'तिरूपतीचे बालाजी पावले,
| ||
अशा मथळ्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. इस्त्रो ही अवकाश संशोधनाच्या क्षेत्रात भरीव कामगिरी करणारी भारत सरकारची वैज्ञानिक संस्था. भारताच्या 100 व्या अवकाश मोहिमेच्या सुरुवातीला ही मोहीम यशस्वी व्हावी म्हणून इस्त्रोचे प्रमुख के. राधाकृष्णन अग्निबाणाची प्रतिकृती घेऊन बालाजीच्या दर्शनाला गेले होते. प्रतिकृती बालाजी समोर ठेवली. मोहीम यशस्वी झाली. जणूकाही बालाजींनीच मोहीम यशस्वी केली. मग इस्त्रोची गरज काय? शास्त्रज्ञ नेमण्याची गरज काय? पुजारीच पुरेसे ना? भारतातील एवढय़ा मोठय़ा अवकाश विज्ञान संस्थेतील लोक अशी कृती करतात याबद्दल आपणा कुणालाही फारसं आश्चर्य वाटत नाही. कारण अशी अतार्किक विचारसरणी विज्ञानाला मान्य नसली, वैज्ञानिक प्रक्रिया संमत नसली, वैज्ञानिक विचारविरोधी असली तरी ती आपल्या संस्काराचा भाग आहे. आपल्या सश्रद्ध वर्तणुकीचा, जगण्याचा एक अविभाज्य घटक आहे. डॉ. अब्दुल कलामांसारखे एक वैज्ञानिक या देशाचे राष्ट्रपती निवडले गेले होते तेव्हा माझ्या सारख्या बुद्धिप्रामाण्यवादी, विज्ञानवादी विचाराच्या माणसाला आनंद झाला होता. पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनंतर एवढय़ा मोठय़ा उच्चपदावर पहिल्यांदा एखादी बुद्धिप्रामाण्यवादी व्यक्ती या देशात विराजमान होते आहे असं वाटलं. मात्र हा आनंद क्षणभंगुर ठरला. राष्ट्रपतिपदाची शपथ घेताच डॉ. अब्दुल कलाम सामान्य जनतेच्या पैशातून, विकत घेतलेल्या विमानातून, वायुदलाच्या स्पेशल विमानातून, पुट्टपार्थिला सत्यसाईबाबांच्या दर्शनाला, नव्हे आशीर्वाद घेण्यासाठी गेले. एवढा मोठा एका वैज्ञानिक सामान्य जादूगारासारखे (कुणीही काही तासांच्या प्रशिक्षणानं हे प्रयोग शिकू शकतो.) हातचलाखीचे प्रयोग करून सोन्याचे हार, अंगठय़ा, विभूती काढणार्या सत्यसाईबाबांसारख्या एका वादग्रस्त, उघड उघड लोकांना फसविणार्या, बाबांच्या पायावर डोकं ठेवायला का जातो? भारताच्या अणुविज्ञान संस्थेचे, संशोधनाचे एकेकाळी प्रमुख असणार्या डॉ. कलामांपेक्षा सत्यसाईबाबा जास्त बुद्धीवान आहेत का? की, त्यांच्याच आशीर्वादानं त्यांना राष्ट्रपती बनवलं किंवा अमिताभ बच्चन सारखा (माझा आवडता नट आहे, त्याच्यावर अनेक लेख लिहिले.) महासदीचा नायक उघड अंधश्रद्धा बाळगतो, त्याचं प्रदर्शन करतो. सुनेचा मंगळ काढण्यासाठी नागबळी करतो. तो कमी बुद्धिमान आहे का? सचिन तेंडुलकरची तीच गत. आपली बॅट चालत नाही म्हणून नागबळी पूजा गाजतवाजत केली. तरी पुढे सात-आठ मॅचेस त्याची बॅट चाललीच नाही. बरं अशी नागबळी करून बॅट चालू लागते हे खरं असेल तर आपण सचिन तेंडुलकरचं एवढं कौतुक करण्याचं काय कारण? नागबळी पूजेचंच कौतुक करू ना? आणि कुणाही सोमा गोम्या, गल्लीतल्या पोर्याला सचिन इतकाच महान बल्लेबाज, अनेक पूजा घालून घालून बनवू या ना? इस्त्रोचे वैज्ञानिक डॉ. अब्दुल कलाम, अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर असे बुद्धिमान, प्रतिभासंपन्न, अनेकांचे विशेषत्वानं युवकांचे आयकॉन आहेत. हे लोक जेव्हा अशी अंधश्रद्धा कृती करतात, अतार्किक गोष्टीचं उघड समर्थन- प्रदर्शन करतात तेव्हा अख्खी भारतीय तरुण पिढी आणखीच त्या दिशेनं, नशिबाच्या, अंधश्रद्धेच्या दिशेनं वाटचाल करण्यास प्रवृत्त होते. आपल्या जीवनातील यशापयश स्वबळावर, स्वकर्तृत्वावर मिळत नसून नशिबामुळं अथवा अशा आधीभौतिक शक्तींच्या कृपाप्रसादामुळं मिळतं असं अधिक घट्टपणे मानू लागते. लहानपणापासून निर्माण झालेला हा अंधश्रद्धांचा विळखा अधिकच घट्ट होतो. त्यामुळे या मोठय़ांचं वागणं हा केवळ वैयक्तिक श्रद्धेचा विषय राहत नाही. तो सामाजिक संस्कारांचा भक्कम आधार बनतो. बर्याच वर्षापूर्वीची गोष्ट. विनोद दुआंचा 'चक्रव्यूह' नावाचा एक चर्चात्मक कार्यक्रम एका टीव्ही वाहिनीवरून प्रसारित होत असे. त्यातील एक कार्यक्रम फलज्योतिष या विषयावरची टीव्ही वाहिनीवरील ही पहिली जाहीर चर्चा. जगजित ऊप्पल नावाचे, टीव्हीवरून नियमित भविष्य सांगणारे, एक खूप प्रसिद्ध ज्योतिषी, मुंबईच्या नेहरू तारांगणाचे संचालक आणि मी असे तिघे चर्चेत होतो. विनोद दुआ अँंकर (संचालक) होते. नेहरू तारांगणाचे संचालक (डायरेक्टर) हे खगोल वैज्ञानिक असतात. वैज्ञानिक क्षेत्रातील ही अत्यंत मानाची, प्रतिष्ठेची पोस्ट समजली जाते. रेकॉर्डिग मुंबईच्या स्टुडिओत होतं. 100-125 प्रेक्षकसंख्या. सारेच्या सारे जगजित उप्पलच्या मागे. पाया पडताहेत, तिथेच भविष्य विचारताहेत, त्यांचं दर्शन घेऊन कृतकृत्य होताहेत, असं भारलेलं वातावरण. तरुण-तरुणींची संख्या अधिक. हिंदीत कार्यक्रम असला तरी सारे आंग्लाळलेले, इंग्रजी बोलणारे आणि राशिभविष्यानुसार दिवसाचा दिनक्रम ठरवणारे. मला वाटलं किमान एक वैज्ञानिक आपल्यासोबत आहेत. ते नेहरू तारांगणाचे संचालक असल्यामुळं विज्ञानवादी विचार प्रखरपणे मांडतील, किमान विज्ञान विचारांचं समर्थन करतील. झालं भलतच.पहिल्या टप्प्यातील चर्चेतच त्यांनी फलज्योतिषाचं समर्थन केलं. सुरुवातच अशी केली,''मी एका पुजार्याचा मुलगा आहे. माझे वडील ज्योतिषी होते. मोठय़ा कष्टानं मी शिकलो. वैज्ञानिक बनलो, एवढय़ा मोठय़ा वैज्ञानिक पदावर पोहोचलो. राशिभविष्य यावर माझी श्रद्धा आहे.'' पत्रिकेतील राहू केतूचा विषय निघाला. राहू, केतू, चंद्र, सूर्य हे ग्रह नसल्यामुळं मी जगजित उप्पल यांची भंबेरी उडवत होतो. त्यांना काही त्याचं समर्थन करता येईना. हे वैज्ञानिक त्यांच्या मदतीला धावले, ''हॉ! राहू केतू का परिणाम होता है! ये परंपरागत भविष्यशास्त्र है, सदियोंसे हम इसे मानते आये है' वगैरे बोलायला लागले. मग माझ्यातला कार्यकर्ता जागा झाला, 'तुम्हाला येथे एक पुजार्याचा, ज्योतिष्याचा मुलगा म्हणून बोलावलं नाही. एक वैज्ञानिक, नेहरू तारांगणाचा संचालक, खगोलशास्त्रातील तज्ज्ञ म्हणून बोलावलं आहे. तुमच्या खगोलशास्त्रानुसार राहू, केतू नावाचे ग्रह अस्तित्वात आहेत का? चंद्र व सूर्य (रवी) हे ग्रह आहेत का? ते सांगा. तुमच्या वैयक्तिक अंधश्रद्धा सांगू नका.'' तेव्हा कुठे महाशय जागेवर आले.''खगोलशास्त्रानुसार राहू, केतू हे ग्रह नाहीत, ते अस्तित्वातच नाहीत. रवी हा तारा आहे, चंद्र (सोम) हा उपग्रह आहे. हे जाहीररीत्या बोलले.' सारा घोळ विनोद दुआंच्या लक्षात आला. खरं म्हणजे ते अँंकर, पण तेही आतून चिडले. कार्यक्रमाच्या दुसर्या सेगमेंटमध्ये त्यांनी या वैज्ञानिकाच्या हातून नारळ फोडून घेतलं. प्रस्तावना केली. ''हम भूल गये थे! इस कार्यक्रम का शुभ- उद्घाटन हमने नहीं किया! अब करते है! ये नारीयल इनके हाथों से फोडते है! क्योंकि ये एक पूजारी के बेटे है और इनका शुभ, अशुभ पर गहरा विश्वास है! वे नेहरू तारांगण इस वैज्ञानिक संस्था के संचालक है! लेकिन पूजारी के बेटे है'' वैज्ञानिक महोदयांनी नारळ फोडलं. विनोद दुआ आपली खिल्ली उडवताहेत हेही त्यांच्या लक्षात आलं नाही. जगजित उप्पलचे हाल हाल झालेत. 'फल-ज्योतिष्याची भाकिते 90 टक्के सिद्ध करा आणि 1 लाखांचं पारितोषिके घ्या' हे आव्हान मी टाकलं. अर्थात, त्यांनी स्वीकारलं नाही. कार्यक्रम खूप गाजला. झी टीव्हीनं तो अनेकवेळा रिपिट केला. एक मोठा खगोलशास्त्रज्ञ, आपल्या क्षेत्रातील तज्ज्ञ माणूस. त्याच्या अभ्यासशास्त्रानुसार राहू, केतू, चंद्र, सूर्य हे ग्रह नाहीत. पत्रिकेला शास्त्रीय आधार नाही. तरी संस्कारामुळं तो ज्योतिष मानतो, सार्या अंधश्रद्धा मानतो. कारण विज्ञान हा केवळ त्याच्या पोटापाण्याचा भाग आहे. वैज्ञानिक विचार, विज्ञान हा त्याच्या बुद्धीचा भागच नाही. ज्या तर्कशुद्ध विचारांवर अख्ख विज्ञान उभं आहे. माणूस तर्कशुद्ध विचार करायला लागल्यामुळं विज्ञानाचा विकास झाला, माणसाची एवढी प्रगती झाली. तो वैज्ञानिक विचार आपल्या भारतीयांच्या जीवनाचा, बुद्धींचा भाग बनू शकला नाही. विज्ञानाच्या क्षेत्रात आपण उल्हासनगर (मेड इन यूएसए) आहोत. इतरांचं मूलभूत संशोधन आपण आयतं वापरतो. त्यात थातूरमातूर बदल करून, ते थोडसं विकसित करून काही उत्पादन करतो आणि स्वत:ला महासत्ता बनविण्याच्या गप्पा मारतो. भारत महासत्ता बनविण्याचं भविष्य वर्तविणारे वा तसा आशावाद वर्तविणारे वैज्ञानिक डॉ. अब्दुल कलामच जर अवैज्ञानिक विचार करणारे असतील, सत्यसाईबाबांसारख्या जादूगाराच्या पाया पडून अवैज्ञानिक आचारांचे प्रदर्शन करणारे असतील तर भारत कशा प्रकारची महासत्ता बनू शकेल? सर्वसामान्य भारतीय माणसानं आपल्या मेंदूचे दोन कप्पे करून टाकले आहेत. एका कप्प्यानं तो विज्ञान शिकतो, प्रयोगशाळेपुरती वैज्ञानिक प्रक्रिया वापरतो, त्याच्या आधारावर डॉक्टरेट मिळवितो, वैज्ञानिक जागा पटकावतो, नेहरू तारांगणाचा संचालक बनतो, इस्त्रोचा वैज्ञानिक बनतो, अंतराळ संशोधनाचा प्रकल्प संचालक बनतो. त्यावर पोट भरतो. पण त्या वैज्ञानिक प्रक्रिया विचारांना तो बिलकूल मेंदूच्या दुसर्या कप्प्यात शिरू देत नाही. तर्कशुद्ध विचार, वैज्ञानिक विचार जीवनाचा भाग बनवत नाही. कारण त्याच्यावर लहानपणापासून संस्कार होतो. 'विज्ञान खरं असतं, ठीक असतं. पण जिथून विज्ञान संपतं तिथून खरं अध्यात्म, आधिभौतिक जग सुरू होतं. या जगाला विज्ञानाचे नियम लागू पडत नाहीत.' हा या देशातील सगळ्यात मोठा खड्डा आहे अंधश्रद्धेचा. ज्यात आपण वारंवार पडतो. वैज्ञानिक जगात एक म्हण आहे, 'न्यूटन जे सिद्ध करतो तेवढंच महत्त्वाचं आहे. तो काय म्हणतो ते बिनमहत्त्वाचं आहे' हे आपण केव्हा शिकणार? (लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक आहेत.) भ्रमणध्वनी - 9371014832 |
Saturday, 15 September 2012
डॉ.कलाम, अमिताभ, सचिनवर चुकीच्या संस्काराचा पगडा
Monday, 10 September 2012
नशिबाच्या दोरावरून पळणं सोडा
A A << Back to Headlines
आम्ही पत्रकार छापत असलेली नेहमीची बातमी-''सुमोभरून दहा माणसं दर्शनासाठी चालली होती. रस्त्यात अपघात झाला. सुमो गाडीचा पार चकनाचूर झाला. 'ऑन द स्पॉट' नऊ माणसं मेलीत. एक माणूस जिवंत राहिला. देव तारी त्याला कोण मारी.'' ही बातमी वाचून आपण सारेच खूश होतो. आपल्याला वाटतं अपघातात दहाही माणसं मरणार होती. त्यापैकी नऊ मेलीत, पण नेमकं एकाला देवानं वाचवलं. पण हे खरं आहे का? अपघात झाला हे खरं. नऊ माणसं मेलीत हेही खरं. पण ही नऊ माणसं देवाच्या परवानगीशिवाय, संमतीशिवाय मेलीत का? जर देवानं एकाला वाचविलं असं आपल्याला म्हणायचं असेल तर नऊ माणसांना देवानेच मारलं असंही आपल्याला म्हणावं लागेल. मात्र हे आपल्या लक्षातच येत नाही. खरं काय आहे? ''अपघातानं नऊ माणसं मेलीत. त्याचप्रमाणे अपघातानंच त्यातील एक माणूस वाचला.'' नाहीतर ''देवानं एकाला मुद्दाम वाचवलं आणि नऊ माणसांना मुद्दाम मारलं.'' या दोन वाक्यांपैकी कोणतं तरी एक वाक्य पूर्ण खरं आहे. दोन्हीमधलं अर्धअर्ध वाक्य खरंच असू शकत नाही. स्वामी विवेकानंद इंग्रजीतील एक म्हण नेहमीच वापरत असत. ''देव त्यांनाच मदत करतो जे स्वत:ची मदत करतात.'' याचा नेमका अर्थ काय? ''देईल हरी खाटल्यावरी असं कधीच घडत नाही. माणसानं कष्ट केल्याशिवाय, मेहनत केल्याशिवाय फळ मिळत नाही. मी स्वामी विवेकानंदांना खरा समाजसुधारक मानतो. तर्कशुद्ध विचार करण्यास प्रवृत्त करणारा धार्मिक संत मानतो ते याचमुळं. त्यांच्या अशा प्रखर विचारांमुळं. आता नशीब आणि कर्तृत्व यात कसा अंतर्विरोध आहे ते आपण समजून घेऊ. नशीब म्हणजे गेल्या जन्मीच्या पाप-पुण्यामुळं असेल अथवा कुणी आपलं नशीब लिहून ठेवलं असेल म्हणून असेल, पण ''जे आपल्या आयुष्यात घडणार आहे ते आधीच ठरलेलं असतं. ते त्यानुसारच घडतं.'' असं मानणं म्हणजे नशीब मानणं. कर्तृत्व म्हणजे आपण जी कृती करतो, प्रयत्न करतो, मेहनत घेतो ते. 'केल्याने होत आहे रे' या उक्तीनुसार आपल्या आयुष्यात घडणार आहे असं मानणं, त्यानुसार जगणं, त्याप्रमाणं परिश्रम करणं म्हणजे कर्तृत्व. थोडक्यात परिश्रम केले तरच काही घडतं अथवा काही घडत नाही असं मानणं. या दोन्हीही संकल्पना परस्परविरोधी आहेत. नशीब खरं असेल तर कर्तृत्वाला वाव असूच शकत नाही. काही केलं काय आणि नाही केलं तरी, ठरलं आहे. त्यानुसारच घडणार आहे. कर्तृत्वाला यात मुळी स्थान असूच शकत नाही. याचा अर्थ 'देई नशीब खाटल्यावरी' असा होतो. म्हणूनच गेल्या लेखात मी असं नशीब मानणार्यांना म्हटलं होतं, ''मी येतो. तुमच्या मुस्काटात एक मारतो. म्हणतो, नशिबात होतं (तुमच्या) म्हणून तुम्ही झापड खाल्ली. माझ्या नशिबात होतं म्हणून मी मारली.'' पण आपल्यापैकी कुणीही असं नशीब मानायला तयार नाही. तरी आपण, अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर नशीब का मानतात, असे विचारतो. ''कर्तृत्वाला नशिबाची साथ असावी लागते का?'' असाही आपला प्रश्न असतो. कारण आपल्याला तर्कशुद्ध विचार करता येत नाही म्हणून. कर्तृत्व केल्याशिवाय काहीच घडत नाही. हे आपल्याला मान्य असतं. त्याबद्दल आपल्या मनात संदेह नसतो. पण अनेकदा आपण कर्तृत्व करूनसुद्धा, खूप प्रयत्न करूनसुद्धा अपेक्षित यश मिळत नाही आणि मग आपण त्या अपयशामागची नेमकी कारणं न शोधता नशिबाला बोट लावून मोकळे होतो. आता मी कितीही करेक्ट कार चालवली, हायवेवरून प्रवास करताना सगळे रहदारीचे नियम काटेकोरपणे पाळलेत, तर माझा अपघात होणारच नाही का? होऊ शकतो. समजा समोरच्या ट्रक ड्रायव्हरनं चूक केली तर, चांगल्या रस्त्यामध्ये मध्येच एखादा मोठ्ठा खड्डा पडला असेल तर आणि त्या ठिकाणी रोड संबंधित अधिकार्याने कोणताच सूचनाफलक लावला नसेल तर अथवा अचानक एखादं मोकाट जनावर रस्त्यावर धावत आलं असेल तर अपघात होऊ शकतो. माझी काहीही चूक नसतानासुद्धा त्या अपघाताचे दुष्परिणाम मला भोगावे लागतील. मग हे दुष्परिणाम माझ्या नशिबाचा भाग आहे का? नशीब मानलं तर हा अपघात आधीच ठरला होता त्याप्रमाणं घडला असं मानावं लागेल. मग कुणाला दोष देता येणार नाही. पण हे खोटं आहे. अपघात का घडला? ट्रक ड्रायव्हरच्या चुकीमुळं अथवा रोड इंजिनिअरनं रोड बांधताना भ्रष्टाचार केल्यामुळं वा आपलं कर्तव्य नीट न बजावल्यामुळं (खड्डय़ाचा फलक लावण्याचं काम) अथवा जनावरांच्या मालकानं जबाबदारी पार न पाडता जनावराला मोकाट सोडून हायवेवर जनावर येऊ दिल्यामुळं अपघात घडू शकतो. म्हणजे माझी वैयक्तिक चूक नसतानासुद्धा दुसर्या कुणाच्या तरी चुकीचे परिणाम मला भोगावे लागतात. कारण आपण एकटे नसतो, शंभर टक्के स्वतंत्र नसतो. आपण सारेच आपल्या देशाचे, समाजाचे घटक असतो. समाजात निर्माण होणार्या संधीचे आपल्याला फायदेही मिळतात आणि समाजात निर्माण होणार्या चुकांचे परिणामही भोगावे लागतात. इतरांच्या चुकांचे परिणाम पाहिले. आता फायद्याचे पाहू. 1978 मध्ये मी इंग्रजी साहित्याच्या एम.ए. फायनल परीक्षेला बसलो. त्या काळी मी एक वक्ता म्हणून प्रसिद्ध होतो. स्त्रीमुक्ती चळवळींमध्ये अग्रेसर होतो. नागपूरच्या दै. 'तरुण भारत'चा माझा युवकांसाठीचा स्तंभ अतिशय लोकप्रिय होता. यवतमाळ जिल्ह्यातील एका महाविद्यालयाचे काही प्राध्यापक ''तुम्ही आमच्या कॉलेजमध्ये इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून जॉईन व्हा,'' अशी विनंती करायला आले. दुसरीकडे जाऊन नोकरी मागण्यापेक्षा ही आयती चालून आलेली सन्मानजनक संधी घ्यायचं मी ठरवलं. परीक्षेचा निकाल लागायचाच होता. निकाल लागला. पास झालो. त्या कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झालो. सिनिअर कॉलेजलाही शिकविण्याची संधी मिळाली. हे माझं नशीब होतं का? आज महाराष्ट्रातल्या कोणत्याही विद्यापीठातून इंग्रजी साहित्यात फर्स्टक्लास आलेल्या विद्यार्थ्यालासुद्धा सहजासहजी अशी सिनिअर कॉलेजला प्राध्यापकी मिळणार नाही. मग त्याचं नशीब वाईट आहे का? 1978 मध्ये इंग्रजी विषयातील प्राध्यापकांचा खूप तुटवडा होता. या क्षेत्रात भरपूर संधी होती. म्हणून मला कुठेना कुठे प्राध्यापकी मिळणारच होती. फक्त मला नावलौकिक असल्यामुळं पास होण्याच्या आधीच निमंत्रण मिळालं एवढंच ते काय घडलं. त्या काळी समाजात संधी होती म्हणून मला प्राध्यापकी मिळाली. आज या क्षेत्रात सॅच्युरेशन निर्माण झालं आहे. म्हणून आज जशी सहज प्राध्यापकी मिळणार नाही, एवढाच याचा अर्थ आहे. नुसतं आपलं कर्तृत्व महत्त्वाचं नसतं. आपण समाजाचा घटक असल्यामुळं समाजात उपलब्ध असलेल्या संधीनुसार अनुकूल कर्तृत्व केलं तरचं त्या कर्तृत्वाचं फळ मिळतं हे आपण समजून घेत नाही आणि अपयशाची कारणं न शोधता नशिबाचे ढोल बडवत बसतो. नशीब असेल तर कर्तृत्वाला वाव असूच शकत नाही आणि कर्तृत्व खरं असेल तर आधी नशीब ठरलेलं असू शकत नाही हे आपण समजून घेतलं पाहिजे. आपली भाषा सुधारली पाहिजे. विचारप्रक्रिया तर्कशुद्ध केली पाहिजे. एक गोष्ट सांगून संपवितो. शिवाजी राजांचे तानाजी मालुसरे गड 'सर' करायला गेले. ('गड आला, पण सिंह गेला.') घोरपडी-दोर लावून गडावर चढले. लढाई सुरू झाली. तानाजी धारातीर्थी पडले. सेनापती पडल्यावर सारे मावळे गडाच्या दोरावरून उतरून पळू लागले. तानाजीच्या भावानं सारे दोर कापले, ''आता उडय़ा टाकून नेभळटासारखे मरा, नाहीतर शूरासारखे लढून मरा अथवा जिंका,'' असा आदेश सोडला. परिणाम, सारे मावळे लढले. गड जिंकला. आता तरी नशिबाच्या दोरावरून पळणं सोडा. समोर आलेल्या प्रसंगाला धैर्यानं व कर्तृत्वानं तोंड द्या. जिंका अथवा मरा, पण भेकडासारखं जगणं, पळणं सोडा. (लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक आहेत.) भ्रमणध्वनी -9371014832 |
Saturday, 1 September 2012
नशीब : नेभळट, षंढ माणसांनी शोधलेली पळवाट
समजा आपण सारे परीक्षेला बसलो आहोत. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर 'होय' अथवा 'नाही' असं टिकमार्क करायचं आहे. मीही तुमच्यासोबत परीक्षा देतो आहे. मी मुळीच अभ्यास केला नाही. 100 प्रश्नांपैकी मला एकाही प्रश्नाचं उत्तर येत नाही. म्हणजे माझी लायकी भोपळा (शून्य) मिळण्याची आहे. पण मी जर थोडी अक्कल वापरली आणि सारीच्या सारी उत्तरं 'होय' अशी टिकमार्क केली, तर? कदाचित शंभरपैकी पन्नास प्रश्नांची उत्तरं अचूक निघतील. मला 50 टक्के मार्क्स मिळतील. कदाचित 70 प्रश्न बरोबर ठरून 70 टक्के मार्क्स मिळतील. पण मला शून्य मार्क्स मिळतील का? शक्य नाही. कारण त्यासाठी मला सारे प्रश्न चुकवावे लागतील. खरी उत्तरं माहिती नसल्यामुळं ते मी चुकवू शकणार नाही. कमीतकमी 30 प्रश्न बरोबर निघतील आणि मला 30 टक्के मार्क्स मिळतील. म्हणजे माझी लायकी भोपळा मिळण्याची असतानासुद्धा मला 30 ते 70 टक्के यामधील कितीही मार्क्स मिळू शकतात. हा निसर्गातील चान्स फॅक्टर, शक्याशक्यतेचा नियम कळला आणि विज्ञानाची प्रगती झपाटय़ानं व्हायला लागली. ज्यावेळी निसर्गात, कोणत्याही विषयात ही 'लॉ ऑफ प्रॉबेबिलिटी' ओलांडणारी भाकितं वारंवार खरी ठरतात. म्हणजे 100 घटनांमध्ये 70 टक्क्यांपेक्षा अधिक घटनांची भाकितं अचूक ठरतात. त्यात काही तथ्य आहे असं मानलं जातं. मग त्या विषयाचा वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास केला जातो. त्यात सातत्यानं हा शक्याशक्यतेचा नियम ओलांडणारे रिझल्टस् मिळत गेले तर त्या विषयाला विज्ञानाचा दर्जा मिळतो. त्या विषयात अधिक संशोधन करण्यास प्रोत्साहन दिलं जातं. मानवजातीला, विज्ञान जगताला, शक्याशक्यतेचा नियम गवसला आणि मग विज्ञानाची प्रगती झपाटय़ानं झाली. शारीरिक विज्ञानात सजेशनचं सामर्थ्य (मनावर होणारा सूचनांचा परिणाम) कळलं आणि मेडिकल सायन्समधील मेडिसीनची प्रगती झपाटय़ानं झाली. सार्या मानवजातीचं आयुर्मान आश्चर्यकारकरीत्या वाढलं. औषधांच्या चाचण्या घेताना 'प्लासिबो' इफेक्ट तपासला जातो. एकाच प्रकारचं दिसणारं औषध दोन वेगवेगळ्या ग्रुपला दिलं जातं. त्या औषधाचे परिणाम होणार आहेत, हे दोन्ही ग्रुपला सांगितलं जातं. एका ग्रुपला खरं औषध दिलं जातं. दुसर्या ग्रुपला मात्र तशाच वेष्टणात औषधी गुणधर्म नसलेली नुसतीच पावडर (वा गोळी) दिली जाते. आता दुसर्या ग्रुपला औषध दिलेलं नसतानाही काही लोकांबाबत परिणाम मिळतात. हे औषधासोबत सांगितलेल्या सजेशनचे (असे असे परिणाम होणार आहेत) परिणाम असतात. पहिल्या ग्रुपला 'ज्याला खरं औषध दिलं असतं.' जर दुसर्या ग्रुपपेक्षा अधिक प्रमाणावर परिणाम मिळाले तरच त्यात काही औषधी गुणधर्म आहेत असं मानलं जातं. या चाचण्यांचे वारंवार असेच परिणाम मिळाले तर त्या औषधाला मान्यता मिळते. हे औषध सजेशनचं सामर्थ्य ओलांडून रिझल्टस् देऊ शकत असल्यामुळं औषधांच्या क्षेत्रात प्रगती साधता आली. त्याचप्रमाणं शक्याशक्यतेचा नियम ओलांडून तपासणी करण्याच्या पद्धती विकसित झाल्यानं विज्ञानाची प्रगती झाली. माणसाच्या दहा लाख वर्षाच्या आयुष्यात मानवजातीनं गेल्या 150 वर्षात उरलेल्या 9 लाख 99 हजार 850 वर्षापेक्षा अधिक प्रगती केली. त्यामागचं हे कारण आहे. आपल्याला सत्य शोधण्यासाठी वैज्ञानिक पद्धती, सायंटिफिक मेथड सापडली आहे. या वैज्ञानिक पद्धतीचा काटेकोर वापर करून आज प्रत्येक क्षेत्रातलं सत्य तपासलं जातं. या फुटपट्टीवर जे खरं ठरत नाही., वैज्ञानिक पद्धतीच्या कसोटीवर जे खरं उतरत नाही त्याला कचरा, पालापाचोळा समजून फेकून दिलं जातं. सोळावं ते विसावं या चार शतकांमध्ये फलज्योतिषाला वारंवार वैज्ञानिक कसोटय़ांवर तपासण्यात आलं. ते कधीच 'लॉ ऑफ प्रॉबेबिलिटी'ची शक्याशक्यतेची कसोटी ओलांडू शकलं नाही. म्हणून वैज्ञानिक जगतातून त्याला हद्दपार करण्यात आलं आहे. आता फलज्योतिष हे केवळ आपल्या अंधश्रद्धाळू मनांमुळं जिवंत आहे आणि काही अंधश्रद्धा जोपासण्याचा विडा उचललेल्या कालिदास संस्कृत विद्यापीठांसारख्या विद्यापीठात जिवंत आहे. पण या अभ्यासक्रमांना वैज्ञानिक मान्यता नाही. पंचांगामध्ये दोन भाग असतात. सूर्योदय, सूर्यास्त, चंद्रोदय, चंद्रास्त, ग्रहण हा ग्रहगोल, गती, स्थान यासंबंधित अभ्यास खरा असतो. त्याला आपण खगोलशास्त्र म्हणतो. तो आजच्या काळात 100 टक्के अचूक सांगता येतो. पंचांगामधला दुसरा भाग शुभ, अशुभ मुहूर्त, राहू, केतू, काळ, भविष्य, राशिभविष्य हे सारं निर्थक असतं. त्याला कोणताही आधार नसतो. सारी भारतीय माणसं शुभमुहूर्तावर लग्न करतात. शुभकार्याला सुरुवात करतात तरी अनेकांची लग्न फसतात. अनेकांचे व्यवसाय, कार्य बुडतात. तरी आपला विश्वास मात्र कायम असतो. हिंदुत्ववादी म्हणवणार्या सावरकरांचं एक वाक्य फार प्रसिद्ध आहे, ''आमचे पेशवे प्रत्येक काम मुहूर्त पाहून करीत असत. संकट आलं तर गणपती पाण्यामध्ये बुडवून ठेवत असत.पण कधीही मुहूर्त न पाहणार्या इंग्रजांनी कधीही सूर्य मावळत नाही एवढय़ा मोठय़ा पृथ्वीच्या भूभागावर आपलं साम्राज्य निर्माण केलं आणि मुहूर्त पाहणार्या आमच्या पेशव्यांची पेशवाई मात्र गणपतीसारखीच पाण्यामध्ये बुडाली.'' किंवा स्वामी विवेकानंद म्हणत असतात, ''जोवर या देशातला तरुण नशिबावर विश्वास ठेवतो, नशिबात असेल तसंच घडतं यावर विश्वास ठेवतो तोवर या भारत देशाला भवितव्य नाही.'' तुमचं माझं नशीब आधी ठरलं असेल तरच ज्योतिष्याला कुंडलीच्या आधारे ते सांगता येईल. पण ते आधीच ठरलं असतं? जर ते आधीचं ठरलं असेल तर तुम्हाला मला करण्यासारखं काही उरतं काय? खरंच कुणाचा नशिबावर 100 टक्के विश्वास असतो? मी माझ्या दर भाषणात जाहीररीत्या विचारतो, ''नशिबावर कुणाचा 100 टक्के विश्वास आहे का? जो 'हो' म्हणेल, त्याच्याजवळ मी येतो. एक जोरदार थापड मुस्काटात मारतो. म्हणतो बाबारे, तुझ्या नशिबात होतं तू झापड खाल्लीस, माझ्या नशिबात होतं मी मारली, चालेल का?'' आपल्यापैकी एकालाही हे मान्य होणार नाही. जोपर्यंत मानव आपल्या मेंदूनं झापड मारण्याचं ठरवत नाही तोवर ते झापड मारणार नाहीत. म्हणून झापड मारणार्याचा तो निर्णय असल्यामुळं त्या कृत्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली पाहिजे, परिणामस्वरूप शिक्षा भोगली पाहिजे. ज्योतिष्याचा आधारच 'नशीब ठरलं आहे' हा आहे. आणि आपलं नशीब वगैरे काहीही ठरलेलं नसतं. ही निव्वळ नेभळट, षंढ माणसांनी शोधलेली पळवाट आहे. आपण भारतीय माणसं हजारो वर्षापासून या नशिबाच्या पळवाटीनं पळतो आहोत.म्हणूनच हजारो वर्षापासून आपल्या देशात जात व्यवस्था टिकली, अस्पृश्यता टिकली. गाईवर प्रेम करणारी, गाईची पूजा करणारी माणसं हजारो वर्षे इतर माणसांना शूद्र लेखून ढोरापेक्षाही वाईट जीवन जगायला मजबूर करू लागली. आपला समाज कधीच एकसंघ नव्हता. तो जातीजातींमध्ये विखुरला होता. म्हणून 500 वर्षे लुटालुटीची आणि आठशे वर्षे गुलामगिरीची या भारताला भोगावी लागली. अब्राहम लिंकनचं एक प्रसिद्ध वाक्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर नेहमी उच्चारत असत, ''गुलामाला त्याच्या गुलामगिरीची जाणीव करून द्या, म्हणजे तो गुलामगिरीविरुद्ध बंड करून उठेल.'' भारतात जाती-अस्पृश्यतेच्या नावावर गुलामगिरीसोबतच दोन हजार वर्षापेक्षा अधिक काळ वेठबिगारी लादली गेली, पण त्याविरुद्ध कधीच बंड झालं नाही. कारण कर्मविपाक सिद्धांताचं अद्भुत रसायन.''बाबारे, तू अस्पृश्य का? शुद्ध का? तर गेल्या जन्मात पाप केल्यामुळं. बाबारे, हा ब्राह्मण का? तर गेल्या जन्मात पुण्य केल्यामुळं. त्यामुळं या जन्मात तुझ्या नशिबात जे आलंय ते निमूटपणे भोग. मुकाटय़ानं सहन कर. कदाचित असा वागलास तर पुढच्या जन्मात, या जन्मातील पुण्यसंचयामुळं चांगला जन्म मिळेल.'' भारतीय माणसं फक्त गेल्या जन्माचं पापच फेडत आलीत. डोकचं पार गुलाम करून टाकलं होतं या संकल्पनेनं. म्हणून भारतात कधीच जातिव्यवस्थेविरुद्ध बंड झालं नाही. ज्योतिष्यावरचा विश्वास म्हणजे भविष्यावरचा विश्वास. आपली कुंडली मांडली जाते, ती खरी असते? त्याला काही शास्त्रीय आधार आहे? त्यातील ग्रहांचा मानवी जीवनावर परिणाम होतो? हो जाता जाता, गेल्या शनिवारच्या लेखानंतर एकाचा मला चिडून 'एसएमएस' आला. 08275948967 या फोनवरून 'तुम्ही उद्या मरणार आहात.'25 तारखेला दुपारी 2.05 वाजता आलेला हा 'एसएमएस' बहुधा एखाद्या चिडलेल्या ज्योतिषाचा असावा. पोलिसांत तक्रार करण्यापेक्षा मी वाचकांनाच कळविलं. मी अजून जिवंत आहे. काय म्हणाल तुम्ही? ''कावळ्याच्या शापानं..'' (लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक आहेत.) भ्रमणध्वनी-9371014832 |
Saturday, 25 August 2012
ज्योतिष खरं असतं का हो?
आधी केवळ राजांचं भविष्य सांगितलं जात असे. जसजशी ज्योतिष्यांची संख्या वाढत गेली तसं तसं इतरांचं भविष्य सांगण्याच्या पद्धती विकसित झाल्यात आणि भारतासारख्या देशात त्याला धार्मिक अधिष्ठान लाभल्यामुळं ते संपूर्ण जीवनव्यापी बनलं. ज्योतिर्विद्येत दोन भाग असतात. एक ग्रहगोलांच्या स्थिती गतीचा अभ्यास. या आधारावर महिना, ऋतू, अमावस्या, पौर्णिमा, सूर्यादय, सुर्यास्त, ग्रहण याची माहिती मिळवली जाते. आजच्या काळात याला आपण अँस्ट्रोनॉमी खगोलशास्त्र म्हणतो. आज आपलं खगोलशास्त्र अतिशय अचुक आहे. त्याआधारे आपण पुढच्या पाच लाख वर्षानंतर होणार्या पौर्णिमा, अमावस्या, ग्रहण, सुर्यादयाचं अचूक निदान करू शकतो. म्हणूनच माणसाचं दान चंद्रावर जाऊन माणसाला घेऊन परत येऊ शकलं. आता अमेरिकन यान मंगळावर उतरून तेथील सारी माहिती पृथ्वीवर पाठवतं आहे. ज्योतिर्विद्येचा दुसरा भाग - भविष्य कथानाचा. याला आज अँस्ट्रोलॉजी फलज्योतिष असं म्हणतात. अठराव्या शतकापर्यंत या दोन्ही शाखा वा दोन्ही भाग एकच होते. प्रत्येक खगोलशास्त्रज्ञ भविष्य सांगण्याचं काम करत असते. ग्रीक तत्ववेत्ता अरिस्टकर्स ऑफ सॅमॉस याने 2250 वर्षापूर्वी सांगितलं होतं की 'पृथ्वी गोल आहे आणि ती सूर्याच्या भोवती फिरते.' एवढं मोठं सत्य सांगणारा हा गणितज्ज्ञही त्याकाळी भविष्य कथनाचं काम करत असे. पाचव्या शतकात भारतातील आर्यभट्टाने हेच मत (पृथ्वी गोल, सूर्याभोवती फिरते) मांडलं. त्याला गणिताच्या आधारावर हेच मत खरं आहे हे कळत होतं. पण त्या काळातल्या इतर ज्योतिर्विदांनी आर्यभट्टाची खिल्ली उडवली. 'पृथ्वी गोल असती तर दूरवर प्रवास करणारे प्रवाशी घसरून पडले नसते का?' 'पृथ्वी फिरत असती तर सकाळी उडणार्या पक्षांना आपलं घरटं - झाड कसं सापडलं असतं' असले तार्किक दृष्टय़ा खरे वाटणारे प्रश्न विचारले. या प्रश्नांची उत्तरं आर्य भट्टाला देता आली नाहीत. ज्योतिषी म्हणून आर्यभट्टाला प्रचंड प्रतिष्ठा होती. तरी त्याचं हे मत मात्र कुणी मान्य केलं नाही. हा आर्यभट्टही त्याकाळी भविष्यकथनाचं काम करत असे. 'सूर्याभोवती फिरताना पृथ्वी स्वत:सोबत साधारणत: 200 मैलांचं वातावरण - गुरूत्वाकर्षणामुळं घेऊन फिरते. त्यामुळं माणसं घसरून पडत नाही. आणि पक्ष्यांना आपली घरटी बरोबर सापडतात' हे कारण त्या काळात आर्यभट्टाला कसं सांगता येणार? त्याला कुठे गुरूत्वाकर्षणाची माहिती होती. सोळाव्या - सतराव्या शतकात दुर्बिणीच्या आधारे अधिक अचूक पृथ्वी - सूर्याचं नातं मांडणारा गॅलिलिओ हाही भविष्य सांगत असे. माणसांचे होरोस्कोप, कुंडली तयार करत असे. त्याकाळी युरोपमधील विद्यापीठांमध्ये गॅलिलिओचं खुप नाव होतं. तो अतिशय मोठा गणितज्ज्ञ, वैज्ञानिक म्हणून नावाजला होता, प्रतिष्ठित झाला होता. डय़ूक फर्डिनांड आजारी पडला. सगळ्यात मोठा ज्योतिषी म्हणून गॅलिलिओकडे त्याची कुंडली अभ्यासासाठी आली. गॅलिलिओकडे त्याची कुंडली अभ्यासासाठी आली. गॅलिलिओनं त्यावेळच्या शास्त्रानुसार कुंडलीचा अभ्यास केला. भविष्य वर्तविलं. डय़ूक फर्डिनांड अजून दीर्घकाळ जगणार आहे. अर्थात डय़ूक फर्डिनांड मोठं प्रस्थ असल्यामुळं गॅलिलिओचं हे भाकित युरोपभर पसरलं. पण 25 दिवसांतच डय़ूक फर्डिनांड वारला. अख्ख्या युरोपमध्ये हा चर्चेचा विषय झाला. सगळ्या विद्यापीठांमध्ये कुंडलीचा अभ्यास केला जात असे. पुन्हा पुन्हा डय़ूक फर्डिनांडच्या कुंडलीचा अभ्यास केला गेला. 'गॅलिलिओचं गणित अचुक होतं, भाकितही अचुक होतं' तरी प्रत्यक्षात डय़ूक वारला. भविष्य चुकलं. असं का घडलं?' म्हणून युरोपभर यावर चर्चा घडून आली. डय़ूक फर्डिनांडची जन्मवेळ चूक असावी, त्याची कुंडलीच अचूक नव्हती म्हणून भविष्य चुकलं. अशी पळवाट युरोपियन विद्यापीठांनी काढली नाही. यातून एका नव्या विचारांचा अंकुर फुटला. ग्रह गोलांचा अभ्यास खरा आहे. पण ग्रहगोलांचा मानवी जीवनावर परिणाम होतो हे मानून आपण भविष्य सांगतो ते खरं नसावं. पुढील काटेकोर अभ्यासातून हा विचार अधिकाधिक पक्का होत गेला. कारण दुर्बिणीच्या शोधानंतर, गॅलिलिओनंतर, ग्रहगोल गतींचा, स्थितींचा (म्हणजे खगोलशास्त्राचा) अभ्यास खुप अचूक होऊ लागला. पण दुसर्या बाजूनं भविष्य कथनातल्या चुकाही, फोलपणाही तेवढय़ाच तीव्रतेनं लक्षात येऊ लागला. अठराव्या शतकाच्या शेवटी अँस्ट्रोलॉजी ज्योतिर्विद्येच्या दोन स्वतंत्र शाखा निर्माण झाल्यात. एक अँस्ट्रोनॉमी खगोलशास्त्र आणि दुसरी उरलेली अँस्ट्रोलॉजी फलज्योतिष. विसाव्या शतकात मात्र खगोलशास्त्रानं फलज्योतिष्याला पूर्णत: नाकारलं. जर एखादा खगोलशास्त्रज्ञ भविष्य सांगत असेल तर त्याला खगोलशास्त्राची फेलोशिप दिली जाणार नाही. म्हणजे त्याला खगोलशास्त्रज्ञ म्हणून मान्यता मिळणार नाही असा नियम रूढ झाला. आज जगताल्या सगळ्या विद्यापीठांमध्ये सायन्सचा एक भाग म्हणून (फिजिक्स, अँस्ट्रोफिजिक्स वा अँस्ट्रोनॉमी, अँस्ट्रोनॉमी शिकवली जाते. पण कोणत्याच विज्ञान - विद्यापीठांमध्ये अँस्ट्रोलॉजी मात्र शिकविली जात नाही. अँस्ट्रोलॉजी, फलज्योतिष्याला विज्ञानाची प्रतिष्ठा नाही. यावर दीर्घकाळ संशोधनं झालीत. त्यात काही तथ्थ्य न आढळल्यामुळं एक निर्थक, टाकावू भाग म्हणून फलज्योतिष्याला टाकून देण्यात आलं आहे. कोणताही आधार नसताना, तत्थ्य नसतानासुद्धा आज भविष्य कथनाची पद्धती, फलज्योतिष टिकून आहे ते अंधश्रद्धांवर. तुमच्या माझ्यावर झालेल्या लहानपणापासूनच्या अंधश्रद्धाळू संस्कारांमुळं. एकेकाळी माझाही फलज्योतिषावर खुप विश्वास होता. अँस्ट्रोलॉजी इज ए सायन्स, फळज्योतिष हे विज्ञानच आहे. असं मी ठणकावून सांगत असे. माझ्या कॉलेज जीवनात मी अभ्यास केला. इतरांचं भविष्य सांगू लागलो. मी सांगितलेलं भविष्य खुप बरोबर ठरतं असं मला वारंवार अनुभवाला येऊ लागलं. अधिक अभ्यास करावा म्हणून त्या विषयावरची वेगवेगळ्या लेखकांची आणखी चार पुस्तकं आणली. जेव्हा या पाच पुस्तकात अनेक महत्त्वाच्या मुद्यांबाबत वेगवेगळी मतं मांडलेली पाहिली तेव्हा माझ्या मनात शंका निर्माण झाली. मी इंटरसायन्सपर्यंत विज्ञानाचा विद्यार्थी होतो. विज्ञानाचे बेसिक पक्के होते. एवढय़ा मोठय़ा प्रसिद्ध ज्योतिष्यांमध्ये जर एकमत नाही तर हे कसं विज्ञान? असा प्रश्न मनात घर करू लागला. आणि एका प्रसंगानंतर मी भविष्य कथन बंद केलं. पण त्या काळातला तो अनुभव ज्योतिष्यांना पुढे एक्सपोज करण्यासाठी खुप उपयोगी पडला. आज गेल्या 30 वर्षापासून आपण ज्योतिष्यांना 90 टक्के तरी अचुक भविष्य सांगा आणि आमचं 15 लाख रूपयांचं पारितोषिक घेऊन जा अशी जाहीर आव्हानं टाकतो आहे. ज्योतिष महामंडळांना टाकतो आहे पण पुढे कुणीही येत नाही. जे आले त्यांचा दारूण पराभव झाला.कारण फलज्योतिष हे शास्त्र नाही. त्यात काहीही सत्य नाही. तुमचं माझं भविष्य कुणालाच सांगता येत नाही. आपलं भविष्य आधीपासून ठरलेलं नसतं. तरी ज्योतिष्यांचं भविष्य अनेकदा खरं कसं ठरतं? तुमचा ज्योतिष्याचा काहीच अभ्यास नाही ना? तरी तुम्ही सहज ज्योतिषी बनू शकता. कदाचित अभ्यासू ज्योतिष्यापेक्षा तुमचं भविष्य अधिक अचुक ठरू शकेल. गरोदर बाईचं भविष्य सांगा. तिला मुलगा होईल की मुलगी होईल. झाला तुम्ही ज्योतिषी. समजा तुम्ही हुशारीनं शंभर गरोदर स्त्रियांना सांगितलं 'बाई तुला मुलगाच होईल.' निसर्गाच्या नियमाप्रमाणं बाईला एकतर मुलगा होतो वा मुलगी होते. दोन चान्सेस असल्यामुळं पन्नास टक्के तरी स्त्रियांना मुलगा होण्याची शक्यता आहे. ज्या बाईला मुलगा होतो तिला 100 टक्के मुलगा होतो. ती ज्योतिषी म्हणून तुमची खुप प्रसिद्धी करले. किमान आणखी पाच - दहा स्त्रियांना तुमच्याकडे घेऊन येईल. मुल झालेल्या 50 स्त्रिया, 500 स्त्रियांना तुमचा ग्राहक बनवेल. मुलगी झालेल्या स्त्रिया म्हणतील जाऊ द्या या ज्योतिष्याला कळत नाही. आपण, दुसर्या रामशास्त्राकडे जाऊ.. झाला तुमचा भविष्याचा धंदा सुरू..पण ज्योतिषी बनण्यासाठी एक महत्त्वाची योग्यता असावी लागते. दुसर्याला फसवण्याची तयारी. फसवण्याची तयारी असल्याशिवाय ज्योतिषी बनू शकत नाही. (लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक आहेत.) दूरध्वनी-9371014832 |
Saturday, 18 August 2012
ज्या गोष्टीची भीती वाटते त्याला सामोरे जा!
असे अनेक प्रकारचे फोबिया आपल्या जीवनात असू शकतात. झू फोबिया प्राण्यांची भीती, क्लॅस्ट्रो फोबिया बंद जागांची भीती, उघडय़ा जागांची भीती, अनोळखी माणसांची भीती, रक्ताची भीती, अंधाराची भीती, भीती वाटण्याचीच भीती अशा कितीतरी प्रकारच्या भीती मानवी जीवनात असतात. या तार्किकदृष्टय़ा अप्रस्तुत असतात. चुकीच्या असतात. प्रमाणाबाहेर असतात म्हणून खोटय़ा असतात. तरी अंतर्मनासाठी मात्र 100 टक्के खर्या असतात. एक गृहस्थ गणपतराव एका जिल्हास्थळी राहतात. 20 मैलावर असणार्या एका गावातील शाळेत शिक्षक आहेत. रोज बसने जातात-येतात. बसस्टँडपासून त्यांचं घर केवळ 5-7 मिनिटं पायी अंतरावर आहे. पण ते कधीही पायी घरी जात नाहीत. जाऊ शकत नाही. रिक्षेवाला एवढय़ा कमी अंतरावर यायला तयार नसतो. पण रिक्षाला दुप्पट, कधी तिप्पट रक्कम मोजूनच ते घरी परततात. जातानाही हीच अवस्था. मुलांना बाबांसाठी रिक्षा पकडून आणावा लागतो. का? त्यांना कुर्त्यांची प्रचंड भीती वाटते. एकदा रिक्षांचा स्ट्राईक होता. गणपतरावांना नाइलाजानं स्टँडवरून पायी घरी यावं लागलं. मोठी हिंमत करून, जीव मुठीत घेऊन ते पायी निघाले. गल्लीबोळात भरपूर मोकाट कुत्री. कुत्री पाहताच गणपतराव घाबरले. पाय थबकले. कुर्त्यांनी बरोबर ओळखलं. ते जोरजोरानं भुंकू लागले. गणपतराव आणखीच घाबरले. थरथर कापू लागले. कुर्त्यांनी भुंकून भुंकून रान उठवलं. आपल्या भाईबंदांना निमंत्रण धाडलं. पाहता पाहता 20-25 कुर्त्यांनी थरथर कापणार्या, जागच्याजागी थांबलेल्या गणपतरावांना गराडा घातला. आजूबाजूच्या माणसांचं लक्ष गेलं. त्यांना ओळखणार्या एका दुकानदारानं धाव घेतली. इतरांच्या मदतीनं कुर्त्यांना पिटाळून लावलं. पण गणपतरावांचं ब्लडप्रेशर एवढं वाढलं होतं, की त्यांना दवाखान्यात भरती करावं लागलं. नॉर्मल व्हायला 4-5 दिवस लागले. पण गणपतरावांचा फोबिया मात्र अधिक वाढला. ते अधिकच पंगू बनले. एरवी आपल्या जीवनात इतर कशालाही न घाबरणारा माणूस पण कुत्रा-फोबिया पायी अपंग झाला. घरी मोटारसायकल आहे. चालवता येते; पण चालवत नाही. कारण कुत्री मागे लागतात. त्यांना कितीही समजावून सांगा, ''अहो, कुत्रा नेहमीच चावत नाही. हजारो माणसं रस्त्यावरून चालतात. सगळ्य़ांनाच कुत्रा चावतो कां? बरं चावला तर चावला अँण्टिरेबिज इंजेक्शन घेतलं की झालं. आजकाल तीनंच घ्यावे लागतात. त्याचा फार त्रासही होत नाही.'' गणपतराव म्हणतात, ''हे सारं मला माहीत आहे. मी शाळेत शिकवतो हे सारं. पण मला भीती वाटते.'' या ठिकाणी गणपतरावांचं कॉन्शस माइंड, जागृत मन घाबरत नाही, तर त्यांचं सबकॉन्शस माइंड अंतर्मन घाबरतं आणि अंतर्मनाला तर्कशास्त्र पटत नाही. कळत नाही. ते आपल्या अनुभवाला महत्त्व देतं. गणपतराव 7 व्या वर्गात शिकत होते. तोवर तो एक नॉर्मल मुलगा होता. कुर्त्यांना फारसे घाबरत नसत. घरी ज्योतिषी आला. त्याने गणपतचा हात पाहिला. पत्रिका पाहिली. इतर भविष्य सांगताना सांगितलं, ''सावध राहा. चार पायांपासून सावध राहा. धोका संभवतो.'' आता ज्योतिष्यांचा धंदाच असा. असं सांगितल्याशिवाय चालणार कसं? गंडांतर टाळण्यासाठी ज्योतिष्यानं ताईत बनवून दिला. 500 रुपयांचा तो ताईत गणपतच्या गळ्यात बांधण्यात आला. त्या दिवसापासून घरातले सगळे, विशेषत: आजी त्याला 'चार पायांपासून सावध राहण्याची'सूचना वारंवार देऊ लागले. एक दिवस शाळेतून घरी एकटंच येताना गणपतवर कुत्रं भुंकू लागलं. एरवीही असं घडायचं. त्या वेळी गणपत थांबायचा. दगड उचलून कुर्त्याकडे भिरकावला, की ते पळून जायचं. आज मात्र गणपतला आठवलं, 'चार पायांपासून सावध' कुर्त्यालाही चार पाय आहेत आणि घाबरून आपलं जड दफ्तर घेऊन पळत सुटला. कुत्रं मागे लागलं. इतरही कुत्री मागे लागलीत. एका कुर्त्यानं गणपतच्या पायाचा चावा घेतला. तेवढय़ात इतर लोक धावून आले. कुर्त्यांना पिटाळलं. 14 इंजेक्शन घ्यावे लागलेत आणि गणपतच्या आयुष्यात कुत्रा-फोबिया सुरू झाला. अजूनही तो 500 रुपयांचा ताईत गणपतच्या गळ्यात आहे. पण त्याला काही कुत्रे घाबरत नाहीत. फक्त ज्योतिष्याच्या पोटाची सोय झाली. पण गणपतच्या बोकांडी कुत्रा-फोबिया बसला. अनेकांना आयुष्यात कुत्रे चावतात. सार्यांनाच कुत्रा-फोबिया होता कां? नाही ना? मग.. ज्योतिष्याच्या भाकितामुळं 'कुत्रा चावण्याचा अनुभव' गणपतच्या अंतर्मनावर अधिकच खोलवर परिणाम करून गेला आणि या भीतीला इतरांनीही अंधश्रद्धेपायी खतपाणी घातलं. गणपतरावांना ही भीती घालवता येईल? कशी? गेली 22 वर्षे मी 'व्यक्तिमत्त्वविकास' कार्यशाळा चालवतो आहे. त्या माध्यमातून अक्षरश: हजारो माणसांची भीती, फोबिया घालविण्यासाठी मदत करता आली आहे. हजारोंना भीतीमुक्त होताना मी अनुभवतो आहे. पण मी स्वत: वयाच्या 19-20 वर्षापर्यंत अतिशय भित्रा होतो. मंत्रतंत्र-जादूटोणा प्रकारांना प्रचंड घाबरत असे. पायामध्ये चप्पल घातल्याशिवाय चालण्याची प्रचंड भीती वाटायची. 'पायाखालची कुणी माती घेतली आणि त्याची जारणमारणाची बाहुली बनवली तर..! तिकडे त्या मांत्रिकानं त्या बाहुलीची मान मोडताच इकडे आपली मान ताडकन तुटून पडेल' याची मला प्रचंड भीती वाटत असे. रस्त्यात काही मंत्रवलेलं पडलं असेल तर तिथून माघारी फिरत असे. दुसर्या रस्त्यानं जात असे. वडिलांची प्रचंड भीती वाटायची. मुलींची भीती वाटायची. खरं म्हणजे त्या काळात मला सगळ्याच प्रकारांची भीती वाटायची. माझं वाचन प्रचंड होतं. माझा सर्वाधिक वेळ वाचन करण्यात जात असे. आपल्यात काही नाही. आपण नगण्य आहोत. आपल्याला विनोबा, आचार्य दादा धर्माधिकारी, जयप्रकाश नारायण, बाबा आमटे, प्राचार्य राम शेवाळकर यांच्यासारखं बनता यावं. थोडसं तरी त्यांच्यातलं काही आपल्याला साध्य करता यावं असं खूप तीव्रतेनं वाटत असे. तेवढय़ात एक वाक्य वाचनात आलं. 'या जगात भीती घालविण्याचा एकच मार्ग आहे. ज्या गोष्टीची भीती वाटते त्या गोष्टीला मुद्दाम फेस करा. सामोरे जा. वारंवार ती गोष्ट करा. मेलो तरी चालेल या जिद्दीनं सामोरे जा.' हे वाक्य मनाला भिडलं. कुणाचं होतं ते आठवत नाही. पण माझे प्रयोग सुरू झाले. पहिला प्रयोग वडिलांबाबत. त्यांच्यासमोर मुद्दाम उभं राहायचो. त्यांचं लक्ष गेलं, की, ''काय रे, काय काम आहे?'' करडय़ा आवाजात ते विचारायचे. ''काही नाही,'' माझं उत्तर. चारपाचदा असं घडल्यावर त्यांचा स्वर खाली आला. मृदू आवाजात त्यांनी विचारलं, ''का रे, तुला काही हवं कां? काही बोलायचं आहे कां?'' त्यांचा तो मृदू आवाज ऐकताच मला वाटलं मी जिंकलो. ''काही नाही'' म्हणून निघून आलो. पण त्या दिवसापासून वडिलांविषयीची भीती मात्र कमी झाली. माझा उत्साह वाढला. मी वर्धेला सायन्स कॉलेजमध्ये शिकायचो. 1971-72 सालची गोष्ट. त्या काळात कॉलेजमध्ये मुलंमुली एकमेकांशी बोलत नसत. कॉलेज सुटलं, की मुलं मुलींना खूप त्रास देत. टॉण्टिंग करणं, फुलं, कागदी बाण फेकून मारणं, कधी सायकली आडव्या घालणं सर्रास चालायचं. सारे तरुण शम्मी कपूर वा जितेंद्रची अवलाद बनून वावरायचे. अशा वातावरणात मी एक शामळू, खादी घालणारा, मान खाली घालून चालणारा मुलगा म्हणून असेल कदाचित. पण एक दिवस आमचा वर्ग सुटल्यावर अचानक चारपाच मुलींचा घोळका समोर आला. मला म्हणाला, ''तुमची प्रॅक्टिकलची वही देता कां? आम्हांला काही प्रॅक्टिकल्स पूर्ण करायचे आहेत.'' मी घाबरलो. हडबडून ''हो'' म्हणाले. माझा गोंधळ उडाला. वही हातात घेतली; पण माझा हात एवढा थरथर कापू लागला, की मुलींच्या हातात ती जाण्याआधीच खाली पडली. सारे खो-खो हसू लागले. मुलीही हसल्या. मुलांनी खूप टिंगल केली. मला खूप वाईट वाटलं. मी फेस करण्याचा प्रयोग करायचं ठरवलं. पण जमेना. रोज ठरवायचो. 5-6 दिवस निघून गेले. एक दिवस एक मुलगी एकटी सापडली. वर्गातून बाहेर पडताना तिला म्हटलं, ''एक्स्क्यूज मी!'' ती थांबली. शांतपणे म्हणाली, ''काय काम आहे?'' मला सुचेना! आता काय म्हणावं? एवढं म्हणण्यासाठीच 5-6 दिवस लागले होते. मी म्हणालो, ''काही नाही, थॅक्स. जा.''आणखी दोनतीन मुलींबाबत हाच प्रयोग रिपीट केला. मुलींना कळेना काय प्रकार आहे. 'एक्स्क्यूज मी' म्हणतो, थांबवतो; जा म्हणतो.त्यांच्यात चर्चा सुरू झाली. पण तिथून दीडदोन वर्षानंतर मी जयप्रकाश नारायणांच्या तरुणशांती सेनेचा वर्धा जिल्हा संघटक होतो आणि मी मुलांबरोबरच मुलींशीही छान संवाद साधू शकत असे. मोकळेपणानं बोलू शकत असे. पुढे जयप्रकाशाजींचं आंदोलन प्रखर झालं. मीही देशभर हिंडू लागलो. आणीबाणी लागण्याच्या काही दिवस आधीची गोष्ट. मी बर्यापैकी निर्भय झालो होतो. 'हमला चाहे जैसा हो, हाथ हमारा नहीं उठेगा' असले नारे द्यायचो. संघटनेचं राज्यपातळीरचं नेतृत्व करण्याची जबाबदारी पेलत होतो. एकदा खेडय़ावर जावं लागलं. ट्रेन उशिरा पोहोचली. त्यामुळं स्टँडवर उशिरा पोहोचलो. 4 कि.मी.पर्यंत पायी जायचं. रात्रीची वेळ. मधे आमराई. त्यात एक पडकी विहीर. तिथे खूप भुतं असतात असं ऐकलेलं. मला दहाव्या वर्गात असताना भूत लागलेलं - ते मांत्रिकानं उतरवलेलं - मी प्रचंड घाबरलेलो. स्वत:ला बजावलं 'कितीही भुतं लागली तरी घाबरून पळून जायचं नाही. मोठय़ा मांत्रिकाकडे जाऊ.सारी भुतं काढून घेऊ; पण पळून जायचं नाही..' अंधारी रात्र. निर्मनुष्य रस्ता. काळोख. रातकिडय़ांचा आवाज.. विहीर ओलांडता ओलांडता नकळत मी सुसाट पळत सुटलो. लक्षात आले आपण घाबरून पळतो आहे. थांबलो. परत आलो. विहिरीच्या कठडय़ावर बसलो. छाती धडधडत होती. भीतीनं शरीर थरथरत होतं. किती वेळ बसलो माहीत नाही. पण शरीराचं थरथरणं थांबलं. हृदयाची घरघर थांबली. भूतही लागलं नाही. (त्या वेळी या जगात भूत नसतं हे माहीत नव्हतं. कुणाच्या तोंडून ठामपणे तरी ऐकलंही नव्हतं) बस्स! तो भीतीचा शेवटचा दिवस. त्यानंतर कधीही भीती वाटली नाही. नाहीतर रोज हाणामारीचे जीवघेणे प्रसंग झेलत अ. भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम एवढय़ा निर्भयपणे उभारताच आलं नसतं. 'ज्या गोष्टीची भीती वाटते ती गोष्ट प्रत्यक्ष करा. फेस करा' याचा वापर करत मी माझी सगळ्या प्रकारची भीती घालवली. पण सगळ्यांनाच असं फेस करणं जमत नाही. मग, गणपतरावांना मी काय शिकवलं.. बेडवर पडल्या पडल्या.. संमोहनात गेल्यावर.. कल्पना करा, डोळ्यासमोर व्हिज्युएलाईज करा.. मी (गणपतराव) बसमधून उतरतो आहे. स्टँडवरून निर्भयपणे पायी चालत घरी जातो आहे. आजूबाजूला कुत्री आहेत. पण त्यांच्या समोरून अतिशय आत्मविश्वासानं निर्भयपणे चालतो आहे. ती भुंकताहेत.. तरी त्यांच्याकडे दुर्लक्ष करत, निर्भयपणे कुर्त्यांकडे पाहत ठामपणे चालतो आहे. निर्भयपणे घरी पोहोचतो आहे. 0 मी नेहमी असाच निर्भयपणे, कुत्री असतील नसतील तरी, आत्मविश्वासानं चालत येतो-जातो. दिवसेंदिवस माझ्या मनातील कुर्त्यांची भीती निघून जाते आहे आणि मी अधिकाधिक निर्भय बनतो आहे. दृश्यमालिका पाहिल्यानंतर वरील दोन सूचना अनेकदा रिपीट करायच्या. रोज दिवसांतून दोनतीनदा सराव करायचा. दीड महिन्याच्या सरावात गणपतरावांना आतून वाटायला लागलं, आता आपण पूर्वीसारखं कुर्त्यांना घाबरत नाही. त्यांनी हिंमत केली. प्रत्यक्ष स्टँडवरून घरी पायी चालत आले. जमलं. त्यांना खूप आनंद झाला. मला फोन आला. ''सर, मी घरी पायी चालत आलो. कुत्रे भुंकले. थोडीशी भीती वाटली; पण जमलं.'' मी म्हणालो, ''रोज सराव सुरू ठेवा. पण प्रत्यक्ष पायी येत-जात जा!'' 15 दिवसांनी गणपतरावांचा पुन्हा फोन आला, ''सर, गेले 15 दिवस मी रोज पायी येतो-जातो. आज तर मोटारसायकलने शाळेवर गेलो-आलो.'' मी त्यांचं अभिनंदन केलं. ते पुढे म्हणाले, ''सर, मी गळ्यातला तो ज्योतिष्याचा ताईत काढून फेकला.'' मी पुन्हा अभिनंदन केलं. म्हणालो, ''आता तुम्ही खरे निर्भय झाला आहात!'' (लेखक हे अखिल भारतीय अंधश्रद्घा निर्मूलन समितीचे संस्थापक, संघटक आहेत.) भ्रमणध्वनी - 9371014832 |
Saturday, 11 August 2012
कल्पना व अंतर्मनाच्या सामर्थ्यावर भाषणशैलीची समृद्धी
पण आधुनिक काळात मात्र याच तर्ळीरश्रळीरींळेप सामर्थ्याचा उपयोग अनेक विधायक कामासाठी करण्याचं तंत्र माणसानं विकसित केलं आहे. माणसाच्या मनाचे, चळपव चे दोन भाग मानले जातात. एक बाह्य मन, उेपीलर्ळेीी चळपव. हे विचार करण्याचं, तर्क, विश्लेषण, भाषा, लेखन, गणित करण्याचं सामर्थ्य असणारं मन. याविषयी आपल्याला पूर्ण जाणीव असते. सार्या शरीराचं जाणीवपूर्वक हे नियंत्रण करत असतं. साधारणत: आपल्या एकूण मनाच्या दहापैकी एकपट भाग या मनानं व्यापला असावा असं मानलं जातं. दुसरं अंतर्मन, र्डीललेपलर्ळेीी चळपव यामध्ये कल्पना करण्याचं तर्ळीरश्रळीश करण्याचं, प्रतिमा पाहण्याचं, ओळखण्याचं सामर्थ्य असतं. एकूण मनाच्या दहापैकी नऊ भाग एवढा मोठा व्याप हा मनाचा आहे असं मानलं जातं. याच मनात लहानपणापासून आपल्यावर झालेले संस्कार, नीतिमूल्य, अनुभूती, विचार करण्याची पद्धती प्रोग्राम झाली असते, रेकॉर्ड झाली असते. हे प्रोग्रामिंग म्हणजेच आपलं व्यक्तिमत्त्व. यातूनच आपला स्वभाव, कृती, भावना, अनुभव घेण्याची प्रक्रिया व विचार करण्याची (सवयीनं) प्रक्रिया निर्माण होत असते. आता हे मन कुठं असतं? ''हाय मेरा दिल'' असं म्हणताना आपण हृदयावर हात ठेवतो व प्रेम तिथं आहे, 'तुम मेरे दिल मे बसी हो' असं दाखवतो. पण तिथे फक्त रक्ताभिसरण करणारं हृदय असतं. प्रेम वाटणारं, फील करणारं मन हे मेंदूत असतं. खरं म्हणजे माणसानं प्रेम दाखवताना डोक्यावर हात ठेवायला हवा, हृदयावर नव्हे. मेंदूत चालणारी कार्यप्रणाली म्हणजे मनर्. ीपलींळेपळपस ेष ींहश इीरळप ळी उरश्रश्रशव चळपव ही मनाची वैज्ञानिक व्याख्या आहे. आणि या मनात जे जे रेकॉर्ड झालं आहे, जे जे प्रोग्राम झालं आहे ते म्हणजे आपलं व्यक्तिमत्त्व. यातील काही गोष्टी आपल्या नकळत निर्माण होतात. काही गोष्टी आपण प्रयत्नपूर्वक, जाणीवपूर्वक निर्माण करतो. एकूण व्यक्तिमत्त्व कसं निर्माण होतं ते आपण पुन्हा कधीतरी पाहू. आता अंतर्मनाच्या र्डीललेपीलर्ळेीी चळपव च्या सामर्थ्यावर लक्ष केंद्रित करू. आपण एखादी नवी कला, कौशल्य कसं प्राप्त करतो? भाषण कला शिकायची आहे. कसं शिकतो आपण? माझ्या अनुभवापासून सुरुवात करतो. आपल्यापैकी प्रत्येक जण बालवयात बोलणं सहजतेनं शिकतो. आई-वडील, लोकांकडून सहजतेनं वय वाढीसोबतच भाषा-बोलणं आत्मसात करतो. इतरांशी आपण बोलतो, भांडतो, गप्पा मारतो, अनुभव सांगतो. यात काही कठीण वाटत नाही. पण पन्नास-शंभर लोकांसमोर माईकवर उभं राहून बोलायला सांगितलं तर? मला वयाच्या विसाव्या वर्षापर्यंत असं मोठय़ांपुढे बोलता येत नसे. वर्गात शिक्षकांनी प्रश्न विचारला तरी त्याचं उत्तर देण्याची हिंमत होत नसे. कधी प्रयत्न केला. तेव्हा हातपाय थरथर कापायचे. शब्द सुचायचे नाहीत. तोंडातून धड वाक्यच बाहेर पडायचे नाहीत. बहुतेकांची अशीच अवस्था होते. वयाच्या 19 व्या वर्षी मी जयप्रकाश नारायण यांच्या तरुण शांतिसेना नामक, तरुणांच्या संघटनेत अपघातानं सामील झालो. त्यावेळी 'शिक्षणात क्रांती' नामक आमचं आंदोलन सुरू होतं. माझे ज्येष्ठ सहकारी, अशोक बंग, दीपमाला कुबडे वगैरे कॉलेजा कॉलेजात जाऊन भाषणं देत असत. मी एक कार्यकर्ता म्हणून त्यांच्यासोबत असे. गेली दोन वर्षे आचार्य दादा धर्माधिकारी, प्राचार्य राम शेवाळकर, नारायणभाई देसाई, आचार्य राममूर्ती असल्या दिग्गज माणसांची, वक्त्यांची भाषणं ऐकत होतो. आधीही बाबासाहेब पुरंदरे, विद्यावाचस्वती विष्णूजी क्षीरसागर, रामचंद्र घंगारे यांची भाषणं ऐकली होती. बालपणात आचार्य विनोबा भावेंची बरीच भाषणं ऐकली होती. पण मला बोलता येत नाही याची दु:खद जाणीव होती. वध्र्याच्या सायन्स कॉलेजमध्ये असताना माझा वर्गमित्र शिरीष गोपाळ देशपांडे आणि पेंडसे सरांची मुलगी छान बोलायचे. वादविवाद स्पर्धेत बक्षीस मिळवायचे. मला सारखं वाटायचं यांच्यासारखं मला बोलता आलं पाहिजे. एक दिवस आम्ही वध्र्याहून आर्वीला बसने जाताना अशोक बंगने आदेश दिला ''श्याम आज तुला प्रस्तावना करायची आहे. 24 मिनिट तरी बोलायचं आहे.'' माझा सारा प्रवास अतिशय टेन्शनमध्ये गेला. 'काय बोलायचं' याचीच तयारी प्रवासात मी करत होतो. आर्वीच्या आर्ट्स-कॉमर्स कॉलेजच्या दीडशे-दोनशे मुलांपुढे माझं पहिलं 5 मिनिटांचं भाषण झालं. छाती धडधडत होती, हातपाय थरथर कापत होते. पण काही तरी बोललो. ''छान! छान बोललास! पुढच्या वेळेस अधिक चांगली तयारी करून बोल.'' अशी शाबासकीची थाप अशोक बंगने दिली आणि मला बळ मिळालं. वक्तृत्व कसं शिकायचं? चांगली तयारी कशी करायची? माहीत नव्हतं. कुणी सांगितलं नव्हतं. कुणाला विचारण्याची हिंमतही झाली नाही. पण आमचे प्रशिक्षक आचार्य दादा धर्माधिकारी अतिशय उत्तम, अप्रतिम वक्ते होते. त्यांची अनेक भाषणं ऐकली. ते नेहमी बोलताना समोर चिटोरा ठेवत असत. मी त्यांना खूप प्रश्न विचारायचो. एवढे विद्वान गृहस्थ. पण कधीही माझा उत्साह त्यांनी भंग केला नाही. माझ्या बर्यावाईट प्रश्नांनाही ते मनापासून उत्तरं देत असत. ''तुम्हे एवढे मोठे वक्ते आहात तरी समोर चिठ्ठी कां ठेवता?'' माझा प्रश्न. ''दर भाषणाच्या आधी मी ठरवतो. काय बोलायचं, किती वेळ बोलायचं. कोणत्या मुद्यांना अधिक प्राधान्य द्यायचं. भाषणाला नीट शिस्त यावी याकरिता चिठ्ठी उपयोगी पडते,'' दादांचं उत्तर. खरं म्हणजे तेव्हा जर मी हिंमत करून विचारलं असतं की भाषणाची तयारी कशी करावी? उत्तम वक्ता असं बनावं? तर.. दादांनी नीट मार्गदर्शन केलं असतं. कदाचित पुढे माझे प्रचंड परिश्रम वाचले असते. मग माझी तयारी सुरू झाली. एखाद्या विषयावरचं भाषण तयार करताना भरपूर वाचायचं. त्याचे मुद्दे निवडायचे. जेवढा वेळ भाषण द्यायचं तेवढय़ा वेळेचं अख्खं भाषण लिहून काढायचं. ते बोलण्याच्या भाषेत लिहायचं. मोठमोठय़ानं वाचायचं. पुन्हा पुन्हा लिहिलेलं भाषण दुरुस्त करायचं. लिहिलेलं भाषण जमलं असं समाधान झालं की ते भाषण एका बंद खोलीत मोठमोठय़ानं म्हणायचं. जाहीर सभेत भाषण देतो आहे या आविर्भावानं खुल्या आवाजात भाषण द्यायचं. खुपदा सराव झाला की मग त्या भाषणाचे शॉर्ट पॉईन्ट्स काढायचे. ते समोर ठेवून असंच बंद खोलीत भाषण गायचं. मग पुढे प्रत्यक्ष लोकांपुढे भाषण द्यायचं. पुढचं काम माझ्यासाठी सोप होतं. तरुण शांतिसेनेची चळवळ सुरू होती. शिबिरांमध्ये, कॉलेजमध्ये भरपूर बोलण्याची संधी मिळत असे. पुढे मी वध्र्याच्या यशवंत महाविद्यालयात आर्ट्स विषयात दाखल झालो. डिबेटिंग सोसायटीचा अध्यक्ष या नात्यानं भरपूर कार्यक्रम आयोजिण्याची संधी मिळाली. स्वत:ही कष्टसाध्य पद्धतीनं वक्ता बनलो आणि इतर अनेक सहकार्यांमधून वक्ते घडवले. जोपर्यंत आपण 25-50 मोठय़ा सभांमधून यशस्वीपणे बोलत नाही तोपर्यंत आपण आत्मविश्वासानं छान बोलू शकतो असा आत्मविश्वास निर्माण होत नाही. याला 'सभाधैर्य' प्राप्त करणं म्हणू या. जेव्हा आपण प्रत्यक्ष 100-200 माणसांपुढे यशस्वीपणे, आत्मविश्वासानं बोलतो तेव्हा तो अनुभव आपल्या अंतर्मनात रेकॉर्ड होतो. या पद्धतीचे 25-50 वेळा भाषण देण्याचे अनुभव आपल्या अंतर्मनात प्रोग्राम झाले की ती आपली 'सवय' बनते. ''आपल्या अंतर्मनात एखादी गोष्ट वारंवार, वारंवार प्रोग्राम झाली की तिचं रूपांतर सवयीत होतं,'' हा एक आपल्या अंतर्मनाचा महत्त्वाचा नियम आहे. अशा आपल्या सवयी निर्माण होतात. कोणतंही कौशल्य आत्मसात करणं म्हणजे त्या कौशल्याची सवय अंतर्मनात निर्माण होईल एवढा वेळ त्या गोष्टीचा अचूक सराव करणं. सराव अचूक असायला हवा. चुकीचा सराव प्रोग्राम झाला तर सवयही डिफेक्टिव्ह निर्माण होईल. मी आधी डिबेटर म्हणून कॉलेजमध्ये व्याख्यानाला जायचो. नंतर वक्ता म्हणून जायचो. त्या काळी 1974 ते 1990 या काळात कॉलेज विद्यार्थी कधीही भाषणं शांतपणे ऐकायचे नाहीत. येनकेनप्रकारे वक्त्यांना पळवून लावण्याचा त्यांचा प्रयत्न असायचा. पण माझ्या आयुष्यात कधीही कुणाला माझं भाषण उधळता आलं नाही. उलट भाषण उधळण्यासाठी आलेल्यांनाच मी भाषणात गुंगवून टाकायचो. त्यातूनच अनेक कार्यकर्ते सापडले आहेत. पण समजा अशा अशांत वातावरणात दोन-चार सभा जरी विद्यार्थ्यांना उधळता आल्या असत्या तर मनात भीती निर्माण झाली असती. या भयप्रद अनुभवाचा परिणाम असा झाला असता की वक्ता म्हणून पुन्हा उभं राहिलो नसतो वा चुकीचं प्रोग्रामिंग झाल्यामुळं वाईट, अर्धवट, घाबरट बनलो असतो. आता मी चळवळीचा कार्यकर्ता असल्यामुळं मला बोलण्याची सहज संधी मिळायची. पण सामान्य माणसाला 25-50 भाषणं देण्याची संधी कधी मिळणार? किती वर्ष लागणार? आज 200 माणसांसाठी भाषण आयोजित करायचं म्हटलं तरी हॉलभाडे, जाहिरात, इतर व्यवस्था खर्च असा मिळून किमान 15 ते 35 हजार रुपये खर्च येतो. पन्नास सभांसाठी 8-12 लाख रुपये खर्च शिवाय एवढा खर्च करून लोक भाषण ऐकायला येतीलच याची खात्री नाही. मग.. वक्ता कसं बनायचं? मी सांगितलं त्याप्रमाणं सुरुवातीला भाषणाची तयारी करायची. एकदा भाषणाची पूर्वतयारी झाली, भाषण तयार झालं की सभाधैर्यासाठी नव्या तंत्राचा वापर करायचा. संमोहनाचा वा मेडिटेशनचा वापर करून अल्फा रिदमच्या अवस्थेत जायचं. घरी बेडवर पडल्या, पडल्या कल्पना (तर्ळीरश्रळीश) करायची, ''आपण एका मोठय़ा नाटय़गृहात भाषण देतो आहोत. नाटय़गृह प्रेक्षकांनी खचाखच भरलं आहे. आपण उत्तम बोलतो आहोत. प्रेक्षक तन्मयतेनं ऐकताहेत.. टाळ्या वाजवताहेत.. यशस्वीपणे, अचूकपणे भाषण देतो आहे.. असं नीट व्हिल्युअलाईज करायचं.'' या पद्धतीनं 5-10 भाषणं वेगवेगळ्या नाटय़गृहात. काही मोठय़ा मैदानात.. पन्नासावं भाषण मुंबईच्या शिवाजी पार्कात.. लाखभर लोकांसमोर. हा पन्नास वेळा अंतर्मनाला झालेला काल्पनिक अनुभवसुद्धा अंतर्मनात प्रोग्राम होतो. त्याची सवय निर्माण होते. पुढे प्रत्यक्ष लोकांपुढे बोलताना सहज जमतं. आत्मविश्वास वाढतो आणि कमी खर्चात, पण मनाचा सराव उत्तम करून चांगलं 'सभाधैर्य' निर्माण करता येतं. नवी सवय निर्माण होते. आत्मविश्वासानं बोलण्याची. याप्रमाणं तर्ळीरश्रळीरींळेप तंत्राचा वापर करून काय काय करता येईल? (लेखक अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष आहेत.) भ्रमणध्वनी - 9371014832 |
Friday, 3 August 2012
मनाचं सामर्थ्य जेवढं विधायक तेवढंच धोकादायक
हे चित्ररूप कल्पनेत पाहणं, तर्ळीरश्रळीश करण्याचं सामर्थ्य प्रत्येक माणसात असतं. बालपणात ते विलक्षण असतं. पण आजच्या सुसंस्कृत व समृद्ध जगात वाढत्या वयासोबत हे तर्ळीरश्रळीश करण्याचं सामर्थ्य कमीकमी होत जातं. डोळ्यापुढे चित्रमालिका उभी करण्याचा प्रयत्न केला तर काही लोकांना चित्रमालिका कल्पनेत दिसत नाही. काही लोकांना कल्पना केल्यावर चित्रमालिका प्रत्यक्ष दिसते आणि काही लोकांना तर ही चित्रमालिका अतिशय जिवंत दिसते. प्रत्यक्ष अनुभव घेतल्यासारखी वाटते. इतकी की कल्पना व प्रत्यक्ष यातील फरकही करता येत नाही. माणसाच्या मनाच्या या सामर्थ्यानं दीर्घकाळापासून माणसाला भुरळ घातली आहे आणि कोडंही घातलं आहे. रोज रात्री आपण सात-आठ तासांच्या झोपेत 30 मिनिटांपासून ते 150 मिनिटांपर्यंत स्वप्न पाहत असतो. प्रत्येक जण रोज स्वप्न पाहतच असतो. स्वप्न पाहताना ती आपण जगत असतो. त्या क्षणी ती आपल्याला 100 टक्के खरीच वाटत असतात. खडबडून जागं झाल्यावर आपल्या लक्षात येतं, अरे, 'हे खरं नव्हतं हे तर स्वप्न होतं.' पण मनुष्यजात मात्र दीर्घकाळ स्वप्नांना खरं मानत असे. त्यांना वाटत असे आपला आत्मा प्रत्यक्ष त्या ठिकाणी गेला होता, भटकून त्या पद्धतीचा अनुभव घेऊन तो शरीरात पुन्हा परत आला. माणसानं वेगवेगळ्या प्रार्थनेच्या, मनाच्या एकाग्रतेच्या प्रक्रिया शोधल्या. त्यांचा संस्कृती, धर्म, आराधना इत्यादींच्या नावाने वापर केला. त्यात नवेनवे प्रयोग केले. त्यातून वेगवेगळ्या मेडिटेशनच्या प्रक्रिया विकसित केल्या आणि त्याला अद्भुत खजिन्याचा शोध लागला. मनाच्या विशिष्ट अवस्थेत त्याला अधिक चांगली दृश्य मालिका दिसते. एरव्ही जागृत अवस्थेत जे दिसत नाही, कल्पना केल्यावरही दिसत नाही ते मात्र मेडिटेशनद्वारा विशिष्ट अवस्थेत गेल्यावर दिसतं. जिवंत दृश्य अनुभव घेतल्यासारखं दिसतं म्हणून याला आधिभौतिक, पारलौकिक अनुभव मानणं स्वाभाविकच होतं. स्वप्नांमध्ये सलगता नसते, प्रतिमा सारख्या बदलत असतात. अनेकदा स्वप्नांमध्ये प्रतिमा बदलत जाते, पण विचार मात्र तोच असतो. प्रतिमांशी न जुळणारा असतो. हा स्वप्नांचा अनुभव घेणार्या माणसाला हे मेडिटेशनमधलं तर्ळीरश्रळीरींळेप खूप प्रभावित करून घेतं. हे वरच्या दर्जाचं अनुभूतीचं क्षेत्र आहे असं त्याला वाटू लागलं. हे तर्ळीरश्रळीरींळेप त्याला खरी अनुभूती वाटू लागली. हजारो वर्षापासून, धर्माच्या उदयाच्या आधीपासून मानवजातीला या आधिभौतिक, पारलौकिक अनुभूतींनी झपाटून टाकलं. आपण आता एकविसाव्या शतकात जगत आहोत. विसाव्या शतकात या क्षेत्रात खूप अभ्यास झाला. सगळेच विषय वैज्ञानिक शिस्तीनं तपासायचे, त्यात काटेकोर संशोधनं करून निखळ सत्य स्वीकारायचं या सवयीमुळं याही क्षेत्रात संशोधने झालीत. त्यात गवसलेलं सत्य मी तुमच्यासमोर मांडत आहे. मन एकाग्र करणारी प्रक्रिया वापरली आणि एकाग्र अवस्थेत माणसाचं शरीर आणि मन पुरेसं रिलॅक्स झालं की माणूस अल्फा रिदम्च्या अवस्थेत जातो. म्हणजे त्याच्या मेंदूचे ए.ए.ऋ. तपासले तर या अवस्थेत ते 8 ते 12 सायकल्स परसेकंद असतात. प्रार्थना, मेडिटेशन, संमोहन, आराधना, भजन, कीर्तन या कोणत्याही माध्यमाद्वारे ही अवस्था माणूस गाठू शकतो. या अवस्थेत असल्यानंतर साधारणत: 50 ते 60 टक्के लोकांना उत्तम होतं आणि यातील 25 ते 35 टक्के लोकांना उत्तम करश्रश्र्रीलळपरींळेप (भ्रम) होतं, होऊ शकतं. तर्ळीरश्रळीरींळेप होणार्यांना आपण दृश्य मालिका पाहत आहोत असं दिसतं. तर करश्रश्र्रीलळपरींळेपी होणार्यांना जी दृश्य मालिका दिसते त्यासोबत त्यांना ऐकू येतं, वास येतो, स्पर्श जाणवतो, चवही येते. पाचही इंद्रियांचे अनुभव येतात. विशेष म्हणजे आपण प्रत्यक्ष तो अनुभव जगत आहोत असं त्यांना वाटतं. मी उदाहरणाच्या माध्यमातूनच हा मुद्दा अधिक स्पष्ट करतो. 1983 सालची गोष्ट. 1982 सालच्या डिसेंबर महिन्यात मी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नावे चळवळ सुरू केली. त्या वेळी मी पत्रकार होतो. माझा एक पत्रकार मित्र अशोक एकबोटे याने गोव्यात 10 अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रमांचा दौरा आखला. त्या वेळी तो गोव्यातील महाराष्ट्र शासनाच्या परिचय केंद्रात अधिकारी म्हणून काम करीत होता. या आयोजनात त्याने काही डॉक्टर्स, प्राध्यापक यांना जोडून घेतलं होतं. पणजीतील 'बीडीएस' मेडिकलचे खूप विद्यार्थी-विद्यार्थिनी या दौर्यात सहभागी झाले. गोवा अंधश्रद्धांबाबत खूपच संवेदनशील प्रदेश आहे. छोटसं राज्य. सारा प्रदेश ढवळून निघाला. प्रचंड ताणतणावाखाली हा दौरा पार पडला. पुढे वर्षभर या दौर्याच्या क्रिया-प्रतिक्रिया गोव्यातील वृत्तपत्रांतून उमटत राहिल्या. या 'बीडीएस'च्या तरुण विद्यार्थ्यांशी छान गट्टी जमली. माझ्या भाषणात 'संमोहनात अशा अनुभूती घेता येतात,' असा उल्लेख प्रत्येक भाषणात व्हायचा. सगळी तरुण मुलं मागे लागलीत म्हणून त्यांच्यावर संमोहन-प्रयोग करायचं असं आम्ही ठरविलं. तोवर माझा संमोहनशास्त्राचा थिअरॉटिकल चांगला अभ्यास होता, पण मी फारसे कुणावर प्रॅक्टिकल्स केले नव्हते. पण माझ्या 'देखा जायेगा' स्वभावाप्रमाणं प्रयोग करायचा निर्णय घेऊन टाकला. 40-50 तरुण मुलं-मुली आणि चार वयस्क मोठी माणसं या कार्यक्रमात सहभागी झालीत. त्यातील 20-25 मुलं-मुली व हे चार ज्येष्ठ नागरिक खोल संमोहनात गेले. बाकीच्यांना मी संमोहनातून बाहेर काढून प्रेक्षक बनवलं. (हे चारही ज्येष्ठ नागरिक अध्यात्माचा खूप अभ्यास करणारे होते. नियमित मेडिटेशनचा सराव करणारे होते, पण त्यांना आध्यात्मिक अनुभूती मात्र आल्या नव्हत्या. म्हणून आग्रहानं ते या प्रयोगात सामील झाले होते.) बाकी तरुण मुलांवर मी प्रयोग सुरू केले. त्यावेळच्या स्वप्नसुंदरी हेमामालिनीच्या बंगल्यावर मुला-मुलींना पाठवलं. हिमालयात घेऊन गेलो, अंतराळात भटकवून आणलं. म्हणजे ते खोल संमोहनात असताना ''तुम्ही आता हेमामालिनीच्या बंगल्यात शिरता आहात. ती हसतमुखानं तुमचं स्वागत करीत आहे, हस्तांदोलन करीत आहे.. वगैरे..'' शब्दांमध्ये मी वर्णन केलं. ज्येष्ठ लोकांना हेमामालिनीच्या बंगल्यावर पाठविणं योग्य नाही आणि त्यांना आध्यात्मिक अनुभूतीची ओढ आहे म्हणून त्यांना सांगितलं की आता तुम्ही ''बाळ कृष्णांच्या गोकुळात पोहोचला आहात. बाळकृष्ण रांगत रांगत तुमच्या मांडीवर येऊन बसले आहेत. त्यांचे हात दुधादह्यानं माखले आहेत. ते तुमच्या तोंडात दूधदही घालताहेत.. बाळकृष्णांसोबत तुम्ही खेळता आहात.. बाळकृष्णांसोबत तुम्ही आहात..'' असं म्हणून मी त्यांना सोडून दिलं. इतर तरुणांवर वेगवेगळे प्रयोग करू लागलो. तीन तासांचा कार्यक्रम संपल्यावर सगळ्यांना मी अनुभव विचारू लागलो. माझ्या डायरीत नोंदवू लागलो. मी शब्दांत बोललो ते सगळ्यांनाच प्रत्यक्ष दिसलं, पण प्रत्येकाचा अनुभव वेगळा होता. एका तरुणाला आंघोळ करून टॉवेल गुंडाळून बाहेर आलेली ओलेती हेमामालिनी दिसली. त्याला लक्स साबणाचा वासही आला. दुसर्या एकाचं मध्येच आलेल्या धर्मेद्रशी भांडण झालं. मारामारी होता होता वाचली. हेमामालिनीनं या तरुणाची बाजू घेतली म्हणून तणतणत धर्मेद्र बाहेर गेला.. वगैरे.. चार ज्येष्ठांना मी अनुभव विचारला. एकाचे बाळकृष्ण रांगतेच राहिले. दुसर्याचे भगवद्गीतेपर्यंत पोहोचले. तिसर्याचे रासक्रीडेत रमले.. वगैरे. शेवटी मी विचारलं, ''हे अनुभव खरे होते का?'' यावर सगळी मुलं-मुली गंभीर होऊन म्हणाली, ''सर, आम्ही जे पाहिलं, अनुभवलं ते 100 टक्के खरं होतं असं वाटतं, पण पणजीतल्या एका हॉलमधून एवढय़ा कमी वेळात आम्ही मुंबईत- हेमामालिनीच्या बंगल्यावर, हिमालयात, अंतराळात कसं जाऊ शकणार? हा तार्किक विचार केल्यानंतर असं वाटतं की हे तुम्ही सांगता तसं (करश्रश्र्रीलळपरींळेप) भ्रम असावेत. पण आम्ही थोडसं संभ्रमात आहोत. अजूनही हिमालयातील बर्फाळ थंडी जाणवत आहे.. वगैरे.'' चार ज्येष्ठ नागरिक सांगत होते, ''सर, खूपच चांगला अनुभव आला. आम्ही इतके वर्षे मेडिटेशन करीत आहोत, पण कधी बाळकृष्णांचं दर्शन झालं नव्हतं. खूप सुंदर अनुभूती आली.'' एका ज्येष्ठाने मात्र माझ्या भ्रम (करश्रश्र्रीलळपरींळेपी) या शब्दाबद्दल आक्षेप घेतला. ते म्हणाले, ''मानव, याला भ्रम कसं म्हणायचं? अहो, बाळकृष्णांनी माझ्या तोंडात घातलेल्या दह्याची चव अजूनही माझ्या तोंडात रेंगाळत आहे. एवढं अवीट गोडीचं दही माझ्या आयुष्यात यापूर्वी मी कधी खाल्लं नाही.. कुरुक्षेत्रावर अजरुनाला गीता सांगताना भगवान कृष्णांना मी प्रत्यक्ष पाहिलं आहे. गीता सांगतानाचा कृष्णांचा आवाज मी ऐकला आहे. अजून ते शब्द, तो आवाज माझ्या कानात घुमतो आहे.. तरी याला भ्रम कसं मानायचं?'' मला महत्प्रयासानं हे भ्रमच आहेत, असं समजावून सांगावं लागलं. त्या वेळी ठामपणे ते मी सांगितलंही. पण डीप ट्रान्समध्ये जो करश्रश्र्रीलळपरींळेपी चा अनुभव येतो तो एवढा खरा वाटतो, जिवंत वाटतो की त्याला खोटा ठरवणं, भ्रम मानणं शक्य होत नाही हे त्या वेळी माझ्या लक्षात आलं. त्यानंतर मी ठरवून टाकलं. यापुढे संमोहनात कधीही देवाचं करश्रश्र्रीलळपरींळेपी सांगायचं नाही. हेमामालिनीच्या बंगल्यावर एवढय़ा दूर जाणं शक्य नाही. तिच्या बंगल्यावर सिक्युरिटी असते. असा सहज प्रवेश मिळू शकत नाही. हे पटू शकतं. पण देव कुठेही, केव्हाही भक्ताला भेटू शकतो या श्रद्धेमुळं अशा अनुभवांना भक्त भ्रम समजू शकत नाही हे माझ्या तीव्रतेनं लक्षात आलं. त्यानंतर मी पाच हजारापेक्षा जास्त तरुण-तरुणींना डीप ट्रान्समध्ये टाकून त्यांच्यावर प्रयोग केले. त्यांचे अनुभव रेकॉर्ड केले. त्यानंतर गेली 22 वर्षे मुंबईतून महाराष्ट्रभर व्यावसायिक पद्धतीनं ''स्वसंमोहन व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळा'' चालवीत आहे. दीड लाख लोकं तरी कार्यशाळेत सहभागी झाले आहेत. ''सुंदर बागेत भटकता आहात.. सुंदर पक्षी, फुलं, हरणं, ससे, पिसारे फुलवलेले मोर आहेत.. टूमदार घरात शिरता आहात. हे एक तर्ळीरश्रळीरींळेप आणि समुद्रकिनारी पोहोचलात.. वाळूवर मोठय़ा बलूनला एक सुंदर झोपडी लटकली आहे. त्यात बसून अंतराळात जाता आहात.. समुद्रपक्षी.. पृथ्वीचा सुंदर गोल, चंद्र, मंगळ, गुरू, शनी सगळ्यांजवळून जाता आहात..'' हे दोन्ही अनुभव प्रत्येक कार्यशाळेतील विद्यार्थ्यांना देतो. त्यातील निम्मे लोकांना एकतर तर्ळीरश्रळीरींळेप होतं वा प्रत्यक्ष करश्रश्र्रीलळपरींळेपी होतं. अनेकांना हा अनुभव अद्भुत वाटतो. हेलावून टाकणारा, चक्रातून सोडणारा वाटतो, पण हा अनुभव खरा नाही.; हे केवळ भ्रम आहेत असं मी आधीपासून सांगत असल्यामुळं कुणाची फसगत होत नाही.25-35 टक्के लोकांना होऊ शकणारं इतकं खरं वाटतं की, तो भ्रम वाटतच नाही. पाचही इंद्रियांना अनुभव येतो. आपणच प्रत्यक्ष तिथे गेलो, पाचही इंद्रियांनी अनुभवून आलो असं वाटतं. माणसाच्या मनाच्या या सामर्थ्याचे खूप विधायक फायदेही आहेत आणि चलाख बदमाशांच्या हाती लागलं तर फसवणुकीसाठी वापरलं जाऊ शकणारं प्रभावी हत्यारसुद्धा आहे. कसं? पुढे पाहू. (लेखक श्याम मानव अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष आहेत.) भ्रमणध्वनी-9371014832 |
Subscribe to:
Posts (Atom)