हे सगळे शब्द वापरत असताना, यांचा नेमका अर्थ काय होतो? समाजामध्ये बुद्धिप्रामाण्यवाद रुजवायचा म्हणजे नेमकं काय? समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणं म्हणजे नेमकं काय? या दोन्ही गोष्टी एकच आहेत का? या प्रश्नांचा मुळातून अभ्यास करणं ही आजच्या काळाची गरज आहे. त्याच पद्धतीनं अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचीही ही अपरिहार्य अशी गरज आहे. ज्याला आपण इंग्रजीमध्ये फं३्रल्लं'्र२े असं म्हणतो, त्याचंच मराठीत केलेलं भाषांतर म्हणजे 'बुद्धिप्रामाण्यवाद'! साधरणत: विसाव्या शतकात हा शब्द मोठय़ा प्रमाणावर रूढ झाला, फं३्रल्लं'्र२े या नावाखाली मान्यता पावला. बुद्धिप्रामाण्यवाद फं३्रल्लं'्र२े हा एखादा इझम आहे का? जसा टं१७्र२े, र्रूं'्र२े व ¬ंल्लँ्रि२े मराठीत यांना म्हणतात मार्क्सवाद, समाजवाद, गांधीवाद. या व्यतिरिक्त आणखीही 'वाद' आहेत. या पद्धतीचा हा काही वाद आहे का? हा सुरवातीला तुमच्या-माझ्या मनामध्ये प्रश्न निर्माण होईल.पण ज्या अर्थाने आपण इझम किंवा वाद हा शब्द वापरतो, त्या अर्थाने 'बुद्धिप्रामाण्यवाद' हा कोणता वाद नाही. बुद्धिप्रामाण्यवाद यामध्ये 'वाद' हा शब्द जरी असला तरी खर्या अर्थानं ही एक प्रक्रिया आहे. त्याला आपण बुद्धिप्रामाण्य प्रक्रिया असं म्हणू शकतो. जीवनातल्या विविध अंगांच्या प्रश्नांची उत्तरं जरी आपल्याला या प्रक्रियेतून मिळत असली, तरी ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या वादांमध्ये जगाचं वा देशाचं अर्थशास्त्रं, समाजशास्त्र या अमूक पद्धतीचं असावं, राज्यव्यवस्था अमूक पद्धतीनं चालावी या विशिष्ट वादानुसार ती चालावी, असा आग्रह असतो. त्या पद्धतीनं बुद्धिप्रामाण्यवाद काही स्वतंत्र इझम किंवा वाद नाही. बुद्धिप्रामाण्यवाद भारताला नवा नाही! भारतीय परंपरेमध्ये बुद्धिप्रामाण्यवाद हा शब्द जरी नवा असला, तरी या पद्धतीची प्रक्रिया मात्र नवी नाही. 'चार्वाक ऋषींची परंपरा' ही एक वेदकालीन परंपरा आहे. चार्वाक त्या काळामध्ये विवेकवाद मांडत असत. ह्या विवेकवादाचं आजच्या काळातलं आधुनिक स्वरूप म्हणजेच बुद्धिप्रामाण्यवाद, असं आपल्याला म्हणता येईल.चार्वाकांचा विवेकवाद 'प्रत्यक्ष प्रमाण अधिक अनुमान' या स्वरूपाचा होता. म्हणजे प्रत्यक्ष प्रमाण अधिक अनुमान याच्या आधारावर जीवनातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण शोधलं पाहिजे. जीवनात जे सत्य आपल्याला शोधायचं आहे, त्याचं उत्तर प्रत्यक्ष प्रमाण आणि त्याच्या आधारावर केलेले अनुमान यातूनच आपल्याला मिळणार आहे किंवा तसं सत्य आपल्याला शोधता येणार आहे, या पद्धतीची चार्वाकांची मांडणी होती. तुम्हाला माहित आहे, की सत्य शोधण्याच्या प्रक्रियेतूनच धर्मांचा उदय झाला आहे किंवा किमान सगळ्या धर्मांनी, 'आम्ही अंतिम सत्य शोधण्याचा प्रय▪करत आहोत' असा दावा तरी केला आहे. प्रश्न एवढाच होता, की हे जे काही 'अंतिम सत्य' आहे ते म्हणजे नेमकं काय आहे? मानव जातीला दीर्घ काळापासून, अगदी पाषाणयुगापासून या विश्वासंबंधी विविध प्रश्न सतावत होते. जसे ही सृष्टी कशी निर्माण झाली? ही पृथ्वी कशी निर्माण झाली? सूर्य, चंद्र, तारे कसे निर्माण झाले? त्याच पद्धतीनं, हे का निर्माण झाले? हा प्रश्न प्रामुख्याने पडत होता.आता, हे का निर्माण झाले असावेत? आपोआप आणि विनाकारण तर हे नक्कीच निर्माण झाले नसावेत! मग कुणाची तरी यामागे एक सुनियंत्रित अशी योजना असली पाहिजे, एक कारण परंपरा असली पाहिजे आणि एका विशिष्ट उद्देशाने यांची निर्मिती झाली असली पाहिजे, या पद्धतीची मांडणी होणं स्वाभाविक होतं. ज्या कारणांकरिता सृष्टीची, माणसांची आणि इतर प्राण्यांची निर्मिती झाली, त्या कारणांचा शोध घेणं म्हणजेच 'अंतिम सत्याचा' शोध घेणं हा धर्माचा खरा उद्देश आहे, अशी मान्यता पुढे रूढ झाली.बरं, हे अंतिम सत्य म्हणजे काय? ईश्वर असेल, ब्रह्म असेल, ब्रह्मंड असेल, त्याही पलीकडे जाऊन प्रेमस्वरूप असेल किंवा आणखी काहीतरी असेल, या पद्धतीची मांडणी वेगवेगळ्या धर्मांनी आपापल्या पद्धतीनं केली आहे.चार्वाकांचं म्हणणं असं होतं, की 'हे अंतिम सत्य वगैरे जे काही आहे, त्याला मुळात अस्तित्वच नाही. या जागामध्ये अंतिम सत्य वगैरे काही नसतं. पण सत्य शोधण्याचा एकमात्र मार्ग आहे आणि तो म्हणजे 'प्रत्यक्ष प्रमाण' म्हणजे 'पुरावा' 'ढ१ा' ते 'ढ१ा' आणि त्याच्या आधारावर केलं जाणारं अनुमान, या दोन गोष्टींपेक्षा आणखी तिसर्या कोणत्याही मार्गानं आपल्याला खर्या अर्थानं सत्य गवसू शकत नाही किंवा सत्य शोधलं जाऊ शकत नाही'. या पद्धतीची मांडणी त्या काळामध्ये चार्वाकांनी केली. प्रत्यक्ष प्रमाण अधिक अनुमान आता हे आपण नेमकं समजून घेऊ, की प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे काय? त्याच्या आधारावर केलं जाणारं अनुमान म्हणजे काय? आपल्याला कल्पना असेल, की आजच्या काळामध्ये वैज्ञानिक प्रक्रिया रूढ झाली आहे म्हणून वादाचे मुद्दे फारसे उरत नाहीत, पण ज्या काळामध्ये माणसाला या पद्धतीची वैज्ञानिक प्रक्रिया आणि प्रगतीच माहीत नव्हती, त्या काळामध्ये तर्काच्या आधारावर ज्ञान मिळवणं हाही ज्ञानाच्या मार्गांमध्ये एक मार्ग मानला जात होता. कवेळ तर्क करून एका गोष्टीच्या आधारावर दुसर्या गोष्टीचं 'लॉजिक' आपण मांडत जायचं. तर्क करत जायचं आणि याच्या आधारावर सुद्धा आपल्याला ज्ञान मिळू शकतं, सत्य शोधून काढता येऊ शकतं, अशी मांडणी त्या काळामध्ये अनेक विद्वान, ऋषीमुनी आणि वैज्ञानिक करत असत. चार्वाकांचं म्हणणं असं होतं, की केवळ तर्काच्या आधारावर कोणतंही सत्य शोधलं जाऊ शकत नाही. हा तर्क किंवा अनुमान प्रत्यक्ष प्रमाणावरच आधारलेला असला पाहिजे. तरच आपल्याला खर्या अर्थानं सत्य शोधता येईल.प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे पुरावा. एखादी घडणारी घटना आपण पाचही इंद्रियांनी प्रत्यक्ष अनुभवली, ती घटना घडते आहे याचा पुरावा आपल्याला मिळाला, की त्याच्या आधारावर जे अनुमान आपण करू तेवढंच काय ते सत्य, बाकी सगळच्या सगळं असत्य. या पद्धतीनं ही मांडणी केली जाऊ शकते. याकरिता एक उदाहरण पाहू. समजा, जंगलामध्ये भटकत असताना आपण रस्ता विसरलो. कुठे जायचं याची कल्पना येत नसल्यामुळे रात्रीच्या अंधारात कुठेतरी आडोसा शोधून आपण बसलो आहोत. अशा अवस्थेत सकाळच्या झुंजूमुंजू वातावरणामध्ये सूर्याची किरणं नुकतीच पसरायला लागली आहेत. अशा वेळेस त्या अंधुकशा प्रकाशात आपल्याला कुठेतरी दूरवर धूर दिसतो. त्याबरोबर आपल्याला अत्यानंद होईल. आपण विचार करू, 'त्या ठिकाणी धूर दिसतो म्हणजे नक्कीच त्या ठिकाणी मनुष्यवस्ती असणार!' कडकडून भूक लागलेली आहे, प्रचंड तहान लागलेली आहे. त्या ठिकाणी मनुष्यवस्ती असल्यामुळे या दोन्ही गोष्टी मिळण्याची शक्यता आहे. तसेच मला आता एकटेपणाची भीती जाणवू लागली आहे. मी अडकून पडलो आहे. कदाचित मी हिंस्त्र श्वापदांना बळी पडेन. रात्रभर मी स्वत:ला कसंबसं वाचवलं आहे आणि आता मला त्या ठिकाणी तो निवारा, आसरा मिळण्याची शक्यता आहे. म्हणून आपल्या मनामध्ये अतिशय आनंद निर्माण होईल. (लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक आहेत.) भ्रमणध्वनी -९३७१0१४८३२ २ँ८ेंल्लं५.ु'ॅ२स्र३.्रल्ल |
Friday, 1 March 2013
बुद्धिप्रामाण्यवाद म्हणजे काय?
Subscribe to:
Post Comments (Atom)
याविषयी आपले मत काय आहे. http://dainiksanatanprabhat.blogspot.in/2013/09/blog-post_8535.html#more
ReplyDeleteकर्ज! कर्ज !! कर्ज !!!
ReplyDeleteआपण एक प्रतिष्ठित आणि मान्यताप्राप्त खाजगी कर्ज कंपनी शोधत आहात जो संपूर्ण आयुष्यासाठी कर्ज प्रदान करतो. आम्ही सर्व प्रकारचे कर्जे अतिशय वेगवान आणि सोप्या पद्धतीने, वैयक्तिक कर्ज, कार कर्ज, तारण कर्ज, विद्यार्थी कर्ज, व्यवसाय कर्ज, गुंतवणूक कर्ज, कर्ज एकत्रीकरण आणि बरेच काही देत आहोत. बँका आणि इतर वित्तीय संस्थांनी आपल्याला नाकारले आहे का? आपल्याला एकत्रीकरण कर्ज किंवा तारण गरजेची आहे का? आपल्या सर्व आर्थिक समस्यांना भूतकाळातील एक गोष्ट बनवण्यासाठी आम्ही येथे आहोत असे आणखी दिसत नाही. आम्ही 2% च्या दराने आर्थिक सहाय्य आवश्यक असलेल्या व्यक्तींसाठी आणि कंपन्यांना निधी देतो. आवश्यक सामाजिक सुरक्षा क्रमांक आवश्यक नाही क्रेडिट तपासणी आवश्यक, 100% हमी. मी तुम्हाला या माध्यमाचा उपयोग करून सांगू इच्छितो की आम्ही विश्वसनीय आणि सहायक मदत देतो आणि आम्हाला तुम्हाला कर्ज देण्यास आनंदच होईल.
मग आम्हाला एक ईमेल पाठवा: (victoriaemmanuelloan@gmail.com) कर्जाकरता अर्ज करण्यासाठी