इंदिरा गांधींना पूर्व पाकिस्तानवर चढाई करण्याचा निर्णय घेण्यास भाग पडलं असावं. पण पुढचं आम्हाला काही पाहता आलं नाही. युद्ध सुरू झालं. पेटलेल्या सैनिकांनी अवघ्या काही दिवसांत अख्खा पूर्व पाकिस्तान ताब्यात घेतला आणि 1 लाख पाकिस्तानी सैनिकांनी शरणागती पत्करून स्वत:ला भारतीय सैन्याच्या हवाली केलं. जगाच्या इतिहासात यापूर्वी एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर एकाचवेळी एवढय़ा मोठय़ा संख्येनं शस्त्रसज्ज सैनिकांनी शरणागती पत्करली नव्हती. भारतीय सैन्यानं इतिहास घडविला. पाकिस्तानी सैनिक बॉर्डरवर बलात्कार करताना, छळताना विचार करीत नसत की, ही स्त्री कोणत्या धर्माची आहे. दोन्ही धर्माच्या स्त्रियांवर बलात्कार करीत असत. सैनिक आणि बलात्कार हा युद्धाच्या इतिहासाचा अविभाज्य भाग राहिला आहे. पहिल्या आणि दुसर्या अशा दोन्ही महायुद्धात मोठय़ा प्रमाणात स्त्रियांवर बलात्कार झाले आहेत. हिटलरच्या नाझी सैन्यानं जसे असंख्य अमानुष बलात्कार केलेत तसंच प्रमाण कमी असलं तरी दोस्त राष्ट्रांच्या सैनिकांनीही बलात्कार केले आहेत. सैनिकांच्या बलात्कारांनी तर सारा भारताचा इतिहास भरलेला आहे. शिवाजी राजांच्या उदयाच्या आधी युद्धात प्रदेश जिंकला की जिंक णारे सैनिक, सरदार सारेच त्या परिसरातील तरुण, सुंदर स्त्रियांना पकडून बलात्कार करीत असत. तेवढय़ानं मन भरलं नाही तर त्यातील विशेष सुंदर स्त्रियांना सोबत घेऊन जात आणि आपल्या नाटक शाळेत व जनानखान्यात भरती करीत असत. युद्धात जिंकण्यासोबतच पराजित परिसरातील स्त्रियांना भोगण्याचा, पळविण्याचा, बलात्कार करण्याचा अधिकारच प्राप्त होतो. असा समज आणि शिरस्ता त्या काळी होता. आपल्या सैनिकांना असे बलात्कार करण्यास बंदी घालणारा, ही आज्ञा मोडल्यास कुणाचाही मुलाहिजा न ठेवता त्याला कडक शिक्षा करणारा पहिला राजा इतिहासानं पाहिला तो शिवाजी राजा. स्त्रियांचा सन्मान राखणारा, तो सन्मान राखलाच जाईल याची काळजी घेणारा जाणता राजा म्हणूनच अद्वितीय आहे, महान आहे. पण शिवाजी राजा नंतर काय? काश्मीर, पंजाब, नागालंॅड वगैरे परिसरात काय घडलं? भारतीय सैनिकांवर बलात्काराचे अनेक आरोप झालेत. भारतीय कायद्यानुसार काही सैनिकांना शिक्षाही झाली. पुरुष स्त्रीवर बलात्कार का करतो? बलात्कार करणारा पुरुष विकृत असतो का? की बलात्कार करण्यास प्रोत्साहन देणारी मानसिकता घडविणारी परिस्थिती विकृत असते? या परिस्थितीला पुरुषप्रधान संस्कृती म्हणतात का? या संस्कारात घडलेल्या प्रत्येक पुरुषाच्या मनाच्या एका कोपर्यात बलात्कारी दडला आहे का? पुढे शोधू या प्रश्नांची उत्तरं. (लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक आहेत ) भ्रमणध्वनी : 9371014832 एारळश्र- ीहूरारपर्रीùीशवळषषारळश्र.लेा |
Saturday, 29 December 2012
मनातील भावनांचा मोकळेपणाने निचरा करा
मी नियमितपणे स्वसंमोहन व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळा चालवितो. त्यामध्ये 'ताणतणाव नियोजन' हा विषय प्रभावीपणे तर शिकविला जातोच, पण सोबत संमोहन प्रक्रियाही शिकवली जाते. जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात विदर्भात पाच-सहा ठिकाणी या कार्यशाळा होणार आहेत. सुरुवातीला मनात निर्माण झालेलं टेंशन तसंच साचत गेलं, तर पुढे त्याचं रूपांतर अँनक्झायटीमध्ये- चिंता, काळजी, अस्वस्थता होतं. त्याचे शरीरावर, मनावर खूप दुष्परिणाम होतात. शरीरावर होणारे दुष्परिणाम-विकार- कशरीं वशीशरीश, रक्तदाब - इश्रेव झीशर्ीीीश, मधुमेह- ऊळरलशींशी, सांधेदुखी, डोकेदुखी, अनेक प्रकारचे चर्मरोग, दमा-अस्थमा, निद्रानाश, इतर मनोविकार आजार. मनावर होणारे दुष्परिणाम बुद्धिकौशल्यावर प्रतिकूल परिणाम, निर्णयक्षमतेवर प्रतिकूल परिणाम, आत्मविश्वास ढासळतो, स्वत:वरचे नियंत्रण सुटते, स्मरणशक्ती खालावते. मागच्या लेखात आपण ताणतणावावर नियंत्रण मिळविण्यासाठी वा ताणतणाव सहजासहजी आपल्या जीवनात निर्माणच होणार नाही यासाठी काय करायचे ते पाहिलं होतं. एकूण 11 उपाय आपण करू शकतो, वापरू शकतो याचा विस्तारानं आढावा घेतला होता. आता पुढील उपाय पाहू या. वेळच्या वेळी आपल्याला आपल्या भावनेचा निचरा करता आला पाहिजे : काय होतं की, दरवेळी आपल्या सगळ्याच भावना आपल्या जीवनामध्ये व्यक्त करता येत नाहीत, कारण काही सामाजिक दडपणं आणि नीतिनियम असतात. एवढंच नव्हे, तर सभ्यपणाच्या कल्पना असतात. त्यामुळे अनेकदा वेगवेगळ्या प्रकारच्या भावना आपल्याला दाबून टाकाव्या लागतात आणि मग या जर तशाच साचत गेल्या तर अत्यंत वाईट असे दुष्परिणाम आपल्याला पुढच्या जीवनामध्ये भोगावे लागतात. त्यामुळे भावनेचा निचरा करणारे तंत्र आपल्या जीवनामध्ये असणं नितांत गरजेचं आहे. याला 'कॅथारसिस' असा शब्द इंग्रजीमध्ये वापरला जातो. 'परझीन'-'शुद्ध होणं.' एखादा स्पंज आहे. हा स्पंज ज्यावेळेस घाण गोळा करतो आणि या स्पंजला दाबून आपण ती घाण काढून टाकतो, त्या पद्धतीने आपल्या मनाचं शुद्धीकरण झालं पाहिजे, ही कल्पना या कॅथारसिसमागे आहे. नाटक-सिनेमामधूनसुद्धा आपल्या भावनेचा सुंदर निचरा होतो. याकरिता मला एक उदाहरण तुम्हाला सांगावसं वाटतं. माझ्याकडं एक विदर्भातील बाई काम करायला होती. विजय कोंडकेचा 'माहेरची साडी' नावाचा सिनेमा लागला होता. ती मला म्हणायला लागली, ''साहेब, मी काही दोन-तीन दिवस कामाला येणार नाही. मी ममईला (मुंबईला) सिनेमा पाहायला चालले.'' मी म्हटलं, ''दोन-तीन दिवस कशाला पाहिजे?'' खरं म्हणजे, मी नालासोपार्याला राहायचो. मुंबई म्हणजे काही दूर नव्हती. ''तू एका दिवसात जाऊन पाहून ये आणि मग दुसर्या दिवशी कामाला ये.'' ''नाय जी, म्हणे दोन-तीन दिवस तर लागलंच मले. सिनेमा पाहून तर यायचंच आहे.'' आता ही बाई गेली आणि तब्बल चार-पाच दिवसांनी आली. ''काय गं, तू सिनेमा पाहायला गेली होती एक दिवसाकरिता आणि तीन-चार दिवसांनी परत येते म्हणजे काय?'' ती म्हणाली, ''अजी तुम्हाला काय सांगू, अरे इतका मस्त सिनेमा आहे ना? अवं, मी गेले सिनेमाले अन् आतमध्ये गेल्या गेल्या जी धो-धो रडायला लागली. सिनेमाभर रडत होती. लई बरं वाटलं. म्या म्हटलं काय, लई चांगला सिनेमा आहे. पुन्हा पाहिल्याशिवाय काय परत जायचंच नाही. लागली म्हणे लाईनीत. अहो कायची! लवकर सिनेमाची एक तिकीट मिळते का? एवढी मोठी रांग! चौथ्या दिवशीचं तिकीट भेटलं, मी राहिली तिकडं. चौथ्या दिवशीचा सिनेमा पाहूनच परत आली.'' आता 'माहेरची साडी' हा सिनेमा आहे, जो आतमध्ये शिरल्यापासून शेवटपर्यंत स्त्रियांना धो धो रडवतो. त्या सिनेमाने आजपर्यंतचे मराठीतले उत्पन्नाचे सगळे रेकॉर्ड्स मोडले, एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर हा सिनेमा चालला आणि या सिनेमाचा प्रेक्षकवर्ग नव्वद टक्क्यांपेक्षा अधिक स्त्रिया होत्या, याचं कारण काय आहे? मनामध्ये साचून असलेल्या सगळय़ा भावनांचा निचरा करण्याची संधी मिळते. धो धो रडूनसुद्धा आपलं मन निर्मळ झाल्यामुळे, परझीन झाल्यामुळे, कॅथारसिस झाल्यामुळे आपल्याला खूप बरं वाटतं. हीही मानवी जीवनातली एक नितांत आवश्यक गरज असू शकते. नाटक-सिनेमामधून कॅथारसिस घडतं याला अत्यंत महत्त्व आहे. त्याकरिता केवळ नाटक- सिनेमाच पुरेसे आहेत असं नव्हे. तुमच्या- माझ्या जीवनामध्ये आपल्याला वेगवेगळे मित्र-मैत्रिणी जोडता आले पाहिजेत. त्यांच्यासोबत छानपैकी आपल्याला आपल्या मनातलं बोलता आलं पाहिजे. मनामध्ये जे काही आहे ते उत्तम पद्धतीनं व्यक्त करता आलं पाहिजे. याबाबत मी जेव्हा नेहमी सगळय़ांसोबत बोलतो. प्रामुख्याने ज्या वेळेस हिपनोथेरपिस्ट कोर्समध्ये संमोहन उपचारांचा भाग शिकवत असताना स्त्रियांच्या कौन्सिलिंगबद्दल काही गोष्टी मला सांगाव्या लागतात, तेव्हा एक गोष्ट मी आवर्जून सांगत असतो. भारतीय स्त्रीबाबत एक अडचण आहे. तिला आपल्या मनातलं इतरांजवळ बोलता येत नाही. मी असं म्हटल्यानंतर, तुम्ही कदाचित मला हसाल. कारण स्त्रिया खूप बोलतात अशी आपली समजूत आहे. हे खरं आहे की, स्त्रिया खूप बोलतात. चार स्त्रिया एकत्र आल्या की प्रचंड बोलत बसतात; पण आपल्या मनातलं सोडून बाकी सगळं बोलतात. कारण लहानपणापासून त्यांना अनुभव आलेला असतो की, आपल्या मनातील एखादं गुपित कोणाला सांगितलं किंवा अगदी आतली गोष्ट कुणाजवळ सांगितली की, ती गोष्ट बाहेर फुटते आणि त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात. त्यामुळे हळूहळू स्त्री हे शिकते की, सगळं बोलायचं, पण आपल्या मनातलं गुपित मात्र कोणाजवळ सांगायचं नाही. आपल्या मनात दबून असलेल्या भावना कुणाला सांगायच्या नाहीत. त्यामुळे वर्षानुवर्षे या भावना मनामध्ये साचत जातात, साचत जातात, साचत जातात आणि त्याचे दुष्परिणाम मनोरुग्ण बनून मग त्यांना भोगावे लागतात किंवा वेगवेगळय़ा पद्धतीचे मानसिक आजार पुढे जाऊन भोगावे लागतात. त्यामुळे मी नेहमी म्हणत असतो की, प्रत्येक स्त्रीला आपल्या मनातलं मोकळेपणाने बोलता येईल असं स्थान असण्याची गरज आहे; आणि जे थेरपिस्ट आहेत, कौन्सिलर्स आहेत त्यांचं हे महत्त्वाचं काम आहे की, त्यांनी विश्वासाचा एक असा खांदा स्त्रीला उपलब्ध करून दिला पाहिजे की, ज्या खांद्यावर डोकं ठेवून, विश्वासाने त्यांना जे सांगावसं वाटतं ते सांगता आलं पाहिजे आणि मोकळेपणानं रडता आलं पाहिजे. पण हे प्रत्येकालाच काही शक्य नाही किंवा दरवेळी आपल्याला कौन्सिलरची किंवा या पद्धतीच्या समंजस थेरपिस्टची मदत मिळेलच असं नाही. याकरिता दुसरा पर्याय आहे. स्त्रियांनीसुद्धा आपल्या जीवनामध्ये अशा काही समंजस स्त्रियांसोबत मैत्री निर्माण केली पाहिजे की, ज्या समजून घेऊ शकतात, आपल्या मनातलं ऐकू शकतात आणि हे गुपित दुसर्याजवळ न सांगण्याइतपत समंजसपणा त्यांच्यामध्ये आहे, असा विश्वास तुम्हाला वाटतो. या पद्धतीचे काही चांगले मित्र-मैत्रिणी जोडणं हेसुद्धा आवश्यक आहे. त्यातून उत्तम पद्धतीने भावनेचा निचरा होऊ शकतो. थोडक्यात, जी माणसं मनातल्या मनात साठवून ठेवतात, सहजासहजी आपल्या भावना मोकळेपणाने व्यक्त करत नाहीत, ती माणसं या पद्धतीच्या आजारांना म्हणजे एंग्झायटी प्रोन आजारांना मोठय़ा प्रमाणावर बळी पडत असतात. त्यामुळे या माणसांनी आपल्या भावना मोकळेपणाने इतरांजवळ व्यक्त केल्या पाहिजेत. समजा, तुम्हाला एखाद्या व्यक्तीपुढे या भावना मोकळेपणाने व्यक्त करणं अडचणीचं वाटत असेल, तर आजच्या आधुनिक काळामध्ये काही दुसरेही पर्याय आहेत. उदाहरणार्थ,आपण एखाद्या मैत्रिणीशी किंवा मित्राशी बोलत आहात असं समजून बोलत जावं आणि टेपरेकॉर्डर ऑन ठेवावा. टेपरेकॉर्डरमध्ये आपण जे काही बोलतो ते नंतर एक-दोनदा ऐकावं. त्यातून बोलण्याचं समाधान मिळतं. पुन्हा ते ऐकल्यामुळे आपल्याला त्याची खात्री वाटते की, हे सगळं आपण बोललेलो आहोत. त्यातूनसुद्धा भावनेचा निचरा होऊ शकतो. दुसरा पर्याय 'लिखाण' हासुद्धा असू शकतो. आपण कागद-पेन घेऊन बसावं आणि आपल्याला जे वाटतं ते सगळंच्या सगळं कागदावर उतरवावं. त्यातूनसुद्धा आपल्या भावनेचा निचरा होऊ शकतो. क्रिएटिव्हिटी : आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये निर्मितीचा आनंद देणारं काम असणं किंवा असला काही छंद असणं नितांत गरजेचं आहे. खरं म्हणजे आपण जे काम करतो, त्यातूनच जर आपल्याला निर्मितीचा आनंद मिळत असेल, तर डेफिनेटली आपल्या जीवनाचं सार्थक बनून जातं, कारण त्यातून आपल्याला इतका सुंदर आनंद मिळत राहतो की, एकूणच सगळय़ा रपुळशीूं आणि ींशपीळेप चा निचरा होत जातो आणि एक निरोगी, आनंदमय जीवन जगण्याची आपल्याला संधी मिळते. पण मॅक्झिमम लोकांना आपल्याला आवडेल किंवा निर्मितीचा आनंद देईल असं काम करण्याची संधी मिळत नाही. त्यावेळेस असे काही छंद आपल्याला जोपासता आले पाहिजेत. कितीतरी प्रकारचे, निर्मितीचा आनंद देणारे छंद असू शकतात. त्याला आपण चित्रकला-पेंटिंग म्हणतो किंवा मूर्तिकला म्हणतो, त्याशिवाय फोटोग्राफीसारखं तंत्र की, ज्यातून आपल्याला निर्मितीचा आनंद मिळू शकेल. संगीत आहे. लेखन आहे. साधं बागकाम आहे. एवढंच नव्हे, तर वेगवेगळ्या पद्धतीच्या कला आहेत. या कलांमधून हा आनंद आपल्याला मिळू शकतो. सगळं जाऊ द्या, साधा उत्तम स्वयंपाक करण्यातसुद्धा आनंद आहे. अशा कितीतरी क्रिएटिव्ह गोष्टी आपल्या जीवनात असू शकतात. ज्या आपल्याला आवडतात. ज्यातून आपल्याला आनंद मिळतो आणि त्या उपयुक्तसुद्धा आहेत. याचं जर कॉम्बिनेशन करता आलं तर पुन्हा रपुळशीूं आणि ींशपीळेप चा निचरा होण्यास प्रचंड मदत मिळते. कारण या सगळ्या क्रिएटिव्ह कामांमध्ये आपण पूर्ण एकाग्र होतो, समरस होतो आणि समरसतेने आणि एकाग्रतेने आपणास जो आनंद मिळायचा तो मिळतो. आता आपल्याला या तेरा मुद्यांचा मी जो उल्लेख केला; हे सगळेच्या सगळे तेरा मुद्दे आपल्या जीवनात अंतर्भूत करता येतीलच असं नाही; पण किमान पहिले पाच मुद्दे कम्पलसरी आपल्याला जीवनात आणावे लागतात. एखादं रिलॅक्सेशन तंत्र, आपल्या विचारप्रक्रियेमध्ये विधायक विचार करण्याचा बदल, आयुष्याबद्दलचा एक विधायक दृष्टिकोन स्वीकारणं, स्वभावामध्ये अनुकूल बदल करणं आणि शांत, खोल, समाधानकारक झोप मिळणं हे पाच मुद्दे आपल्यापैकी प्रत्येकाच्या जीवनात आपल्याला अंतर्भूत करताच आले पाहिजेत. त्यानंतर पुढचे जे काही आठ मुद्दे आहेत, त्यापैकी किमान चार ते पाच मुद्दे आपल्या जीवनामध्ये अंतर्भूत करता आले म्हणजे, एकूण नऊ ते दहा मुद्दे जर आपल्या जीवनामध्ये असू शकले तर मग आपल्याला रपुळशीूं आणि ींशपीळेप पासून कायमचं दूर राहून अतिशय शांत-रिलॅक्स-आनंदी जीवन जगण्याची संधी घेता येते. मला वाटतं, जे काही मी तुमच्यापुढे मांडलं आहे त्याचा नीट विचार करा. आयुष्यामध्ये अशी मनोवृत्ती निर्माण करा की, कोणत्याच प्रकारचे रपुळशीूं आणि ींशपीळेप आपल्या मनामध्ये निर्माण होणार नाहीत. आपलं जीवन पाहिलं तर ते अतिशय सुंदर आहे, सोपं आहे, सहज आहे, आनंदाने जगण्यासारखं आहे. आनंदाने जगणं हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे. त्यामुळे मी एवढंच सांगेन की, या मुद्यांचा नीट विचार करून आजपासूनच आपलं जीवन अतिशय शांत, रिलॅक्स, आनंदी अवस्थेत जगायचं, असं ठरवू या. (लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक आहेत.) भ्रमणध्वनी-9371014832 |
Tuesday, 25 December 2012
ताणतणावाचं नियोजन तुमच्याच हाती
तुम्हाला जर ताणतणावरहित
जगायचं असेल तर आयुष्यामध्ये रिलॅक्सेशन तंत्राची जोड देणं अपरिहार्य आहे.
तुम्ही त्याकरिता साधे रिलॅक्सेशन वापरा, संमोहन उपचार वापरा, योगा किंवा
मेडिटेशन वापरा किंवा इतर कोणतेही रिलॅक्सेशनचे तंत्र वापरा; पण त्याची जोड
देणे नितांत गरजेचे आहे. कारण आपल्या शरीरामध्ये ज्या प्रकारची रपुळशीूं
आणि ींशपीळेप निर्माण होतात, अँंड्रीनॅलीन आणि स्टीरॉईड्सचं प्रमाण साचत
जातं त्याचा निचरा करण्यासाठी रिलॅक्सेशन अपरिहार्य आणि आवश्यक आहे.
त्याशिवाय एवढय़ा उत्तम पद्धतीने निचराच होऊ शकत नाही हे कृपया आपण समजून
घ्या. संमोहन उपचाराचा उपयोग तुम्ही व्यक्तिमत्त्व विकासाकरिता करता. इतरही
अनेक गोष्टींचा उपयोग व्यक्तिमत्त्व विकासासारखा तुम्ही करू शकाल; पण
रिलॅक्सेशन, संमोहनाचा उपयोग स्वत:चं शरीर उत्तम पद्धतीने रिलॅक्स
करण्याकरिता जो करू शकतो त्याला मात्र दुसरा पर्याय नाही हे कृपया समजून
घ्या.
आपल्या विचारप्रक्रियेमध्ये बदल केला पाहिजे - आपल्याला जर नकारात्मक विचार करण्याची सवय असेल तर सातत्याने आपण आपल्या मनामध्ये ताणतणावच निर्माण करत जाणार आहोत. त्यामुळं आपल्याला विधायक विचार करण्याची सवय निर्माण करणं नितांत गरजेचं आहे. त्याकरिता एक तर संमोहन उपचार आपल्याला वापरता येतात आणि त्यातून ही सवय निर्माण करता येते, तर दुसर्या बाजूने सातत्याने आपल्या कॉन्शस माईंडमध्ये स्वत:च स्वत:ला सांगून, 'अरे, मला नकारात्मक विचार नाही करायचा बरं का! आता मी सतत पॉझिटिव्ह विचार करणार आहे,' असं दरवेळी स्वत:ला दक्ष राहून सांगत जाण्यातूनसुद्धा आपल्यामध्ये बदल घडवून आणता येतो. जीवनाकडे पाहण्याचा एक व्यापक, विधायक माणुसकीपूर्ण दृष्टिकोन स्वीकारणे आपल्याला नितांत गरजेचं आहे. त्यामुळे आपण स्ट्रेस आणि इतर सगळं टेन्शन्स आपल्या जीवनातून घालवू शकतो.
आपल्या स्वभावामध्ये बदल करणं - जोपर्यंत आपण आपल्या स्वभावामध्ये विधायक बदल करू शकणार नाही, तोपर्यंत या स्ट्रेसपासून आणि टेन्शनपासून आपण कधीही स्वत:ला वाचवू शकणार नाही. अर्थात याकरिता पुन्हा संमोहन उपचार आपल्याला ताकदीने मदत करतात. स्वभावामध्ये बदल करण्यासाठी त्या पद्धतीचे बदल आपल्याला घडवून आणता येतात.
शांत, खोल आणि समाधानकारक झोप मिळाली पाहिजे - झोप हे टेन्शन-ताणतणाव याचा निचरा करणारं अतिशय उत्तम औषध आहे. जर आपल्याला रोज शांत, खोल आणि गाढ झोप लागत राहिली तर फारसे ताणतणाव शिल्लकच राहत नाहीत; पण यात एक अडचण आहे. ज्यावेळेस आपल्या मनावरच्या ताणाचे प्रमाण वाढते, टेन्शनचे प्रमाण वाढते, रपुळशीूं खूप वाढते त्यावेळेस आपल्याला झोपच येत नाही. रपुळशीूं आणि ींशपीळेप हे खर्या अर्थाने झोपेचे शत्रू आहेत. म्हणजे ज्यांच्यामुळे त्याचा निचरा होतो आणि आपण नॉर्मल होतो, पूर्ववत होतो, ती झोपच जर आपल्याला मिळाली नाही तर आपल्याला खर्या अर्थानं अतिशय कठीण समस्येला तोंड द्यावं लागतं. याकरिता पुन्हा आपल्याला संमोहन उपचारांची मदत होते. समजा एखाद दिवशी ताणाचे प्रमाण वाढलेले असल्यामुळे झोप येत नसेल, तर संमोहन उपचार करा. कॅसेट ऐका.. तुमच्या मनावरचे ताण कमी होतील. तरीही झोप आली नाही तर पुन्हा दुसर्यांदा ऐका, तिसर्यांदा ऐका! मनावरचे ताण बरेचसे कमी झाले की तुम्हाला छानपैकी झोप लागेल. त्यामुळे शांत, खोल व समाधानकारक झोप हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. अर्थात कुणी किती तास झोपायचं हे व्यक्तिपरत्वे अवलंबून असतं. याबाबत कोणताही असा नियम सांगत नाही की सहा तास, सात तास झोप पुरेशी होते. काही माणसांना साडेसात-आठ तासांची झोप आवश्यक वाटते. काही माणसांना पाच तासातसुद्धा झोप पूर्ण होते याचे समाधान मिळते. त्यामुळे माणसानुसार, त्याच्या व्यक्तिमत्त्वानुसार, त्याच्या आवश्यकतेनुसार त्याच्या झोपेचे प्रमाण कमी-अधिक असू शकते; पण शांत, खोल आणि समाधानकारक झोप मिळणं हे मात्र नितांत गरजेचं आहे.
व्यायाम - नियमित आणि आवश्यक तेवढा व्यायाम जर आपण करत गेलो, तर जे अँंड्रीनॅलीन आणि स्टीरोईड्स अतिरिक्त प्रमाणात आपल्या शरीरात साचतात त्यांचा निचरा होण्यासाठी मदत मिळते. कारण व्यायाम करताना जी अँक्शन घडते त्यातून घाम येऊन पुढील क्रियेसाठी स्नायू तयार होतात आणि त्यामुळे शरीरात अतिरिक्त प्रमाणात साचलेली अँड्रीनॅलीन आणि स्टीरॉईड्स कमी होतात. त्यामुळे त्याचे दुष्परिणाम आपल्याला कमी प्रमाणात भोगावे लागतात.
आहार - आहारसुद्धा आवश्यक आहे. योग्य आणि आवश्यक तेवढा संपूर्ण आहार नितांत गरजेचा आहे.
आपल्याला व्यसनांपासून दूर राहता आलं पाहिजे - दारू, तंबाखू, सिगारेट यासारख्या व्यसनांपासून आपण दूर राहिलो पाहिजे. मला पुन्हा एकदा प्रकर्षाने तुम्हाला जाणीव करून द्यावीशी वाटते की दारू, सिगारेट, तंबाखू अशी व्यसनं रपुळशीूं ीिेपश व्यसनं आहेत. आपल्यापैकी अनेक सिगारेट ओढणार्यांना असं वाटतं की सिगारेट ओढल्यानंतर रपुळशीूं निघून जाते व आपण रिलॅक्स होतो; पण ही वस्तुस्थिती नाही. सिगारेटची सवय आपल्या शरीराला लागलेली असते. त्यामुळे मुद्दाम शरीर कृत्रिम रपुळशीूं निर्माण करतं. जेणेकरून आपण सिगारेट ओढावी आणि मग सिगारेट ओढल्यानंतर आपलं शरीर थोडंसं रिलॅक्स होतं. पुन्हा रपुळशीूं लीशरींश होते. पुन्हा ताणतणाव निर्माण होतात. यातून सातत्याने ताणतणाव निर्माण करून घेण्याची सवय दारू पिणार्या माणसाला, सिगारेट ओढणार्या माणसाला, तंबाखू खाणार्या माणसाला लागते. तथापि या व्यसनांमुळे आपल्याला रिलॅक्सेशन मिळते हा केवळ गैरसमज आहे हे कृपया आपण समजून घ्या.
जीवनामध्ये काही अर्थपूर्ण नाती असली पाहिजेत, प्रेम असले पाहिजे - जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये प्रेम नाही, प्रेमाला वाव देणारी माणसं नाहीत तोपर्यंत आपल्या जीवनात जगण्यात अर्थ वाटत नाही आणि मग ही परिस्थिती रपुळशीूं आणि टेन्शन निर्माण करणारी परिस्थिती ठरते. म्हणून आयुष्यामध्ये चांगले मित्र असणं, चांगल्या मैत्रिणी असणं, मुलं असणं, जोडीदार असणं, इतर कौटुंबिक नाती असणं हे नितांत गरजेचं आहे.
समाधान देणारा सेक्स - खरं म्हणजे पती-पत्नीच्या संबंधांमध्ये दोघांनाही पुरेशी तृप्ती मिळाली पाहिजे. दोघांनाही समाधान देणारा सेक्स असला पाहिजे. मानवी जीवनामध्ये सेक्समधून जेवढा रपुळशीूं आणि ींशपीळेप चा निचरा होतो तेवढा सुंदर निचरा होण्याचे दुसरे उदाहरण नाही. माणूस अंतर्बाह्य सुंदर पद्धतीने रिलॅक्स होतो. भारतीय माणूस सेक्सला फार महत्त्व देत नाही. खरं म्हणजे अनेकदा पती-पत्नीसुद्धा सेक्स या विषयावर परस्परांसोबत बोलत नाहीत. त्यातल्या त्यात साधारणत: असं मानलं जातं की, पुरुषाची तृप्ती झाली की संपलं. त्यातून स्त्रियांमधलं असमाधान मात्र वाढत जातं. हा आपल्या देशामधला सगळय़ात मोठा समस्या असणारा संदर्भ अनेकांना माहीतसुद्धा नसतो. त्यामुळे दोघांचीही लैंगिक तृप्ती हा मुद्दा आहे. पती-पत्नीने हा मुद्दा समजून घेतला पाहिजे आणि नियमितपणे दोघांनाही समाधान देणारा सेक्स उपलब्ध होईल याची काळजी घेतली पाहिजे. त्यामध्ये जर काही अडचणी येणार असतील तर त्यावर मात केली पाहिजे. संमोहन उपचार पद्धती अतिशय उत्तम पद्धतीने त्यावर मात करण्यासाठी आपल्याला मदत करू शकतात.
सेक्सच्या आड येणारा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रपुळशीूं आणि ींशपीळेप. अपुळशीूं आणि ींशपीळेप हे सेक्सचा शत्रू आहेत. समजा काही कारणामुळे पतीला किंवा पत्नीला, कोणालाही प्रचंड प्रमाणावर मनावर जर ताण निर्माण झालेला असेल, कोणत्याही एखाद्या गोष्टीमुळे ती किंवा तो अस्वस्थ असेल तर दोघांना सेक्समध्ये सहभागी होता येत नाही आणि पतीबाबत ही बाब असेल तर त्याला परफॉर्मन्स करता येत नाही. त्यामुळे दोघांमध्ये उत्तम सेक्स तर सोडाच, पण साधं सेक्श्युल लाईफसुद्धा उरू शकत नाही. त्यामुळे स्वाभाविकच यावर मात करण्यासाठी रिलॅक्सेशनचं तंत्र उपयोगी पडतं. आधी जर आपण संमोहन किंवा कोणतंही रिलॅक्सेशनचं तंत्र वापरलं तर स्वाभाविकच रपुळशीूं आणि ींशपीळेप चं प्रमाण कमी होतं आणि ते पुरेसे कमी झाल्यानंतर सेक्सचा झशीषेीारपलश उत्तमपणे साधता येतो. त्यामुळे संमोहन उपचार पद्धती सेक्सवरच्या प्रत्येक समस्येला घालवण्यासाठी, त्यावर मात करण्यासाठी आपल्याला सुंदररीत्या मदत करू शकते.
मनोरंजन - मनाला पुरेसा विरंगुळा देणारं मनोरंजन आपल्या जीवनामध्ये असलं पाहिजे. आपण नाटक पाहतो. नाटकामध्ये खर्या अर्थाने शिरतो, समरस होतो, त्याचा आनंद आपण घेतो. त्यातून आपल्याला मनोरंजन मिळतं. सिनेमामध्ये आपण याच पद्धतीने शिरतो, खर्या अर्थाने त्याच्याशी तादात्म्य होतो. त्यातून आपल्याला आनंद मिळतो. डान्स आहे, गाणी आहेत, दूरदर्शन आहे. या सगळय़ाच प्रकारच्या मनोरंजनाला एक खास महत्त्व आपल्या जीवनामध्ये आहे. जर आपण यामध्ये मनापासून सहभागी झालो, तर संपूर्ण मन त्यामध्ये गुंतल्यामुळे स्वाभाविकच सगळय़ा प्रकारच्या ींशपीळेपी आणि रपुळशींळशी चा निचरा व्हायला मदत मिळते आणि पुन्हा ताजेतवाने होऊन आपण जीवनाला सुरुवात करू शकतो. यातलं सगळय़ात उत्तम जर कोणतं मनोरंजन असेल तर ते डान्स आहे. कारण डान्समध्ये तीन गोष्टी एकत्र येतात. यामध्ये रिदम-ताल, शारीरिक व्यायाम आणि गाणी या तीन गोष्टी एकत्र येतात.
महाराष्ट्रीयन माणसं याबाबतीत मात्र बरीचशी नतद्रष्ट आहेत. महाराष्ट्रीयन माणसं काय म्हणतात, तू नाच आम्ही पाहतो. ते तमासगिरांना नाचायला लावतात. थोडक्यात 'तुम्ही निरोगी रहा, आम्ही तुम्हाला पाहत पाहत रोगी बनत जातो', या पद्धतीच्या मनोवृत्तीने जगणारी आपण महाराष्ट्रीयन माणसं आहोत. नाचणार्यांबाबत आपण बोलतानासुद्धा 'नाच्या', 'तमासगीर' असे शब्द वापरतो. भारतामधल्याच इतर काही कल्चर आहेत, ज्यांच्या जीवनाचा 'नाच' हा अविभाज्य भाग आहे. आदिवासी, पंजाबी, गुजराती अशा बहुतांश कल्चरमध्ये 'नाच' हा त्यांच्या जीवनाचा 'अपरिहार्य आणि अविभाज्य' भाग आहे. एवढेच नव्हे तर साऊथ इंडियन्समध्येसुद्धा 'नाच' हा त्यांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा, प्रतिष्ठेचा, सन्मानाचा भाग आहे. महाराष्ट्रीयन माणसं मात्र याबाबत नतद्रष्ट आहेत.
(लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन
समितीचे संस्थापक, संघटक आहेत.)
भ्रमणध्वनी-9371014832
आपल्या विचारप्रक्रियेमध्ये बदल केला पाहिजे - आपल्याला जर नकारात्मक विचार करण्याची सवय असेल तर सातत्याने आपण आपल्या मनामध्ये ताणतणावच निर्माण करत जाणार आहोत. त्यामुळं आपल्याला विधायक विचार करण्याची सवय निर्माण करणं नितांत गरजेचं आहे. त्याकरिता एक तर संमोहन उपचार आपल्याला वापरता येतात आणि त्यातून ही सवय निर्माण करता येते, तर दुसर्या बाजूने सातत्याने आपल्या कॉन्शस माईंडमध्ये स्वत:च स्वत:ला सांगून, 'अरे, मला नकारात्मक विचार नाही करायचा बरं का! आता मी सतत पॉझिटिव्ह विचार करणार आहे,' असं दरवेळी स्वत:ला दक्ष राहून सांगत जाण्यातूनसुद्धा आपल्यामध्ये बदल घडवून आणता येतो. जीवनाकडे पाहण्याचा एक व्यापक, विधायक माणुसकीपूर्ण दृष्टिकोन स्वीकारणे आपल्याला नितांत गरजेचं आहे. त्यामुळे आपण स्ट्रेस आणि इतर सगळं टेन्शन्स आपल्या जीवनातून घालवू शकतो.
आपल्या स्वभावामध्ये बदल करणं - जोपर्यंत आपण आपल्या स्वभावामध्ये विधायक बदल करू शकणार नाही, तोपर्यंत या स्ट्रेसपासून आणि टेन्शनपासून आपण कधीही स्वत:ला वाचवू शकणार नाही. अर्थात याकरिता पुन्हा संमोहन उपचार आपल्याला ताकदीने मदत करतात. स्वभावामध्ये बदल करण्यासाठी त्या पद्धतीचे बदल आपल्याला घडवून आणता येतात.
शांत, खोल आणि समाधानकारक झोप मिळाली पाहिजे - झोप हे टेन्शन-ताणतणाव याचा निचरा करणारं अतिशय उत्तम औषध आहे. जर आपल्याला रोज शांत, खोल आणि गाढ झोप लागत राहिली तर फारसे ताणतणाव शिल्लकच राहत नाहीत; पण यात एक अडचण आहे. ज्यावेळेस आपल्या मनावरच्या ताणाचे प्रमाण वाढते, टेन्शनचे प्रमाण वाढते, रपुळशीूं खूप वाढते त्यावेळेस आपल्याला झोपच येत नाही. रपुळशीूं आणि ींशपीळेप हे खर्या अर्थाने झोपेचे शत्रू आहेत. म्हणजे ज्यांच्यामुळे त्याचा निचरा होतो आणि आपण नॉर्मल होतो, पूर्ववत होतो, ती झोपच जर आपल्याला मिळाली नाही तर आपल्याला खर्या अर्थानं अतिशय कठीण समस्येला तोंड द्यावं लागतं. याकरिता पुन्हा आपल्याला संमोहन उपचारांची मदत होते. समजा एखाद दिवशी ताणाचे प्रमाण वाढलेले असल्यामुळे झोप येत नसेल, तर संमोहन उपचार करा. कॅसेट ऐका.. तुमच्या मनावरचे ताण कमी होतील. तरीही झोप आली नाही तर पुन्हा दुसर्यांदा ऐका, तिसर्यांदा ऐका! मनावरचे ताण बरेचसे कमी झाले की तुम्हाला छानपैकी झोप लागेल. त्यामुळे शांत, खोल व समाधानकारक झोप हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. अर्थात कुणी किती तास झोपायचं हे व्यक्तिपरत्वे अवलंबून असतं. याबाबत कोणताही असा नियम सांगत नाही की सहा तास, सात तास झोप पुरेशी होते. काही माणसांना साडेसात-आठ तासांची झोप आवश्यक वाटते. काही माणसांना पाच तासातसुद्धा झोप पूर्ण होते याचे समाधान मिळते. त्यामुळे माणसानुसार, त्याच्या व्यक्तिमत्त्वानुसार, त्याच्या आवश्यकतेनुसार त्याच्या झोपेचे प्रमाण कमी-अधिक असू शकते; पण शांत, खोल आणि समाधानकारक झोप मिळणं हे मात्र नितांत गरजेचं आहे.
व्यायाम - नियमित आणि आवश्यक तेवढा व्यायाम जर आपण करत गेलो, तर जे अँंड्रीनॅलीन आणि स्टीरोईड्स अतिरिक्त प्रमाणात आपल्या शरीरात साचतात त्यांचा निचरा होण्यासाठी मदत मिळते. कारण व्यायाम करताना जी अँक्शन घडते त्यातून घाम येऊन पुढील क्रियेसाठी स्नायू तयार होतात आणि त्यामुळे शरीरात अतिरिक्त प्रमाणात साचलेली अँड्रीनॅलीन आणि स्टीरॉईड्स कमी होतात. त्यामुळे त्याचे दुष्परिणाम आपल्याला कमी प्रमाणात भोगावे लागतात.
आहार - आहारसुद्धा आवश्यक आहे. योग्य आणि आवश्यक तेवढा संपूर्ण आहार नितांत गरजेचा आहे.
आपल्याला व्यसनांपासून दूर राहता आलं पाहिजे - दारू, तंबाखू, सिगारेट यासारख्या व्यसनांपासून आपण दूर राहिलो पाहिजे. मला पुन्हा एकदा प्रकर्षाने तुम्हाला जाणीव करून द्यावीशी वाटते की दारू, सिगारेट, तंबाखू अशी व्यसनं रपुळशीूं ीिेपश व्यसनं आहेत. आपल्यापैकी अनेक सिगारेट ओढणार्यांना असं वाटतं की सिगारेट ओढल्यानंतर रपुळशीूं निघून जाते व आपण रिलॅक्स होतो; पण ही वस्तुस्थिती नाही. सिगारेटची सवय आपल्या शरीराला लागलेली असते. त्यामुळे मुद्दाम शरीर कृत्रिम रपुळशीूं निर्माण करतं. जेणेकरून आपण सिगारेट ओढावी आणि मग सिगारेट ओढल्यानंतर आपलं शरीर थोडंसं रिलॅक्स होतं. पुन्हा रपुळशीूं लीशरींश होते. पुन्हा ताणतणाव निर्माण होतात. यातून सातत्याने ताणतणाव निर्माण करून घेण्याची सवय दारू पिणार्या माणसाला, सिगारेट ओढणार्या माणसाला, तंबाखू खाणार्या माणसाला लागते. तथापि या व्यसनांमुळे आपल्याला रिलॅक्सेशन मिळते हा केवळ गैरसमज आहे हे कृपया आपण समजून घ्या.
जीवनामध्ये काही अर्थपूर्ण नाती असली पाहिजेत, प्रेम असले पाहिजे - जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये प्रेम नाही, प्रेमाला वाव देणारी माणसं नाहीत तोपर्यंत आपल्या जीवनात जगण्यात अर्थ वाटत नाही आणि मग ही परिस्थिती रपुळशीूं आणि टेन्शन निर्माण करणारी परिस्थिती ठरते. म्हणून आयुष्यामध्ये चांगले मित्र असणं, चांगल्या मैत्रिणी असणं, मुलं असणं, जोडीदार असणं, इतर कौटुंबिक नाती असणं हे नितांत गरजेचं आहे.
समाधान देणारा सेक्स - खरं म्हणजे पती-पत्नीच्या संबंधांमध्ये दोघांनाही पुरेशी तृप्ती मिळाली पाहिजे. दोघांनाही समाधान देणारा सेक्स असला पाहिजे. मानवी जीवनामध्ये सेक्समधून जेवढा रपुळशीूं आणि ींशपीळेप चा निचरा होतो तेवढा सुंदर निचरा होण्याचे दुसरे उदाहरण नाही. माणूस अंतर्बाह्य सुंदर पद्धतीने रिलॅक्स होतो. भारतीय माणूस सेक्सला फार महत्त्व देत नाही. खरं म्हणजे अनेकदा पती-पत्नीसुद्धा सेक्स या विषयावर परस्परांसोबत बोलत नाहीत. त्यातल्या त्यात साधारणत: असं मानलं जातं की, पुरुषाची तृप्ती झाली की संपलं. त्यातून स्त्रियांमधलं असमाधान मात्र वाढत जातं. हा आपल्या देशामधला सगळय़ात मोठा समस्या असणारा संदर्भ अनेकांना माहीतसुद्धा नसतो. त्यामुळे दोघांचीही लैंगिक तृप्ती हा मुद्दा आहे. पती-पत्नीने हा मुद्दा समजून घेतला पाहिजे आणि नियमितपणे दोघांनाही समाधान देणारा सेक्स उपलब्ध होईल याची काळजी घेतली पाहिजे. त्यामध्ये जर काही अडचणी येणार असतील तर त्यावर मात केली पाहिजे. संमोहन उपचार पद्धती अतिशय उत्तम पद्धतीने त्यावर मात करण्यासाठी आपल्याला मदत करू शकतात.
सेक्सच्या आड येणारा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रपुळशीूं आणि ींशपीळेप. अपुळशीूं आणि ींशपीळेप हे सेक्सचा शत्रू आहेत. समजा काही कारणामुळे पतीला किंवा पत्नीला, कोणालाही प्रचंड प्रमाणावर मनावर जर ताण निर्माण झालेला असेल, कोणत्याही एखाद्या गोष्टीमुळे ती किंवा तो अस्वस्थ असेल तर दोघांना सेक्समध्ये सहभागी होता येत नाही आणि पतीबाबत ही बाब असेल तर त्याला परफॉर्मन्स करता येत नाही. त्यामुळे दोघांमध्ये उत्तम सेक्स तर सोडाच, पण साधं सेक्श्युल लाईफसुद्धा उरू शकत नाही. त्यामुळे स्वाभाविकच यावर मात करण्यासाठी रिलॅक्सेशनचं तंत्र उपयोगी पडतं. आधी जर आपण संमोहन किंवा कोणतंही रिलॅक्सेशनचं तंत्र वापरलं तर स्वाभाविकच रपुळशीूं आणि ींशपीळेप चं प्रमाण कमी होतं आणि ते पुरेसे कमी झाल्यानंतर सेक्सचा झशीषेीारपलश उत्तमपणे साधता येतो. त्यामुळे संमोहन उपचार पद्धती सेक्सवरच्या प्रत्येक समस्येला घालवण्यासाठी, त्यावर मात करण्यासाठी आपल्याला सुंदररीत्या मदत करू शकते.
मनोरंजन - मनाला पुरेसा विरंगुळा देणारं मनोरंजन आपल्या जीवनामध्ये असलं पाहिजे. आपण नाटक पाहतो. नाटकामध्ये खर्या अर्थाने शिरतो, समरस होतो, त्याचा आनंद आपण घेतो. त्यातून आपल्याला मनोरंजन मिळतं. सिनेमामध्ये आपण याच पद्धतीने शिरतो, खर्या अर्थाने त्याच्याशी तादात्म्य होतो. त्यातून आपल्याला आनंद मिळतो. डान्स आहे, गाणी आहेत, दूरदर्शन आहे. या सगळय़ाच प्रकारच्या मनोरंजनाला एक खास महत्त्व आपल्या जीवनामध्ये आहे. जर आपण यामध्ये मनापासून सहभागी झालो, तर संपूर्ण मन त्यामध्ये गुंतल्यामुळे स्वाभाविकच सगळय़ा प्रकारच्या ींशपीळेपी आणि रपुळशींळशी चा निचरा व्हायला मदत मिळते आणि पुन्हा ताजेतवाने होऊन आपण जीवनाला सुरुवात करू शकतो. यातलं सगळय़ात उत्तम जर कोणतं मनोरंजन असेल तर ते डान्स आहे. कारण डान्समध्ये तीन गोष्टी एकत्र येतात. यामध्ये रिदम-ताल, शारीरिक व्यायाम आणि गाणी या तीन गोष्टी एकत्र येतात.
महाराष्ट्रीयन माणसं याबाबतीत मात्र बरीचशी नतद्रष्ट आहेत. महाराष्ट्रीयन माणसं काय म्हणतात, तू नाच आम्ही पाहतो. ते तमासगिरांना नाचायला लावतात. थोडक्यात 'तुम्ही निरोगी रहा, आम्ही तुम्हाला पाहत पाहत रोगी बनत जातो', या पद्धतीच्या मनोवृत्तीने जगणारी आपण महाराष्ट्रीयन माणसं आहोत. नाचणार्यांबाबत आपण बोलतानासुद्धा 'नाच्या', 'तमासगीर' असे शब्द वापरतो. भारतामधल्याच इतर काही कल्चर आहेत, ज्यांच्या जीवनाचा 'नाच' हा अविभाज्य भाग आहे. आदिवासी, पंजाबी, गुजराती अशा बहुतांश कल्चरमध्ये 'नाच' हा त्यांच्या जीवनाचा 'अपरिहार्य आणि अविभाज्य' भाग आहे. एवढेच नव्हे तर साऊथ इंडियन्समध्येसुद्धा 'नाच' हा त्यांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा, प्रतिष्ठेचा, सन्मानाचा भाग आहे. महाराष्ट्रीयन माणसं मात्र याबाबत नतद्रष्ट आहेत.
(लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन
समितीचे संस्थापक, संघटक आहेत.)
भ्रमणध्वनी-9371014832
जादूटोणाविरोधी विधेयकातून नवे क्रांतिपर्व सुरू होईल
![]() |
![]() |
पहिल्या आठवडय़ात विधानमंडळाचे कामकाज सुरळीत चालू शकले नाही. या आठवडय़ात ते सुरळीत चालू शकले तर कदाचित हे जादूटोणाविरोधी बिल चर्चेला येऊ शकेल. पण नेहमीप्रमाणेच, ''आमच्या धर्मावर गदा येणार, वारीला जाणं, सत्यनारायण करणं, घरीसुद्धा पूजा करणं गुन्हा ठरणार, हे विधेयक केवळ हिंदूंच्या विरुद्ध आहे,'' असा आरडाओरडा हितसंबंधी मंडळींनी आणि विशेषत: सनातन संस्थेवाल्या सनातन्यांनी सुरू केला आहे. जादूटोणाविरोधी विधेयक संमत झालं तर सनातन संस्था, हिंदू जनजागरण समिती व या सनातनी विचारांचे इतर लोक अडचणीत येतील. त्यांना विखारी अंधश्रद्धाळू अमानुष सनातनी प्रचार थांबवावा लागेल अथवा जेलची हवा खावी लागेल हे खरं आहे. सनातन संस्थेवर बंदी घालण्याची शिफारस महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे केली आहे. त्यामुळे त्यांनी जीव तोडून या बिलाला विरोध करणं स्वाभाविक आहे. पण इतरांनी का विरोध करावा? काय आहे या बिलात? त्यावेळचे सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हंडोरे, मुख्यमंत्री विलासराव देशमुख, उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या पुढाकाराने सध्याचे जादूटोणाविरोधी विधेयकाचे प्रारूप तयार झाले आहे. 16 डिसेंबर 2005 साली ते विधानसभेत नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात पारित झाले होते. पुढे ते विधानपरिषदेत अडकले. विधानसभेत पारित झालेले विधेयक संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठविल्यामुळे ते शून्यावर आहे. आता सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनी पुन्हा ते विधानसभेत मांडले आहे. फक्त विधेयकाच्या नावात बदल केला. बाकी जसेच्या तसे आहे. सध्याच्या विधेयकातील शब्दन्शब्द विचारपूर्वक ठरविण्याची संधी माजी सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्यासोबत मला मिळाली. ना. हंडोरे त्यांचे खासगी सचिव मिलिंद शंभरकर आणि मी अशा तिघांनी या विधेयकाचे अंतिम प्रारूप ठरविण्यात प्रचंड मेहनत घेतली. त्यामुळे या विधेयकात आलेल्या प्रत्येक शब्दामागचा, बदलामागचा इतिहास मला ठाऊक आहे. तो वाचकांसोबत शेअर करण्याची संधी मी घेतो आहे. अनेकांना वाटते हे विधेयक फार कमजोर आहे. असं वाटणं चांगली गोष्ट आहे. पण गेल्या 30 वर्षात अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ लढाऊपणे तळागाळातून चालविणार्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला माहीत आहे की, हा कायदा अतिशय ताकदवान आहे. सरकारच्या कर्तव्याच्या आणि भारतीय राज्यघटनेच्या सध्याच्या मर्यादेत राहून यापेक्षा प्रभावी विधेयक तयार करणे शक्य नाही. पण हा कायदा महाराष्ट्र सरकारचा आहे. आम्हा अंधश्रद्धा निर्मूलन चळवळवाल्यांचा नाही. तसा तो असता तर फलज्योतिषापासून पर परासानशास्त्रीय दावे करणार्यांपर्यंत सारे या विधेयकात ओढले गेले असते, पण ते शक्य नव्हते. कारण अंधश्रद्धा निर्मूलन करणं हे प्रबोधनाचं काम आहे. हे प्रबोधन आमच्यासारख्या कार्यकत्र्यांनी प्रसिद्धिमाध्यमांनी व सरकारनेही केलं पाहिजे. पण राज्यसरकारनं जिथे माणसाची उघड फसवणूक होते, लुबाडणूक होते, जीव धोक्यात येतो तिथेच कायद्याद्वारा हस्तक्षेप केला पाहिजे याचे नीट भान ठेवून सध्याचे प्रारूप तयार झाले आहे. सध्याच्या विधेयकाचा मथळा आहे 'महाराष्ट्र नरबळी व अन्य अमानवीय, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध व त्यांचे समूळ उच्चाटन अधिनियम 2011' अमानवीय, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा, नरबळी याचा अर्थ काय? 2 ख. नुसार याची व्याख्या सोपी करून टाकली. परिशिष्टात जोडलेली 12 कलमं म्हणजेच अमानवीय, अनिष्ट, अघोरी प्रथा, जादूटोणा, नरबळी या बाहेरची एकही गोष्ट या विधेयकात अंतर्भूत नाही, अशी अपवादात्मक व सोपी सुटसुटीत व्याख्या सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांच्यामुळं करण्यात आली. त्यांनी खूप मेहनतीनं हे विधेयक सोपं, सुटसुटीत करण्यात मोलाचं मार्गदर्शन केलं. सर्वसाधारण विधेयकात शब्दांची व्याख्या करावी लागते. त्यात खूप गोष्टी येऊ शकतात आणि म्हणून काही लोक अमानवीय, अघोरी, अनिष्ट प्रथा यात अनेक प्रथांवर बंदी येईल, अशी भीती व्यक्त करतात, पण केवळ व्याख्येद्वारा 12 कलमांच्या मर्यादेतच हे विधेयक बंदिस्त केले आहे. त्यात इतर प्रथा येत नाहीत. हा पहिला महत्त्वाचा मुद्दा.
परिशिष्टातील 12 कलमासंबंधी कृती घडली की, संबंधितांसाठी शिक्षा मात्र कठोर आहे. सहा महिने ते सात वर्षे कारावास आणि पाच हजार ते पन्नास हजार रुपये दंड. शिवाय या अपराधाचा प्रसार-प्रचार करणार्यासही एवढीच कठोर शिक्षा आहे. शिवाय हा अपराध दखलपात्र व अजामीनपात्र आहे. त्यामुळं पोलिसांना गुन्हा नोंदवावाच लागेल व जामीन न्यायालयातून घ्यावा लागेल. पण अपराध काय?
परिशिष्टातील ही 12 कलमं वाचा
1. भूत उतरविण्याच्या बहाण्याने बांधून ठेवून वा अन्यरीत्या मारहाण करणे, मिरचीची धुरी देणे, पादत्राणे भिजवलेले पाणी पाजणे, छताला टांगणे, तापलेल्या वस्तूंचे चटके देणे, जबरदस्तीने मूत्र, विष्ठा पाजणे, केस उपटणे इत्यादी प्रकारे छळ करणे.
(भूत उतरविण्यासाठी मंत्र-प्रार्थना, पूजा करणे गुन्हा नाही)
2. एखाद्या व्यक्तीने (जिवंत) तथाकथित चमत्कार करून आर्थिक प्राप्ती करणे, फसवणूक, ठकविणे, दहशत बसविणे. 3. जीवाला धोका निर्माण होतो किंवा शरीराला जीवघेण्या जखमा होतात अशा अनिष्ट व अघोरी प्रथांचा अवलंब करणे, उत्तेजन देणे, सक्ती करणे, 4. कोणतेही अमानुष कृत्य करणे, नरबळी देणे, सल्ला देणे, प्रोत्साहन देणे, प्रवृत्त करणे. 5. अतिंद्रिय शक्ती संचारली असे भासवून भीती निर्माण करणे, न ऐकल्यास वाईट परिणाम होतील, अशी धमकी देणे.
(केवळ देव-देवी अंगात येणे गुन्हा नाही)
6. एखादी व्यक्ती करणी करते. काळी विष्ठा करते, भूत लावले, जनावराचे दूध आटविते, अपशकुनी आहे, रोगराई पसरविणे, सैतान आहे असे जाहीर करणे व त्या व्यक्तीचे जगणे त्रासदायक करणे. 7. करणी, चेटूक केलं या सबबीखाली मारहाण करणे, धिंड काढणे, वाळीत टाकणे. 8. भुताची भीती घालणे, शारीरिक इजा भुतामुळं झाली सांगणे, वैद्यकीय उपचार घेण्यापासून रोखून मंत्रतंत्र अघोरी उपाय करणे, मृत्यूची भीती घालणे. 9. कुत्रा, साप, विंचू चावल्यास वैद्यकीय उपचार घेण्यापासून रोखून त्याऐवजी मंत्रतंत्र यांसारखे उपचार करणे.
(कुर्त्यावर अँन्टीरेबीज, अँन्टीव्हेनम (स्नेक) इंजेक्शन्स वेळीच घेतल्यास माणसं वाचू शकतात. कोकणातल्या विंचूदंशानं माणूस मरू शकतो, पण वैद्यकीय उपचारांनी वाचू शकतो.). 10. बोटाने शस्त्रक्रिया करतो वा गर्भवती स्त्रीचे गर्भलिंग बदलवितो असा दावा करणे. 11. अवतार असल्याचे सांगून व पूर्वजन्मी प्रियकर, प्रेयसी, पती, पत्नी असल्याचे सांगून लैंगिक संबंध ठेवणे. 12. मंदबुद्धीच्या व्यक्तीमध्ये शक्ती आहे असे भासवून त्या व्यक्तीचा धंदा व व्यवसाय करणे. आता या 12 कलमांत विरोध करण्यासारखे काय आहे? कुणीतरी सुबुद्ध माणूस याला विरोध करणे शक्य आहे का? ही 12 कलमं म्हणजेच कायदा आहे. मग हे सत्यनारायण, वारी, पूजेला कायदा विरोध करतो हे कुठून आलं? त्याला आधार काय?
भारतीय जनता पक्षाचा या बिलाला संपूर्ण पाठिंबा होता. आजही असलाच पाहिजे. त्यांना विरोध करण्याचा नैतिक अधिकारच नाही. त्या वेळचे भाजपचे महाराष्ट्र अध्यक्ष नितीन गडकरी माझे जुने मित्र. विद्यार्थिदशेपासूनचे स्नेही. मी दै. 'तरुण भारत' (नागपूर) चा युवास्तंभ चालवीत असे. त्या वेळी ते विद्यार्थी परिषदेत सक्रिय होते. तेव्हापासूनची मैत्री. त्यांनी माझं काम एकदम सोपं करू टाकलं. जादूटोणाविरोधी बिलासंबंधी सारे निर्णय घेण्यासाठी
भाजपतर्फे अशोक मोडक या आमदाराला प्रतिनिधी नेमून टाकलं. विधिमंडळाच्या भाजप कार्यालयात गोपीनाथ मुंडे, विरोधी पक्षनेते पांडुरंग फुंडकर यांच्यासमोर नितीन गडकरींनी माझ्यासमक्ष विषय काढला आणि चारही प्रमुख नेत्यांनी अशोक मोडक म्हणतील तर भाजपचं अंतिम मत असेल असं एक मतानं सांगितलं.
अशोक मोडक अतिशय आग्रही; पण खूप प्रगल्भ विचारांचे असल्यामुळे आमचं काम फारच सोपं झालं. एका महत्त्वाच्या बैठकीत तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख, उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील, सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्या उपस्थितीत अशोक मोडक यांनी या बिलावर अंतिम शिक्कामोर्तब केलं. त्यांनी सुचवलेले सारे बदल मान्य केले. मोडकांच्या आग्रहाखातर बिलात सार्वजनिक चळवळी म्हटल्याचं स्थान देणारी एक तरतूद होती. तीही आम्ही काढून टाकली. त्यामुळे या बिलाला विरोध करण्याचा कोणताही नैतिक अधिकार भाजपला नाही. माझे स्नेही नितीन गडकरी नेहमी म्हणतात,''मी दिलेला शब्द कधीही मोडत नाही.'' आता तर ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यामुळं त्यांचा शब्द त्यांच्या पक्षाचा अधिकृत शब्द खरा करण्यासाठी जबाबदारी ते पार पाडतील याची मला खात्री आहे. 2003 सालच्या हिवाळी अधिवेशनाआधी झालेल्या याच महत्त्वाच्या बैठकीच्या वेळी भाजपचे आ. मंगलप्रसाद लोढा यांच्या नेतृत्वाखाली जैन धर्मीयांचे एक शिष्टमंडळ मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना भेटायला आलं. खरं म्हणजे ते हे बिल मंजूर करू नका, असं सांगण्यासाठी आले होते. मुख्यमंर्त्यांनी त्यांच्याशी मला चर्चा करायला सांगितले. सारं बिल शिष्टमंडळानं समजावून घेतल्यावर आ. मंगलप्रसाद लोढा म्हणाले,''मानव, हे तर फारच चांगलं बिलं झालं आहे. यात विरोध करण्यासारखं काहीच नाही. उगाच गैरसमज पसरविला जातो आहे. आम्हा धार्मिक माणसांचा गैरसमज दूर करण्यासाठी या बिलात काही तसे टाका.'' चांगल्या धार्मिक रूढी, परंपरांना हे बिल लागू पडत नाही असं काहीतरी मी त्यांना मुख्यमंर्त्यांना सांगायला सांगितलं. ''आपल्याला असं काही टाकता आलं तर टाका,'' असं मुख्यमंत्री म्हणाले, म्हणून आम्ही (मी, तत्कालीन सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हंडोरे, पी. एस. मिलिंद शंभरकर) त्या पद्धतीनं एक वाक्य तयार केलं. कायदा खात्याच्या माणसांना ते दिलं. या बिलात व्यक्तीचं शारीरिक, मानसिक, आर्थिक नुकसान न करणार्या कोणत्याही चांगल्या रूढी, परंपरेचा समावेश नाही अशी तळटीप टाकायचं आम्ही ठरवलं होतं. कायदा खात्यानं त्याचं तेरावं कलम करून टाकलं. त्यांच्या पद्धतीप्रमाणे त्याचं शब्दांकन तयार केलं. ते समजायला कठीण आहे हे माझ्या लक्षात आलं होतं; पण वेळ नव्हता. नागपूर अधिवेशनात बिल मांडायचं असल्यामुळं आणि बिलाचं अंतिम रूप तयार करण्याची जबाबदारी व अधिकार कायदा खात्याचाच असल्यामुळे आम्ही गप्प बसलो.
काय आहे ते कलम?
शंका दूर करण्यासाठी याद्वारे असे घोषित करण्यात येते की, ज्यामुळे व्यक्तीला मानसिक, शारीरिक वा आर्थिक बाधा पोहोचत नाही असे कोणतेही धार्मिक विधी व धार्मिक कृत्ये अंतर्भूत असलेल्या कृतींनी या अधिनियमातील कोणतीही गोष्ट लागू होणार नाही. याचा खरा अर्थ असा होतो की, परिशिष्टातील 12 कलमांत एखादी रूढी, विधी, कृत्य येत असेल, कारण या 12 व्या
कलमाव्यतिरिक्त इतर कशालाच हे बिल लागू होत नाही, असं व्याख्येत 1 (ख), स्पष्टच केलं आहे) आणि त्याद्वारे व्यक्तीला मानसिक, शारीरिक, आर्थिक बाधा पोहोचत नसेल तर त्यालाही हे बिल लागू होणार नाही. ती गोष्ट शिक्षापात्र ठरणारं नाही. चांगल्या रूढी, परंपरांना हे बिल लागू होत नाही हे सांगण्यासाठी हे तेरावं कलम समाविष्ट केलं अहे. त्याचा अर्थ हाच होता. फार गदारोळ व्हायला लागल्यानंतर मी पुन्हा सुप्रीम कोर्टात माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांच्याकडे गेले. कायदा खात्याच्या शब्दरचनेनुसार टाकलेलं हे तेरावं कलम त्यांनी बारकाईनं पाहिलं आणि निर्वाळा दिला. भाषा उगीच क्लिष्ट केली आहे. न्यायमूर्तीनी अगदी सुरुवातीलाच मला समजावून सांगितलं होतं. बिलाची भाषा सोपी हवी. कुणालाही कळली पाहिजे. बिल मराठीतच तयार करायचं. मग त्याचं इंग्रजीत भाषांतर करायचं. नाहीतर इंग्रजीत बिल बनवितात. अशा क्लिष्ट मराठीत त्याचं भाषांतर करतात हे योग्य नाही. त्यासाठी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानला तयार केलेले कायदे वाचा. एवढय़ावर ते त्या वेळी थांबले नाहीत. तर अनेक तास माझ्यासोबत असून त्यांनी या बिलातील महत्त्वाची कलमं सोप्या मराठी भाषेत तयार करून दिली होती. त्यामुळं या वेळी क्लिष्ट भाषेविषयी (13 व्या कलमाच्या) त्यांनी नापसंती व्यक्त केली.
पण पुढे म्हणाले, पण अर्थ बरोबर आहे. व्यक्तीचं मानसिक, शारीरिक, आर्थिक नुकसान न करणार्या रूढी, परंपरांना (विधी, कृत्ये) यातून सूट दिली आहे. त्या शिक्षापात्र ठरणार नाही, असाच याचा अर्थ निघतो. व्यक्तीचं मानसिक, शारीरिक, आर्थिक नुकसान करणार्या धार्मिक विधी, कृत्यांना हे बिल लागू होतं असा अर्थ निघूच शकत नाही. कुणालाही तो काढता येणार नाही. कायद्याचा उलटा अर्थ काढता येत नसतो. सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती पी. बी. सावंतांनी हा निर्वाळा दिल्यावर मी रिलॅक्स झालो. ना. चंद्रकांत हंडोरेही रिलॅक्स झाले. तरी पण मग उद्या आम्ही आमच्या घरी सत्यनारायणाची पूजा केली तर तुम्ही म्हणाल व्यक्तीचं आर्थिक नुकसान झालं. आम्हाला 6 महिने जेलमध्ये पाठवलं. पंढरपूरच्या वारीला पायी गेलो तर म्हणाल. शारीरिक नुकसान झालं. आम्हाला 6 महिने जेलमध्ये पाठवलं. आम्ही घरी देवाची 2 तास पूजा करीत असलो तर म्हणाल, तुमचं मानसिक नुकसान झालं. 6 महिने जेलमध्ये पाठवाल, असे आ. दिवाकर रावते विधानपरिषदेत बोलले. वृत्तपत्रांत मोठमोठे मथळे, बातम्या, छापून आल्यात आणि महाराष्ट्रभर गैरसमज पसरला. असं बिलात कुठेही नसताना आ. दिवाकर रावते मुद्दाम बोलले. पुढे त्यावर चर्चाच न झाल्यामुळं हे मत कुणीही विधानपरिषदेच्या फ्लोअरवर खोडून काढलं नाही. सनातन्यांच्या हाती कोलीत मिळालं. ते ह्या बातम्या, मथळे दाखवून दाखवून मुद्दाम गैरसमज पसरवताहेत.
खरं म्हणजे शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धवजी ठाकरेंना बिलासंदर्भात मातोश्रीवर भेटलो होतो, 'अंधविश्वास शब्द काढून टाका, अघोरी प्रथा म्हणा,' अशी त्यांनी केलेली सूचना मान्य झाली. त्या वेळच्या मुख्यमंर्त्यांनी बिलाचा मथळाच बदलून टाकला. बिल छपाईला जाण्याआधी आ. सुभाष देसाईंनी अनेक शाब्दिक बदल सुचविले. ते बिलात केले गेले. शिवसेनेचा 100 टक्के सहभाग मिळण्याआधीच हे बिल विधानसभेत मांडून संमत झाले होते. हे खरे असले तरी सगळ्याच पक्षांशी चर्चा करून जास्तीतजास्त सहमतीनं प्रारूप ठरविण्याचा विचार अमलात आणला होता हेही खरं आहे. सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांच्याशी मंत्रालयात झालेल्या चर्चेत त्यांनी या नव्या बिलातील काही बदल करण्याचे मान्य केले. त्यामुळं मुद्दाम विरोध करणार्यांना निष्प्रभ करता येईल हे त्यांनाही पटले. एकतर हे तेरावं कलम मुळातूनच विधेयकातून वगळावं. त्यामुळे विधेयक, कुठेही कमकुवत होत नाही. दुसरं पाचवं कलम ट्रस्ट कंपनीसंबंधी आहे. तेही काढून टाकावं. हिंदूंचे ट्रस्ट ताब्यात घेण्याचे षड्यंत्र अशी ओरड करणार्या सनातन्यांची हवाच निघून जाईल. तिसरं पुन्हा अंधविश्वास हा शब्द नव्या बिलात टाकला आहे. मागील सरकारनं कार्याध्यक्ष उद्धवजी ठाकरेंची सूचना सन्मानपूर्वक मानली होती. त्याचा आदर राखावा. बिल चर्चेला येतानाचे हे बदल करण्याची तयारी सरकारनं दाखवली तर विरोध करण्यासारखं काहीही उरणार नाही. उत्तम वातावरणात चर्चा होऊ शकेल. हे जादूटोणाविरोधी बिल संमत झालं तर संपूर्ण देशाला हे कळत नकळत लागू होईल. किमान प्रसिद्धिमाध्यमांसाठी तरी ते देशभर लागू होईल. कारण परिशिष्टातील 12 कलमांचा प्रचार-प्रसार करणं हाही कायद्यानं गुन्हा ठरणार आहे. मुंबईत प्रसारित झाल्याशिवाय भारतातील कोणताच टीव्ही चालू शकत नाही. पर्यायानं देशभरातील सार्याच टीव्ही व इतर प्रसिद्धिमाध्यमांना या बिलाचा अभ्यास करूनच आपल्या कार्यक्रमांना, जाहिरातींना, बातम्यांना प्रसारित करावं लागेल. शिवाय महाराष्ट्रातील हजारो, लाखो माणसांचे जीव वाचतील. लाखो लोकांची लुबाडणूक थांबेल. एक नवे क्रांतिपर्व सुरू होईल.
(लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन
समितीचे संस्थापक, संघटक आहेत.)
भ्रमणध्वनी-9371014832
Friday, 14 December 2012
ज्योतिषी ठगांना आव्हान देण्याची वेळ आली आहे
राजे महोदय, सहा महिन्यांत मृत्युयोग ज्योतिष्यानं राजाच्या कुंडलीचा नीट अभ्यास केला. त्याचा चेहरा पडला. तो बोलेनाच. राजानं फारच आग्रह केल्यावर तो भविष्य सांगायला तयार झाला. तो म्हणाला, ''राजे महोदय, मला सांगायला फार वाईट वाटतं, दु:खही होतं; पण सत्य सांगणं माझं कर्तव्य आहे म्हणून सांगतो. आपल्याजवळ फार कमी वेळ आहे. केवळ सहा महिन्यांचा अवधी आहे. आतापासून सहाव्या महिन्याच्या शेवटी, सातवा महिना सुरू होण्याच्या आधी आपल्याला हे जग सोडून जावं लागेल. मृत्युयोग आहे. कोणत्याही परिस्थितीत न टळणारा मृत्युयोग.'' राजाला प्रचंड हादरा बसला. आपण मरणार या कल्पनेनंच राजा झुरू लागला. हळूहळू त्याचं राज्यकारभारावरून लक्ष उडालं. तो आपल्या शयनगृहातच राहू लागला. दरबारात येईनासा झाला. ही बातमी बाहेर फुटली. राजा दुबळा होतोय हे लक्षात येताच मांडलिक राजांनी गुप्त तयारी सुरू केली. सैन्याची जमवाजमव सुरू केली. हेरखात्याकडून ही बातमी परदेशात असलेल्या प्रधानाला समजली. 'राज्य' धोक्यात आहे हे लक्षात येताच प्रधान आपली यात्रा अर्धवट टाकून राज्यात परत आला. तोवर दोन महिन्यांचा कालावधी उलटला होता. ज्योतिष्याच्या भविष्यकथनामुळं राजाचं मन राज्यकारभारातून उडालं, हे प्रधानाला हेरखात्याकडून कळलं होतंच. तातडीनं प्रधानानं राजाची भेट घेतली. भविष्यकथनात काही अर्थ नसतो. कदाचित एखाद्या शत्रूचं हे षडयंत्र असावं, असंही प्रधानानं सांगून पाहिलं. पण काही उपयोग झाला नाही. राजाचा या नव्या ज्योतिष्याच्या भविष्यकथनावर अढळ विश्वास बसला आहे, आपण कितीही समजावून सांगितलं तरी राजा ऐकणार नाही, हे प्रधानाच्या लक्षात आलं. प्रधानानं खूप विचार केला, निर्णय घेतला आणि निश्चयानं कामाला लागला. राजदरबार भरला दुसर्या दिवशी दुपारी 12 वाजता राजदरबार भरणार असा तातडीचा आदेश प्रधानानं काढला. सगळ्यांना सूचना गेल्या. महत्त्वाच्या मंर्त्यांना संदेश गेले. सैन्याला आणि हेरखात्याला जय्यत तयार राहण्याचे आदेश सुटले. 'राजाही दरबारात हजर राहणार आहे' असे निरोप गेले. खूप दिवसांनंतर राजदरबार भरला. राजदरबारात सगळे मंत्री, सेनापती, मानकरी तर हजर होतेच; पण राज्यातील महत्त्वाचे व मान्यवर नागरिकही मोठय़ा संख्येनं प्रधानानं हजर ठेवले होते. बरोबर 12 वाजता खचाखच भरलेल्या दरबारात राजेमहोदयांना प्रधान जातीनं घेऊन आले. सारे आपापल्या स्थानावर विराजमान झाले. प्रधानानं बोलायला सुरुवात केली. ज्योतिष्याला त्याच्या भविष्य कथनाच्या सामर्थ्याविषयी प्रश्न केला. ''ज्योतिष हे गणित आहे. माझं गणित अचूक असतं, माझं भविष्यकथन काळ्या दगडावरची रेघ असते.'' वगैरे ज्योतिष्यानं सांगितलं. ''आपण राजाचं भविष्य सांगितलं. मी पुन्हा तुम्हाला एक संधी देतो. पुन्हा राजाच्या कुंडलीचा अभ्यास करा. पुन्हा राजाचे भविष्य सांगा.'' प्रधानानं आज्ञा सोडली. ''माझं भविष्य-गणित कधीच चुकत नाही. खरं म्हणजे मी कधीच पुन्हा दुसर्यांदा गणित करत नाही. तरी तुमचा आग्रह आहे म्हणून अभ्यास करतो. राजाचं भविष्यकथन असल्यामुळंच मी माझा नियम मोडायला तयार आहे.'' असं म्हणून ज्योतिष्यानं पुन्हा राजाच्या कुंडलीचा अभ्यास सुरू केला. बराच वेळ आकडेमोड केली आणि शेवटी निर्धारपूर्वक सांगितलं. ''माझं भविष्यकथन अगदी अचूक होतं. राजाचा मृत्युयोग निश्चित आहे. आता केवळ चारच महिने उरलेत. त्यात कालत्रयीही बदल होणं शक्य नाही.'' हे भविष्यकथन ऐकताच संपूर्ण दरबार शहारला. आतापर्यंत केवळ कुजबुज ऐकू येत होती. पण आता खरंच राजा 4 महिन्यांत मरणार म्हटल्यावर सार्या दरबारावर शोककळा पसरली. राण्या रडायला लागल्या. पण प्रधानानं मुळीच विचलीत न होता ज्योतिष्याला विचारलं - ''ज्योतिषी महोदय, तुमची कुंडली तुम्हाला माहीत आहे का?'' मी अजून 55 वर्षे जगणार आहे ज्योतिषी हसून म्हणाला, ''अहो, हे काय प्रधान महोदय, माझी कुंडली मला ठाऊक नसेल? अगदी मुखोद्गत आहे मला ती.'' ''तुमचं आयुष्य किती आहे?'' प्रधान. ज्योतिषी, ''अहो, आता तर मी कुठे पस्तीस वर्षांचा आहे. अगदी वयाच्या नव्वद वर्षांपर्यंत माझं आयुष्य आहे. अजून पंचावन्न वर्षे मी जगणार आहे.'' प्रधान , ''उत्तम गोष्ट आहे. तुम्ही पंचावन्न वर्षे अजून जगणार; दीर्घायू आहात. तरी माझ्याखातर पुन्हा तुम्ही तुमच्या कुंडलीचा अभ्यास करा; तुमचं आयुष्य किती ते मला सांगा.'' ज्योतिषी हसून आकडेमोड करायला लागला.. म्हणाला, ''प्रधानजी, तुमच्या सांगण्यावरून मी माझ्या कुंडलीचा पुन्हा एकदा अभ्यास केला. आकडेमोड केली. माझं भविष्य बरोबर आहे. मी दीर्घकाळ जगणार. वयाच्या नव्वदीपर्यंत जगणार..'' हे ऐकताच.. डोळ्यांचं पातं लवतं न लवतं तोच प्रधानजी ज्योतिष्याजवळ झेपावले. क्षणात आपली तलवार म्यानातून काढली. कचकन ज्योतिष्याचं मुंडकं उडवलं. धडापासून वेगळं झालेलं रक्ताळलेलं ज्योतिष्याचं मुंडकं राजाच्या पायाजवळ पडलं. संपूर्ण दरबार शहारून गेला. स्मशानशांतता पसरली. प्रधान धीरगंभीर आवाजात सांगू लागला, ''राजे महोदय, मला माफ करा! आयुष्यात पहिल्यांदा तुमच्या परवानगीशिवाय मी एक निर्णय घेतला! पण माझा उद्देश तुमच्या लक्षात आल्यावर तुम्ही मला माफ कराल. एवढच नव्हे, तर तुम्ही, हा सारा देश, सारे प्रजाजन माझा निर्णय योग्य होता असंच म्हणतील याची मला खात्री आहे. राजे महोदय, या ज्योतिष्यानं आपण सहा महिन्यांत मरणार असं भविष्य कथन केलं. ते आपण खरंच धरून चाललात. कारण आपला ज्योतिषावर, भविष्यकथनावर प्रचंड विश्वास आहे. नाइलाजानं मी कठोर निर्णय घेतला. असल्या दैववादी बनवणार्या, नियतीवादी बनवणार्या ज्योतिषावर लोकांचा विश्वास वाढवणार्या ज्योतिष्याचं पितळ उघडं पाडण्याचा मी निश्चय केला. पण राजे महोदय, काल रात्री घेतलेला निर्णय, त्याचा मृत्यू त्याला कळू शकला नाही. त्याचे बदललेले ग्रह त्याला दिसले नाहीत. काही मिनिटांत येणारा मृत्यू ज्या ज्योतिष्याला दिसू शकला नाही, स्वत:चा मृत्युयोग ज्याला कळू शकला नाही, तो ज्योतिषी तुमचा मृत्युयोग कसा काय सांगू शकतो, महाराज? मला सांगा, कसा काय सांगू शकतो?'' प्रधान या ठिकाणी थांबला.. दरबारात स्मशानशांतता पसरली. थोडय़ा वेळानं हळूच राजानं दोन्ही हात उचलले. टाळी वाजवायला सुरुवात केली. सार्या दरबारानं टाळ्या वाजवून-वाजवून, टाळ्यांच्या गजरानं सभागृह दणाणून सोडलं. स्वामी विवेकानंद ही गोष्ट आवर्जून का सांगायचे, ते आपण समजून घेऊ, नीट मनात ठसवू. यानंतर कोणत्याच प्रकारचं भविष्य पुढील आयुष्यात पाहणार नाही, भविष्यावर विश्वास ठेवणार नाही असं ठरवू आणि नियतीवादी बनवणारं, पराक्रमशून्य बनवणारं हे ज्योतिषी षडयंत्र उलथवून टाकू ! आजवर कोणीही ''ज्योतिष हे शास्त्र आहे'' हे सिद्ध करू शकला नाही! 1985 सालापासून ज्योतिष्यांना आम्ही सतत आव्हान देत आलो आहे. आम्ही वीस पत्रिका देतो, ज्योतिष्यांनीच तयार केलेल्या पत्रिका देतो, त्यातील कोण जिवंत आहे व कोण मेलं आहे एवढंच 95 टक्के अचूक सांगा आणि 15 लाखांचं (2009 सालात ते 15 लाखांचं झालेलं आहे.) पारितोषिक घेऊन जा. काही ज्योतिषी पुढे म्हणू लागले. आमच्या शास्त्रानुसार मृत्यू सांगायचा नसतो. पुन्हा ही एक पळवाट, बनवेगिरी. ठीक आहे. त्याचाही फायदा आम्ही त्यांना घेऊ दिला. तुम्हाला ज्या विषयाचं भविष्य सांगता येतं असे किमान 5 मुद्दे ठरवा. आम्ही दिलेल्या वीस कुंडल्यांच्या आधारावर या 5 मुद्यांबाबतचं (कदाचित शिक्षण, नोकरी/ व्यवसाय, लग्न, मुलं, अपघात) भविष्य किमान 90 टक्के जरी अचूक सांगितलं तरी हे पारितोषिक मिळेल; पण हे पारितोषिक मात्र आजवर कुणीही जिंकू शकलेलं नाही किंवा त्याच्या जवळपाससुद्धा कुणी येऊ शकलेलं नाही. काहींनी आव्हान स्वीकारण्याचा दावा केला. तसं वृत्तपत्रांमधून जाहीरही केलं; पण प्रत्यक्षात मात्र, वेळ आल्यावर नेहमीच आव्हानातून पळ काढला. फक्त अशोक तोमर नावाच्या मुंबईत अँस्ट्रॉलॉजिकल इन्स्टिटय़ूट चालवणार्या ज्योतिष्यानं नाशिकात हे आव्हान पार पाडलं. 1985 साली सार्या पत्रकारांसमोर पार पडलेल्या या आव्हानात 10 कुंडल्यांच्या आधारे भाकितं केली. केवळ 32 टक्के अचूक ठरलीत, त्याचा दारुण पराभव झाला. दिल्ली स्टार न्यूजच्या चंद्रगहणाच्या एका लाईव्ह कार्यक्रमात मीरा महाजन नावाच्या एका टीव्ही स्टार ज्योतिषीने जाहीर आव्हान स्वीकारण्याचे लाईव्ह मान्य केले. पण पुढे तिने चक्क पळ काढला. पुढे चार दिवस मी दिल्लीत थांबलो, पण ती चॅनेलवाल्यांनाही सापडली नाही. फलज्योतिषावर आक्षेप : 186 वैज्ञानिकांचे पत्रक फलज्योतिष हे विज्ञान नव्हे, असे जगभरातील शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. फलज्योतिषाला विरोध करणारे परिपत्रकच शास्त्रज्ञांनी तयार केले आहे आणि त्यावर विविध देशांतील महत्त्वाच्या 186 शास्त्रज्ञांनी सह्या केल्या आहेत. सह्या करणार्यांमध्ये 19 नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ आहेत. त्यात भारतातील सी.चंद्रशेखर या एकुलत्या एक शास्त्रज्ञाची सही आहे. या परिपत्रकाचा मूळ मसुदा असा आहे : जगभरातील विविध क्षेत्रांत फलज्योतिष अधिकाधिक स्वीकारले जात आहे. हे पाहून विविध क्षेत्रांतील आम्हा वैज्ञानिकांना काळजी वाटते. आम्ही खाली स्वाक्षरी करणारे-खगोलशास्त्रज्ञ, अँस्ट्रोफिजिसिस्ट आणि इतर क्षेत्रातील वैज्ञानिक (ज्योतिष्यांकडून वैयक्तिक आणि सार्वजनिकरीत्या सांगितली जाणारी भाकिते व सल्ले, जे चिकित्साही न करता स्वीकारले जातात त्या विरोधात) लोकांना सावध करू इच्छितो. ज्यांना ज्योतिषशास्त्रावर विश्वास ठेवावासा वाटतो त्यांनी जाणून असावं, की ज्योतिषशास्त्रातील गृहीतांना कोणताही पाया नाही, आधार नाही. लोक फलज्योतिषावर विश्वास का ठेवतात? आजच्या अनिश्चिततेच्या काळात योग्य निर्णय घेण्याचं मार्गदर्शन मिळवण्यासाठी, समाधानकारक सल्ला मिळवण्यासाठी ते आसुसलेले असतात. त्यामुळे त्यांच्या आवाक्यापलीकडे असणारे आकाशस्थ ग्रहगोल त्यांचे नशीब (नियती) आधीच ठरवतात, यावर विश्वास ठेवणं त्यांना आवडत असेल. तरीपण आपण सगळ्यांनी वस्तुस्थितीला सामोरं गेलं पाहिजे आणि भविष्य हे आपल्यावर अवलंबून असतं, ग्रह-तार्यांवर नव्हे, हे समजून घेतलं पाहिजे. आजच्या आधुनिक काळात, आधुनिक शिक्षणाच्या आणि आधुनिक दृष्टीच्या प्रकाशात आपण हे समजून घेतलं पाहिजे की, अंधश्रद्धा आणि जादुई चमत्कारांवर विश्वास ठेवणं, विसंबून राहणं म्हणजे स्वत:चीच फसवणूक करून घेणं होईल. तरीही आजच्या आधुनिक समाजामध्ये फलज्योतिषावरील विश्वास वाढतो आहे. आज केल्या जाणार्या भविष्यकथनांवर, त्यांची कसलीही तपासणी न करता प्रसिद्धिमाध्यमं (अगदी प्रतिष्ठित दैनिकं, मासिकं, पुस्तक प्रकाशकसुद्धा) प्रसिद्धी देतात. यामुळं आम्ही वैज्ञानिक अस्वस्थ झालो आहोत. या परिस्थितीची परिणती अतार्किकता आणि भोंगळवाद वाढवण्यातच होईल. आम्हाला असं वाटतं, की या ज्योतिषी ठगांच्या दिखाऊ दाव्यांना सरळ आणि पूर्ण शक्तिनिशी आव्हान देण्याची वेळ आता आली आहे. (लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक, संघटक आहेत.) भ्रमणध्वनी-9371014832 |
Subscribe to:
Posts (Atom)